श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ एकोनपञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
मुनिकुमारेभ्यः वाल्मीकेः सीतापार्श्व आगमनं, तेन तस्यै सान्त्वनाप्रदानं तस्याः स्वाश्रमे समानयनं च -
मुनिकुमारांकडून समाचार मिळून वाल्मीकिंचे सीतेजवळ येऊन तिचे सान्त्वन करणे आणि तिला आश्रमात घेऊन जाणे -
सीतां तु रुदतीं दृष्ट्‍वा ते तत्र मुनिदारकाः ।
प्राद्रवन्यत्र भगवान् आस्ते वाल्मीकिरुग्रधीः ॥ १ ॥
जेथे सीता रडत होती तेथून दूर थोड्‍याशा अंतरावरच ऋषिंचे काही बालक होते. तिला रडतांना पाहून ती मुले आपल्या आश्रमाकडे धावली, जेथे उग्र तपस्येमध्ये मन लावणारे भगवान्‌ वाल्मीकि मुनी विराजमान होते. ॥१॥
अभिवाद्य मुनेः पादौ मुनिपुत्रा महर्षये ।
सर्वं निवेदयामासुः तस्यास्तु रुदितस्वनम् ॥ २ ॥
त्या सर्व मुनिकुमारांनी महर्षिंच्या चरणी अभिवादन करून त्यांना सीतेच्या रडण्याचा समाचार ऐकवला. ॥२॥
अदृष्टपूर्वा भगवन् कस्याप्येषा महात्मनः ।
पत्‍नीर श्रीरिव सम्मोहाद् विरौति विकृतानना ॥ ३ ॥
ती म्हणाली - भगवन्‌ ! गंगेच्या तटावर कुणा महात्मा नरेशाची पत्‍नी आहे, जी साक्षात्‌ लक्ष्मीसमान वाटत आहे. तिला आम्ही पूर्वी कधी पाहिलेले नाही. ती मोहामुळे विकृत मुख होऊन रडत आहे. ॥३॥
भगवन् साधु पश्येस्त्वं देवतामिव खाच्च्युताम् ।
नद्यास्तु तीरे भगवन् वरस्त्री कापि दुःखिता ॥ ४ ॥
भगवन्‌ ! आपण स्वतः येऊन चांगल्याप्रकारे पहावे. ती आकाशांतून उतरलेल्या कुणा देवीसारखी दिसून येत आहे. प्रभो ! गंगेच्या तटावर ही जी कुणी सुंदर स्त्री बसलेली आहे. ती फार दुःखी आहे. ॥४॥
दृष्टास्माभिः प्ररुदिता दृढं शोकपरायणा ।
अनर्हा दुःखशोकाभ्यां एकां दीनां अनाथवत् ॥ ५ ॥
आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे की ती जोरजोराने रडत आहे आणि खोल शोकात बुडून गेली आहे. ती दुःख आणि शोक भोगण्यासाठी योग्य नाही आहे. एकटी आहे, दीन आहे आणि अनाथासारखी व्याकुळ झाली आहे. ॥५॥
न ह्येनां मानुषीं विद्मः सत्क्रियास्याः प्रयुज्यताम् ।
आश्रमस्याविदूरे च त्वामियं शरणं गता ॥ ६ ॥
आमच्या समजुतीप्रमाणे ही कोणी मानवी स्त्री नाही आहे. आपण हिचा सत्कार केला पाहिजे. या आश्रमापासून थोड्‍याच अंतरावर असल्याने ती वास्तविक आपल्याच आश्रयास आली आहे. ॥६॥
त्रातारमिच्छते साध्वी भगवंस्त्रातुमर्हसि ।
तेषां तु वचनं श्रुत्वा बुद्ध्या निश्चित्य धर्मवित् ॥ ७ ॥

तपसा लब्धचक्षुष्मान् प्राद्रवद् यत्र मैथिली ।
भगवन्‌ ! ही साध्वीदेवी स्वतःसाठी कोणी रक्षक शोधत आहे. म्हणून आपण हिचे रक्षण करावे. त्या मुनिकुमारांचे हे वचन ऐकून धर्मज्ञ महर्षिनी बुद्धिनी निश्चित करून सत्य गोष्ट जाणली, कारण की त्यांना तपस्येच्या द्वारा दिव्य दृष्टि प्राप्त झालेली होती. जाणतांच जेथे मैथिली सीता विराजमान होती त्या स्थानी ते धावतच आले. ॥७ १/२॥
तं प्रयान्तमभिप्रेत्य शिष्या ह्येनं महामतिम् ॥ ८ ॥

तं तु देशमभिप्रेत्य किञ्चित् पद्‌भ्यां महामतिः ।
अर्घ्यमादाय रुचिरं जाह्नवीतीरमागमत् ।
ददर्श राघवस्येष्टां सीतां पत्‍नी३मनाथवत् ॥ ९ ॥
त्या परम बुद्धिमान्‌ महर्षिना जातांना पाहून त्यांचे शिष्यही त्यांच्या बरोबर निघाले. पायी थोडे जाऊन ते महामति महर्षि सुंदर अर्घ्य घेऊन गंगातटवर्ती त्या स्थानावर आले. तेथे येऊन त्यांनी राघवांची प्रिय पत्‍नी सीतेला अनाथासारख्या दशेमध्ये पाहिले. ॥८-९॥
तां सीतां शोकभारार्तां वाल्मीकिर्मुनिपुङ्‌गवः ।
उवाच मधुरां वाणीं ह्लादयन्निव तेजसा ॥ १० ॥
शोकाच्या भाराने पीडित झालेल्या सीतेला आपल्या तेजाने आल्हादितशी करीत मुनिवर वाल्मीकि मधुर वाणीत बोलले - ॥१०॥
स्नुषा दशरथस्य त्वं रामस्य महिषी प्रिया ।
जनकस्य सुता राज्ञः स्वागतं ते पतिव्रते ॥ ११ ॥
पतिव्रते ! तू राजा दशरथांची पुत्रवधू, महाराजा श्रीरामांची प्रिय पट्‍टराणी आणि राजा जनकांची पुत्री आहेस ! तुझे स्वागत आहे. ॥११॥
आयान्ती चासि विज्ञाता मया धर्मसमाधिना ।
कारणं चैव सर्वं मे हृदयेनोपलक्षितम् ॥ १२ ॥
जेव्हा तू येथे येत होतीस तेव्हा आपल्या धर्म-समाधिद्वारा मला याचा पत्ता लागला होता. तुझ्या परित्यागाचे जे काही कारण आहे ते मी आपल्या मनानेच जाणले आहे. ॥१२॥
तव चैव महाभागे विदितं मम तत्त्वतः ।
सर्वं च विदितं मह्यं त्रैलोक्ये यद्धि वर्तते ॥ १३ ॥
महाभागे ! तुझा सारा वृत्तांत मी ठीक ठीक जाणला आहे. त्रैलोक्यात जे काही होत आहे ते सर्व मला विदित आहे. ॥१३॥
अपापां वेद्मि सीते त्वां तपोलब्धेन चक्षुषा ।
विस्रब्धा भव वैदेहि साम्प्रतं मयि वर्तसे ॥ १४ ॥
सीते ! मी तपस्येद्वारा प्राप्त झालेल्या दिव्य दृष्टिने जाणत आहे की तू निष्पाप आहेस. म्हणून वैदेही ! आता तू निश्चिंत हो. या समयी तू माझ्या जवळ आहेस. ॥१४॥
आश्रमस्याविदूरे मे तापस्यस्तपसि स्थिताः ।
तास्त्वां वत्से यथा वत्सं पालयिष्यन्ति नित्यशः ॥ १५ ॥
मुली ! माझ्या आश्रमाच्या जवळच काही तपस्वी स्त्रिया राहातात, ज्या तपस्येत संलग्न आहेत. त्या आपल्या मुलीप्रमाणे सदा तुझे पालन करतील. ॥१५॥
इदमर्घ्यं प्रतीच्छ त्वं विस्रब्धा विगतज्वरा ।
यथा स्वगृहमभ्येत्य विषादं चैव मा कृथाः ॥ १६ ॥
हा मी दिलेला अर्घ्य ग्रहण कर आणि निश्चिंत एवं निर्भय हो. आपल्याच घरात आली आहेस असे समजून विषाद करू नको. ॥१६॥
श्रुत्वा तु भाषितं सीता मुनेः परममद्‌भुतम् ।
शिरसावन्द्य चरणौ तथेत्याह कृताञ्जलिः ॥ १७ ॥
महर्षिचे हे अत्यंत अद्‍भुत भाषण ऐकून सीतेने त्यांच्या चरणी मस्तक नमवून प्रणाम केला आणि हात जोडून म्हटले - जशी आज्ञा ! ॥१७॥
तं प्रयान्तं मुनिं सीता प्राञ्जलिः पृष्ठतोऽन्वगात् ।
तं दृष्ट्‍वा मुनिमायान्तं वैदेह्या मुनिपत्‍नमयः ।
उपाजग्मुर्मुदा युक्ता वचनं चेदमब्रुवन् ॥ १८ ॥
तेव्हा मुनि पुढे पुढे निघाले आणि सीता हात जोडून त्यांच्या मागे निघाली. वैदेही बरोबर महर्षिना येतांना पाहून मुनीपत्‍नी त्यांच्याजवळ आल्या आणि अत्यंत प्रसन्नतेने याप्रकारे बोलल्या - ॥१८॥
स्वागतं ते मुनिश्रेष्ठ चिरस्यागमनं च ते ।
अभिवादयामस्त्वां सर्वा उच्यतां कि च कुर्महे ॥ १९ ॥
मुनिश्रेष्ठ ! आपले स्वागत आहे ! बर्‍याच दिवसानंतर येथे आपले शुभागमन झाले आहे. आम्ही सर्व आपल्याला अभिवादन करीत आहोत. सांगावे, आम्ही आपली काय सेवा करावी. ॥१९॥
तासां तद्वचनं श्रुत्वा वाल्मीकिरिदमब्रवीत् ।
सीतेयं समनुप्राप्ता पत्‍नी रामस्य धीमतः ॥ २० ॥
त्यांचे हे वचन ऐकून वाल्मीकी म्हणाले - ही परम बुद्धिमान्‌ राजा श्रीरामांची धर्मपत्‍नी सीता येथे आली आहे. ॥२०॥
स्नुषा दशरथस्यैषा जनकस्य सुता सती ।
अपापा पतिना त्यक्ता परिपाल्या मया सदा ॥ २१ ॥
सती सीता राजा दशरथांची पुत्रवधू आणि जनकांची पुत्री आहे. निष्पाप असूनही पतिने हिचा परित्याग केला आहे म्हणून मलाच हिचे लालन-पालन करावयाचे आहे. ॥२१॥
इमां भवन्त्यः पश्यन्तु स्नेहेन परमेण हि ।
गौरवान्मम वाक्याच्च पूज्या वोऽस्तु विशेषतः ॥ २२ ॥
म्हणून आपण सर्व लोकांनी हिच्यावर अत्यंत स्नेहदृष्टि ठेवावी. माझ्या सांगण्यावरून तसेच आपल्याच गौरवानेही ही आपल्याला विशेष आदरणीया आहे. ॥२२॥
मुहुर्मुहुश्च वैदेहीं प्रणिधाय महायशाः ।
स्वमाश्रमं शिष्यवृतः पुनरायान्महातपाः ॥ २३ ॥
याप्रकारे वारंवार सीतेला मुनिपत्‍नींच्या हाती सोपवून महायशस्वी तसेच महातपस्वी वाल्मीकी शिष्यांसह परत आपल्या आश्रमात परत आले. ॥२३॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे एकोनपञ्चाशः सर्गः ॥ ४९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा एकोणपन्नासावा सर्ग पूरा झाला. ॥४९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP