[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। सप्तसप्ततितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
भरतेन पितुः श्राद्धे ब्राह्मणेभ्यो बहुधनरत्‍नप्रभृतीनां दानं त्रयोदशे दिनेऽस्थिसंचयस्य शिष्टं कार्यं पूरयितुं पितुश्चिताभूमौ गत्वा भरतशत्रुघ्नयोर्विलापो, वसिष्ठसुमन्त्राभ्यां तयोराश्वासनं च -
भरतानी पित्याच्या श्राद्धात ब्राह्मणांना खूप धन-रत्‍ने आदिंचे दान देणे, तेराव्या दिवशी अस्थि संचयाचे शेष कार्य पूर्ण करण्यासाठी पित्याच्या चिता भूमीवर जाऊन भरत आणि शत्रुघ्न यांचे विलाप करणे आणि वसिष्ठ तसेच सुमन्त्रांनी त्यांना समजाविणे -
ततो दशाहेऽतिगते कृतशौचो नृपात्मजः ।
द्वादशेऽहनि सम्प्राप्ते श्राद्धकर्माण्यकारयत् ॥ १ ॥
त्यानंतर दहा दिवस निघून गेल्यावर राजकुमार भरताने अकराव्या दिवशी आत्मशुद्धिसाठी स्नान करून एकादशाह श्राद्धाचे अनुष्ठान केले आणि नंतर बारावा दिवस आल्यावर त्यांनी अन्य श्राद्ध कर्म (मासिक आणि सपिण्डीकरण श्राद्ध) केले. ॥ १॥
ब्राह्मणेभ्यो ददौ रत्‍नं ददावन्नं च पुष्कलम् ।
वासांसि च महार्हाणि रत्‍नानि विविधानि च ।
वास्तिकं बहु शुक्लं च गाश्चापि शतशस्तदा ॥ २ ॥
त्यामध्ये भरतांनी ब्राह्मणांना धन, रत्‍ने, प्रचुर अन्न, बहुमूल्य वस्त्रे, नाना प्रकारची रत्‍ने, बरेचसे बोकड, चांदी आणि बर्‍याच गाई दान दिल्या. ॥ २ ॥
दासीर्दासांश्च यानानि वेश्मानि सुमहान्ति च ।
ब्राह्मणेभ्यो ददौ पुत्रो राज्ञस्तस्यौर्ध्वदेहिकम् ॥ ३ ॥
राजपुत्र भरताने राजाच्या पारलौकिक हितासाठी बर्‍याचशा दास-दासी, वाहने मोठ्मोठी घरेही ब्राह्मणांना दिली. ॥ ३॥
ततः प्रभातसमये दिवसे च त्रयोदशे ।
विललाप महाबाहुर्भरतः शोकमूर्च्छितः ॥ ४ ॥
त्यानंतर तेराव्या दिवशी प्रभात समयी महाबाहु भरत शोकाने मूर्च्छित होऊन विलाप करू लागले. ॥ ४॥
शब्दापिहितकण्ठस्तु शोधनार्थमुपागतः ।
चितामूले पितुर्वाक्यं इदमाह सुदुःखितः ॥ ५ ॥

तात यस्मिन् निसृष्टोऽहं त्वया भ्रातरि राघवे ।
तस्मिन् वनं प्रव्रजिते शून्ये त्यक्तोऽस्म्यहं त्वया ॥ ६ ॥
त्या समयी रडण्यामुळे त्यांचा कंठ दाटून आला होता. ते पित्याच्या चितास्थानावर अस्थिसंचयासाठी आले आणि अत्यंत दुःखी होऊन याप्रकारे म्हणू लागले - ’तात! आपण मला ज्या ज्येष्ठ भ्राता राघवाच्या हाती सोपविले होते, ते वनात निघून गेल्यावर आपण मला शून्यातच सोडून दिले आहे. (यासमयी मला कुणाचाही आधार नाही. ) ॥ ५-६॥
यस्या गतिरनाथायाः पुत्रः प्रव्राजितो वनम् ।
तामम्बां तात कौसल्यां त्यक्त्वा त्वं क्व गतो नृप ॥ ७ ॥
’तात ! नरेश्वर! ज्या अनाथ झालेल्या देवीचा एकमात्र आधार असलेल्या पुत्राला आपण वनात धाडून दिले आहे त्या माता कौसल्येला सोडून आपण कोठे निघून गेलात ? ॥ ७॥
दृष्ट्‍वा भस्मारुणं तच्च दग्धास्थि स्थानमण्डलम् ।
पितुः शरीरनिर्वाणं निष्टनन् विषसाद सः ॥ ८ ॥
पित्याच्या चितेचे ते स्थानमंडल भस्माने भरलेले होते आणि अत्यंत उष्णतेमुळे किञ्चित लाल दिसत होते. तेथे पित्याच्या जळलेल्या अस्थि (हाडे) विखरून पडलेल्या होत्या. पित्याच्या शरीराच्या निर्वाहाचे ते स्थान पाहून भरत अत्यंत विलाप करीत शोकात बुडून गेले. ॥ ८॥
स तु दृष्ट्‍वा रुदन् दीनः पपात धरणीतले ।
उत्थाप्यमानः शक्रस्य यन्त्रध्वज इवोच्छ्रितः ॥ ९ ॥
त्या स्थानाला पाहातांच ते दीनभावाने रडत जमिनीवर पडले. जणु काही इंद्राचा यन्त्रबद्ध उंच ध्वज वर वर उचलला जात असता एकाएकी खाली घसरून पडावा तसे ते भासले. ॥ ९॥
अभिपेतुस्ततः सर्वे तस्यामात्याः शुचिव्रतम् ।
अन्तकाले निपतितं ययातिमृषयो यथा ॥ १० ॥
पुण्याचा अंत होऊन स्वर्गातून पतन पावलेल्या राजा ययातिच्या जवळ अष्टक आदि राजर्षि ज्याप्रमाणे आले होते त्याप्रमाणे त्या पवित्रव्रत धारण करणार्‍या भरतांजवळ त्यांचे सर्व मंत्री येऊन पोहोंचले. ॥ १०॥
शत्रुघ्नश्चापि भरतं दृष्ट्‍वा शोकपरिप्लुतम् ।
विसंज्ञो न्यपतद्‌भूमौ भूमिपालमनुस्मरन् ॥ ११ ॥
भरतांना शोकात बुडालेले पाहून शत्रुघ्नही आपला पिता दशरथ महाराज यांचे वारंवार स्मरण करीत निश्चेष्ट होऊन पृथ्वीवर पडले. ॥ ११॥
उन्मत्त इव निश्चित्तो विललाप सुदुःखितः ।
स्मृत्वा पितुर्गुणाङ्‌गानि तानि तानि तदा तदा ॥ १२ ॥
ते वेळोवेळी अनुभव आलेल्या पित्याच्या लालन-पालन संबंधी त्या त्या गुणांचे स्मरण करून अत्यंत दुःखी होऊन शुद्ध हरपून उन्मत्ताप्रमाणे विलाप करू लागले. ॥ १२॥
मन्थराप्रभवस्तीव्रः कैकेयीग्राहसङ्‌कुलः ।
वरदानमयोऽक्षोभ्योऽमज्जयच्छोकसागरः ॥ १३ ॥
’हाय ! मंथरेपासून ज्याचे प्राकट्य झाले आहे, कैकेयीरूपी ग्राहाने जो व्याप्त आहे आणि जो कुठल्याही प्रकारे नष्ट केला जाऊ शकत नाही त्या वरदानमय शोकरुपी उग्र समुद्राने आम्हा सर्व लोकांना आपल्या आत निमग्न करून टाकले आहे. ॥ १३॥
सुकुमारं च बालं च सततं लालितं त्वया ।
क्व तात भरतं हित्वा विलपन्तं गतो भवान् ॥ १४ ॥
’तात ! आपण सदा ज्याचे लाड केलेले आहेत आणि जो सुकुमार आणि बालक आहे त्या रडून विलाप करणार्‍या भरताला सोडून आपण कोठे निघून गेला आहात ? ॥ १४॥
ननु भोज्येषु पानेषु वस्त्रेष्वाभरणेषु च ।
प्रवारयति सर्वान् नस्तन्नः कोऽद्य करिष्यति ॥ १५ ॥
’भोजन, पान, वस्त्रें आणि आभूषणे- या सर्वांचा अधिक संख्येमध्ये संग्रह करून आपण आम्हां सर्वांना आपापल्या रूचिप्रमाणे त्या वस्तु ग्रहण करण्यास सांगत होता. आता आमच्यासाठी अशी व्यवस्था कोण करील ? ॥ १५॥
अवदारणकाले तु पृथिवी नावदीर्यते ।
या विहीना या त्वया राज्ञा धर्मज्ञेन महात्मना ॥ १६ ॥
’आपल्या सारख्या धर्मज्ञ महात्मा राजाच्या विरहित झाल्यावर खरेतर पृथ्वी विदीर्ण होत नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे. ॥ १६॥
पितरि स्वर्गमापन्ने रामे चारण्यमाश्रिते ।
किं मे जीवितसामर्थ्यं प्रवेक्ष्यामि हुताशनम् ॥ १७ ॥
’पिता स्वर्गवासी झाले आणि राम वनात निघून गेले आता माझ्यात जिवंत राहाण्याची शक्ति तरी कोठे आहे ? आता तर मी अग्नितच प्रवेश करीन. ॥ १७॥
हीनो भ्रात्रा च पित्रा च शून्यामिक्ष्वाकुपालिताम् ।
अयोध्यां न प्रवेक्ष्यामि प्रवेक्ष्यामि तपोवनम् ॥ १८ ॥
’मोठे बंधु आणि पिता यांच्या शिवाय हीन होऊन इक्ष्वाकुवंशी नरेशांच्या द्वारा पालित या शून्य अयोध्येत मी प्रवेश करणार नाही, मी तपोवनातच निघून जाईन. ॥ १८॥
तयोर्विलपितं श्रुत्वा व्यसनं चाप्यवेक्ष्य तत् ।
भृशमार्ततरा भूयः सर्व एवानुगामिनः ॥ १९ ॥
त्या दोघांचा विलाप ऐकून आणि त्या संकटास पाहून समस्त अनुचर वर्गातील लोक पुन्हा अत्यंत शोकाने व्याकुळ होऊन गेले. ॥ १९॥
ततो विषण्णौ श्रान्तौ च शत्रुघ्नभरतावुभौ ।
धरायां स्म व्यचेष्टेतां भग्नशृङ्‌गाविवर्षभौ ॥ २० ॥
त्यासमयी भरत आणि शत्रुघ्न हे दोघे भाऊ विषादग्रस्त आणि श्रांत (थकून) होऊन शिंगे तुटलेल्या दोन बैलांप्रमाणे पृथ्वीवर लोळू लागले. ॥ २०॥
ततः प्रकृतिमान् वैद्यः पितुरेषां पुरोहितः ।
वसिष्ठो भरतं वाक्यमुत्थाप्य तमुवाच ह ॥ २१ ॥
त्यानंतर दैवी प्रकृतीने युक्त आणि सर्वज्ञ वसिष्ठ जे या श्रीराम आदिंच्या पित्याचे पुरोहित होते, भरताला उठवून त्याला याप्रमाणे बोलले - ॥ २१॥
त्रयोदशोऽयं दिवसः पितुर्वृत्तस्य ते विभो ।
सावशेषास्थिनिचये किमिह त्वं विलम्बसे ॥ २२ ॥
’प्रभो ! तुमच्या पित्याचा दाहसंस्कार होऊन आज तेरावा दिवस आहे, आता अस्थिसंचयाचे जे शेष कार्य आहे ते करण्यास तुम्ही येथे विलम्ब का बरे लावित आहात ? ॥ २२॥
त्रीणि द्वन्द्वानि भूतेषु प्रवृत्तान्यविशेषतः ।
तेषु चापरिहार्येषु नैवं भवितुमर्हसि ॥ २३ ॥
’भूक-तहान, शोक-मोह, तसेच जरा-मृत्यु - ही तीन शब्दे सर्व प्राण्यांना समान रूपाने उपलब्ध होतात. त्यांना अडविणे सर्वथा असंभव आहे- अशा स्थितित तुम्ही याप्रकारे शोकाकुल होता कामा नये. ॥ २३॥
सुमन्त्रश्चापि शत्रुघ्नमुत्थाप्याभिप्रसाद्य च ।
श्रावयामास तत्त्वज्ञः सर्वभूतभवाभवौ ॥ २४ ॥
तत्वज्ञ सुमन्त्रांनीही शत्रुघ्नाला उठवून त्याच्या चित्तास शांत केले तसेच समस्त प्राण्यांच्या जन्म-मरणाच्या अनिवार्यतेचा उपदेश ऐकविला. ॥ २४॥
उत्थितौ तौ नरव्याघ्रौ प्रकाशेते यशस्विनौ ।
वर्षातपपरिग्लानौ पृथगिन्द्रध्वजाविव ॥ २५ ॥
त्यावेळी उठून बसलेले ते दोघे यशस्वी नरश्रेष्ठ पाऊस आणि ऊन यांनी मलिन झालेल्या दोन वेगवेगळ्या इंद्रध्वजांप्रमाणे प्रकाशित होत होते. ॥ २५॥
अश्रूणि परिमृद्‌गन्तौ रक्ताक्षौ दीनभाषिणौ ।
अमात्यास्त्वरयन्ति स्म तनयौ चापराः क्रियाः ॥ २६ ॥
ते अश्रु पुसत दीन वाणीने बोलत होते. त्या दोघांचे डोळे लाल झाले होते. तसेच मंत्री लोक त्या दोन्ही राजकुमारांना निरनिराळ्या क्रिया लवकर करण्यासाठी प्रेरित करीत होते. ॥ २६॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे सप्तसप्ततितमः सर्गः ॥ ७७ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा सत्याहत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥ ७७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP