[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। चतुर्थः सर्गः
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्वो रामाभिषेकं निश्चित्य राज्ञा सुमन्त्रं प्रेष्य तेन समानितं श्रीरामं प्रति किञ्चिदावश्यकं निवेद्य तस्य स्वगृहे प्रस्थापनं, श्रीरामेण कौसल्याभवनं गत्वा मातरं प्रति स्वाभिषेकवृत्तस्य सूचनं मातुराशिषं प्राप्य लक्ष्मणेनसह प्रेमपूर्वकं वार्तालापं कृत्वा स्वकीये भवने तस्य गमनम् - श्रीरामास राज्य देण्याचा निश्चय करुन राजाने सुमंत्र द्वारा पुन्हा श्रीरामास बोलावून त्यांना आवश्यक गोष्टी सांगणे, श्रीरामांचे कौसल्येच्या भवनास जाऊन मातेला हा समाचार सांगणे आणि मातेकडून आशीर्वाद मिळवून लक्ष्मणाशी प्रेमपूर्वक वार्तालाप करुन आपल्या महालात जाणे -
गतेष्वथ नृपो भूयः पौरेषु सह मन्त्रिभिः ।
मन्त्रयित्वा ततश्चक्रे निश्चयज्ञः स निश्चयम् ॥ १ ॥

श्व एव पुष्यो भविता श्वोऽभिषेच्यस्तु मे सुतः ।
रामो राजीवपत्राक्षो युवराज इति प्रभुः ॥ २ ॥
राजसभेतून पुरवासी निघून गेल्यावर कार्यसिद्धीस योग्य अशा देश-कालांचे नियम जाणणार्‍या प्रभावशाली नरेशानी पुन्हा मंत्र्यांबरोबर सल्ला-मसलत करून हा निश्चय केला की 'उद्याच पुष्य नक्षत्र असेल म्हणून उद्याच मला आपला पुत्र कमलनयन राम यांचा युवराज पदावर अभिषेक केला पाहिजे'. ॥१-२॥
अथान्तर्गृहमाविश्य राजा दशरथस्तदा ।
सूतं आमन्त्रयामास रामं पुनरिहानय ॥ ३ ॥
त्यानंतर अंतःपुरात जाऊन महाराज दशरथांनी सूतास बोलाविले आणि आज्ञा दिली - 'जा रामाला पुन्हा एक वेळ येथे बोलावून आणा.' ॥३॥
प्रतिगृह्य तु तद्वाक्यं सूतः पुनरुपाययौ ।
रामस्य भवनं शीघ्रं राममानयितुं पुनः ॥ ४ ॥
त्यांची आज्ञा शिरोधार्य करुन सुमंत्र शीघ्र रामास बोलावून आणण्यासाठी पुन्हां त्यांच्या महालात गेले. ॥४॥
द्वाःस्थैरावेदितं तस्य रामायागमनं पुनः ।
श्रुत्वैव चापि रामस्तं प्राप्तं शङ्‌‍कान्वितोऽभवत् ॥ ५ ॥
द्वारपालांनी रामांना सुमंत्रांच्या पुनरागमनाची (वार्ता) सूचना दिली. त्यांचे आगमन झाल्याचे ऐकताच रामांच्या मनात संदेह उत्पन्न झाला. ॥५॥
प्रवेश्य चैनं त्वरितो रामो वचनमब्रवीत् ।
यदागमनकृत्यं ते भूयस्तद्‍ब्रूह्यशेषतः ॥ ६ ॥
त्यांना आत बोलवून रामांनी मोठ्या उतावळेपणाने विचारले - 'आपल्याला पुन्हा येथे येण्याची काय आवश्यकता उत्पन्न झाली ? हे पूर्णरूपाने सांगा ! ॥६॥
तमुवाच ततः सूतो राजा त्वां द्रष्टुमिच्छति ।
श्रुत्वा प्रमाणं तत्र त्वं गमनायेतराय वा ॥ ७ ॥
तेव्हा सूतांनी त्यांना म्हटले - 'महाराज आपल्याला भेटू इच्छितात. माझे हे म्हणणे ऐकून तेथे जावयाचे की नाही याचा निर्णय आपण स्वतः करावा.' ॥७॥
इति सूतवचः श्रुत्वा रामोऽपि त्वरयान्वितः ।
प्रययौ राजभवनं पुनर्द्रष्टुं नरेश्वरम् ॥ ८ ॥
सूताचे हे वचन ऐकून राम महाराज दशरथांचे पुन्हा दर्शन करण्यासाठी तात्काळ त्यांच्या महालाकडे निघाले. ॥८॥
तं श्रुत्वा समनुप्राप्तं रामं दशरथो नृपः ।
प्रवेशयामास गृहं विवक्षुः प्रियमुत्तमम् ॥ ९ ॥
राम आले आहेत हे ऐकून राजा दशरथांनी त्यांना प्रिय तथा उत्तम गोष्ट सांगण्यासाठी महालाच्या आत बोलावून घेतले. ॥९॥
प्रविशन्नेव च श्रीमान् राघवो भवनं पितुः ।
ददर्श पितरं दूरात् प्रणिपत्य कृताञ्जलिः ॥ १० ॥
पित्याच्या भवनात प्रवेश करताच श्रीमान राघवांनी त्यांना पाहिले आणि दुरूनच हात जोडून त्यांच्या चरणांवर पडले. ॥१०॥
प्रणमन्तं तमुत्थाप्य सम्परिष्वज्य भूमिपः ।
प्रदिश्य चासनं चास्मै रामं च पुनरब्रवीत् ॥ ११ ॥
प्रणाम करणार्‍या रामांना उठवून महाराजांनी छातीशी धरले आणि त्यांना बसण्यासाठी आसन देऊन पुन्हा त्यांच्याशी याप्रकारे बोलण्यास आरंभ केला- ॥११॥
राम वृद्धोऽस्मि दीर्घायुः भुक्ता भोगा यथेप्सिताः ।
अन्नवद्‌भिः क्रतुशतैर्यथेष्टं भूरिदक्षिणैः ॥ १२ ॥
"रामा ! आता मी वृद्ध झालो आहे. माझे वय बरेच अधिक झालेले आहे. मी बरेचसे (अनेक) मनोवाञ्छित भोग भोगले आहेत, अन्न आणि भरपूर दक्षिणांनी युक्त शेंकडो यज्ञही केले आहेत. ॥१२॥
जातमिष्टमपत्यं मे त्वमद्यानुपमं भुवि ।
दत्तमिष्टमधीतं च मया पुरुषसत्तम ॥ १३ ॥
'पुरषोत्तम ! तू मला परम प्रिय अभीष्ट संतानाच्या रूपांत प्राप्त झाला आहेस की ज्याला या भूमण्डलात कोठे उपमा नाही. मी दान यज्ञ आणि स्वाध्याय ही केले आहेत. ॥१३॥
अनुभूतानि चेष्टानि मया वीर सुखान्यपि ।
देवर्षिपितृविप्राणामनृणोऽस्मि तथाऽऽत्मनः ॥ १४ ॥
'वीरा ! मी अभीष्ट सुखांचाही अनुभव घेतलेला आहे. मी देवता, ऋषि, पितर आणि ब्राह्मणांच्या तथा आपल्याही ऋणांतून उऋण (मुक्त) झालो आहे. ॥१४॥
न किञ्चिन्मम कर्त्तव्यं तवान्यत्राभिषेचनात् ।
अतो यत्त्वामहं ब्रूयां तन्मे त्वं कर्तुमर्हसि ॥ १५ ॥
आता तुला युवराज-पदावर अभिषिक्त करण्याशिवाय आणखी कोणतेही कर्तव्य माझ्यासाठी शेष राहिलेले नाही म्हणून मी तुला जे काही सांगत आहे, त्या माझ्या आज्ञेचे पालन तुला केले पाहिजे. ॥१५॥
अद्य प्रकृतयः सर्वास्त्वामिच्छन्ति नराधिपम् ।
अतस्त्वां युवराजानमभिषेक्ष्यामि पुत्रक ॥ १६ ॥
'पुत्रा ! (मुला !) आता सारी प्रजा तुला आपला राजा बनवू इच्छित आहे. म्हणून मी तुला युवराजपदावर अभिषिक्त करीन." ॥१६॥
अपि चाद्याशुभान् राम स्वप्नान् पश्यामि राघव ।
सनिर्घाता दिवोल्काश्च पतन्ति हि महास्वनाः ॥ १७ ॥
'हे राघवा ! रामा ! आजकाल मला फार वाईट स्वप्ने पडत आहेत. दिवसा वज्रपाता बरोबरच फार भयंकर शब्द करणार्‍या उल्काही खाली पडत आहेत. ॥१७॥
अवष्टब्धं च मे राम नक्षत्रं दारुणग्रहैः ।
आवेदयन्ति दैवज्ञाः सूर्याङ्‌‍गारकराहुभिः ॥ १८ ॥
'रामा ! ज्योतिषांचे म्हणणे आहे की माझ्या जन्मनक्षत्राला सूर्य, मंगळ, आणि राहू नामक भयंकर ग्रहांनी आक्रांत केलेले आहे. ॥१८॥
प्रायेण हि निमित्तानामीदृशानां समुद्‍भवे ।
राजा हि मृत्युमाप्नोति घोरां चापदमृच्छति ॥ १९ ॥
अशा अशुभ लक्षणांचे प्राकट्य झाल्यावर प्रायः राजा घोर आपत्तीत पडतो आणि अंततोगत्वा त्याचा मृत्यु ही होऊन जातो. ॥१९॥
तद् यावदेव मे चेतो न विमुह्यति राघव ।
तावदेवाभिषिञ्चस्व चला हि प्राणिनां मतिः ॥ २० ॥
म्हणून राघवा ! जोपर्यंत माझ्या चित्तात मोह उत्पन्न झालेला नाही, तोपर्यंतच (तत्पूर्वीच) तू युवराज पदावर आपला अभिषेक करुन घे, कारण की प्राण्यांची बुद्धी चञ्चल असते. ॥२०॥
अद्य चन्द्रोऽभ्युपगमत् पुष्यात् पूर्वं पुनर्वसुम् ।
श्वः पुष्ययोगं नियतं वक्ष्यन्ते दैवचिन्तकाः ॥ २१ ॥
आज चंद्रमा पुष्याच्या आधीच्या एका पुनर्वसु नक्षत्रावर विराजमान आहे म्हणून निश्चितच उद्या तो पुष्यनक्षत्रावर राहील असे ज्योतिषी म्हणत आहेत'. ॥२१॥
तत्र पुष्येऽभिषिञ्चस्व मनस्त्वरयतीव माम् ।
श्वस्त्वाहमभिषेक्ष्याभि यौवराज्ये परंतप ॥ २२ ॥
म्हणून या पुष्य नक्षत्रावरच तू आपला अभिषेक करवून घे. हे परंतप ! माझे मन मला या कार्यात खूप शीघ्रता (घाई) करण्यास सांगत आहे. या कारणाने मी उद्या तुझा अवश्य युवराज पदावर अभिषेक करुन देईन. ॥२२॥
तस्मात् त्वयाद्यप्रभृति निशेयं नियतात्मना ।
सह वध्वोपवस्तव्या दर्भप्रस्तरशायिना ॥ २३ ॥
म्हणून तू आत्ता या वेळेपासूनच सारी रात्र इंद्रियसंयम पूर्वक राहून वधू सीतेसह उपवास कर आणि कुशाच्या (दर्भाच्या) शय्येवर झोप. ॥२३॥
सुहृदश्चाप्रमत्तास्त्वां रक्षन्त्वद्य समन्ततः ।
भवन्ति बहुविघ्नानि कार्याण्येवंविधानि हि ॥ २४ ॥
"आज तुझे सुहृद सावध राहून सर्व बाजूंनी तुमचे रक्षण करोत, कारण या प्रकारच्या शुभ कार्यात अनेक प्रकारची विघ्ने येण्याची संभावना राहात असते. ॥२४॥
विप्रोषितश्च भरतो यावदेव पुरादितः ।
तावदेवाभिषेकस्ते प्राप्तकालो मतो मम ॥ २५ ॥
'जोपर्यंत भरत या नगराबाहेर आपल्या मामाच्या येथे निवास करीत आहे, तो पर्यंतच तुझा अभिषेक होऊन जाणे मला उचित प्रतित होत आहे. ॥२५॥
कामं खलु सतां वृत्ते भ्राता ते भरतः स्थितः ।
जेष्ठानुवर्ती धर्मात्मा सानुक्रोशो जितेन्द्रियः ॥ २६ ॥

किं नु चित्तं मनुष्याणामनित्यमिति मे मतम् ।
सतां च धर्मनित्यानां कृतशोभि च राघव ॥ २७ ॥
यात संदेह नाही की तुझा भाऊ भरत सत्पुरुषांच्या आचार-व्यवहारात स्थित आहे, आपल्या मोठ्या भावाचे अनुसरण करणारा, धर्मात्मा, दयाळू आणि जितेंद्रिय आहे. तथापि मनुष्यांचे चित्त प्रायः स्थिर राहात नाही, असे माझे मत आहे. राघवा ! धर्मपरायण सत्पुरुषांचे मनही विभिन्न कारणांनी राग-द्वेषादिंनी संयुक्त होऊन जाते. ॥२६-२७॥
इत्युक्तः सोऽभ्यनुज्ञातः श्वोभाविन्यभिषेचने ।
व्रजेति रामः पितरमभिवाद्याभ्ययाद् गृहम् ॥ २८ ॥
राजांनी याप्रकारे सांगितल्यावर आणि दुसरे दिवशी होणार्‍या राज्याभिषेका निमित्त व्रतपालना साठी जाण्याची आज्ञा दिल्यावर रामाने पित्याला प्रणाम केला आणि ते परत आपल्या महालात गेले. ॥२८॥
प्रविश्य चात्मनो वेश्म राज्ञाऽऽदिष्टेऽभिषेचने ।
तत्क्षणादेव निष्क्रम्य मातुरन्तःपुरं ययौ ॥ २९ ॥
राजाने राज्याभिषेकासाठी व्रतपालनाच्या निमित्ताने जी आज्ञा दिली होती ती सीतेला सांगण्यासाठी आपल्या महालात प्रवेश करून जेव्हा श्रीरामांना तेथे सीता दिसली नाही तेव्हा ते तात्काळ तेथून बाहेर निघून मातेच्या अंतःपुरात निघून गेले. ॥२९॥
तत्र तां प्रवणामेव मातरं क्षौमवासिनीम् ।
वाग्यतां देवतागारे ददर्शायाचतीं श्रियम् ॥ ३० ॥
तेथे जाऊन त्यांनी पाहिले की माता कौसल्या रेशमी वस्त्र नेसून मौन राहून देवमंदिरात बसून देवतांची आराधना करीत आहे आणि पुत्रासाठी राजलक्ष्मीची याचना करत आहे. ॥३०॥
प्रागेव चागता तत्र सुमित्रा लक्ष्मणस्तथा ।
सीता चानयिता श्रुत्वा प्रियं रामाभिषेचनम् ॥ ३१ ॥
रामाच्या राज्याभिषेकाचा प्रिय समाचार ऐकून सुमित्रा आणि लक्ष्मण पहिल्यानेच तेथे आलेले होते आणि नंतर सीतेला ही तेथे बोलावण्यात आले होते. ॥३१॥
तस्मिन् कालेऽपि कौसल्या तस्थावामीलितेक्षणा ।
सुमित्रयान्वास्यमाना सीतया लक्ष्मणेन च ॥ ३२ ॥
राम जेव्हा तेथे पोहोंचले त्या समयी ही, कौसल्या डोळे बंद करुन ध्यान लावून बसलेली होती, आणि सुमित्रा, सीता आणि लक्ष्मण तिच्या सेवेत सर्व उभी होती. ॥३२॥
श्रुत्वा पुष्ये च पुत्रस्य यौवराज्येऽभिषेचनम् ।
प्राणायामेन पुरुषं ध्यायमाना जनार्दनम् ॥ ३३ ॥
पुष्य नक्षत्राच्या योगावर पुत्राची युवराजपदावर अभिषिक्त होण्याची गोष्ट ऐकून ती त्याचा मंगलकामनेने प्राणायाम द्वारा परम पुरुष नारायणाचे ध्यान करीत होती. ॥३३॥
तथा सनियमामेव सोऽभिगम्याभिवाद्य च ।
उवाच वचनं रामो हर्षयंस्तामिदं वरम् ॥ ३४ ॥
याप्रकारे नियम पालनात दंग असलेल्या मातेच्या निकट त्याच अवस्थेत जाऊन रामांनी तिला प्रणाम केला आणि तिला हर्ष प्रदान करीत ही श्रेष्ठ गोष्ट सांगितली - ॥३४॥
अम्ब पित्रा नियुक्तोऽस्मि प्रजापालनकर्मणि ।
भविता श्वोऽभिषेको मे यथा मे शासनं पितुः ॥ ३५ ॥

सीतयाप्युपवस्तव्या रजनीयं मया सह ।
एवमुक्तमुपाध्यायैः सह मामुक्तवान् पिता ॥ ३६ ॥
'माते ! पित्याने मला प्रजापालनाच्या कर्मात नियुक्त केले आहे. उद्या माझा अभिषेक होईल. माझ्यासाठी पित्याचा जसा आदेश आहे त्यास अनुसरून सीतेलाही माझ्या बरोबर या रात्री उपवास करावा लागेल. उपाध्यायांनी असे सांगितले होते, जे पित्यांनी मला सांगितले आहे. ॥३५-३६॥
यानि यान्यत्र योग्यानि श्वोभाविन्यभिषेचने ।
तानि मे मङ्‌‍गलान्यद्य वैदेह्याश्चैव कारय ॥ ३७ ॥
म्हणून उद्या होणार्‍या अभिषेकाच्या निमित्ताने आज माझ्यासाठी आणि सीतेसाठी जे जे मंगलकार्य आवश्यक असेल, ते सर्व करवावे'. ॥३७॥
एतच्छ्रुत्वा तु कौसल्या चिरकालाभिकाङ्‌‍क्षितम् ।
हर्षबाष्पाकुलं वाक्यमिदं राममभाषत ॥ ३८ ॥
चिरकालापासून मातेच्या हृदयात ज्या गोष्टीची अभिलाषा होती तिची पूर्ती सूचित करणारी ही गोष्ट ऐकून माता कौसल्येने आनंदाश्रु गळत असतां गद्‍गद कण्ठाने या प्रकारे म्हटले - ॥३८॥
वत्स राम चिरं जीव हतास्ते परिपन्थिनः ।
ज्ञातीन् मे त्वं श्रिया युक्तः सुमित्रायाश्च नन्दय ॥ ३९ ॥
'वत्स राम ! चिरंजीवी हो ! तुझ्या मार्गात विघ्न आणणारे शत्रु नष्ट होऊन जावोत. तू राजलक्ष्मीने युक्त होऊन माझ्या आणि सुमित्रेच्या बंधु-बांधवांना आनंदित कर. ॥३९॥
कल्याणे बत नक्षत्रे मयि जातोऽसि पुत्रक ।
येन त्वया दशरथो गुणैराराधितः पिता ॥ ४० ॥
'पुत्रा ! तू माझ्या द्वारे कुठल्या तरी मंगलमय नक्षत्रास उत्पन्न झाला आहेस, की ज्याच्या योगे तू आपल्या गुणांच्या द्वारे पिता दशरथ यांना प्रसन्न करुन घेतले आहेस. ॥४०॥
अमोघं बत मे क्षान्तं पुरुषे पुष्करेक्षणे ।
येयमिक्ष्वाकुराजश्रीः पुत्र त्वां संश्रयिष्यति ॥ ४१ ॥
'मोठ्या आनंदाची गोष्ट आहे कि मी कमलनयन भगवान विष्णुंच्या प्रसन्नतेसाठी जे व्रत-उपवास आदि केले होते ते आज सफल झाले आहे. मुला ! त्याचाच फलाने ही इक्ष्वाकुकुलाची राजलक्ष्मी तुला प्राप्त होणार आहे'. ॥४१॥
इत्येवमुक्तो मात्रा तु रामो भ्रातरमब्रवीत् ।
प्राञ्जलिं प्रह्वमासीनमभिवीक्ष्य स्मयन्निव ॥ ४२ ॥
मातेने असे म्हटल्यावर रामांनी विनीतभावाने हात जोडून उभ्या असलेल्या आपला भाऊ लक्ष्मण याच्याकडे पाहून हसत हसत म्हटले - ॥४२॥
लक्ष्मणेमां मया सार्द्धं प्रशाधि त्वं वसुंधराम् ।
द्वितीयं मेऽन्तरात्मानं त्वामियं श्रीरुपस्थिता ॥ ४३ ॥
'लक्ष्मणा ! तू माझ्या बरोबर या पृथ्वीच्या राज्याचे शासन (पालन) कर. तू माझा द्वितीय अंतरात्मा आहेस. ही राजलक्ष्मी तुलाच प्राप्त होत आहे. ॥४३॥
सौमित्रे भुङ्‌‍क्ष्व भोगांस्त्वमिष्टान् राज्यफलानि च ।
जीवितं चापि राज्यं च त्वदर्थमभिकामये ॥ ४४ ॥
'सुमित्रानंदन ! (सौमित्र !) तू अभीष्ट भोग आणि राज्याच्या श्रेष्ठ फळांचा उपभोग घे. तुझ्या साठीच मी या जीवनाची तथा राज्याची अभिलाषा करत आहे.' ॥४४॥
इत्युक्त्वा लक्ष्मणं रामो मातरावभिवाद्य च ।
अभ्यनुज्ञाप्य सीतां च जगाम स्वं निवेशनम् ॥ ४५ ॥
लक्ष्मणास असे म्हणून रामांनी दोन्ही मातांना प्रणाम केला आणि सीतेला ही बरोबर चलण्याची आज्ञा देऊन ते तिला घेऊन आपल्या महालात निघून गेले. ॥४५॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे चतुर्थः सर्गः ॥ ४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा चौथा सर्ग पूरा झाला. ॥४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP