श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ अष्टसप्ततितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
अगस्त्यं प्रति स्वकीयकुत्सिताहार प्राप्तिकारणं वर्णयता श्वेतेन ब्रह्मणा सह संजाताया वार्ताया उपस्थापनमगस्त्याय दिव्याभूषणस्य दानेन तस्य क्षुत्तृषाकष्टतो मुक्तिश्च -
राजा श्वेताने अगस्त्यांना आपल्यासाठी घृणित आहाराच्या प्राप्तीचे कारण सांगून ब्रह्मदेवांशी झालेल्या आपल्या वार्तेला उत्पस्थित करणे आणि त्यांना दिव्य आभूषणाचे दान देऊन भूक-तहानेच्या कष्टातून मुक्त होणे -
श्रुत्वा तु भाषितं वाक्यं मम राम शुभाक्षरम् ।
प्राञ्जलिः प्रत्युवाचेदं स स्वर्गी रघुनन्दन ॥ १ ॥
(अगस्त्य म्हणाले -) रघुनंदन रामा ! हे बोललेले शुभाक्षर युक्त वाक्य ऐकून त्या स्वर्गीय पुरुषाने हात जोडून याप्रकारे उत्तर दिले - ॥१॥
शृणु ब्रह्मन् पुरा वृत्तं ममैतत् सुखदुःखयोः ।
अनतिक्रमणीयं च यथा पृच्छसि मां द्विज ॥ २ ॥
ब्रह्मन्‌ ! आपण जे काही विचारत आहात ते माझ्या सुखदुःखाचे अलंघनीय कारण, जे पूर्वकाळात घडलेले आहे येथे सांगत आहे. आपण ऐकावे. ॥२॥
पुरा वैदर्भको राजा पिता मम महायशाः ।
सुदेव इति विख्यातः त्रिषु लोकेषु वीर्यवान् ॥ ३ ॥
पूर्वकाळात माझे महायशस्वी पिता विदर्भ देशाचे राजे होते. त्यांचे नाव सुदेव होते. ते तीन्ही लोकात विख्यात पराक्रमी होते. ॥३॥
तस्य पुत्रद्वयं ब्रह्मन् द्वाभ्यां स्त्रीभ्यां अजायत ।
अहं श्वेत इति ख्यातो यवीयान् सुरथोऽभवत् ॥ ४ ॥
ब्रह्मन्‌ ! त्यांच्या दोन पत्‍नी होत्या, ज्यांच्या गर्भापासून त्यांना दोन पुत्र झाले. त्यात ज्येष्ठ मी होतो. माझी श्वेत या नावाने प्रसिद्धी झाली आणि माझ्या लहान भावाचे नाव सुरथ होते. ॥४॥
ततः पितरि स्वर्याते पौरा मामभ्यषेचयन् ।
तत्राहं कृतवान् राज्यं धर्म्यं च सुसमाहितः ॥ ५ ॥
पिता स्वर्गलोकाला निघून गेल्यावर पुरवासी लोकांनी राजाच्या पदावर माझा अभिषेक केला. तेथे परम सावधान राहून मी धर्मास अनुकूल रीतीने राज्याचे पालन केले. ॥५॥
एवं वर्षसहस्राणि समतीतानि सुव्रत ।
राज्यं कारयतो ब्रह्मन् प्रजा धर्मेण रक्षतः ॥ ६ ॥
सुव्रत ब्रह्मर्षे ! याप्रकारे धर्मपूर्वक प्रजेचे रक्षण तसेच राज्याचे शासन करत असता माझी एक सहस्त्र वर्षे निघून गेली. ॥६॥
सोऽहं निमित्ते कस्मिंश्चिद् विज्ञातायुर्द्विजोत्तम ।
कालधर्मं हृदि न्यस्य ततो वनमुपागमम् ॥ ७ ॥
द्विजश्रेष्ठ ! एका समयी मला काही निमित्ताने आपल्या आयुष्याचा पत्ता लागला आणि मी मृत्युतिथिला हृदयात ठेवून तेथून वनास प्रस्थान केले. ॥७॥
सोऽहं वनमिदं दुर्गं मृगपक्षिविवर्जितम् ।
तपश्चर्तुं प्रविष्टोऽस्मि समीपे सरसः शुभे ॥ ८ ॥
त्यासमयी मी याच दुर्गम वनात आलो जेथे पशुही नाहीत आणि पक्षीही नाहीत. वनात प्रवेश करून मी या सरोवराच्या सुंदर तटाजवळ तपस्या करण्यासाठी बसलो. ॥८॥
भ्रातरं सुरथं राज्ये ह्यभिषिच्य महीपतिम् ।
इदं सरः समासाद्य तपस्तप्तं मया चिरम् ॥ ९ ॥
राज्यावर आपला भाऊ सुरथ याचा अभिषेक करून या सरोवरासमीप येऊन मी दीर्घकाळपर्यंत तपस्या केली. ॥९॥
सोऽहं वर्षसहस्राणि तपस्त्रीणि महावने ।
तप्त्वा सुदुष्करं प्राप्तो ब्रह्मलोकं अनुत्तमम् ॥ १० ॥
या विशाल वनात तीन हजार वर्षे पर्यंत अत्यंत दुष्कर तपस्या करून मी परम उत्तम ब्रह्मलोकास प्राप्त झालो. ॥१०॥
तस्येमे स्वर्गभूतस्य क्षुत्पिपासे द्विजोत्तम ।
बाधेते परमोदार ततोऽहं व्यथितेन्द्रियः ॥ ११ ॥
द्विजश्रेष्ठ ! परम उदार महर्षे ! ब्रह्मलोकात पोहोचूनही मला भूक व तहान फार कष्ट देत होत्या. त्यामुळे सर्व इंद्रिये व्यथित होत होती. ॥११॥
गत्वा त्रिभुवनश्रेष्ठं पितामहमुवाच ह ।
भगवन् ब्रह्मलोकोऽयं क्षुत्पिपासाविवर्जितः ॥ १२ ॥

कस्यायं कर्मणः पाकः क्षुत्पिपासानुगो ह्यहम् ।
आहारः कश्च मे देव तन्मे ब्रूहि पितामह ॥ १३ ॥
एक दिवस मी त्रैलोक्याची श्रेष्ठ देवता भगवान्‌ ब्रह्मदेवांना म्हटले - भगवान्‌ ! हा ब्रह्मलोक तर तहान-भूक कष्टारहित आहे परंतु येथे ही क्षुधा-पिपासेचे क्लेश माझा पिच्छा सोडत नाहीत. हा माझ्या कुठल्या कर्माचा परिणाम आहे ? देव ! पितामह ! माझा आहार काय आहे ? हे मला सांगा. ॥१२-१३॥
पितामहस्तु मामाह तवाहारः सुदेवज ।
स्वादूनि स्वानि मांसानि तानि भक्षय नित्यशः ॥ १४ ॥
हे ऐकून ब्रह्मदेव मला म्हणाले - सुदेवनंदन ! तू मर्त्यलोकात स्थित आपल्याच शरीराचे सुस्वादु मांस प्रतिदिन खात जा, तोच तुझा आहार आहे. ॥१४॥
स्वशरीरं त्वया पुष्टं कुर्वता तप उत्तमम् ।
अनुप्तं रोहते श्वेत न कदाचिन्महामते ॥ १५ ॥
श्वेत ! तू उत्तम तप करून केवळ आपल्या शरीराचेच पोषण केले आहेस. महामते ! दानरूपी बीज पेरल्याशिवाय कुठेच काहीच जमत नाही- कुठलाही भोज्य पदार्थ उपलब्ध होत नाही. ॥१५॥
दत्तं न तेऽस्ति सूक्ष्मोऽपि तप एव निषेवसे ।
तेन स्वर्गगतो वत्स बाध्यसे क्षुत्पिपासया ॥ १६ ॥
तू देवता, पितर तसेच अतिथिंसाठी कधी काही थोडेसेही दान केलेले आहेस असे दिसून येत नाही. तू केवळ तपस्या करीत होतास. वत्सा ! म्हणून ब्रह्मलोकात येऊनही भूक-तहानेने पीडित होत आहेस. ॥१६॥
स त्वं सुपुष्टमाहारैः स्वशरीरमनुत्तमम् ।
भक्षयित्वामृतरसं तेन तृप्तिर्भविष्यति ॥ १७ ॥
नाना प्रकारच्या आहारांनी उत्तम प्रकारे पोषित झालेले तुझे परम उत्तम शरीर अमृतरसाने युक्त होईल आणि त्याचे भक्षण करण्यानेच तुझ्या क्षुधा-पिपासेचे निवारण होईल. ॥१७॥
यदा तु तद्वनं श्वेत अगस्त्यः सुमहानृषिः ।
आगमिष्यति दुर्धर्षः तदा कृच्छ्राद् विमोक्ष्यते ॥ १८ ॥
श्वेत ! जेव्हा त्या वनात दुर्धर्ष अगस्त्य येतील तेव्हा तू या कष्टांतून सुटू शकशील. ॥१८॥
स हि तारयितुं सौम्य शक्तः सुरगणानपि ।
किं पुनस्त्वां महाबाहो क्षुत्पिपासावशं गतम् ॥ १९ ॥
सौम्य ! महाबाहो ! ते देवतांचाही उद्धार करण्यास समर्थ आहेत मग भूक-तहान यांच्या अधीन झालेल्या तुझ्या सारख्या पुरुषाला संकटातून सोडविणे त्यांच्यासाठी काय मोठी गोष्ट आहे ? ॥१९॥
सोऽहं भगवतः श्रुत्वा देवदेवस्य निश्चयम् ।
आहारं गर्हितं स्वशरीरं द्विजोत्तम ॥ २० ॥
द्विजश्रेष्ठ ! देवाधिदेव भगवान्‌ ब्रह्मदेवांचा तो निश्चय ऐकून मी आपल्या शरीराचाच घृणित आहार करू लागलो. ॥२०॥
बहून् वर्षगणान् ब्रह्मन् भुज्यमानमिदं मया ।
क्षयं नाभ्येति ब्रह्मर्षे तृप्तिश्चापि ममोत्तमा ॥ २१ ॥
ब्रह्मन्‌ ! ब्रह्मर्षे ! कित्येक वर्षे माझ्या द्वारा उपभोग घेतला जाऊन ही हे शरीर नष्ट होत नाही आणि मला पूर्णतः तृप्ति प्राप्त होते. ॥२१॥
तस्य मे कृच्छ्रभूतस्य कृच्छ्रादस्माद् विमोचय ।
अन्येषां न गतिर्ह्यत्र कुम्भयोनिमृते द्विजम् ॥ २२ ॥
मुने ! याप्रकारे मी संकटात पडलो आहे. आपण माझ्या दृष्टिपथात आला आहात म्हणून या कष्टातून माझा उद्धार करा. आपण महर्षि कुम्भजाशिवाय दुसर्‍या कोणास या निर्जन वनात पोहोचतांच येणार नाही. (म्हणून आपण अवश्य कुम्भयोनि अगस्त्यच आहात.) ॥२२॥
इदमाभरणं सौम्य तारणार्थं द्विजोत्तम ।
प्रतिगृह्णीष्व भद्रं ते प्रसादं कर्तुमर्हसि ॥ २३ ॥
सौम्य ! विप्रवर ! आपले कल्याण होवो. आपण माझा उद्धार करण्यासाठी माझ्या या आभूषणाचे दान ग्रहण करावे आणि आपला कृपाप्रसाद मला प्राप्त व्हावा. ॥२३॥
इदं तावत् सुवर्णं च धनं वस्त्राणि च द्विज ।
भक्ष्यं भोज्यं च ब्रह्मर्षे ददात्याभरणानि च ॥ २४ ॥
ब्रह्मन्‌ ! ब्रह्मर्षे ! हे दिव्य आभूषण सुवर्ण, धन, वस्त्रे, भक्ष्य, भोज्य तसेच अन्य नाना प्रकारची आभरणेही देते. ॥२४॥
सर्वान् कामान् प्रयच्छामि भोगांश्च मुनिपुङ्‌गव ।
तारणे भगवन् मह्यं प्रसादं कर्तुमर्हसि ॥ २५ ॥
मुनिश्रेष्ठ ! या आभूषण द्वारा मी समस्त कामना (मनोवांछित पदार्थ) आणि भोगांनाही देत आहे. भगवन्‌ ! आपण माझ्या उद्धारासाठी माझ्यावर कृपा करावी. ॥२५॥
तस्याहं स्वर्गिणो वाक्यं श्रुत्वा दुःखसमन्वितम् ।
तारणायोपजग्राह तदाभरणमुत्तमम् ॥ २६ ॥
स्वर्गीय राजा श्वेताची ती दुःखपूर्ण हकिगत ऐकून मी त्याचा उद्धार करण्यासाठी ते आभूषण घेऊन टाकले. ॥२६॥
मया प्रतिगृहीते तु तस्मिन् आभरणे शुभे ।
मानुषः पूर्वको देहो राजर्षेर्विननाश ह ॥ २७ ॥
जसे मी या शुभ आभूषणाचे दान ग्रहण केले तोच राजर्षि श्वेताचे ते पूर्व-शरीर (शव) अदृश्य झाले. ॥२७॥
प्रनष्टे तु शरीरेऽसौ राजर्षिः परया मुदा ।
तृप्तः प्रमुदितो राजा जगाम त्रिदिवं सुखम् ॥ २८ ॥
ते शरीर अदृश्य झाल्या बरोबर राजर्षि श्वेत परमानंदाने तृप्त होऊन प्रसन्नतापूर्वक सुखमय ब्रह्मलोकास निघून गेले. ॥२८॥
तेनेदं शक्रतुल्येन दिव्यमाभरणं मम ।
तस्मिन् निमित्ते काकुत्स्थ दत्तमद्‌भुतदर्शनम् ॥ २९ ॥
काकुत्स्थ ! त्या इंद्रतुल्य तेजस्वी राजा श्वेताने त्या भूक-तहान निवारणरूप पूर्वोक्त निमित्ताने हे अद्‍भुत दिसणारे दिव्य आभूषण मला दिले होते. ॥२९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डेऽष्टसप्ततितमः सर्गः ॥ ७८ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा अठ्‍याहत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥७८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP