[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ अष्टमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
हनुमता पुनः पुष्पकस्य दर्शनम् -
हनुमानद्वारा पुन्हा पुष्पक विमानाचे दर्शन -
स तस्य मध्ये भवनस्य संस्थितो
महद्विमानं मणिरत्‍नचित्रितम् ।
प्रतप्तजाम्बूनदजालकृत्रिमं
ददर्श वीरः पवनात्मजः कपिः ॥ १ ॥
ते बुद्धिमान वायुपुत्र हनुमान रावणाच्या गृहाजवळ बसले असता उत्कृष्ट मणि आणि रत्‍नांनी व्याप्त आणि उत्कृष्ट सुवर्णमय खिडक्यांच्या रचनेने युक्त असे विशाल विमान पुन्हा पाहिले. ॥१॥
तदप्रमेयप्रतिकारकृत्रिमं
कृतं स्वयं साध्विति विश्वकर्मणा ।
दिवं गतं वायुपथप्रतिष्ठितं
व्यराजतादित्यपथस्य लक्ष्म तत् ॥ २ ॥
त्याच्या रचनेचे, सौन्दर्य आदि दृष्टीने मोजमाप करणे अशक्य होते. त्याची निर्मिति अनुपम प्रकारे केलेली होती. स्वतः विश्वकर्म्याने ते बनविले होते आणि अति उत्तम म्हणून त्याची प्रशंसाही केली होती. ज्यावेळी ते आकाशात जाऊन वायुमार्गात स्थित होत असे तेव्हां ते सूर्याच्या मार्गाचे चिह्नच असे सुशोभित होत असे. ॥२॥
न तत्र किंचिन्न कृतं प्रयत्‍नतो
न तत्र किंचिन्न महार्घरत्‍नवत् ।
न ते विशेषा नियताः सुरेष्वपि
न तत्र किंचिन्न महाविशेषवत् ॥ ३ ॥
प्रयत्‍नपूर्वक न केलेले, अमूल्य रत्‍ने नसलेले आणि उत्कृष्ट गुण ज्यात नाहीत, असे त्यात काही एक नव्हते. त्यात ज्या ज्या विशेष गोष्टी होत्या, त्यांचा देवतांच्या विमानातही अभाव होता. ॥३॥
तपः समाधानपराक्रमार्जितं
मनःसमाधानविचारचारिणम् ।
अनेकसंस्थानविशेषनिर्मितं
ततस्ततस्तुल्यविशेषनिर्मितम् ॥ ४ ॥
रावणाने निराहार राहून जे तप केले होते आणि भगवन्ताच्या चिन्तनात चित्त एकाग्र केले होते त्याच्या द्वारा प्राप्त पराक्रमामुळेच त्याने त्या विमानावर अधिकार प्राप्त केला होता. मनात ज्या ठिकाणी जाण्याचा संकल्प उठेल तेथे ते विमान जाऊन पोहोचत असे. अनेक प्रकारच्या विशिष्ट निर्माण कलांच्या द्वारे त्या विमानाची रचना झाली होती आणि ठिक-ठिकाणाहून प्राप्त केलेल्या दिव्य विमान निर्माणोचित विशेषतान्द्वारे त्यास निर्माण केले होते. ॥४॥
मनः समाधाय तु शीघ्रगामिनं
दुरावरं मारुततुल्यगामिनम् ।
महात्मनां पुण्यकृतां महर्द्धिनां
यशस्विनामग्र्यमुदामिवालयम् ॥ ५ ॥
ते विमान त्याच्या स्वामीच्या मनाचे अनुसरण करून शीघ्र गतीने जाणारे, दुसर्‍यांना दुर्लभ, आणि वायुवेगाने पुढे जाणारे तथा श्रेष्ठ आनन्दा (महान सुखा)चे भागी, खूप तप केलेले, पुण्यवान आणि कीर्ती संपन्न महात्मा लोकांनाच प्राप्त होणारे होते. ॥५॥
विशेषमालम्ब्य विशेषसंस्थितं
विचित्रकूटं बहुकूटमण्डितम् ।
मनोऽभिरामं शरदिन्दुनिर्मलं
विचित्रकूटं शिखरं गिरेर्यथा ॥ ६ ॥
ते विमान विशिष्ट गतीने युक्त होते. आकाशरूप विशेष प्रदेशात ते ठेवलेले होते. आश्चर्यकारक चित्र विचित्र वस्तूंच्या समुदायाचे ते एक भांडारच होते. नाना प्रकारच्या दालनांनी ते सुशोभित केलेले होते. ते शरद ऋतूतील चन्द्राप्रमाणे निर्मळ आणि आनन्द देणारे होते. विचित्र लहान लहान शिखरांनी युक्त अशा एखाद्या पर्वताच्या मुख्य शिखराची जशी शोभा दिसते त्या प्रमाणेच अद्‍भुत शिखर असलेल्या त्या पुष्पक विमानाची शोभा दिसत होती. ॥६॥
वहन्ति यत् कुण्डलशोभितानना
महाशना व्योमचरा निशाचराः ।
विवृत्तविध्वस्तविशाललोचना
महाजवा भूतगणाः सहस्रशः ॥ ७ ॥

वसन्तपुष्पोत्करचारुदर्शनं
वसन्तमासादपि चारुदर्शनम् ।
स पुष्पकं तत्र विमानमुत्तमं
ददर्श तद् वानरवीरसत्तमः ॥ ८ ॥
कुंडलीच्या योगाने ज्यांची मुखे सुशोभित झालेली आहेत, ज्यांची पापणीही हलत नाही असे विशाल व तारवटलेले डोळे असलेले, अपरिमित भोजन करणारे, अत्यन्त वेगवान, आकाशात विचरण करणारे आणि रात्रीही दिवसाप्रमाणे चालणारे हजारो भूतगण त्याचे भारवाहक होते. वसन्त ऋतूतील शोभेपेक्षाही दिसण्यात मनोहर, आणि वसन्त ऋतूतील पुष्पसमुदायामुळे ज्याची आकृती फारच सुन्दर दिसत होती अशा प्रकारचे ते उत्कृष्ट पुष्पक विमान, श्रेष्ठ वानरवीर हनुमानांनी तेथे पाहिले. ॥७-८॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे अष्टमः सर्गः ॥ ८ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा आठवा सर्ग पूरा झाला. ॥८॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP