श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ पञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
लक्ष्मणसुमन्त्रयोः संवादः -
लक्ष्मण आणि सुमंत्रांचा संवाद -
दृष्ट्‍वा तु मैथिलीं सीतां आश्रमे सम्प्रवेशिताम् ।
सन्तापमगमद् घोरं लक्ष्मणो दीनचेतनः ॥ १ ॥
मैथिली सीतेचा मुनिंच्या आश्रमात प्रवेश झाला आहे हे पाहून लक्ष्मण मनातल्या मनात अत्यंत दुःखी झाले. त्यांना घोर संताप झाला. ॥१॥
अब्रवीच्च महातेजाः सुमन्त्रं मन्त्रसारथिम् ।
सीतासन्तापजं दुःखं पश्य रामस्य सारथे ॥ २ ॥
त्या समयी महातेजस्वी लक्ष्मण मंत्रणेत सहायता देणार्‍या सारथि सुमंत्रांना म्हणाले -सूत ! पहा तर खरे ! श्रीरामांना आत्तापासूनच सीतेच्या विरहजनित संतापाचे कष्ट भोगावे लागत आहेत. ॥२॥
ततो दुःखतरं किं नु राघवस्य भविष्यति ।
पत्‍नींञ शुद्धसमाचारां विसृज्य जनकात्मजाम् ॥ ३ ॥
भले, राघवांना याहून अधिक दुःख काय असणार आहे की त्यांना आपल्या पवित्र आचरण करणार्‍या धर्मपत्‍नी जनकात्मजा सीतेचा परित्याग करावा लागला. ॥३॥
व्यक्तं दैवादहं मन्ये राघवस्य विनाभवम् ।
वैदेह्या सारथे नित्यं दैवं हि दुरतिक्रमम् ॥ ४ ॥
सारथ्या ! राघवांना सीतेचा हा जो नित्य वियोग प्राप्त झाला आहे यात मी दैवालाच कारण मानतो; कारण की दैवाचे विधान दुर्लंघ्य असते. ॥४॥
यो हि देवान्सगन्धर्वान् असुरान्सह राक्षसैः ।
निहन्याद् राघवः क्रुद्धः स दैवं पर्युपासते ॥ ५ ॥
जे श्रीरघुनाथ कुपित झाल्यावर देवता, गंधर्व तसेच राक्षसांसहित असुरांचाही संहार करू शकतात तेच दैवाची उपासना करत आहेत. (त्याचे निवारण करू शकत नाहीत.) ॥५॥
पुरा रामः पितुर्वाक्याद् दण्डके विजने वने ।
उषित्वा नव वर्षाणि पञ्च चैव महावने ॥ ६ ॥
पूर्वी श्रीरामांना पित्याच्या सांगण्यावरून चौदा वर्षेपर्यंत विशाल आणि निर्जन दण्डकवनात राहावे लागले आहे. ॥६॥
ततो दुःखतरं भूयः सीताया विप्रवासनम् ।
पौराणां वचनं श्रुत्वा नृशंसं प्रतिभाति मे ॥ ७ ॥
आता त्याहूनही दुःखाची गोष्ट ही झाली आहे की त्यांना सीतादेवीना निर्वासित करावे लागले. परंतु पुरवासी लोकांची गोष्ट ऐकून असे करणे मला अत्यंत निर्दयतापूर्ण कर्म वाटत आहे. ॥७॥
को नु धर्माश्रयः सूत कर्मण्यस्मिन् यशोहरे ।
मैथिलीं प्रतिसम्प्राप्तः पौरैर्हीनार्थवादिभिः ॥ ८ ॥
सूत ! सीतेविषयी अन्यायपूर्वक गोष्टी बोलणार्‍या या पुरवासींमुळे अशा कीर्तिनाशक कर्मामध्ये प्रवृत्त होऊन श्रीरामांनी कुठल्या धर्मराशीचे उपार्जन केले आहे ? ॥८॥
एता वाचो बहुविधाः श्रुत्वा लक्ष्मणभाषिताः ।
सुमन्त्रः श्रद्धया प्राज्ञो वाक्यमेतदुवाच ह ॥ ९ ॥
लक्ष्मणांनी बोललेल्या या अनेक प्रकारच्या गोष्टी ऐकून बुद्धिमान्‌ सुमंत्रांनी श्रद्धापूर्वक हे वचन सांगितले - ॥९॥
न सन्तापस्त्वया कार्यः सौमित्रे मैथिलीं प्रति ।
दृष्टमेतत् पुरा विप्रैः पितुस्ते लक्ष्मणाग्रतः ॥ १० ॥
सौमित्र ! मैथिली सीतेच्या विषयी आपण संतप्त होता कामा नये. लक्ष्मणा ! ही गोष्ट ब्राह्मणांनी आपल्या पित्यासमोरच जाणलेली होती. ॥१०॥
भविष्यति दृढं रामो दुःखप्रायो विसौख्यभाक् ।
प्राप्स्यते च महाबाहुः विप्रयोगं प्रियैर्द्रुतम् ॥ ११ ॥
त्या काळात दुर्वासांनी सांगितले होते की श्रीरामांना निश्चितच अधिक दुःख सोसावे लागेल. प्रायः त्यांचे सौख्य हिरावून घेतले जाईल. महाबाहु श्रीरामांना शीघ्रच आपल्या प्रियजनांचा वियोग प्राप्त होईल. ॥११॥
त्वां चैव मैथिलीं चैव शत्रुघ्नभरतौ तथा ।
स त्यजिष्यति धर्मात्मा कालेन महता महान् ॥ १२ ॥
सौमित्र ! धर्मात्मा महापुरूष श्रीराम दीर्घकाळ जात असता तुमचा, मैथिलीचा तसेच भरत आणि शत्रुघ्नाचाही त्याग करतील. ॥१२॥
इदं त्वयि न वक्तव्यं सौमित्रे भरतेऽपि वा ।
राज्ञा वो व्याहृतं वाक्यं दुर्वासा यदुवाच ह ॥ १३ ॥
दुर्वासांनी जी गोष्ट सांगितली होती ती महाराज दशरथांनी तुम्हांला, शत्रुघ्नाला आणि भरतालाही सांगण्यास मनाई केलेली होती. ॥१३॥
महाजनसमीपे च मम चैव नरर्षभ ।
ऋषिणा व्याहृतं वाक्यं वसिष्ठस्य च सन्निधौ ॥ १४ ॥
नरश्रेष्ठ ! दुर्वासा मुनिने फार मोठ्‍या जनसमुदायासमीप माझ्या समक्ष तसेच महर्षि वसिष्ठांच्या निकट ही गोष्ट सांगितली होती. ॥१४॥
ऋषेस्तु वचनं श्रुत्वा मामाह पुरुषर्षभः ।
सूत न क्वचिदेवं ते वक्तव्यं जनसंनिधौ ॥ १५ ॥
दुर्वासा मुनिंची ही गोष्ट ऐकून पुरूषप्रवर दशरथांनी मला सांगितले होते की, सूत ! तुम्ही इतर लोकांच्या समोर या प्रकारची गोष्ट सांगता कामा नये. ॥१५॥
तस्याहं लोकपालस्य वाक्यं तत्सुसमाहितः ।
नैव जात्वनृतं कुर्यां इति मे सौम्य दर्शनम् ॥ १६ ॥
सौम्य ! त्या लोकपालक दशरथांच्या त्या वाक्याला मी खोटे करणार नाही. हा माझा संकल्प आहे. यासाठी मी सदा सावधान राहात असतो. ॥१६॥
सर्वथैव न वक्तव्यं मया सौम्य तवाग्रतः ।
यदि ते श्रवणे श्रद्धा श्रूयतां रघुनन्दन ॥ १७ ॥
सौम्य ! रघुनंदना ! यद्यपि ही गोष्ट मी आपल्या समोर सर्वथा सांगायला नको होती, तथापि जर आपल्या मनात ही ऐकण्यासाठी श्रद्धा (उत्सुकता) असेल तर ऐका. ॥१७॥
यद्यप्यहं नरेन्द्रेण रहस्यं श्रावितं पुरा ।
तथाप्युदाहरिष्यामि दैवं हि दुरतिक्रमम् ॥ १८ ॥

येनेदमीदृशं प्राप्तं दुःखं शोकसमन्वितम् ।
न त्वया भरते वाच्यं शत्रुघ्नस्यापि सन्निधौ ॥ १९ ॥
जरी पूर्वी महाराजांनी हे रहस्य दुसर्‍यासमोर प्रकट न करण्याचा आदेश दिला होता, तथापि आज मी ती गोष्ट सांगेन. दैवाचे विधान ओलांडणे फार कठीण आहे. तुम्ही सुद्धा भरत आणि शत्रुघ्नाच्या समोर ही गोष्ट सांगता कामा नये. ॥१८-१९॥
तच्छ्रुत्वा भाषितं तस्य गम्भीरार्थपदं महत् ।
तथ्यं ब्रूहीति सौमित्रिः सूतं वाक्यमथाब्रवीत् ॥ २० ॥
सुमंत्रांचे हे गंभीर भाषण ऐकून सौमित्र लक्ष्मणाने म्हटले - सुमंत्र ! जी खरी गोष्ट असेल, ती आपण अवश्य सांगावी. ॥२०॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे पञ्चाशः सर्गः ॥ ५० ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा पन्नासावा सर्ग पूरा झाला. ॥५०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP