|
| इन्द्रं विन जगत्यशान्तिः अश्वमेधानुष्ठानेन इन्द्रस्य ब्रह्महत्यातो मुक्तिश्च - 
 | इंद्राविना जगतात् अशान्ति तसेच अश्वमेधाच्या अनुष्ठानाने इंद्राचे ब्रह्महत्येपासून मुक्त होणे - | 
| तदा वृत्रवधं सर्वं अखिलेन स लक्ष्मणः । कथयित्वा नरश्रेष्ठः कथाशेषं प्रचक्रमे ॥ १ ॥
 
 | त्या समयी वृत्रासुराच्या वधाची पूरी कथा ऐकवून नरश्रेष्ठ लक्ष्मणांनी शेष कथा सांगण्यास याप्रकारे आरंभ केला - ॥१॥ | 
| ततो हते महावीर्ये वृत्रे देवभयंकरे । ब्रह्महत्यावृतः शक्रः संज्ञां लेभे न वृत्रहा ॥ २ ॥
 
 | देवतांना भय देणारा महापराक्रमी वृत्रासुर मारला गेल्यावर ब्रह्महत्येने घेरलेल्या वृत्रनाशक इंद्रांना बराच वेळ शुद्ध राहिली नव्हती. ॥२॥ | 
| सोऽन्तमाश्रित्य लोकानां नष्टसंज्ञो विचेतनः । कालं तत्रावसत् कञ्चिद् वेष्टमान इवोरगः ॥ ३ ॥
 
 | लोकांच्या अंतिम सीमेचा आश्रय घेऊन ते सर्पाप्रमाणे लोळत काही काळ पर्यंत अचेत आणि संज्ञाशून्य होऊन पडून राहिले होते. ॥३॥ | 
| अथ नष्टे सहस्राक्षे उद्विग्नं अभवज्जगत् । भूमिश्च ध्वस्तसंकाशा निःस्नेहा शुष्ककानना ॥ ४ ॥
 
 निःस्रोतसस्ते सर्वे तु ह्रदाश्च सरितस्तथा ।
 संक्षोभश्चैव सत्त्वानां अनावृष्टिकृतोऽभवत् ॥ ५ ॥
 
 | इंद्र अदृश्य झाल्याने सारा संसार व्याकुळ झाला. पृथ्वी जणु उजाड झाली. तिची आर्द्रता नष्ट झाली आणि वने वाळून गेली. समस्त सरोवरे आणि सरितांमध्ये जलस्त्रोताचा अभाव झाला आणि वृष्टि न झाल्याने सर्व जीव भयभीत झाले. ॥४-५॥ | 
| क्षीयमाणे तु लोकेऽस्मिन् संभ्रान्तमनसः सुराः । यदुक्तं विष्णुना पूर्वं तं यज्ञं समुपानयन् ॥ ६ ॥
 
 | समस्त लोक क्षीण होऊ लागले. यामुळे देवतांच्या हृदयांत व्याकुळता पसरली आणि त्यांनी पूर्वी भगवान् विष्णुनी जो सांगितला होता त्या यज्ञाचे स्मरण केले. ॥६॥ | 
| ततः सर्वे सुरगणाः सोपाध्यायाः सहर्षिभिः । तं देशं समुपाजग्मुः यत्रेन्द्रो भयमोहितः ॥ ७ ॥
 
 | त्यानंतर बृहस्पतिंना बरोबर घेऊन ऋषिंसहित सर्व देवता, जेथे भयाने मोहित होऊन इंद्र लपून बसले होते त्या स्थानावर गेल्या. ॥७॥ | 
| ते तु दृष्ट्वा सहस्राक्षं आवृतं ब्रह्महत्यया । तं पुरस्कृत्य देवेशं अश्वमेधं प्रचक्रिरे ॥ ८ ॥
 
 | त्यांनी इंद्रांना ब्रह्महत्येने आवेष्टित पाहून त्याच देवेश्वरांना पुढे करून अश्वमेघ यज्ञ करण्यास सुरूवात केली. ॥८॥ | 
| ततोऽश्वमेधः सुमहान् महेन्द्रस्य महात्मनः । ववृधे ब्रह्महत्ययाः पावनार्थं नरेश्वर ॥ ९ ॥
 
 | नरेश्वर ! नंतर तर महामनस्वी महेंद्राचा तो महान् अश्वमेध यज्ञ आरंभ झाला त्याचे उद्देश्य होते ब्रह्महत्येची निवृत्ति करून इंद्रांना पवित्र करणे. ॥९॥ | 
| ततो यज्ञे समाप्ते तु ब्रह्महत्या महात्मनः । अभिगम्याब्रवीद् वाक्यं क्व मे स्थानं विधास्यथ ॥ १० ॥
 
 | त्यानंतर जेव्हा हा यज्ञ समाप्त झाला, तेव्हा ब्रह्महत्येने महामनस्वी देवतांच्या जवळ येऊन विचारले - माझ्यासाठी कोठे स्थान बनविणार आहात ? ॥१०॥ | 
| ते तामूचुस्ततो देवाः तुष्टाः प्रीतिसमन्विताः । चतुर्धा विभजात्मानं आत्मनैव दुरासदे ॥ ११ ॥
 
 | हे ऐकून संतुष्ट आणि प्रसन्न झालेल्या देवतांनी तिला म्हटले - दुर्जय शक्तिशाली ब्रह्महत्ये ! तू आपलीच आपणांस चार भागांत विभक्त कर. ॥११॥ | 
| देवानां भाषितं श्रुत्वा ब्रह्महत्या महात्मनाम् । सन्निधौ स्थानमन्यत्र वरयामास दुर्वसा ॥ १२ ॥
 
 | महामनस्वी देवतांचे हे कथन ऐकून महेंद्रांच्या शरीरात दुःखपूर्वक निवास करणार्या ब्रह्महत्येने आपले चार भाग केले आणि इंद्रांच्या शरीराहून अन्यत्र राहाण्यासाठी स्थान मागितले. ॥१२॥ | 
| एकेनांशेन वत्स्यामि पूर्णोदासु नदीषु वै । चतुरो वार्षिकान् मासान् दर्पघ्नी कामचारिणी ॥ १३ ॥
 
 | (ती म्हणाली -) मी आपल्या एक अंशाने वर्षा ऋतुचे चार महिने जलाने भरलेल्या नद्यांमध्ये निवास करीन. त्या समयी मी इच्छेनुसार विचरणारी आणि दुसर्यांच्या दर्पाचे दलन करणारी होईन. ॥१३॥ | 
| भूम्यामहं सर्वकालं एकेनांशेन सर्वदा । वसिष्यामि न सन्देहः सत्येनैतद्ब्रवीमि वः ॥ १४ ॥
 
 | दुसर्या भागाने मी सदा सर्व समयी भूमिवर निवास करीन यात संदेह नाही, ही मी आपल्या समोर सत्य गोष्ट सांगत आहे. ॥१४॥ | 
| योऽयमंशस्तृतीयो मे स्त्रीषु यौवनशालिषु । त्रिरात्रं दर्पपूर्णासु वशिष्ये दर्पघातिनी ॥ १५ ॥
 
 | आणखी जो माझा तिसरा अंश आहे, त्याच्यासह मी युवावस्थेने सुशोभित होणार्या गर्विष्ठ स्त्रियांमध्ये प्रतिमास तीन रात्रिपर्यंत निवास करीन आणि त्यांचा दर्प नष्ट करीत राहीन. ॥१५॥ | 
| हन्तारो ब्राह्मणान् ये तु मृषापूर्वमदूषकान् । तांश्चतुर्थेन भागेन संश्रयिष्ये सुरर्षभाः ॥ १६ ॥
 
 | सुरश्रेष्ठगण ! जे खोटे बोलून कुणालाही कलंकित करत नाहीत अशा ब्राह्मणांचा जे वध करतात, त्यांच्यावर मी आपल्या चौथ्या भागाने आक्रमण करीन. ॥१६॥ | 
| प्रत्यूचुस्तां ततो देवा यथा वदसि दुर्वसे । तथा भवतु तत्सर्वं साधयस्व यदीप्सितम् ॥ १७ ॥
 
 | तेव्हा देवतांनी तिला म्हटले - दुर्वसे ! तू जसे बोलत आहेस ते सर्व तसेच होवो. जा आणि आपले अभीष्ट साधन कर. ॥१७॥ | 
| ततः प्रीत्याऽन्विता देवाः सहस्राक्षं ववन्दिरे । विज्वरः स च पूतात्मा वासवः समपद्यत ॥ १८ ॥
 
 | तेव्हा देवतांनी फार प्रसन्नतेने सहस्त्रलोचन इंद्रांची वंदना केली. इंद्र निश्चिंत, निष्पाप आणि विशुद्ध झाले. ॥१८॥ | 
| प्रशान्तं च जगत्सर्वं सहस्राक्षे प्रतिष्ठिते । यज्ञं चाद्भुतसंकाशं तदा शक्रोऽभ्यपूजयत् ॥ १९ ॥
 
 | इंद्र आपल्या पदावर प्रतिष्ठित होताच संपूर्ण जगतात शांती पसरली. त्यासमयी इंद्रांनी त्या अद्भुत शक्तिशाली यज्ञाची खूप प्रशंसा केली. ॥१९॥ | 
| ईदृशो ह्यश्वमेधस्य प्रसादो रघुनन्दन । यजस्व सुमहाभाग हयमेधेन पार्थिव ॥ २० ॥
 
 | रघुनंदना ! अश्वमेघ यज्ञाचा असाच प्रभाव आहे, म्हणून महाभाग ! पृथ्वीनाथ ! आपण अश्वमेघ यज्ञाद्वारा यजन करावे. ॥२०॥ | 
| इति लक्ष्मणवाक्यमुत्तमं नृपतिरतीव मनोहरं महात्मा ।
 परितोषमवाप हृष्टचेताः
 निशम्य इन्द्रसमानविक्रमौजाः ॥ २१ ॥
 
 | लक्ष्मणांचे हे उत्तम आणि अत्यंत मनोहर वचन ऐकून महात्मा राजा श्रीरामचंद्र जे इंद्रासमान पराक्रमी आणि बलशाली होते, मनातल्या मनात फार प्रसन्न आणि संतुष्ट झाले. ॥२१॥ | 
| इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे षडशीतितमः सर्गः ॥ ८६ ॥ 
 | याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा शहाऐंशीवा सर्ग पूरा झाला. ॥८६॥ | 
 
 
|