श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ पञ्चदश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

इंद्रजिता विभीषणस्य उपहसनं, तं निर्भर्त्स्य विभीषणन संसदि स्वकीय समुचितसम्मतेः प्रकाशनम् - इंद्रजित द्वारा विभीषणांचा उपहास तसेच विभीषणांनी त्याला खडसावून सभेमध्ये आपली उचित सम्मति देणे -
बृहस्पतेस्तुल्यमतेर्वचस्तन्
निशम्य यत्‍नेंन विभीषणस्य ।
ततो महात्मा वचनं बभाषे
तत्रेन्द्रजिन्नैः ऋतयूथमुख्यः ॥ १ ॥
विभीषण बृहस्पति प्रमाणे बुद्धिमान्‌ होते. त्यांच्या वचनांना कसे तरी मोठ्‍या कष्टाने ऐकून राक्षसयूथपतिंच्या मध्ये प्रधान महाकाय इंद्रजिताने तेथे याप्रमाणे म्हटले- ॥१॥
किं नाम ते तात कनिष्ठवाक्यं
अनर्थकं व बहुभीतवच्च ।
अस्मिन् कुले योऽपि भवेन्न जातः
सोऽपीदृशं नैव वदेन्न कुर्यात् ॥ २ ॥
हे माझ्या लहान (चुलत्या) काका ! आपण खूपच घाबरल्याप्रमाणे ही कशी निरर्थक गोष्ट सांगत आहात ? ज्याने या कुळात जन्म घेतला नसेल तो पुरूषही अशी गोष्ट बोलणार नाही आणि असे कामही करणार नाही. ॥२॥
सत्त्वेन वीर्येण पराक्रमेण
धैर्येण शौर्येण च तेजसा च ।
एकः कुलेऽस्मिन् पुरुषो विमुक्तो
विभीषणस्तात कनिष्ठ एषः ॥ ३ ॥
बाबा ! आमच्या या राक्षस कुळात एकमात्र हे लहान काका विभीषणच बल, वीर्य, पराक्रम, धैर्य, शौर्य आणि तेजरहित आहेत. ॥३॥
किं नाम तौ मानुष राजपुत्रौ
अस्माकमेकेन हि राक्षसेन ।
सुप्राकृतेनापि रणे निहन्तुमेतौ
शक्यौ कुतो भीषयसे स्म भीरो ॥ ४ ॥
ते दोन्ही मानव राजकुमार काय आहेत ? त्यांना तर आमचा एक साधारणसा राक्षसही मारू शकतो, मग माझे भित्रे काका ! आपण आम्हांला का घाबरून सोडत आहांत ? ॥४॥
त्रिलोकनाथो ननु देवराजः
शक्रो मया भूमितले निविष्टः ।
भयार्दिताश्चापि दिशः प्रपन्नाः
सर्वे तथा देवगणाः समग्राः ॥ ५ ॥
मी तीन्ही लोकांचे स्वामी देवराज इंद्र यांनाही स्वर्गांतून हटवून या भूतलावर आणून बसविले होते. त्या समयी सर्व देवतांनी भयभीत होऊन पळून जाऊन संपूर्ण दिशांचा आश्रय घेतला होता. ॥५॥
ऐरावतो निःस्वनमुन्नदन् स
निपातितो भूमितले मया तु ।
विकृष्य दन्तौ तु मया प्रसह्य
वित्रासिता देवगणाः समग्राः ॥ ६ ॥
मी हठपूर्वक ऐरावत हत्तीचे दोन्ही दात उपटून त्याला स्वर्गातून पृथ्वीवर पाडून टाकले होते. त्या समयी तो जोरजोराने चीत्कार करीत होता, आपल्या या पराक्रमद्वारा मी संपूर्ण देवतांना त्रस्त करून सोडले होते. ॥६॥
सोऽहं सुराणामपि दर्पहन्ता
दैत्योत्तमानामपि शोककर्ता ।
कथं नरेन्द्रात्मजयोर्न शक्तो
मनुष्ययोः प्राकृतयोः सुवीर्यः ॥ ७ ॥
जो देवतांचा दर्पही दलन करू शकतो, मोठ मोठ्‍या दैत्यांनाही शोकमग्न करून टाकणारा आहे तसेच जो उत्तम बल-पराक्रमाने संपन्न आहे - तोच माझ्या सारखा वीर, मनुष्य जातिच्या दोन साधारण राजकुमारांचा सामना कसा बरे करू शकणार नाही ? ॥७॥
अथेन्द्रकल्पस्य दुरासदस्य
महौजसस्तद् वचनं निशम्य ।
ततो महार्थं वचनं बभाषे
विभीषणः शस्त्रभृतां वरिष्ठः ॥ ८ ॥
इंद्र्तुल्य तेजस्वी महापराक्रमी दुर्जय वीर इंद्रजिताचे हे म्हणणे ऐकून शस्त्रधार्‍यांमध्ये श्रेष्ठ विभीषणाने हे महान्‌ अर्थाने युक्त वचन सांगितले- ॥८॥
न तात मंत्रे तव निश्चयोऽस्ति
बालस्त्वमद्यापि अविपक्वबुद्धिः ।
तस्मात्त्वयाप्यात्मविनाशनाय
वचोऽर्थहीनं बहुविप्रलप्तम् ॥ ९ ॥
तात ! अजून तू बालक आहेस. तुझी बुद्धि अपरिपक्व आहे. तुझ्या मनात कर्तव्य आणि अकर्तव्याचा यथार्थ निश्चय झालेला नाही, म्हणून तू आपल्या विनाशासाठी बर्‍याचशा निरर्थक गोष्टी बडबडत आहेस. ॥९॥
पुत्रप्रवादेन तु रावणस्य
त्वमिन्द्रजिन्मित्रमुखोऽसि शत्रुः ।
यस्येदृशं राघवतो विनाशं
निशम्य मोहाद् अनुमन्यसे त्वम् ॥ १० ॥
इंद्रजित ! तू रावणाचा पुत्र म्हणवून घेऊन ही वरूनच त्याचा मित्र आहेस. अंतरांतून तर तू पित्याचा शत्रूच वाटत आहेस. हेच कारण आहे की तू राघवांच्या द्वारा राक्षसराजाच्या विनाशाच्या गोष्टी ऐकूनही मोहवश त्यांच्या हो ला हो म्हणत आहेस. (हांजी हांजी करत आहेस) ॥१०॥
त्वमेव वध्यश्च सुदुर्मतिश्च
स चापि वध्यो य इहानयत् त्वाम् ।
बालं दृढं साहसिकं च योऽद्य
प्रावेशयन् मंत्रकृतां समीपम् ॥ ११ ॥
तुझी बुद्धि फारच खोटी आहे. तू स्वत: तर मारला जाण्यास योग्य आहेसच, ज्याने तुला येथे बोलावून आणले आहे तोही वधा योग्यच आहे. ज्याने आज तुझ्यासारख्या अत्यंत दु:साहसी बालकाला या सल्लागारांच्या समीप येऊ दिले आहे, तो प्राणदंडाचाच अपराधी आहे. ॥११॥
मूढः प्रगल्भोऽविनयोपपन्नः
तीक्ष्णस्वभावोऽल्पमतिर्दुरात्मा ।
मूर्खस्त्वमत्यन्त सुदुर्मतिश्च
त्वमिन्द्रजिद् बालतया ब्रवीषि ॥ १२ ॥
इंद्रजिता ! तू अविवेकी आहेस. तुझी बुद्धि परिपक्व नाही आहे. विनयाने तर तुला स्पर्श केलेला नाही. तुझा स्वभाव फार तीक्ष्ण आहे आणि बुद्धि फारच थोटी आहे. तू अत्यंत दुर्बुद्धि, दुरात्मा आणि मूर्ख आहेस. म्हणून बालकाप्रमाणे बिन शेंड्‍या-बुडख्या सारख्या गोष्टी बोलत आहेस. ॥१२॥
को ब्रह्मदण्डप्रतिमप्रकाशान्
अर्चिष्मतः कालनिकाशरूपान् ।
सहेत बाणान् यमदण्डकल्पान्
समक्षमुक्तान् युधि राघवेण ॥ १३ ॥
भगवान्‌ श्रीराघवांच्या द्वारा युद्धाच्या सुरूवातीलाच शत्रुंच्या समक्ष सोडले गेलेले तेजस्वी बाण साक्षात्‌ ब्रह्मदंडाप्रमाणे प्रकाशित होतात, काळासमान वाटतात आणि यमदंडासमान भयंकर असतात. भले, त्यांना कोण सहन करू शकतो ? ॥१३॥
धनानि रत्‍नामनि सुभूषणानि
वासांसि दिव्यानि मणींश्च चित्रान् ।
सीतां च रामाय निवेद्य देवीं
वसेम राजन्निह वीतशोकाः ॥ १४ ॥
म्हणून राजन्‌ ! आपण सर्व धन, रत्‍न, सुंदर आभूषणे, दिव्य वस्त्रे, विचित्र मणि आणि देवी सीतेला श्रीरामांच्या सेवेत समर्पित करूनच शोकरहित होऊन या नगरात निवास करू शकतो. ॥१४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे पञ्चदशः सर्ग ॥ १५ ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा पंधरावा सर्ग पूर्ण झाला. ॥१५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP