श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ त्रिनवतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामस्य यज्ञे वाल्मीकेरागमनं, रामायणगानार्थं तस्य कुशीलवौ प्रत्यादेशः -
श्रीरामांच्या यज्ञात महर्षि वाल्मीकिंचे आगमन आणि त्यांचा रामायण गायनासाठी कुश आणि लवाला आदेश -
वर्तमाने तथाभूते यज्ञे च परमाद्‌भुते ।
सशिष्य आजगामाशु वाल्मीकिर्मुनिपुङ्‌गवः ॥ १ ॥
याप्रकारे तो अत्यंत अद्‍भुत यज्ञ जेव्हा चालू होता त्यासमयी भगवान्‌ वाल्मीकि मुनी आपल्या शिष्यांसह त्यात शीघ्रतापूर्वक आले. ॥१॥
स दृष्ट्‍वा दिव्यसङ्‌काशं यज्ञमद्‌भुतदर्शनम् ।
एकान्ते ऋषिवाहानां चकार उटजाञ्छुभान् ॥ २ ॥
त्यांनी त्या दिव्य आणि अद्‍भुत यज्ञाचे दर्शन घेतले आणि ऋषिंसाठी जे वाडे बनविले होते त्यांच्या जवळच त्यांनी आपल्यासाठीही सुंदर पर्णशाला बनवून घेतल्या. ॥२॥
शकटांश्च बहून् पूर्णान् फलमूलैश्च शोभनान् ।
वाल्मीकिवाटे रुचिरे स्थापयन्नविदूरतः ॥ ३ ॥
वाल्मीकिंच्या सुंदर वाड्‍याच्या जवळच अन्न आदिनी भरलेले बरेचसे छकडे उभे करण्यात आले होते. त्या बरोबरच चांगली चांगली फळे आणि मूळे ठेवून देण्यात आली होती. ॥३॥
आसीत् सुपूजितो राज्ञा मुनिभिश्च महात्मभिः ।
वाल्मीकिः सुमहातेजा न्यवसत् परमात्मवान् ॥ ४ ॥
राजा श्रीराम तथा बहुसंख्य महात्मा मुनिंच्या द्वारा उत्तम प्रकारे पूजित एवं सन्मानित होऊन महातेजस्वी आत्मज्ञानी वाल्मीकि मुनींनी मोठ्‍या सुखाने तेथे निवास केला. ॥४॥
स शिष्यावब्रवीद्धृष्टौ युवां गत्वा समाहितौ ।
कृत्स्नं रामायणं काव्यं गायेथां परया मुदा ॥ ५ ॥
त्यांनी आपल्या हृष्ट-पुष्ट दोन शिष्यांना म्हटले - तुम्ही दोघे भाऊ एकाग्रचित्त होऊन हिंडून फिरून मोठ्‍या आनंदाने संपूर्ण रामायण काव्याचे गायन करा. ॥५॥
ऋषिवाटेषु पुण्येषु ब्राह्मणावसथेषु च ।
रथ्यासु राजमार्गेषु पार्थिवानां गृहेषु च ॥ ६ ॥
ऋषि आणि ब्राह्मणांच्या पवित्र स्थानांवर, गल्ल्यांच्या मध्ये, राजमार्गांवर तसेच राजांच्या निवासस्थानावर या काव्याचे गायन करा. ॥६॥
रामस्य भवनद्वारि यत्र कर्म च कुर्वते ।
ऋत्विजामग्रतश्चैव तत्र गेयं विशेषतः ॥ ७ ॥
श्रीरामांचे जे गृह बनलेले आहे त्याच्या दरवाजावर; जेथे ब्राह्मण लोक यज्ञकार्य करत आहेत तेथे; तसेच ऋत्विजांच्या समोरही या काव्याचे विशेषरूपाने गायन केले पाहिजे. ॥७॥
इमानि च फलान्यत्र स्वादूनि विविधानि च ।
जातानि पर्वताग्रेषु चास्वाद्यास्वाद्य गायताम् ॥ ८ ॥
येथे पर्वतशिखरावर नाना प्रकारची स्वादिष्ट आणि मधुर फळे लागलेली आहेत. (भूक लागल्यावर) त्यांचा स्वाद घेत घेत या काव्याचे गायन करीत राहा. ॥८॥
न यास्यथः श्रमं वत्सौ भक्षयित्वा फलान्यथ ।
मूलानि च सुमृष्टानि न रागाद् पपिहास्यथः ॥ ९ ॥
मुलांनो ! येथील सुमधुर फळां-मूळांचे भक्षण करण्याचे तुम्हांस कधी थकवाही येणार नाही आणि तुमच्या गळ्याची मधुरताही नष्ट होणार नाही. ॥९॥
यदि शब्दापयेद् रामः श्रवणाय महीपतिः ।
ऋषीणामुपविष्टानां यथायोगं प्रवर्तताम् ॥ १० ॥
जर महाराज श्रीरामांनी तुम्हां दोघांना गायन ऐकण्यासाठी बोलावले तर तुम्ही त्यांच्याशी तसेच तेथे बसलेल्या ऋषि-मुनिंशीही यथायोग्य विनयपूर्ण वर्तन करा. ॥१०॥
दिवसे विंशतिः सर्गा गेया मधुरया गिरा ।
प्रमाणैर्बहुभिस्तत्र यथोद्दिष्टा मया पुरा ॥ ११ ॥
मी प्रथमच भिन्न भिन्न संख्या असणार्‍या श्लोकांनी युक्त रामायण काव्याच्या सर्गांचा ज्या प्रकारे तुम्हाला उपदेश दिला आहे, त्यास अनुसरून प्रतिदिन वीस वीस सर्गांचे मधुर स्वराने गायन करा. ॥११॥
लोभश्चापि न कर्तव्यः स्वल्पोऽपि धनवाञ्छया ।
किं धनेनाश्रमस्थानां फलमूलाशिलां सदा ॥ १२ ॥
धनाच्या इच्छेने थोडासाही लोभ करू नका. आश्रमात राहून फळ-मूळ भोजन करणार्‍या वनवासी लोकांना धनाशी काय काम ? ॥१२॥
यदि पृच्छेत्स काकुत्स्थो युवां कस्येति दारकौ ।
आवां वाल्मीकेरथ शिष्यौ द्वौ ब्रूतमेवं नराधिपम् ॥ १३ ॥
जर काकुत्स्थांनी विचारले - मुलांनो ! तुम्ही दोघे कोणाचे पुत्र आहात ? तर तुम्ही दोघे महाराजांना इतकेच सांगा की आम्ही दोघे भाऊ महर्षि वाल्मीकिंचे शिष्य आहोत. ॥१३॥
इमास्तन्त्रीः सुमधुराः स्थानं वापूर्वदर्शनम् ।
मूर्च्छयित्वा सुमधुरं गायतां विगतज्वरौ ॥ १४ ॥
ह्या वीणेच्या सात तारा आहेत. यांच्यापासून फार मधुर आवाज निघतो. यात अपूर्व स्वरांचे प्रदर्शन करणारी ही स्थाने बनलेली आहेत. हिच्या स्वरांना झंकृत करून मिळवून सुमधुर स्वरात तुम्ही दोघे भाऊ काव्याचे गायन करा आणि सर्वथा निश्चिंत राहा. ॥१४॥
आदिप्रभृति गेयं स्यात् न चावज्ञाय पार्थिवम् ।
पिता हि सर्वभूतानां राजा भविति धर्मतः ॥ १५ ॥
आरंभापासून या काव्याचे गायन केले पाहिजे, तुम्ही असे काही आचरण करू नये की ज्यायोगे राजाचा अपमान होईल, कारण की राजा धर्माच्या दृष्टिने संपूर्ण प्राण्यांचा पिता असतो. ॥१५॥
तद् युवां हृष्टमनसौ श्वः प्रभाते समाहितौ ।
गायतं मधुरं गेयं तन्त्रीलयसमन्वितम् ॥ १६ ॥
म्हणूनच तुम्ही दोघे भाऊ प्रसन्न आणि एकाग्रचित्त होऊन उद्या सकाळ पासूनच वीणेच्या लयीवर मधुर स्वराने रामायण-गायन करण्यास आरंभ करा. ॥१६॥
इति संदिश्य बहुशो मुनिः प्राचेतसस्तदा ।
वाल्मीकिः परमोदारः तूष्णीमासीन् महामुनिः ॥ १७ ॥
याप्रकारे बरेच काही आदेश देऊन वरूणाचे पुत्र परम उदार महामुनि वाल्मीकि गप्प झाले. ॥१७॥
संदिष्टौ मुनिना तेन तावुभौ मैथिलीसुतौ ।
तथैव करवावेति निर्जग्मतुररिन्दमौ ॥ १८ ॥
मुनिंनी याप्रकारे आदेश दिल्यावर मैथिली सीतेचे ते दोन्ही शत्रुदमन पुत्र फार चांगले, आम्ही असेच करू असे म्हणून तेथून निघून गेले. ॥१८॥
तामद्‌भुतां तौ हृदये कुमारौ
निवेश्य वाणीमृषिभाषितां तदा ।
समुत्सुकौ तौ सुखमूषतुर्निशां
यथाऽश्विनौ भार्गवनीतिसंहिताम् ॥ १९ ॥
शुक्राचार्यांनी बनविलेल्या नीतिसंहितेला धारण करणार्‍या अश्विनीकुमारांप्रमाणे ऋषिनी सांगितलेल्या त्या अद्‍भुत वाणीला हृदयात धारण करून ते दोन्ही कुमार मनातल्या मनात उत्कण्ठित होऊन तेथे रात्रभर सुखाने राहिले. ॥१९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे त्रिनवतितमः सर्गः ॥ ९३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा त्र्याण्णववा सर्ग पूरा झाला. ॥९३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP