श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ एकोनचत्वारिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामेण सुग्रीवं प्रति कृतज्ञतायाः प्रकाशनं, विभिन्न वानरयूथपतीनां सैन्यैः सहागमनम् - श्रीरामचंद्रांनी सुग्रीवाबद्दल कृतज्ञता प्रकट करणे तसेच विभिन्न वानर यूथपतिंचे आपल्या सेनांसह आगमन -
इति ब्रुवाणं सुग्रीवं रामो धर्मभृतां वरः ।
बाहुभ्यां संपरिष्वज्य प्रत्युवाच कृताञ्जलिम् ॥ १ ॥
सुग्रीवांनी असे म्हटल्यावर धर्मात्म्यांमध्ये श्रेष्ठ रामांनी आपल्या दोन्ही भुजांनी त्यांना आलिंगन दिले आणि हात जोडून उभे असलेल्या त्यांना याप्रकारे म्हटले- ॥१॥
यदिंद्रो वर्षते वर्षं न तच्चित्रं भविष्यति ।
आदित्योऽसौ सहस्रांशुः कुर्याद् वितिमिरं नभः ॥ २ ॥

चंद्रमा रजनीं कुर्यात् प्रभया सौम्य निर्मलाम् ।
त्वद्विधो वापि मित्राणां प्रीतिं कुर्यात् परंतप ॥ ३ ॥
’सख्या ! इंद्र जी जलाची वृष्टि करतात, सहस्त्र किरणांनी शोभणारे सूर्यदेव जे आकाशांतील अंधकार दूर करतात तसेच हे सौम्य ! चंद्रमा आपल्या प्रभेने जो अंधार्‍या रात्रीलाही उज्वल बनवितो त्यात काही आश्चर्याची गोष्ट नाही आहे; कारण की तो त्यांचा स्वाभाविका गुण आहे. परंतप ! सुग्रीवा ! याप्रकारे तुमच्या सारखे पुरुषही जर आपल्या मित्रांवर उपकार करून त्यांना प्रसन्न करतात तर यातही काही आश्चर्य मानता उपयोगी नाही. ॥२-३॥
एवं त्वयि न तच्चित्रं भवेद् यत् सौम्य शोभनम् ।
जानाम्यहं त्वां सुग्रीव सततं प्रियवादिनम् ॥ ४ ॥
’सौम्य सुग्रीवा ! याप्रकारे तुमच्यात जो मित्रांचे हितसाधनरूप कल्याणकरी गुण आहे तो आश्चर्याचा विषय नाही आहे, कारण मी जाणतो की तुम्ही सदा प्रिय बोलणारे आहात- हा तुमचा स्वाभाविक गुण आहे. ॥४॥
त्वत्सनाथः सखे सङ्‌ख्येर जेतास्मि सकलानरीन् ।
त्वमेव मे सुहृन्मित्रं साहाय्यं कर्तुमर्हसि ॥ ५ ॥
’सख्या ! तुमच्या सहायतेमुळे सनाथ होऊन मी युद्धात समस्त शत्रूंना जिंकून घेईन. तुम्हीच माझे हितैषी मित्र आहात आणि माझी सहायता करू शकता. ॥५॥
जहारात्मविनाशाय वैदेहीं राक्षसाधमः ।
वञ्चयित्वा तु पौलोमीं अनुह्लादौ यथा शचीम् ॥ ६ ॥
’राक्षसाधम रावणाने आपला नाश करण्यासाठीच मैथिलीला फसवून तिचे अपहरण केले आहे. ज्याप्रमाणे अनुल्हादाने आपल्या विनाशासाठीच पुलोमपुत्री शचीचे बलपूर्वक हरण केले होते अगदी त्याप्रमाणेच (**) ॥६॥
(**-पुलोम दानवाची कन्या शची इंद्रदेवाप्रति अनुरक्त होती, परंतु अनुल्हादाने तिच्या पित्याला फुसलावून आपल्या पक्षाचे करून घेतले आणि त्याच्या अनुमतिने शचीचे हरण केले. जेव्हा इंद्रांना याचा सुगाव लागला तेव्हा ते अनुमति देणार्‍या पुलोमाला आणि अपहरण करणार्‍या अनुल्हादालाही मारून शचीला आपल्या घरी घेऊन आले. ही पुराण कथा प्रसिद्ध आहे. (रामायणतिलक मधून)
नचिरात् तं वधिष्यामि रावणं निशितैः शरैः ।
पौलोम्याः पितरं दृप्तं शतक्रतुरिवारिहा ॥ ७ ॥
’जसे शत्रुहंता इंद्रांनी शचीच्या घमेंडखोर पित्याला मारून टाकले होते त्याप्रमाणेच मी ही लवकरच आपल्या तीक्ष्ण बाणांनी रावणाचा वध करून टाकीन.’ ॥७॥
एतस्मिन्नंतरे चैव रजः समभिवर्तत ।
उष्णां तीव्रां सहस्रांशो श्छादयद्गहगने प्रभाम् ॥ ८ ॥
श्रीराम आणि सुग्रीवात जेव्हा याप्रकारे गोष्टी चालल्या होत्या त्याच समयी फार जोराची धूळ उठली, जी आकाशात पसरून तिने सूर्याच्या प्रचंड प्रभेलाही झाकून टाकले. ॥८॥
दिशः पर्याकुलाश्चासन् तमसा तेन मूर्च्छता ।
चचाल च मही सर्वा सशैलवनकानना ॥ ९ ॥
नंतर तर धूळजनित अंधःकाराने संपूर्ण दिशा दूषित आणि व्याप्त होऊन गेल्या तसेच पर्वत, वने आणि काननांसह संपूर्ण पृथ्वी डगमगू लागली. ॥९॥
ततो नगेंद्रसंकाशैः तीक्ष्णदंष्ट्रैर्महाबलैः ।
कृत्स्ना संछादिता भूमिः असंख्येयैः प्लवंगमैः ॥ १० ॥
त्यानंतर पर्वतासमान शरीर आणि तीक्ष्ण दाढा असणार्‍या असंख्य महाबली वानरांनी तेथील सारी भूमी आच्छादित होऊन गेली. ॥१०॥
निमेषांतरमात्रेण ततस्तैर्हरियूथपैः ।
कोटीशतपरीवारैः वानरैः हरियूथपैः ॥ ११ ॥
डोळ्याचे पाते लवते न लवते तोच अब्जावधि वानरांनी घेरलेल्या अनेकानेक यूथपतिंनी तेथे येऊन सारी भूमी झाकून टाकली. ॥११॥
नादेयैः पार्वतेयैश्च सामुद्रैश्च महाबलैः ।
हरिभिर्मेघनिर्ह्रादैः अन्यैश्च वनवासिभिः ॥ १२ ॥
नद्या, पर्वत, वने आणि समुद्र सर्व स्थानांचे निवासी महाबली वानर एकत्र जमले, जे मेघांच्या गर्जने प्रमाणे उच्च स्वराने सिंहनाद करीत होते. ॥१२॥
तरुणादित्यवर्णैश्च शशिगौरैश्च वानरैः ।
पद्मकेसरवर्णैश्च श्वेतैर्मेरुकृतालयैः ॥ १३ ॥
कोणी बालसूर्याप्रमाणे लाल रंगाचे होते, तर कोणी चंद्रम्याप्रमाणे गौर वर्णाचे होते. कित्येक वानर कमळांतील केसरांप्रमाणे पीत वर्णाचे होते आणि कित्येक हिमाचलवासी वानर पांढरे दिसून येत होते. ॥१३॥
कोटीसहस्रैर्दशभिः श्रीमान् परिवृतस्तदा ।
वीरः शतवलिर्नाम वानरः प्रत्यदृश्यत ॥ १४ ॥
त्या समयी परम कांतिमान् शतबलि नामक वीर वानर दहा अब्ज वानरांसह दृष्टिगोचर झाला. ॥१४॥
ततः काञ्चनशैलाभः ताराया वीर्यवान् पिता ।
अनेकैर्बहुसाहस्रैः कोटिभिः प्रत्यदृश्यत ॥ १५ ॥
तत्पश्चात सुवर्णशैलासमान सुंदर आणि विशाल शरीराचे ताराचे महाबली पिता कित्येक सहस्र कोटी वानरांसह तेथे उपस्थित दिसून आले. ॥१५॥
तथापरेण कोटीनां सहस्रेण समन्वितः ।
पिता रुमायाः संप्राप्तः सुग्रीवश्वशुरो विभुः ॥ १६ ॥
त्याच प्रमाणे रूमाचे पिता आणि सुग्रीवांचे श्वसुर, जे अत्यंत वैभवशाली होते, तेथे उपस्थित झाले. त्यांच्या बरोबरही दहा अब्ज वानर होते. ॥१६॥
पद्मकेसरसंकाशः तरुणार्कनिभाननः ।
बुद्धिमान् वानरश्रेष्ठः सर्ववानरसत्तमः ॥ १७ ॥

अनीकैर्बहुसाहस्रैः वानराणां समन्वितः ।
पिता हनुमतः श्रीमान् केसरी प्रत्यदृश्यत ॥ १८ ॥
त्यानंतर हनुमानाचे पिता कपिश्रेष्ठ श्रीमान् केसरी दिसून आले, त्यांच्या शरीराचा रंग कमलाच्या केसरांप्रमाणे पिवळा आणि मुख प्रातःकालच्या सूर्यासमान लाल होते. ते फार बुद्धिमान् आणि समस्त वानरांमध्ये श्रेष्ठ होते. ते कित्येक हजार वानरांनी घेरलेले होते. ॥१७-१८॥
गोलाङ्‌गूल महाराजो गवाक्षो भीमविक्रमः ।
वृतः कोटिसहस्रेण वानराणामदृश्यत ॥ १९ ॥
नंतर लंगूर जातिच्या वानरांचे महाराज भयंकर पराक्रमी गवाक्षांचे दर्शन झाले. त्यांच्या बरोबर दह अब्ज वानरांची सेना होती. ॥१९॥
ऋक्षाणां भीमवेगानां धूम्रः शत्रुनिबर्हणः ।
वृतः कोटिसहस्राभ्यां द्वाभ्यां समभिवर्तत ॥ २० ॥
शत्रूंचा संहार करणारे धूम्र भयंकर वेगवान् वीस अब्ज अस्वलांची सेना घेऊन आले. ॥२०॥
महाचलनिभैर्घोरैः पनसो नाम यूथपः ।
आजगाम महावीर्यः तिसृभिः कोटिभिर्वृतः ॥ २१ ॥
महापराक्रमी यूथपति पनस तीस कोटी वानरांसह उपस्थित झाले. ते सर्वच्या सर्व भयंकर तसेच महान् पर्वताकार दिसत होते. ॥२१॥
नीलाञ्जनचयाकारो नीलो नामैष यूथपः ।
अदृश्यत महाकायः कोटिभिर्दशभिर्वृतः ॥ २२ ॥
यूथपति नीलाचे शरीरही फार विशाल होते. ते निळ्या कज्जल गिरि प्रमाणे नील वर्णाचे होते आणि दहा कोटि कपिंनी घेरलेले होते. ॥२२॥
ततः काञ्चनशैलाभो गवयो नाम यूथपः ।
आजगाम महार्वीयः कोटिभिः पञ्चभिर्वृतः ॥ २३ ॥
नंतर यूथपति गवय जे सुवर्णमय मेरूपर्वतासमान कांतिमान् आणि महापराक्रमी होते, पाच कोटी वानरांसह उपस्थित झाले. ॥२३॥
दरीमुखश्च बलवान् यूथपोऽभ्याययौ तदा ।
वृतः कोटिसहस्रेण सुग्रीवं समवस्थितः ॥ २४ ॥
त्याच समयी वानरांचे बलवान् सरदार दहीमुखही येऊन पोहोंचले. ते दहा अब्ज वानरांसह सुग्रीवांच्या सेवेमध्ये उपस्थित झाले होते. ॥२४॥
मैंदश्च द्विविदश्चोभौ अवश्विपुत्रौ महाबलौ ।
कोटिकोटिसहस्रेण वानराणामदृश्यताम् ॥ २५ ॥
अश्विनीकुमारांचे महाबली पुत्र मैंद आणि द्विविद होते. दोघे भाऊ ही दहा-दहा अब्ज वानरांच्या सेनेसह तेथे दिसून आले. ॥२५॥
गजश्च बलवान् वीरः स्तिसृभिः कोटिभिर्वृतः ।
आजगाम महातेजाः सुग्रीवस्य समीपतः ॥ २६ ॥
तदनंतर महातेजस्वी बलवान् वीर गज तीन कोटी वानरांसह सुग्रीवांजवळ आले. ॥२६॥
ऋक्षराजो महातेजा जांबवान्नाम नामतः ।
कोटिभिर्दशभिः व्याप्तः सुग्रीवस्य वशे स्थितः ॥ २७ ॥
अस्वलांचे राजे जाम्बवान् फार तेजस्वी होते. ते दहा कोटी अस्वलांनी घेरलेले आले आणि सुग्रीवांच्या अधीन होऊन उभे राहिले. ॥२७॥
रुमणो नाम तेजस्वी विक्रांतैः वानरैर्वृतः ।
आगतौ बलवांस्तूर्णं कोटिशतसमावृतः ॥ २८ ॥
रूमण (रूमण्वान् ) नामक तेजस्वी आणि बलवान् वानर एक अब्ज पराक्रमी वानरांसह अत्यंत तीव्र गतीने तेथे आला. ॥२८॥
ततः कोटिसहस्राणां सहस्रेण शतेन च ।
पृष्ठतोऽनुगतः प्राप्तो हरिभिर्गंधमादनः ॥ २९ ॥
यानंतर यूथपति गंधमादन उपस्थित झाले. त्यांच्या पाठोपाठ एक पद्म वानरांची सेना आली. ॥२९॥
ततः पद्मसहस्रेण वृतः शङ्‌कुनशतेन च ।
युवराजोऽङ्‌गतदः प्राप्तः पितुस्तुल्यपराक्रमः ॥ ३० ॥
तत्पश्चात युवराज अंगद आले. ते आपल्या पित्यासमान पराक्रमी होते. त्यांच्या बरोबर एक सहस्त्र पद्म आणि शंभर शंकु (एक पद्म) वानरांची सेना होती. (त्यांच्या सैनिकांची एकूण संख्या दहा शंख एक पद्म होती.) ॥३०॥
ततस्ताराद्युतिस्तारो हरिभिर्भीमविक्रमैः ।
पञ्चभिर्हरिकोटिभिः दूरतः पर्यदृश्यत ॥ ३१ ॥
तदनंतर तारांप्रमाणे कांतिमान् तार नामक वानर पाच कोटी भयंकर पराक्रमी वानर वीरासंह दूरून येतांना दिसून आला. ॥३१॥
इंद्रजानुः कपिर्वीरो यूथपः प्रत्यदृश्यत ।
एकादशानां कोटीनां ईश्वरस्तैश्च संवृतः ॥ ३२ ॥
इंद्रजानु (इंद्रभानु) नामक वीर यूथपति जो खूपच विद्वान् आणि बुद्धिमान् होता अकरा कोटी वानरांसह उपस्थित दिसून आला. तो त्या सर्वांचा स्वामी होता. ॥३२॥
ततो रंभस्त्वनुप्राप्तः तरुणादित्यसंनिभः ।
अयुतेन वृतश्चैव सहस्रेण शतेन च ॥ ३३ ॥
यानंतर रंभ नामक वानर उपस्थित झाला, जो प्रातःकालच्या सूर्याप्रमाणे लाल रंगाचा होता. त्याच्या बरोबर अकरा हजार एकशे वानरांची सेना होती. ॥३३॥
ततो यूथपतिर्वीरो दुर्मुखो नाम वानरः ।
प्रत्यदृश्यत कोटिभ्यां द्वाभ्यां परिवृतो बली ॥ ३४ ॥
तत्पश्चात् वीर यूथपति दुर्मुख नामक बलवान् वानर उपस्थित दिसून आला जो दोन कोटी वानर सैनिकांनी घेरलेला होता. ॥३४॥
कैलासशिखराकारैः वानरैर्भीमविक्रमैः ।
वृतः कोटिसहस्रेण हमुमान् प्रत्यदृश्यत ॥ ३५ ॥
यानंतर हनुमानांनी दर्शन दिले. त्यांच्या बरोबर कैलास शिखरासमान श्वेत शरीराचे भयंकर पराक्रमी वानर दहा अब्जच्या संख्येत विद्यमान होते. ॥३५॥
नलश्चापि महावीर्यः संवृतो द्रुमवासिभिः ।
कोटीशतेन संप्राप्तः सहस्रेण शतेन च ॥ ३६ ॥
नंतर महापराक्रमी नील उपस्थित झाले. जे एक अब्ज एक हजार एकशे द्रुमवासी वानरांनी घेरलेले होते. ॥३६॥
ततो दधिमुखः श्रीमान् कोटिभिर्दशभिर्वृतः ।
संप्राप्तोऽभिनदंतस्य सुग्रीवस्य महात्मनः ॥ ३७ ॥
त्यानंतर श्रीमान् दधिमुख दहा कोटी वानरांसह गर्जना करीत किष्किंधेत महात्मा सुग्रीवांजवळ आले. ॥३७॥
शरभः कुमुदो वह्निः वानरो रंह एव च ।
एते चान्ये च बहवो वानराः कामरूपिणः ॥ ३८ ॥

आवृत्य पृथिवीं सर्वां पर्वातांश्च वनानि च ।
यूथपाः समनुप्राप्ताः तेषां संख्या न विद्यते ॥ ३९ ॥
याशिवाय शरभ, कुकुद, वह्मि तसेच संह - हे आणि इतरही बरेचसे इच्छानुसार रूप धारण करणारे वानरयूथपति सारी पृथ्वी, पर्वत आणि वनांना आवृत्त करून तेथे उपस्थित झाले, ज्यांची काही गणनाच करता येणे शक्य नव्हते, ॥३८-३९॥
आगताश्च विशिष्टाश्च पृथिव्यां सर्ववानराः ।
आप्लवंतः प्लवंतश्च गर्जंतश्च प्लवंगमाः ।
अभ्यवर्तंत सुग्रीवं सूर्यमभ्रगणा इव ॥ ४० ॥
तेथे आलेले सर्व वानर पृथ्वीवर बसले. ते सर्वच्या सर्व उड्या मारीत, गर्जना करीत तेथे सुग्रीवाच्या चारी बाजूस जमा झाले. जणु सूर्याला सर्व बाजूंनी घेरून मेघांचे समूह पसरलेले आहेत. ॥४०॥
कुर्वाणा बहुशब्दांश्च प्रहृष्टा बाहुशालिनः ।
शिरोभिर्वानरेंद्राय सुग्रीवस्य न्यवेदयन् ॥ ४१ ॥
आपल्या भुजांनी सुशोभित होणारे बरेचसे श्रेष्ठ वानरांनी (जे गर्दीमुळे सुग्रीवाजवळ सुद्धा पोहोचू शकत नव्हते) अनेक प्रकारची बोली बोलून तसेच मस्तक नमवून वानरराज सुग्रीवांना आपल्या अगमनाची सूचना दिली. ॥४१॥
अपरे वानरश्रेष्ठाः संयम्य च यथोचितम् ।
सुग्रीवेण समागम्य स्थिताः प्राञ्जलयस्तदा ॥ ४२ ॥
बरेचसे श्रेष्ठ वानर त्यांच्याजवळ गेले आणि यथोचित रूपाने भेंटून परतले. तसेच कित्येक वानर सुग्रीवांना भेटल्यावर त्यांच्या जवळच हात जोडून उभे राहिले. ॥४२॥
सुग्रीवस्त्वरितो रामे सर्वांस्तान् वानरर्षभान् ।
निवेदयित्वा धर्मज्ञः स्थितः प्राञ्जलिरब्रवीत् ॥ ४३ ॥
धर्माचे ज्ञाते वानरराज सुग्रीवांनी तेथे आलेल्या त्या सर्व वानरश्रेष्ठांचा समाचार निवेदन करून श्रीरामचंद्रांना शीघ्रतापूर्वक त्यांचा परिचय करून दिला आणि हात जोडून ते त्यांच्या समोर उभे राहिले. ॥४३॥
यथासुखं पर्वतनिर्झरेषु
वनेषु सर्वेषु च वानरेंद्राः ।
निवेशयित्वा विधिवद् बलानि
बलं बलज्ञः प्रतिपत्तुमीष्टे ॥ ४४ ॥
त्या वानर-यूथपतिंनी तेथील पर्वतीय निर्झरांच्या आसपास तसेच समस्त वनांमध्ये आपल्या सेनांना यथोचितरूपाने सुखपूर्वक उतरविले. तत्पश्चात् सर्व सेनांचे ज्ञाते सुग्रीव त्यांचे पूर्णतः ज्ञान करून घेण्यास समर्थ होऊ शकले. ॥४४॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे एकोनचत्वारिंशः सर्गः ॥ ३९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा एकोणचाळिसावा सर्ग पूरा झाला. ॥३९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP