प्रस्तावना :

आपदामपहर्तारं दातारं सर्व संपदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयोभूयो नमाम्यहम् ॥ १ ॥
कूजंतं रामरामेति मधुरं मधुराक्षरम् ।
आरुह्य कविताशाखां वंदे वाल्मीकि कोकिलम् ॥ २ ॥
यत्कृतं यत्करिष्यामि तत्सर्वं न मया कृतम् ।
त्वया कृतं तु फलभुक्त्वमेव मधुसूदन ॥ ३ ॥
* * *
आदिकाव्य हे रामायण । जैं नव्हतें कोणाचें आख्यान ।
नानापुराणें माहात्म्यकथ । शास्त्रसिद्धांत रामायणीं ॥ १ ॥
नाना सकाम कथा सृष्टीवरी । रामकथेची न पवती सरी ।
कां जे आत्माराम चराचरीं । तारक ब्रह्म सर्वत्र हें ॥ २ ॥

वेद जसा सर्व धर्मग्रंथांत आद्य ग्रंथ म्हणून शोभत आहे, तसेंच रामायण हें आदिकाव्य म्हणून जगांत मिरवले जाते. रामदासी गिरिधरस्वामी यांच्या वरील श्लोकात म्हटल्याप्रमाणे रामकथेची सर आजवर कोणत्याही काव्यास आली नाही व पुढेही येणें संभवनीय नाही. रामकथेतील रहस्य जाणून श्रीसमर्थांनी म्हटले ’रामकथेचा प्रसार ब्रह्मांडाच्याही पलीकडे करावा.

to be continued. . .