राजभिः श्रीरामायोपहारस्य प्रेषणं, तमादाय श्रीरामेण स्वमित्रेभ्यो वानरादिभ्यस्तस्य वितरणं, वानरादीनां तत्र सुखेनावस्थानम् -
|
राजांचे श्रीरामांसाठी भेटी देणे आणि श्रीरामांनी त्या सर्व घेऊन आपले मित्र, वानरे, अस्वले आणि राक्षसांना वाटून टाकणे तसेच वानर आदिंचे तेथे सुखपूर्वक राहाणे -
|
ते प्रयाता महात्मानः पार्थिवास्ते प्रहृष्टवत् । गजवाजिसहस्रौघैः कम्पयन्तो वसुंधराम् ॥ १ ॥
|
अयोध्येहून प्रस्थित झालेले ते महामना भूपाल हजारो हत्ती, घोडे तसेच पायदळांच्या समूहांनी पृथ्वी कंपित करीत हर्षपूर्वक पुढे जाऊ लागले. ॥१॥
|
अक्षौहिण्यो हि तत्रासन् राघवार्थे समुद्यताः । भरतस्याज्ञयानेकाः प्रहृष्टा बलवाहनाः ॥ २ ॥
|
भरताच्या आज्ञेने राघवांच्या मदतीसाठी कित्येक अक्षौहिणी सेना युद्धासाठी उद्यत होऊन आल्या होत्या. त्या सर्वांमधील सैनिक आणि वहाने हर्ष आणि उत्साहाने भरलेली होती. ॥२॥
|
ऊचुस्ते च महीपाला बलदर्पसमन्विताः । न रामरावणं युद्धे पश्यामः पुरतः स्थितम् ॥ ३ ॥
|
ते सर्व राजे बळाच्या घमेंडीने भरून आपसात या प्रकारे गोष्ट बोलू लागले - आपण युद्धामध्ये श्रीराम आणि रावणाला समोरासमोर उभे असलेले पाहिलेले नाही. ॥३॥
|
भरतेन वयं पश्चात् समानीता निरर्थकम् । हता हि राक्षसाः क्षिप्रं पार्थिवैः स्युर्न संशयः ॥ ४ ॥
|
भरताने (पहिल्याने तर सूचना दिली नाही) नंतर युद्ध समाप्त झाल्यावर आपल्याला व्यर्थच बोलावून घेतले. जर सर्व राजे गेले असते तर त्यांच्या द्वारा समस्त राक्षसांचा संहार फारच लवकर झाला असता यात संशय नाही. ॥४॥
|
रामस्य बाहुवीर्येण रक्षिता लक्ष्मणस्य च । सुखं पारे समुद्रस्य युध्येम विगतज्वराः ॥ ५ ॥
|
श्रीराम आणि लक्ष्मणाच्या बाहुबलाने सुरक्षित आणि निश्चिंत होऊन आपण समुद्राच्या पलिकडील तीरावर सुखपूर्वक युद्ध करू शकलो असतो. ॥५॥
|
एताश्चान्याश्च राजानः कथास्तत्र सहस्रशः । कथयन्तः स्वराज्यानि जग्मुर्हर्षसमन्विताः ॥ ६ ॥
|
ह्या आणि आणखीही बर्याच गोष्टी करीत ते हजारो नरेश अत्यंत हर्षाने आपापल्या राज्यात गेले. ॥६॥
|
स्वानि राज्यानि मुख्यानि ऋद्धानि मुदितानि च । समृद्धधनधान्यानि पूर्णानि वसुमन्ति च ॥ ७ ॥
यथापुराणि ते गत्वा रत्नातनि विविधान्यथ । रामस्य प्रियकामार्थं उपहारान् नृपा ददुः ॥ ८ ॥ अश्वान्यानानि रत्नाानि हस्तिनश्च मदोत्कटान् । चन्दनानि च मुख्यानि दिव्यान्याभरणानि च ॥ ९ ॥ मणिमुक्ताप्रवालांस्तु दास्यो रूपसमन्विताः । अजाविकं च विविधं रथांस्तु विविधान् बहून् ॥ १० ॥
|
त्यांची आपली आपली प्रसिद्ध राज्ये समृद्धशाली, सुख आणि आनंदाने परिपूर्ण, धनधान्याने संपन्न तसेच रत्ने आदिनी परिपूर्ण होती. त्या राज्यात आणि नगरात जाऊन त्या नरेशांनी श्रीरामांचे प्रिय करण्याच्या इच्छेने नाना प्रकारची रत्ने आणि उपहार धाडले. घोडे, वहाने, रत्ने, मत्त हत्ती, उत्तम चंदन, दिव्य आभूषणे, मणि, मोती, पोवळी, रुपवती दासी, नाना प्रकारच्या बकर्या, मेंढ्या तसेच तर्हे तर्हेचे बरेचसे रथ भेट दिले. ॥७-१०॥
|
भरतो लक्ष्मणश्चैव शत्रुघ्नश्च महाबलः । आदाय तानि रत्नामनि स्वां पुरीं पुनरागताः ॥ ११ ॥ आगम्य च पुरीं रम्यां अयोध्यां पुरुषर्षभाः । तानि रत्ना्नि चित्राणि रामाय समुपाहरन् ॥ १२ ॥
|
महाबली भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न त्या रत्नांना घेऊन पुन्हा आपल्या पुरीमध्ये परत आले. रमणीय पुरी अयोध्येत येऊन त्या तीन्ही पुरुषप्रवर बंधुनी ती विचित्र रत्ने रामांना समर्पित केली. ॥११-१२॥
|
प्रतिगृह्य च तत् सर्वं रामः प्रीतिसमन्वितः । सुग्रीवाय ददौ राज्ञे महात्मा कृतकर्मणे ॥ १३ ॥ बिभीषणाय च ददौ तथान्येभ्योऽपि राघवः । राक्षसेभ्यः कपिभ्यश्च यैर्वृतो जयमाप्तवान् ॥ १४ ॥
|
ती सर्व ग्रहण करून महात्मा श्रीरामांनी मोठ्या प्रसन्नतेने उपकारी वानरराज सुग्रीव आणि विभीषण तसेच अन्य राक्षस आणि वानरांमध्येही ती वाटून टाकली; कारण त्यांच्या कडून घेरलेले राहूनच राघवांनी युद्धात विजय प्राप्त केला होता. ॥१३-१४॥
|
ते सर्वे रामदत्तानि रत्नािनि कपिराक्षसाः । शिरोभिर्धारयामासुः भुजेषु च महाबलाः ॥ १५ ॥
|
त्या सर्व महाबली वानरांनी आणि राक्षसांनी रामांनी दिलेली ती रत्न आपल्या मस्तक आणि भुजांमध्ये धारण केली. ॥१५॥
|
हनूमन्तं च नृपतिः इक्ष्वाकूणां महारथः । अङ्गदं च महाबाहुं अङ्कमारोप्य वीर्यवान् ॥ १६ ॥ रामः कमलपत्राक्षः सुग्रीवमिदमब्रवीत् । अङ्गदस्ते सुपुत्रोऽयं मन्त्री चाप्यनिलात्मजः ॥ १७ ॥ सुग्रीवमन्त्रिते युक्तौ मम चापि हिते रतौ । अर्हतो विविधां पूजां त्वत्कृते वै हरीश्वर ॥ १८ ॥
|
त्यानंतर इक्ष्वाकु नरेश महापराक्रमी कमलनयन रामांनी महाबाहु हनुमान् आणि अंगदाला मांडीवर बसवून सुग्रीवाला याप्रकारे म्हटले -सुग्रीवा ! अंगद तुमचा सुपुत्र आहे आणि पवनकुमार हनुमान् मंत्री ! वानरराज ! हे दोघे माझ्यासाठी मंत्र्यांचे काम करत होते आणि सदा माझे हित साधण्यात तत्पर रहात होते, म्हणून आणि विशेषतः तुमच्या नात्याने हे माझ्याकडून विविध आदर-सत्कार तसेच भेट मिळविण्यास योग्य आहेत. ॥१६-१८॥
|
इत्युक्त्वा व्यवमुच्याङ्गाद् भूषणानि महायशाः । स बबन्ध महार्हाणि तदाङ्गदहनूमतोः ॥ १९ ॥
|
असे म्हणून महायशस्वी श्रीरामांनी आपल्या शरीरावरून बहुमूल्य आभूषणे उतरवून ती अंगद आणि हनुमानांच्या अंगावर बांधली. ॥१९॥
|
आभाष्य च महावीर्यान् राघवो यूथपर्षभान् । नीलं नलं केसरिणं कुमुदं गन्धमादनम् ॥ २० ॥ सुषेणं पनसं वीरं मैन्दं द्विविदमेव च । जाम्बवन्तं गवाक्षं च विनतं धूम्रमेव च ॥ २१ ॥ वलीमुखं प्रजङ्घं च सन्नादं च महाबलम् । दरीमुखं दधिमुखं इन्द्रजानुं च यूथपम् ॥ २२ ॥ मधुरं श्लक्ष्णया वाचा नेत्राभ्यामापिबन्निव । सुहृदो मे भवन्तश्च शरीरं भ्रातरस्तथा ॥ २३ ॥ युष्माभिः उद्धृतश्चाहं व्यसनात् काननौकसः । धन्यो राजा च सुग्रीवो भवद्भिः सुहृदां वरैः ॥ २४ ॥
|
यानंतर राघवांनी महापराक्रमी वानर यूथपति - नील, नल, केसरी, कुमुद, गंधमादन, सुषेण, पनस, वीर मैंद, द्विविद, जाम्बवान्, गवाक्ष, विनत, धूम्र, बलिमुख, प्रजङ्घ, महाबली संनाद, दरीमुख, दधिमुख आणि यूथपति इंद्रजानु यांना बोलावून त्यांच्याकडे दोन्ही नेत्रांनी अशा प्रकारे पाहिले की जणु ते त्यांना नेत्रपुटांच्या द्वारे पिऊन टाकत आहेत. त्यांनी स्नेहयुक्त मधुर वाणीने त्यांना म्हटले -वानरवीरांनो ! आपण माझे सुहृद, शरीर आणि बंधु आहात. आपणच मला संकटांतून सोडविले आहे. आपल्या सारख्या श्रेष्ठ सुहृदांना प्राप्त करून राजा सुग्रीव धन्य झाला आहे. ॥२०-२४॥
|
एवमुक्त्वा ददौ तेभ्यो भूषणानि यथार्हतः । वज्राणि च महार्हाणि सस्वजे च नरर्षभः ॥ २५ ॥
|
असे म्हणून नरश्रेष्ठ रामांनी त्यांना यथायोग्य आभूषणे आणि बहुमूल्य हिरे दिले. तसेच त्यांना आलिंगन दिले. ॥२५॥
|
ते पिबन्तः सुगन्धीनि मधूनि मधुपिङ्गलाः । मांसानि च सुमृष्टानि मूलानि च फलानि च ॥ २६ ॥
|
मधुसमान पिंगल वर्णाचे ते वानर तेथे सुगंधित मधु पीत होते. राजभोग वस्तुंचा उपभोग घेत होते आणि स्वादिष्ट फळेमूळे खात होते. ॥२६॥
|
एवं तेषां निवसतां मासः साग्रो ययौ तदा । मुहूर्तमिव ते सर्वे रामभक्त्या च मेनिरे ॥ २७ ॥
|
याप्रकारे निवास करीत असता त्या वानरांचा तेथे एक महिन्याहून अधिक समय निघून गेला, परंतु श्रीरामांच्या प्रति भक्तिमुळे त्यांना तो समय एका मुहूर्तासमानच वाटला होता. ॥२७॥
|
रामोऽपि रेमे तैः सार्धं वानरैः कामरूपिभिः । राक्षसैश्च महावीर्यैः ऋक्षैश्चैव महाबलैः ॥ २८ ॥
|
श्रीरामही इच्छेनुसार रूप धारण करणार्या त्या वानरांबरोबर, महापराक्रमी राक्षसांबरोबर आणि महाबलि अस्वलांबरोबर आनंदाने काळ घालवीत होते. ॥२८॥
|
एवं तेषां ययौ मासो द्वितीयः शिशिरः सुखम् । वानराणां प्रहृष्टानां राक्षसानां च सर्वशः ॥ २९ ॥ इक्ष्वाकुनगरे रम्ये परां प्रीतिमुपासताम् । रामस्य प्रीतिकरणैः कालस्तेषां सुखं ययौ ॥ ३० ॥
|
याप्रकारे त्यांचा शिशिर ऋतूचा दुसरा महिनाही सुखपूर्वक निघून गेला. इक्ष्वाकुवंशी नरेशांच्या त्या सुरम्य राजधानीत ते वानर आणि राक्षस मोठ्या हर्षाने आणि प्रेमाने राहात होते. रामांच्या प्रेमपूर्वक सत्काराने त्यांचा तो समय सुखपूर्वक निघून जात होता. ॥२९-३०॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे एकोनचत्वारिंशः सर्गः ॥ ३९ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा एकोणचाळिसावा सर्ग पूरा झाला. ॥३९॥
|