हनुमता तारायाः प्रबोधनं, ताराकर्तृकः पत्यनुगमननिश्चयश्च -
|
हनुमंताने तारेला समजविणे आणि तारेने पतिचे अनुगमनाचाच निश्चय करणे -
|
ततो निपतितां तारां च्युतां तारामिवांबरात् । शनैराश्वासयामास हनुमान् हरियूथपः ॥ १ ॥
|
तारेला आकाशांतून तुटून पडलेल्या तारकेप्रमाणे पडलेली पाहून वानरयूथपति हनुमानाने हळू हळू समजाविण्यास आरंभ केला. ॥१॥
|
गुणदेषकृतं जंतुः स्वकर्मफलहेतुकम् । अव्यग्रस्तदवाप्नोति सर्वं प्रेत्य शुभाशुभम् ॥ २ ॥
|
’देवी ! जीवाच्या द्वारा गुणबुद्धिमुळे अथवा दोषबुद्धिमुळे केली गेलेली जी आपली कर्मे आहेत तीच सुख-दुःखरूप फळाची प्राप्ति करविणारी होतात. परलोकात जाऊन प्रत्येक जीव शाम्टाभावाने राहून आपल्या शुभ आणि अशुभ - सर्व कर्मांचे फळ भोगतो. ॥२॥
|
शोच्या शोचसि कं शोच्यं दीनं दीना ऽनुकंपसे । कस्य को वा ऽनुशोच्यो ऽस्ति देहे ऽस्मिन् बुद्बुादोपमे ॥ ३ ॥
|
तू स्वतः शोचनीय आहेस, मग दुसर्या कुणाला शोचनीय समजून शोक करीत आहेस ? स्वयं दीन असून तू दुसर्या कुठल्या दीनावर दया करीत आहेस ? पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे असलेल्या या शरीरात राहून कुठला जीव कुठल्या जीवासाठी शोचनीय आहे ? ॥३॥
|
अङ्गयदस्तु कुमारो ऽयं द्रष्टव्यो जीवपुत्रया । आयत्यां च विधेयानि समर्थान्यस्य चिंतय ॥ ४ ॥
|
’तुझा पुत्र अंगद जीवित आहे. आता तुला त्याच्याकडेच पाहिले पाहिजे, आणि त्याच्यासाठी भविष्यात जे उन्नतिचे साधक श्रेष्ठ कार्य असेल, त्याचा विचार केला पाहिजे. ॥४॥
|
जानास्यनियतामेवं भूतानामागतिं गतिम् । तस्माच्छुभं हि कर्तव्यं पण्डिते नेह लौकिकम् ॥ ५ ॥
|
’देवी ! तू विदुषी आहेस, म्हणून जाणतच आहेस की प्राण्यांच्या जन्म आणि मृत्युचा कुठला निश्चित समय नाही. म्हणून शुभ (परलोकासाठी सुखद) कर्मेच केली पाहिजेत. जास्त रडणे आदि जो लौकिक (कर्म) व्यवहार आहे तो करता कामा नये. ॥५॥
|
यस्मिन् हरिसहस्राणि प्रयुतान्यर्बुदानि च । वर्तयंति कृतांशानि सो ऽयं दिष्टांतमागतः ॥ ६ ॥
|
’शेकडो, हजारो आणि लाखो वानर ज्याच्यावर आशा लावून जीवन- निर्वाह करीत होते, तेच हे वानरराज आपल्या प्रारब्धनिर्मित आयुष्याचा काळ पूरा करून चुकले आहेत. ॥६॥
|
यदयं न्यायदृष्टार्थः सामदानक्षमापरः । गतो धर्मजितां भूमिं नैनं शोचितुमर्हसि ॥ ७ ॥
|
’यांनी नीतिशास्त्रानुसार अर्थाचे साधन- राज्यकार्याचे संपादन केले आहे. हे उपयुक्त समयावर साम, दान आणि क्षमेचा व्यवहार करीत आले आहेत. म्हणून धर्मानुसार प्राप्त होणार्या लोकात गेले आहेत. त्यांच्यासाठी तुम्ही शोक करता कामा नये. ॥७॥
|
सर्वे हि हरिशार्दूलाः पुत्रश्चायं तवाङ्गनदः । इदं हर्यृक्षराज्यं च त्वत्सनाथमनिंदिते ॥ ८ ॥
|
’सती साध्वी देवी ! हे सर्व श्रेष्ठ वानर, हे तुमचे पुत्र अंगद तसेच वानर आणि अस्वलांचे हे राज्य सर्व तुमच्यामुळेच सनाथ आहे. तुम्ही त्या सर्वांची स्वामिनी आहात. ॥८॥
|
ताविमौ शोकसंतापौ शनैः प्रेरय भामिनि । त्वाय परिगृहीतो ऽयमङ्गैदः शास्तु मेदिनीम् ॥ ९ ॥
|
’भामिनी ! हे अंगद आणि सुग्रीव दोघेही शोकाने संतप्त होत आहेत. तुम्ही त्यांना भावी कार्यासाठी प्रेरित करा. तुमच्या अधीन राहून हा अंगद या पृथ्वीचे शासन करील. ॥९॥
|
संततिश्च यथा दृष्टा कृत्यं यच्चापि सांप्रतम् । राज्ञस्तत्क्रियतां तावदेष कालस्य निश्चयः ॥ १० ॥
|
’शास्त्रात संतान होण्याचे जे प्रयोजन सांगितले गेले आहे तसेच यावेळी राजा वालीच्या पारलौकिक कल्याणासाठी जे काही कर्तव्य आहे तेच करावे - हीच समयाची निश्चित प्रेरणा आहे. ॥१०॥
|
संस्कार्यो हरिराजश्च अङ्गदश्चाभिषिच्यताम् । सिंहासनगतं पुत्रं पश्यंती शांतिमेष्यसि ॥ ११ ॥
|
’वानरराजाचा अंत्येष्टि संस्कार आणि कुमार अंगदाचा राज्याभिषेक केला जावा. मुलाला राजसिंहासनावर बसलेला पाहून तुम्हांला शांती मिळेल. ॥११॥
|
सा तस्य वचनं श्रुत्वा भर्तृव्यसनपीडिता । अब्रवीदुत्तरं तारा हनुमंतमवस्थितम् ॥ १२ ॥
|
तारा आपल्या स्वामीच्या विरह-शोकाने पीडित होती. ती उपर्युक्त वचन ऐकून समोर उभे असलेल्या हनुमानास म्हणाली- ॥१२॥
|
अङ्गवदप्रतिरूपाणां पुत्राणामेकतः शतम् । हतस्याप्यस्य वीरस्य गात्रसंश्लेषणं वरम् ॥ १३ ॥
|
’अंगदासारखे शंभर पुत्र एकीकडे आणि मेलेले असूनही या वीरवर स्वामीचे आलिंगन करून सती जाणे दुसरीकडे- या दोन्हीमध्ये आपल्या वीर पतिच्या शरीराचे आलिंगन मला श्रेष्ठ वाटत आहे. ॥१३॥
|
न चाहं हरिराजस्य प्रभावाम्यङ्गंदस्य वा । पितृव्यस्तस्य सुग्रीवः सर्वकार्येष्वनंतरः ॥ १४ ॥
|
’मी वानरांच्या राज्याची स्वामिनीही नाही आहे आणि अंगदासाठी काही करण्याचाही मला अधिकार नाही आहे. याचे चुलते सुग्रीवच समस्त कार्यासाठी समर्थ आहेत आणि तेच माझ्यापेक्षा निकटवर्ती आहेत. ॥१४॥
|
न ह्येषा बुद्धिरास्थेया हनुमन्नङ्गसदं प्रति । पिता हि बंधुः पुत्रस्य न माता हरिसत्तम ॥ १५ ॥
|
’कपिश्रेष्ठ हनुमान् ! अंगदाविषयीचा आपला हा सल्ला माझ्यासाठी उपयोगांत आणण्यास योग्य नाही. आपल्याला हे समजले पाहिजे की पुत्राचे वास्तविक प्रभु (सहायक) पिता आणि चुलता हेच आहेत; माता नाही. ॥१५॥
|
न हि मम हरिराजसंश्रयात् क्षमतरमस्ति परत्र चेह वा । अभिमुखहतवीरसेवितं शयनमिदं मम सेवितुं क्षमम् ॥ १६ ॥
|
’माझ्यासाठी वानरराज वालीचे अनुगमन करण्याहून अधिक या लोकात अथवा परलोकात कुठलेही कार्य उचित नाही. युद्धात शत्रुशी झुंजून मेलेल्या आपल्या वीर स्वामीच्या द्वारा सेवित चिता आदिच्या शय्येवर शयन करणेच माझ्यासाठी सर्वथा योग्य आहे. ॥१६॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे एकविंशः सर्गः ॥ २१ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा एकविसावा सर्ग पूरा झाला. ॥२१॥
|