श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ सप्तचत्वारिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
पूर्वादिषु तिसृषु दिक्षु प्रविष्टानां वानराणां सनैराश्यं निवर्तनम् - पूर्व आदि तीन दिशांना गेलेल्या वानरांचे निराश होऊन परत येणे -
दर्शनार्थं तु वैदेह्याः सर्वतः कपिकुंजराः ।
व्यादिष्टाः कपिराजेन यथोक्तं जग्मुरञ्जसा ॥ १ ॥
वानरराजाकडून समस्त दिशांकडे जाण्याची आज्ञा मिळून ते सर्वश्रेष्ठ वानर, ज्याला ज्या दिशेकडे जाण्याचा आदेश झाला होता तिकडे सीतेचा पत्ता लावण्यासाठी उत्साहपूर्वक निघून गेले. ॥१॥
ते सरांसि सरित्कक्षान् आकाशं नगराणि च ।
नदीदुर्गांस्तथा देशान् विचिन्वंति समंततः ॥ २ ॥
ते सरोवरे, सरिता, लतामण्डप, मोकळी स्थाने आणि नगरात तसेच नद्यांच्यामुळे दुर्गम प्रदेशात सर्व बाजूस हिंडून फिरून सीतेचा शोध घेऊ लागले. ॥२॥
सुग्रीवेण समाख्याताः सर्वे वानरयूथपाः ।
तत्र देशान् प्रविचिन्वंति सशैलवनकाननान् ॥ ३ ॥
सुग्रीवांनी ज्यांना आज्ञा दिली होती, ते सर्व वानर-यूथपति आपल्या-आपल्या दिशांमधील पर्वत, वने आणि काननांसहित संपूर्ण देशांत शोध घेऊ लागले. ॥३॥
विचित्य दिवसं सर्वे सीताधिगमने धृताः ।
समायांति स्म मेदिन्यां निशाकालेषु वानराः ॥ ४ ॥
सीतेचा शोध लावण्याची निश्चित इच्छा मनांत ठेवून ते सर्व वानर दिवसभर इकडे-तिकडे अन्वेषण करीत रात्रीच्या समयी एखाद्या नियत स्थानावर एकत्र होत असत. ॥४॥
सर्वर्तुकांश्च देशेषु वानराः सफलद्रुमान् ।
आसाद्य रजनीं शय्यां चक्रुः सर्वेष्वहःसु ते ॥ ५ ॥
सर्व दिवसभर भिन्न-भिन्न देशांत हिंडून-फिरून ते वानर सर्वऋतुमध्ये फळे देणार्‍या वृक्षांच्या जवळ जाऊन रात्री तेथे झोपत अथवा विश्राम करीत असत. ॥५॥
तदहः प्रथमं कृत्वा मासे प्रस्रवणं गताः ।
कपिराजेन संगम्य निराशाः कपिकुञ्जराः ॥ ६ ॥
जाण्याच्या दिवसाला पहिला दिवस मानून एक मास पूर्ण होई पर्यंत ते श्रेष्ठ वानर निराश होऊन परतून आले आणि कपिराज सुग्रीवांना भेटून प्रस्त्रवण गिरिवर येऊन थांबले. ॥६॥
विचित्य तु दिशं पूर्वां यथोक्तां सचिवैः सह ।
अदृष्ट्‍वा विनतः सीतां आजगाम महाबलः ॥ ७ ॥
महाबली विनत आपल्या मंत्र्यासहित पूर्वी सांगितल्या प्रमाणे पूर्व दिशेमध्ये शोध करून तेथे सीता न मिळाल्याने किष्किंधेस परत आले. ॥७॥
दिशमप्युत्तरां सर्वां विविच्य स महाकपिः ।
आगतः सह सैन्येन वीरः शतबलिस्तदा ॥ ८ ॥
महाकपि शतबलि सर्व उत्तर दिशेमध्ये शोध करून भयभीत होऊन तात्काळ सेनेसहित किष्किंधेला परत आले. ॥८॥
सुषेणः पश्चिमामाशां विविच्य सह वानरैः ।
समेत्य मासे पूर्णे तु सुग्रीवमुपचक्रमे ॥ ९ ॥
वानरांसहित सुषेणही पश्चिम दिशेचे अनुसंधान करून तेथे सीता न मिळाल्याने एक महिना पूर्ण होताच सुग्रीवाजवळ निघून आले. ॥९॥
तं प्रस्रवणपृष्ठस्थं समासाद्याभिवाद्य च ।
आसीनं सह रामेण सुग्रीवमिदमब्रुवन् ॥ १० ॥
प्रस्त्रवणगिरिवर श्रीरामचंद्रांजवळ बसलेले सुग्रीवांजवळ जाऊन सर्व वानरांनी त्यांना प्रणाम केला आणि या प्रकारे सांगितले- ॥१०॥
विचिताः पर्वताः सर्वे वनानि गहनानि च ।
निम्नगाः सागरांताश्च सर्वे जनपदाश्च ये ॥ ११ ॥

गुहाश्च विचिताः सर्वाः याश्च ते परिकीर्तिताः ।
विचिताश्च महागुल्मा लताविततसंतताः ॥ १२ ॥
’राजन्! आम्ही समस्त पर्वत, दाट जंगले, समुद्र पर्यंत नद्या, संपूर्ण देश, आपण सांगितलेल्या सर्व गुहा तसेच लतवितांनी व्याप्त झाड्यांमध्ये ही शोध घेतला. ॥११-१२॥
गहनेषु च देशेषु दुर्गेषु विषमेषु च ।
सत्त्वान्यतिप्रमाणानि विचितानि हतानि च ।
ये चैव गहना देशा विचितास्ते पुनः पुनः ॥ १३ ॥
’दाट वने, विभिन्न देश, दुर्गम स्थाने आणि उंच उंच जमिनींवर ही शोध घेतला आहे. मोठ मोठ्या प्राण्यांची ही झडती घेतली आणि त्यांना मारून टाकले. जे जे प्रदेश दाट आणि दुर्गम वाटले, तेथे वारंवार शोध केला. (परंतु कोठे ही सीतेचा पत्ता लागला नाही.) ॥१३॥
उदारसत्त्वाभिजनो हनूमाअन्
स मैथीलीं ज्ञास्यति वानरेंद्रः ।
दिशं तु यामेव गता तु सीता
तामास्थितो वायुसुतो हनूमान् ॥ १४ ॥
’वानरराज ! वायुपुत्र हनुमान् परम शक्तिमान् आणि कुलीन आहेत. तेच मैथिली सीतेचा पत्ता लावू शकतील, कारण की जिकडे सीता गेली आहे त्याच दिशेकडे ते गेले आहेत. ॥१४॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे सप्तचत्वारिंशः सर्गः ॥ ४७ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा सत्तेचाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP