श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ सप्तत्रिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सुग्रीवेण वानरसेनासंग्रहाय पुनर्दूतान् प्रेषयितुं हनुमत आज्ञपनं, तेभ्यो राजाज्ञामाकर्ण्य समेषां वानराणां किष्किंधां प्रति प्रस्थानं, निवृत्तैर्दूतैः सुग्रीवायोपायनानि समर्प्य वानरागमनवृत्तांतस्य निवेदनम् - सुग्रीवांनी हनुमानास वानरसेनेच्या संग्रहासाठी दुसर्‍यांदा दूत धाडण्याची आज्ञा देणे, त्या दूतांकडून राजाची आज्ञा ऐकून समस्त वानरांचे किष्किंधेकडे प्रस्थान आणि दूतांनी परत येऊन सुग्रीवास भेटून त्याचबरोबर वानरांच्या आगमनाचा समाचार ऐकविणे -
एवमुक्तस्तु सुग्रीवो लक्ष्मणेन महात्मना ।
हनुमंतं स्थितं पार्श्वे वचनं चेदमब्रवीत् ॥ १ ॥
महात्मा लक्ष्मणांनी जेव्हा असे म्हटले, तेव्हा सुग्रीव आपल्याजवळ उभे असलेल्या हनुमानास याप्रमाणे बोलले- ॥१॥
महेंद्रहिमवद्विंध्य कैलासशिखरेषु च ।
मंदरे पाण्डुशिखरे पञ्चशैलेषु ये स्थिताः ॥ २ ॥

तरुणादित्यवर्णेषु भ्राजमानेषु नित्यशःर्वतः ।
पर्वतेषु समुद्रांते पश्चिमायां तु ये दिशि ॥ ३ ॥

आदित्यभवने चैव गिरौ संध्याभ्रसंनिभे ।
पद्मतालवनं भीमाः संश्रिता हरिपुंगवाः ॥ ४ ॥

अञ्जनांबुदसंकाशाः कुञ्जरेंद्रमहौजसः ।
अञ्जने पर्वते चैव ये वसंति प्लवंगमाः ॥ ५ ॥

मनःशिलागुहावासा वानराः कनकप्रभाः ।
मेरुपार्श्वगताश्चैव ये धूम्रगिरिसंश्रिताः ॥ ६ ॥

तरुणादित्यवर्णाश्च पर्वते च महारुणे ।
पिबंतो मधु मैरेयं भीमवेगाः प्लवंगमाः ॥ ७ ॥

वनेषु च सुरम्येषु सुगंधिषु महत्सु च ।
तापसाश्रमरम्येषु वनांतेषु समंततः ॥ ८ ॥

तांस्तान् त्वमानय क्षिप्रं पृथिव्यां सर्ववानरान् ।
सामदानादिभिः कल्पैः वानरैर्वेगवत्तरैः ॥ ९ ॥
’महेन्द्र, हिमवान्, विंध्य, कैलास तथा श्वेतशिखरे असणारा मंदराचल - या पांच पर्वतांच्या शिखरांवर जे श्रेष्ठ वानर राहातात, पश्चिम दिशेला समुद्राच्या परवर्ती तटावर प्रातःकालीन सूर्यासमान कांतिमान्, आणि नित्य प्रकाशमान पर्वतांवर ज्या वानरांचा निवास आहे, भगवान् सूर्याचे निवासस्थान तसेच संध्याकालीन मेघसमूहाप्रमाणे अरुण वर्णाचे उदयाचल तसेच अस्ताचलावर जे वानर वास करतात, पद्माचलावर्ती वनाचा आश्रय घेऊन जे भयानक पराक्रमी वानरश्रेष्ठ निवास करतात, अञ्जन पर्वतावर जे काजळ आणि मेघासमान काळे तसेच गजराजासमान महाबलाढ्य वानर राहातात, मोठमोठ्या पर्वतांच्या गुहांमधून निवास करणारे तसेच मेरू पर्वतांच्या आसपास राहाणारे जे सुवर्णासारखी कांति असणारे वानर आहेत, जे धूम्रगिरिचा आश्रय घेऊन राहतात, मैरेय मधुचे पान करीत जे महारूण पर्वतावर प्रातःकालच्या सूर्याप्रमाणे लाल रंगाचे भयानक वेग असणारे वानर निवास करतात, तसेच सुगंधानी परिपूर्ण तसेच तपस्व्यांच्या आश्रमांनी सुशोभित मोठमोठ्या रमणीय वनात आणि वनांतात चारी बाजूस जे वानर राहातात, भूमण्डलातील त्या सर्व वानरांना तुम्ही शीघ्र येथे घेऊन या. शक्तिशाली तसेच अत्यंत वेगवान् वानरांना धाडून त्यांच्या द्वारा साम, दाम आदि उपायांचा प्रयोग करून त्या सर्वांना येथे बोलावून घ्या. ॥२-९॥
प्रेषिताः प्रथमं ये च मयाऽऽज्ञाता महाजवाः ।
त्वरणार्थं तु भूयस्त्वं संप्रेषय हरीश्वरान् ॥ १० ॥
’माझ्या आज्ञेने पूर्वी जे महान् वेगवान् वानर धाडले गेले आहेत त्यांना घाई करण्यासाठी प्रेरणा देण्याच्या निमित्ताने तुम्ही पुन्हा दुसर्‍या श्रेष्ठ वानरांना धाडा. ॥१०॥
ये प्रसक्ताश्च कामेषु दीर्घसूत्राश्च वानराः ।
इहानयस्व तान् सर्वान् शीघ्रं सर्वानेव कपीश्वरान् ॥ ११ ॥
’जे वानर कामभोगात फसलेले असतील तसेच जे दीर्घसूत्री (प्रत्येक कार्य विलंबाने करणारे, चेंगट) असतील, त्या सर्व कपीश्वरांना शीघ्र येथे घेऊन यावे. ॥११॥
अहोभिर्दशभिर्ये हि नागच्छंति ममाज्ञया ।
हंतव्यास्ते दुरात्मानो राजशासनदूषकाः ॥ १२ ॥
’जे माझ्या आज्ञे पासून दहा दिवसाच्या आत येथे येणार नाहीत, त्या दुरात्मा वानरांना, राजाज्ञेला कलंकित करणारांना मारून टाकले पाहिजे. ॥१२॥
शतान्यथ सहस्राणां कोट्यश्च मम शासनात् ।
प्रयांतु कपिसिंहानां निदेशे मम ये स्थिताः ॥ १३ ॥
’जे माझ्या आज्ञेच्या अधीन राहातात अशा शेकडो, हजारो तसेच कोट्यावधि वानरसिंह माझ्या आदेशावरून जावोत. ॥१३॥
मेघपर्वतसंकाशा श्छादयंत इवांबरम् ।
घोररूपाः कपिश्रेष्ठा यांतु मच्छासनादितः ॥ १४ ॥
’जे मेघ आणि पर्वतासमान आपल्या विशाल शरीराने आकाशाला जणु आच्छादित करतात, ते घोर रूपधारी श्रेष्ठ वानर माझा आदेश मानून यात्रा करोत. ॥१४॥
ते गतिज्ञा गतिं गत्वा पृथिव्यां सर्ववानराः ।
आनयंतु हरीन् सर्वांन् त्वरिताः शासनान्मम ॥ १५ ॥
’वानरांच्या निवासस्थनांना जाणणारे सर्व वानर तीव्र गतीने भूमण्डलात चोहोबाजूस जाऊन माझ्या आदेशाने त्या त्या स्थानातील संपूर्ण वानरगणांना ताबडतोब येथे घेऊन येवोत.’ ॥१५॥
तस्य वानरराजस्य श्रुत्वा वायुसुतो वचः ।
दिक्षु सर्वासु विक्रांतान् प्रेषयामास वानरान् ॥ १६ ॥
वानरराज सुग्रीवांचे बोलणे ऐकून वायुपुत्र हनुमानांनी संपूर्ण दिशांमध्ये बर्‍याचशा पराक्रमी वानरांना धाडले. ॥१६॥
ते पदं विष्णुविक्रांतं पतत्त्रिज्योतिरध्वगाः ।
प्रयाताः प्रहिता राज्ञा हरयस्तत्क्षणेन वै ॥ १७ ॥
राजाची आज्ञा मिळताच ते सर्व वानर तात्काळ आकाशातून पक्ष्यांच्या आणि नक्षत्रांच्या मार्गाने निघाले. ॥१७॥
ते समुद्रेषु गिरिषु वनेषु च सरस्सु च ।
वानरा वानरान् सर्वान् रामहेतोरचोदयन् ॥ १८ ॥
त्या वानरांनी समुद्रांचे किनारे, पर्वतावर, वनांत आणि सरोवरांच्या तटावर राहाणार्‍या समस्त वानरांना श्रीरामांचे कार्य करण्यासाठी चलण्यास सांगितले. ॥१८॥
मृत्युकालोपमस्याज्ञां राजराजस्य वानराः ।
सुग्रीवस्याययुः श्रुत्वा सुग्रीवभयशंकिताः ॥ १९ ॥
आपले सम्राट सुग्रीवांचा, जे मृत्यु तसेच काळाप्रमाणे भयानक दंड देणारे होते, आदेश ऐकून ते सर्व वानर त्यांच्या भयाने कापू लागले आणि तात्काळ किष्किंधाकडे प्रस्थित झाले. ॥१९॥
ततस्तेऽञ्जनसंकाशा गिरेस्तस्मान्महाबलाः ।
तिस्रः कोट्यः प्लवंगानां निर्ययुर्यत्र राघवः ॥ २० ॥
त्यानंतर कज्जल गिरिच्या काजळा समान काळे आणि महान् बलवान् तीन कोटी वानर त्या स्थानावर जाण्यासाठी निघाले, जेथे श्रीराघव विराजमान् होते. ॥२०॥
अस्तं गच्छति यत्रार्कः तस्मिन् गिरिवरे रताः ।
तप्तहेममहाभाः तस्मात् कोट्यो दश च्युताः ॥ २१ ॥
जेथे सूर्यदेव अस्तास जातात त्या श्रेष्ठ पर्वतावर राहाणारे दहा कोटी वानर ज्यांची कांति तापलेल्या सुवर्णासमान होती, तेथून किष्किंधेकडे येण्यास निघाले. ॥२१॥
कैलासशिखरेभ्यश्च सिंहकेसरवर्चसाम् ।
ततः कोटिसहस्राणि वानराणामुपागमन् ॥ २२ ॥
कैलासाच्या शिखरांवरून सिंहाच्या आयाळी प्रमाणे श्वेत कांति असणारे दहा अब्ज वानर आले. ॥२२॥
फलमूलेन जीवंतो हिमवंतमुपाश्रिताः ।
तेषां कोटिसहस्राणां सहस्रं समवर्तत ॥ २३ ॥
जे हिमालयावर राहून फल-मूलांवर जीवन-निर्वाह करीत होते, ते वानर एक नीत्म्या संख्ये मध्ये तेथे आले. ॥२३॥
अङ्‌गाेरकसमानानां भीमानां भीमकर्मणाम् ।
विंध्याद् वानरकोटीनां सहस्राण्यपतन् द्रुतम् ॥ २४ ॥
विंध्याचल पर्वतावरून मंगळासमान लाल रंगाचे भयानक पराक्रमी भयंकर रूपधारी वानरांची दहा अब्ज सेना अत्यंत वेगाने किष्किंधेत आली. ॥२४॥
क्षीरोदवेलानिलयाः तमालवनवासिनः ।
नारिकेलाशनाश्चैव तेषां संख्या न विद्यते ॥ २५ ॥
क्षीर समुद्राच्या किनार्‍यावर आणि तमालवनात नारळ खाऊन राहाणारे वानर इतक्या अधिक संख्येने आले होते की त्यांची गणना करणेच शक्य नव्हते. ॥२५॥
वनेभ्यो गह्वरेभ्यश्च सरिद्‌भ्य श्च महाजवा ।
आगच्छद् वानरी सेना पिबंतीव दिवाकरम् ॥ २६ ॥
वनांतून, गुहांमधून आणि नद्यांच्या किनार्‍यावरून असंख्य महाबलाढ्य वानर एकत्र आले. वानरांची ती सर्व सेना सूर्यदेवाला जणुं पिऊन टाकीत आली होती. (आच्छादित करीत आली होती.) ॥२६॥
ये तु त्वरयितुं याता वानराः सर्ववानरान् ।
ते वीरा हिमवच्छैले ददृशुस्तं महाद्रुमम् ॥ २७ ॥
जे वानर समस्त वानरांना शीघ्र येण्यासाठी प्रेरित करण्याकरितां किष्किंधेहून दुसर्‍यांदा धाडले गेले होते, त्या वीरांनी हिमालय पर्वतावर जो भगवान् शंकराच्या यज्ञशाळेत स्थित होता त्या विशाल वृक्षास पाहिले. ॥२७॥
तस्मिन् गिरिवरे पुण्ये यज्ञो माहेश्वरः पुरा ।
सर्वदेवमनस्तोषो बभौ दिव्यो सुमनोरमः ॥ २८ ॥
त्या पवित्र व श्रेष्ठ पर्वतावर पूर्वकाळी भगवान् शंकरांनी सर्व देवदेवतांना संतुष्ट करणारा व अत्यंत मनोहारी असा यज्ञ केला होता. ॥ २८ ॥
अन्ननिस्यंदजातानि मूलानि च फलानि च ।
अमृतास्वादकल्पानि ददृशुस्तत्र वानराः ॥ २९ ॥
त्या पर्वतावर खीर आदि अन्न (होमद्रव्या) पासून घृत आदिचा स्त्राव झाला होता, त्यामुळे तेथे अमृतासमान स्वादिष्ट फळे आणि मूळे उत्पन्न झाली होती. त्या फळांना त्या वानरांनी पाहिले. ॥२९॥
तदन्नसंभवं दिव्यं फलमूलं मनोहरम् ।
यः कश्चित्सकृदश्नाति मासं भवति तर्पितः ॥ ३० ॥
त्या अन्नाने उत्पन्न झालेल्या त्य दिव्य आणि मनोहर फळा-मूळांना जो कुणी एक वेळ खात असे तो एक मासपर्यंत त्यामुळे तृप्त राहात असे. ॥३०॥
तानि मूलानि दिव्यानि फलानि च फलाशनाः ।
औषधानि च दिव्यानि जगृहुर्हरिपुंगवाः ॥ ३१ ॥
फलाहार करणार्‍या त्या वानर शिरोमणींनी त्या दिव्य फळा-मूळांना आणि दिव्य औषधांना आपल्या बरोबर घेतले. ॥३१॥
तस्माच्च यज्ञायतनात् पुष्पाणि सुरभीणि च ।
आनिन्युर्वानरा गत्वा सुग्रीवप्रियकारणात् ॥ ३२ ॥
तेथे जाऊन त्या यज्ञ-मण्डपातून ते सर्व वानर सुग्रीवांचे प्रिय करण्यासाठी सुगंधित पुष्पेही घेऊन आले. ॥३२॥
ते तु सर्वे हरिवराः पृथिव्यां सर्ववानरान् ।
सञ्चोदयित्वा त्वरितं यूथानां जग्मुरग्रतः ॥ ३३ ॥
ते समस्त श्रेष्ठ वानर भूमण्डलावरील समस्त वानरांना तात्काळ चलण्याचा आदेश देऊन त्यांच्या यूथांच्या आगमनापूर्वीच सुग्रीवांजवळ आले. ॥३३॥
ते तु तेन मुहूर्तेन यूथपाः शीघ्रचारिणः ।
किष्किंधां त्वरया प्राप्ताः सुग्रीवो यत्र वानरः ॥ ३४ ॥
ते शीघ्रगामी वानर त्याच मुहूर्तावर निघून अत्यंत उतावळेपणाने किष्किंधापुरीमध्ये जेथे वानरराज सुग्रीव होते, तेथे जाऊन पोहोचले. ॥३४॥
ते गृहीत्वौषधीः सर्वाः फलं मूलं च वानराः ।
तं प्रतिग्राहयामासुः वचनं चेदमब्रुवन् ॥ ३५ ॥
त्या संपूर्ण औषधी आणि फळा-मूळांना घेऊन त्या वानरांनी ती सुग्रीवांच्या सेवेत अर्पण केली आणि याप्रकारे म्हणाले- ॥३५॥
सर्वे परिगताः शैलाः समुद्राश्च वनानि च ।
पृथिव्यां वानराः सर्वे शासनादुपयांति ते ॥ ३६ ॥
’महाराज ! आम्ही लोक सर्व पर्वत, नद्या आणि वनांतून फिरून आलो. भूमण्डलांतील समस्त वानर आपल्या आज्ञेने येथे येत आहेत. ॥३६॥
एवं श्रुत्वा ततो हृष्टः सुग्रीवः प्लवगाधिपः ।
प्रतिजग्राह तत् प्रीतः तेषां सर्वमुपायनम् ॥ ३७ ॥
हे एकून वानरराज सुग्रीव फार प्रसन्न झाले. त्यांनी त्या वानरांनी दिलेली सर्व भेट-सामग्री आनंदाने ग्रहण केली. ॥३७॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे सप्तत्रिंशः सर्गः ॥ ३७ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा सदतीसावा सर्ग पूरा झाला. ॥३७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP