वाल्मीकिना शत्रुघ्नं प्रति सौदासस्य कल्माषपादस्य कथायाः श्रावणम् -
|
महर्षि वाल्मीकिंनी शत्रुघ्नास सुदासपुत्र कल्माषपादाची कथा ऐकविणे -
|
प्रस्थाप्य च बलं सर्वं मासमात्रोषितः पथि । एक एवाशु शत्रुघ्नो जगाम त्वरितं तदा ॥ १ ॥
|
आपल्या सेनेला पुढे धाडून अयोध्येत एक महिना राहून शत्रुघ्न एकटेच तेथून मधुवनाच्या मार्गावर प्रस्थित झाले. ते अत्यंत वेगाने पुढे जाऊ लागले. ॥१॥
|
द्विरात्रमन्तरे शूर उष्य राघवनन्दनः । वाल्मीकेराश्रमं पुण्यं अगच्छद् वासमुत्तमम् ॥ २ ॥
|
राघवनंदन शूरवीर शत्रुघ्न वाटेत दोन रात्री घालवून तिसर्या दिवशी महर्षि वाल्मीकिंच्या पवित्र आश्रमावर जाऊन पोहोचले. ते सर्वात उत्तम निवासस्थान होते. ॥२॥
|
सोऽभिवाद्य महात्मानं वाल्मीकिं मुनिसत्तमम् । कृताञ्जलिरथो भूत्वा वाक्यमेतद् उवाच ह ॥ ३ ॥
|
तेथे त्यांनी हात जोडून मुनिश्रेष्ठ महात्मा वाल्मीकिना प्रणाम करून याप्रमाणे म्हटले - ॥३॥
|
भगवन् वस्तुमिच्छामि गुरोः कृत्यादिहागतः । श्वः प्रभाते गमिष्यामि प्रतीचीं वारुणीं दिशम् ॥ ४ ॥
|
भगवन् ! मी आपले मोठे भाऊ श्रीरघुनाथ यांच्या कार्यासाठी इकडे आलो आहे. आज रात्री मी येथेच राहू इच्छितो आणि उद्या सकाळी वरुणदेव द्वारा पालित पश्चिम दिशेला निघून जाईन. ॥४॥
|
शत्रुघ्नस्य वचः श्रुत्वा प्रहस्य मुनिपुङ्गवः । प्रत्युवाच महात्मानं स्वागतं ते महायशः ॥ ५ ॥
|
शत्रुघ्नाचे हे वचन ऐकून मुनिवर वाल्मीकिनी हसत हसत त्या महात्म्यास उत्तर दिले - महायशस्वी वीरा ! तुमचे स्वागत आहे. ॥५॥
|
स्वमाश्रममिदं सौम्य राघवाणां कुलस्य हि । आसनं पाद्यमर्घ्यं च निर्विशङ्कः प्रतीच्छ मे ॥ ६ ॥
|
सौम्या ! हा आश्रम रघुवंशीयासाठी आपले घरच आहे. तू निःशंक होऊन माझ्या कडून आसन, पाद्य आणि अर्ध्य स्वीकार कर. ॥६॥
|
प्रतिगृह्य तदा पूजां फलमूलं च भोजनम् । भक्षयामास काकुत्स्थः तृप्तिं च परमां गतः ॥ ७ ॥
|
तेव्हा तो सत्कार ग्रहण करून शत्रुघ्नाने फळमूळाचे भोजन केले. त्यामुळे त्याला तृप्ति मिळाली. ॥७॥
|
स भुक्त्वा फलमूलं च महर्षिं तमुवाच ह । इयं यज्ञविभूतीयंस्ते कस्याश्रमसमीपतः ॥ ८ ॥
|
फळमूळ खाऊन ते महर्षिंना म्हणाले -मुने ! या आश्रमाच्या निकट जे हे प्राचीनकालचे यज्ञवैभव (यूप आदि उपकरणे) दिसून येत आहे, कुणाचे आहे- कुठल्या यजमान नरेशाने येथे यज्ञ केला होता ? ॥८॥
|
तत्तस्य भाषितं श्रुत्वा वाल्मीकिर्वाक्यमब्रवीत् । शत्रुघ्न शृणु यस्येदं बभूवायतनं पुरा ॥ ९ ॥
|
त्यांचा हा प्रश्न ऐकून वाल्मीकिनी म्हटले -शत्रुघ्ना ! पूर्वकाळी ज्या यजमान नरेशाचा हा यज्ञमण्डप राहिलेला आहे, ते सांगतो, ऐक. ॥९॥
|
युष्माकं पूर्वको राजा सौदासस्तस्य भूपतेः । पुत्रो वीरसहो नाम वीर्यवान् अतिधार्मिकः ॥ १० ॥
|
तुमचे पूर्वज राजा सुदास या भूमण्डलाचे स्वामी झाले होते. त्या भूपालांचा वीरसह (मित्रसह) नामक एक पुत्र होता, जो फार पराक्रमी आणि अत्यंत धर्मात्मा होता. ॥१०॥
|
स बाल एव सौदासो मृगयामुपचक्रमे । चञ्चूर्यमाणं ददृशे स शूरो राक्षसद्वयम् ॥ ११ ॥
|
सौदासाचा तो शूरवीर पुत्र बाल्यावस्थेतच एका दिवशी शिकार खेळण्यासाठी वनात गेला. तेथे त्याने दोन राक्षस पाहिले जे सर्वत्र वारंवार विचरत होते. ॥११॥
|
शार्दूलरूपिणौ घोरौ मृगान्बहुसहस्रशः । भक्षमाणावसन्तुष्टौ पर्याप्तिं नैव जग्मतुः ॥ १२ ॥
|
त्या दोन्ही घोर राक्षसांनी वाघाचे रूप धारण करून कित्येक हजार मृगांना मारून खाऊन टाकले, तरीही संतुष्ट झाले नाहीत. त्यांचे पोट भरले नाही. ॥१२॥
|
स तु तौ राक्षसौ दृष्ट्वा निर्मृगं च वनं कृतम् । क्रोधेन महताविष्टो जघानैकं महेषुणा ॥ १३ ॥
|
सौदासाने त्या दोन्ही राक्षसांना पाहिले. त्याच बरोबर त्यांच्या द्वारे मृगशून्य केले गेलेल्या त्या वनाच्या अवस्थेवरही त्याने दृष्टिपात केला यामुळे तो अत्यंत क्रोधाविष्ट झाला आणि त्यापैकी एकाला विशाल बाणाने त्याने मारून टाकले. ॥१३॥
|
विनिपात्य तमेकं तु सौदासः पुरुषर्षभः । विज्वरो विगतामर्षो हतं रक्षो ह्युदैक्षत ॥ १४ ॥
|
एकाला धराशायी करून ते पुरुषप्रवर सौदास निश्चिंत झाले. त्यांचा अमर्ष जाऊ लागला आणि ते त्या मेलेल्या राक्षसाला पाहू लागले. ॥१४॥
|
निरीक्षमाणं तं दृष्ट्वा सहायं तस्य रक्षसः । सन्तापमकरोद् घोरं सौदासं चेदमब्रवीत् ॥ १५ ॥
|
त्या राक्षसाच्या मेलेल्या साथीदाराला जेव्हा सुदास पहात राहिले होते त्या समयी त्यांच्याकडे दृष्टिपात करून त्या दुसर्या राक्षसाला मनातल्या मनात घोर संताप आला आणि सौदासाला त्याने याप्रकारे म्हटले - ॥१५॥
|
यस्मादनपराधं त्वं सहायं मम जघ्निवान् । तस्मात् तवापि पापिष्ठ प्रदास्यामि प्रतिक्रियाम् ॥ १६ ॥
|
महापापी नरेशा ! तू माझ्या निरपराध साथीदारास ठार मारले आहेस, म्हणून मी तुझा यासाठी बदला घेईन. ॥१६॥
|
एवमुक्त्वा तु तद् रक्षः तस्तत्रैवान्तरधीयत । कालपर्याययोगेन राजा मित्रसहोऽभवत् ॥ १७ ॥
|
असे म्हणून तो राक्षस तेथे अंतर्धान झाला आणि दीर्घकाळानंतर सुदासकुमार मित्रसह अयोघ्येचा राजा झाला. ॥१७॥
|
राजापि यजते यज्ञं अस्याश्रमसमीपतः । अश्वमेधं महायज्ञं तं वसिष्ठोऽप्यपालयत् ॥ १८ ॥
|
त्याच राजा मित्रसहाने या आश्रमाच्या समीप अश्वमेघ नामक महायज्ञाचे अनुष्ठान केले. महर्षि वसिष्ठ आपल्या तपोबलाने त्या यज्ञाचे रक्षण करीत होते. ॥१८॥
|
तत्र यज्ञो महानासीद् बहुवर्षगणायुतः । समृद्धः परया लक्ष्म्या देवयज्ञसमोऽभवत् ॥ १९ ॥
|
त्यांचा तो महान् यज्ञ खूप वर्षांपर्यंत येथे चालू होता. तो भारी धनसंपत्तिने संपन्न यज्ञ देवतांच्या यज्ञाची बरोबरी करत होता. ॥१९॥
|
अथावसाने यज्ञस्य पूर्ववैरमनुस्मरन् । वसिष्ठरूपी राजानं इति होवाच राक्षसः ॥ २० ॥
|
त्या यज्ञाची समाप्ति झाल्यावर पूर्वीच्या वैराचे स्मरण करणारा तो राक्षस वसिष्ठांचे रूप धारण करून राजाजवळ आला आणि याप्रकारे बोलला - ॥२०॥
|
अद्य यज्ञावसानान्ते सामिषं भोजनं मम । दीयतामिह शीघ्रं वै नात्र कार्या विचारणा ॥ २१ ॥
|
राजन् ! आज यज्ञाच्या समाप्तिचा दिवस आहे, म्हणून आज मला तू शीघ्रच मांसयुक्त भोजन दे. या विषयात दुसरा अन्यथा विचार करता कामा नये. ॥२१॥
|
तच्छ्रुत्वा व्याहृतं वाक्यं रक्षसा ब्रह्मरूपिणा । सूदान् संस्कारकुशलं उवाच पृथिवीपतिः ॥ २२ ॥
|
ब्राह्मणरूपधारी राक्षसाने सांगितलेली गोष्ट ऐकून राजाने स्वयंपाक करण्यात कुशल आचार्यांना म्हटले - ॥२२॥
|
हविष्यं सामिषं स्वादु यथा भवति भोजनम् । तथा कुरुष्व शीघ्रं वै परितुष्येद् यथा गुरुः ॥ २३ ॥
|
तुम्ही लोक आज शीघ्रच मांसयुक्त हविष्य तयार करा आणि ते असे बनवा ज्यामुळे स्वादिष्ट भोजन होऊ शकेल. तसेच माझे गुरूदेव संतुष्ट होऊ शकतील. ॥२३॥
|
शासनात् पार्थिवेन्द्रस्य सूदः सम्भ्रान्तमानसः । स रक्षः पुनस्तत्र सूदवेषमथाकरोत् ॥ २४ ॥
|
महाराजांची ही आज्ञा ऐकून आचार्याच्या मनात फारच भीती उत्पन्न झाली. (तो विचार करू लागला, आज गुरूजी अभक्ष्य भक्षणात कसे प्रवृत्त झाले) हे पाहून नंतर त्या राक्षसानेच आचार्याचा वेष धारण केला. ॥२४॥
|
स मानुषमथो मांसं पार्थिवाय न्यवेदयत् । इदं स्वादु हविष्यं च सामिषं चान्नमाहृतम् ॥ २५ ॥
|
त्याने मनुष्याचे मांस आणून राजाला दिले आणि म्हटले - हे मांसयुक्त अन्न तसेच हविष्य आणले आहे. हे फारच स्वादिष्ट आहे. ॥२५॥
|
स भोजनं वसिष्ठाय पत्न्याा सार्धमुपाहरत् । मदयन्त्या नरव्याघ्र सामिषं रक्षसा हृतम् ॥ २६ ॥
|
नरश्रेष्ठा ! आपली पत्नी राणी मदयंती हिच्यासह राजा मित्रसहाने राक्षसाने आणलेले ते मांसयुक्त भोजन वसिष्ठांच्या समोर ठेवले. ॥२६॥
|
ज्ञात्वा तदामिषं विप्रो मानुषं भाजनं गतम् । क्रोधेन महताविष्टो व्याहर्तुमुपचक्रमे ॥ २७ ॥
|
थाळीमध्ये मानव-मांस वाढले गेले आहे हे जाणून महर्षि वसिष्ठ महान् क्रोधाने भरून गेले आणि याप्रकारे बोलले - ॥२७॥
|
यस्मात् त्वं भोजनं राजन् ममैतद् दातुमिच्छसि । तस्माद् भोजनमेतत् ते भविष्यति न संशयः ॥ २८ ॥
|
राजन् ! तू मला असे भोजन देऊ इच्छितोस म्हणून हेच तुझे भोजन होईल यात संशय नाही. (अर्थात् तू मनुष्यभक्षी होऊन जाशील.) ॥२८॥
|
ततः क्रुद्धस्तु सौदासः तोयं जग्राह पाणिना । वसिष्ठं शप्तुमारेभे भार्या चैनमवारयत् ॥ २९ ॥
|
हे ऐकून सौदासानेही रागावून हातात जल घेतले आणि वसिष्ठ मुनींना शाप द्यावयास आरंभ केला. तोपर्यंत त्यांच्या पत्नीने त्यांना रोखले. ॥२९॥
|
राजन्प्रभुर्यतोऽस्माकं वसिष्ठो भगवान् ऋषिः । प्रतिशप्तुं न शक्तस्त्वं देवतुल्यं पुरोधसम् ॥ ३० ॥
|
ती म्हणाली - राजन् ! भगवान् वसिष्ठ मुनि आपले सर्वांचे स्वामी आहेत, म्हणून आपण आपल्या देवतुल्य पुरोहितांना बदल्यात शाप देऊ शकत नाही. ॥३०॥
|
ततः क्रोधमयं तोयं तेजोबलसमन्वितम् । व्यसर्जयत धर्मात्मा ततः पादौ सिषेच च ॥ ३१ ॥
|
तेव्हा धर्मात्मा राजाने तेज आणि बलाने संपन्न त्या क्रोधमय जलाला खाली टाकले. (त्यायोगे आपल्या दोन्ही पावलांनाच त्याने शिंपले.) ॥३१॥
|
तेनास्य राज्ञस्तौ पादौ तदा कल्माषतां गतौ । तदाप्रभृति राजाऽसौ सौदासः सुमहायशाः ॥ ३२ ॥
कल्माषपादः संवृत्तः ख्यातश्चैव तथा नृपः ।
|
असे करण्याने राजाचे दोन्ही पाय तात्काळ चितकबरे झाले. तेव्हा पासून महायशस्वी राजा सौदास कल्माषपाद (चितकबरे पाय असणारा) झाला आणि त्याच नावाने त्याची ख्याती झाली. ॥३२ १/२॥
|
स राजा सह पत्न्याथ वै प्रणिपत्य मुहुर्मुहुः । पुनर्वसिष्ठं प्रोवाच यदुक्तं ब्रह्मरूपिणा ॥ ३३ ॥
|
त्यानंतर पत्नीसहित राजाने वारंवार प्रणाम करून नंतर वसिष्ठांना म्हटले -ब्रह्मर्षि ! आपलेच रूप धारण करून कुणीतरी मला असे भोजन देण्यासाठी प्रेरित केले होते. ॥३३॥
|
तच्छ्रुत्वा पार्थिवेन्द्रस्य रक्षसा विकृतं च तत् । पुनः प्रोवाच राजानं वसिष्ठः पुरुषर्षभम् ॥ ३४ ॥
|
राजाधिराज मित्रसहाचे हे वचन ऐकून आणि ती राक्षसाची करणी जाणून वसिष्ठांनी पुन्हा त्या नरश्रेष्ठ नरेशास म्हटले- ॥३४॥
|
मया रोषपरीतेन यदिदं व्याहृतं वचः । नैतच्छक्यं वृथा कर्तुं प्रदास्यामि च ते वरम् ॥ ३५ ॥
|
राजन् ! मी रोषाने भरून जे बोललो आहे त्याला व्यर्थ केले जाऊ शकत नाही, परंतु यातून सुटण्यासाठी मी तुला एक वर देईन. ॥३५॥
|
कालो द्वादश वर्षाणि शापस्यान्तो भविष्यति । मत् प्रसादाच्च राजेन्द्र व्यतीतं न स्मरिष्यसि ॥ ३६ ॥
|
राजेंद्र ! तो वर या प्रकारचा आहे - हा शाप बारा वर्षे पर्यंत राहील. त्यानंतर त्याचा अंत होऊन जाईल. माझ्या कृपेने तुला घडलेल्या गोष्टीचे स्मरण राहाणार नाही. ॥३६॥
|
एवं स राजा तं शापं उपभुज्यारिसूदनः । प्रतिलेभे पुना राज्यं प्रजाश्चैवान्वपालयत् ॥ ३७ ॥
|
याप्रकारे त्या शत्रुसूदन राजाने बारा वर्षेपर्यंत तो शाप भोगून पुन्हा आपले राज्य प्राप्त केले आणि प्रजाजनांचे निरंतर पालन केले. ॥ ३७ ॥
|
तस्य कल्माषपादस्य यज्ञस्यायतनं शुभम् । आश्रमस्य समीपेऽस्य यन्मां पृच्छसि राघव ॥ ३८ ॥
|
रघुनंदना, ज्या यज्ञस्थळासंबंधी तुम्ही विचारीत होतात तेच हे राजा कल्माषपादाच्या यज्ञाचे सुंदर स्थळ माझ्या आश्रमाजवळ दिसते आहे. ॥ ३८ ॥
|
तस्य तां पार्थिवेन्द्रस्य कथां श्रुत्वा सुदारुणाम् । विवेश पर्णशालायां महर्षिमभिवाद्य च ॥ ३९ ॥
|
महाराज मित्रसहाची ती अत्यंत दारुण कथा ऐकून शत्रुघ्नाने महर्षींना प्रणाम करून पर्णशालेत प्रवेश केला. ॥ ३९ ॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे पञ्चषष्टितमः सर्गः ॥ ६५ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा पासष्ठावा सर्ग पूरा झाला. ॥६५॥
|