रावणादीनां तपो वरप्राप्तिश्च -
|
रावण आदिंची तपस्या आणि वर-प्राप्ति -
|
अथाब्रवीन्मुनिं रामः कथं ते भ्रातरो वने । कीदृशं तु तदा ब्रह्मन् तपस्तेपुर्महाबलाः ॥ १ ॥
|
इतकी कथा ऐकून श्रीरामांनी अगस्त्य मुनिंना विचारले - ब्रह्मन् ! त्या तीन्ही महाबली भावांनी वनात कशा प्रकारे कशी तपस्या केली ? ॥१॥
|
अगस्त्यस्त्वब्रवीत् तत्र रामं सुप्रीतमानसम् । तास्तान् धर्मविधींस्तत्र भ्रातरस्ते समाविशन् ॥ २ ॥
|
तेव्हा अगस्त्यांनी अत्यंत प्रसन्नचित्त असणार्या श्रीरामांना म्हटले -रघुनंदना ! त्या तीन्ही भावांनी तेथे पृथक-पृथक धर्मविधिंचे अनुष्ठान केले. ॥२॥
|
कुम्भकर्णस्ततो यत्तो नित्यं धर्मपथे स्थितः । तताप ग्रीष्मकाले तु पञ्चाग्नीन् परितः स्थितः ॥ ३ ॥
|
कुम्भकर्ण आपल्या इंद्रियावर संयम ठेवून प्रतिदिन धर्मात्मा मार्गामध्ये स्थित होऊन उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या चारी बाजूस अग्नि पेटवून उन्हात बसून पञ्चाग्निचे सेवन करू लागला. ॥३॥
|
मेघाम्बुसिक्तो वर्षासु वीरासनमसेवत । नित्यं च शिशिरे काले जलमध्यप्रतिश्रयः ॥ ४ ॥
|
नंतर वर्षाऋतुमध्ये खुल्या मैदानात वीरासनात बसून मेघांनी वृष्टि केलेल्या जलात भिजत राहिला आणि थंडिच्या दिवसात प्रतिदिन जलाच्या आत राहू लागला. ॥४॥
|
एवं वर्षसहस्राणि दश तस्यापचक्रमुः । धर्मे प्रयतमानस्य सत्पथे निष्ठितस्य च ॥ ५ ॥
|
याप्रकारे सन्मार्गात स्थित होऊन धर्मासाठी प्रयत्नशील कुम्भकर्णाची दहा हजार वर्षे निघून गेली. ॥५॥
|
विभीषणस्तु धर्मात्मा नित्यं धर्मपरः शुचिः । पञ्चवर्षसहस्राणि पादेनैकेन तस्थिवान् ॥ ६ ॥
|
विभीषण तर सदाच धर्मात्मा होते. ते नित्य धर्मपरायण राहून शुद्ध आचार -विचाराचे पालन करत पाच हजार वर्षे एका पायावर उभे राहिले. ॥६॥
|
समाप्ते नियमे तस्य ननृतुश्चाप्सरोगणाः । पपात पुष्पवर्षं च तुष्टुवुश्चापि देवताः ॥ ७ ॥
|
त्यांचा नियम समाप्त झाल्यावर अप्सरा नृत्य करू लागल्या, त्यांच्यावर आकाशातून पुष्पवृष्टि झाली आणि देवतांनी त्यांची स्तुति केली. ॥७॥
|
पञ्चवर्षसहस्राणि सूर्यं चैवान्ववर्तत । तस्थौ च उर्ध्वशिरोबाहुः स्वाध्याये धृतमानसः ॥ ८ ॥
|
तदनंतर विभीषणाने आपले दोन्ही बाहु आणि मस्तक उचलून स्वाध्यायपरायण होऊन पाच हजार वर्षांपर्यंत सूर्यदेवाची आराधना केली. ॥८॥
|
एवं विभीषणस्यापि स्वर्गस्थस्येव नन्दने । दशवर्षसहस्राणि गतानि नियतात्मनः ॥ ९ ॥
|
याप्रकारे मनाला आधीन ठेवणार्या विभीषणाची ही दहा हजार वर्षे अत्यंत सुखात गेली, जणु ते स्वर्गांतील नंदनवनात निवास करीत होते. ॥९॥
|
दशवर्षसहस्रं तु निराहारो दशाननः । पूर्णे वर्षसहस्रे तु शिरश्चाग्नौ जुहाव सः ॥ १० ॥
|
दशमुख रावणाने दहा हजार वर्षे पर्यंत निरंतर उपवास केला. प्रत्येक सहस्त्र वर्षे पूर्ण झाल्यावर तो आपले एक मस्तक कापून अग्निमध्ये होमून टाकीत होता. ॥१०॥
|
एवं वर्षसहस्राणि नव तस्यातिचक्रमुः । शिरांसि नव चाप्यस्य प्रविष्टानि हुताशनम् ॥ ११ ॥
|
याप्रकारे एकेक करत त्याची नऊ हजार वर्षे निघून गेली आणि नऊ मस्तके अग्निदेवाला समर्पित केली गेली. ॥११॥
|
अथ वर्षसहस्रे तु दशमे दशमं शिरः । छेत्तुकामे दशग्रीवे प्राप्तस्तत्र पितामहः ॥ १२ ॥
|
जेव्हा दहावे सहस्त्र पूरे झाले आणि दशग्रीव आपले दहावे मस्तक कापण्यास उद्यत झाला, त्या समयी पितामह ब्रह्मदेव तेथे येऊन पोहोंचले. ॥१२॥
|
पितामहस्तु सुप्रीतः सार्धं देवैरुपस्थितः । तव तावद् दशग्रीव प्रीतोऽस्मीत्यभ्यभाषत ॥ १३ ॥
|
पितामह ब्रह्मदेव अत्यंत प्रसन्न होऊन देवतांसह तेथे पोहोंचले होते. येताच त्यांनी म्हटले- दशग्रीव ! मी तुझ्यावर फार प्रसन्न आहे. ॥१३॥
|
शीघ्रं वरय धर्मज्ञ वरो यस्तेऽभिकाङ्क्षितः । कं ते कामं करोम्यद्य न वृथा ते परिश्रमः ॥ १४ ॥
|
धर्मज्ञा ! तुझ्या मनात जो वर प्राप्त करण्याची इच्छा असेल तो शीघ्र माग. बोल, आज मी तुझी कुठली अभिलाषा पूर्ण करू ? तुझे परिश्रम व्यर्थ जाता कामा नयेत. ॥१४॥
|
अथाब्रवीद् दशग्रीवः प्रहृष्टेनान्तरात्मना । प्रणम्य शिरसा देवं हर्षगद्गदया गिरा ॥ १५ ॥
|
हे ऐकून दशग्रीवाचा अंतरात्मा प्रसन्न झाला. त्याने मस्तक नमवून भगवान् ब्रह्मदेवांना प्रणाम केला आणि हर्ष गद्गद वाणीमध्ये म्हटले - ॥१५॥
|
भगवन्प्राणिनां नित्यं नान्यत्र मरणाद्भयम् । नास्ति मृत्युसमः शत्रुः अमरत्वमहं वृणे ॥ १६ ॥
|
भगवन् ! प्राण्यांना मृत्युशिवाय आणखी कुणाचे सदा भय रहात नाही, म्हणून मी अमर होऊ इच्छितो कारण मृत्युसमान कुठलाही शत्रु नाही. ॥१६॥
|
एवमुक्तस्तदा ब्रह्मा दशग्रीवमुवाच ह । नास्ति सर्वामरत्वं ते वरं अन्यं वृणीष्व मे ॥ १७ ॥
|
त्याने असे म्हटल्यावर ब्रह्मदेवांनी दशग्रीवास म्हटले - तुला सर्वथा अमरत्व मिळू शकत नाही म्हणून दुसरा कुठला वर माग. ॥१७॥
|
एवमुक्ते तदा राम ब्रह्मणा लोककर्तृणा । दशग्रीव उवाचेदं कृताञ्जलिरथाग्रतः ॥ १८ ॥
|
श्रीरामा ! लोकस्त्रष्टा ब्रह्मदेवांनी असे म्हटल्यावर दशग्रीवाने त्यांच्या समोर हात जोडून म्हटले- ॥१८॥
|
सुपर्णनागयक्षाणां दैत्यदानवरक्षसाम् । अवध्योऽहं प्रजाध्यक्ष देवतानां च शाश्वत ॥ १९ ॥
|
सनातन प्रजापते ! मी गरूड, नाग, यक्ष, दैत्य, दानव, राक्षस आणि देवतांसाठी अवध्य होऊन जावे. ॥१९॥
|
नहि चिन्ता ममान्येषु प्राणिष्वमरपूजित । तृणभूता हि ते मन्ये प्राणिनो मानुषादयः ॥ २० ॥
|
देववंद्य पितामह ! अन्य प्राण्यांपासून मला जराही चिंता नाही आहे. मनुष्य आदि अन्य जीवांना तर मी तृणवत् समजतो. ॥२०॥
|
एवमुक्तस्तु धर्मात्मा दशग्रीवेण रक्षसा । उवाच वचनं देवः सह देवैः पितामहः ॥ २१ ॥ भविष्यत्येवमेतत् ते वचो राक्षसपुङ्गव । एवमुक्त्वा तु तं राम दशग्रीवं पितामहः ॥ २२ ॥
|
राक्षसप्रवर ! तुझे हे वचन खरे होईल. श्रीरामा ! दशग्रीवाला असे बोलून पितामह परत म्हणाले - ॥२१-२२॥
|
शृणु चापि वरो भूयः प्रीतस्येह शुभो मम । हुतानि यानि शीर्षाणि पूर्वमग्नौ त्वयानघ ॥ २३ ॥ पुनस्तानि भविष्यन्ति तथैव तव राक्षस । वितरामीह ते सौम्य वरं चान्यं दुरासदम् ॥ २४ ॥ छन्दतस्तव रूपं च मनसा यद् यथेप्सितम् ।
|
निष्पाप राक्षस ! ऐक - मी प्रसन्न होऊन परत तुला हा शुभ वर प्रदान करत आहे - तू प्रथम अग्निमध्ये आपल्या ज्या ज्या मस्तकांचे हवन केले आहेस ती सर्व तुझ्यासाठी परत पूर्ववत् प्रकट होतील. सौम्य याशिवाय एक आणखीही दुर्लभ वर मी येथे तुला देत आहे - तू आपल्या मनाने ज्यावेळी जसे रूप धारण करण्याची इच्छा करशील, त्या तुझ्या इच्छेनुसार त्यासमयी तुझे तसेच रूप होईल. ॥२३-२४ १/२॥
|
एवं पितामहोक्तस्य दशग्रीवस्य रक्षसः ॥ २५ ॥ अग्नौ हुतानि शीर्षाणि पुनस्तान्युत्थितानि वै ।
|
पितामह ब्रह्मदेवांनी इतके म्हणताच राक्षस दशग्रीवाची जी मस्तके पूर्वी आगीत होमून टाकली होती, ती परत नवीन रूपात प्रकट झाली. ॥२५ १/२॥
|
एवमुक्त्वा तु तं राम दशग्रीवं पितामहः ॥ २६ ॥ विभीषणमथोवाच वाक्यं लोकपितामहः ।
|
श्रीरामा ! दशग्रीवाला पूर्वोक्त गोष्ट सांगून लोकपितामह ब्रह्मदेव विभीषणास म्हणाले - ॥२६ १/२॥
|
विभीषण त्वया वत्स धर्मसंहितबुद्धिना ॥ २७ ॥ परितुष्टोऽस्मि धर्मात्मन् वरं वरय सुव्रत ।
|
मुला विभीषणा ! तुझी बुद्धि सदा धर्मांत लागणारी आहे म्हणून मी तुझ्यावर फार प्रसन्न आहे. हे सुव्रता ! धर्मात्मन् ! तूही आपल्या रूचिनुसार काही वर माग. ॥२७ १/२॥
|
विभीषणस्तु धर्मात्मा वचनं प्राह साञ्जल ॥ २८ ॥ वृतः सर्वगुणैर्नित्यं चन्द्रमा रश्मिभिर्यथा । भगवन्कृतकृत्योऽहं यन्मे लोकगुरुः स्वयम ॥ २९ ॥ प्रीतेन यदि दातव्यो वरो मे शृणु सुव्रत ।
|
तेव्हा किरणमालामंडित चंद्रम्याप्रमाणे सदा समस्त गुणांनी संपन्न धर्मात्मा विभीषणांनी हात जोडून म्हटले - भगवन् ! जर साक्षात् लोकगुरू आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर मी कृतार्थ आहे. मला काहीही मिळविण्याचे बाकी राहिलेले नाही. सुव्रत पितामह ! जर आपण प्रसन्न होऊन वर देऊ इच्छित असाल तर ऐकावे- ॥२८-२९ १/२॥
|
परमापद्गतस्यापि धर्मे मम मतिर्भवेत् ॥ ३० ॥ अशिक्षितं च ब्रह्मास्त्रं भगवन् प्रतिभातु मे ।
|
भगवन् ! मोठ्यात मोठी असलेल्या आपत्तीत पडल्यावरही माझी बुद्धि धर्मांतच लागून राहावी - धर्मापासून विचलित होऊ नये आणि न शिकताच मला ब्रह्मास्त्राचे ज्ञान व्हावे. ॥३० १/२॥
|
या या मे जायते बुद्धिर्येषु येष्वाश्रमेषु च ॥ ३१ ॥ सा सा भवतु धर्मिष्ठा तं तु धर्मं च पालये । एष मे परमोदारो वरः परमको मतः ॥ ३२ ॥
|
ज्या ज्या आश्रमाविषयी माझे जे जे विचार असतील ते धर्माच्या अनुकूलच असावे आणि त्या त्या धर्माचे मी पालन करावे, हेच माझ्यासाठी सर्वात उत्तम आणि अभीष्ट वरदान आहे. ॥३१-३२॥
|
नहि धर्माभिरक्तानां लोके किञ्चन दुर्लभम् । पुनः प्रजापतिः प्रीतो विभीषणमुवाच ह ॥ ३३ ॥
|
कारण जो धर्मात अनुरक्त असतो त्याच्यासाठी काहीही दुर्लभ नाही, हे ऐकून प्रजापति ब्रह्मदेव पुन्हा प्रसन्न होऊन विभीषणाला म्हणाले - ॥३३॥
|
धर्मिष्ठस्त्वं यथा वत्स तथा चैतद् भविष्यति । यस्माद् राक्षसयोनौ ते जातस्यामित्रनाशन ॥ ३४ ॥
नाधर्मे जायते बुद्धिः अमरत्वं ददामि ते ।
|
वत्सा ! तू धर्मात स्थित राहाणारा आहेस, म्हणून जे काही इच्छितोस ते सर्व पूर्ण होईल. शत्रुनाशना ! राक्षसयोनिमध्ये उत्पन्न होऊनही तुझी बुद्धि अधर्माकडे लागत नाही म्हणून मी तुला अमरत्व प्रदान करतो. ॥३४ १/२॥
|
इत्युक्त्वा कुम्भकर्णाय वरं दातुमुपस्थित॥ ३५ ॥ । प्रजापतिं सुराः सर्वे वाक्यं प्राञ्जलयोऽब्रुवन् ।
|
विभीषणाला असे सांगून जेव्हा ब्रह्मदेव कुम्भकर्णाला वर देण्यास उद्यत झाले तेव्हा सर्व देवता त्यांना हात जोडून म्हणाल्या - ॥३५ १/२॥
|
न तावत्कुम्भकर्णाय प्रदातव्यो वरस्त्वया ॥ ३६ ॥ जानीषे हि यथा लोकान् त्रासयत्येष दुर्मतिः ।
|
प्रभो ! आपण कुम्भकर्णाला वरदान देऊ नये कारण की आपण जाणतां की हा दुर्बुद्धि निशाचर कशाप्रकारे समस्त लोकांना त्रास देत आहे. ॥३६ १/२॥
|
नन्दनेऽप्सरसः सप्त महेन्द्रानुचरा दश ॥ ३७ ॥ अनेन भक्षिता ब्रह्मन् ऋषयो मानुषास्तथा ।
|
ब्रह्मन् ! याने नंदन वनातील सात अप्सरा, देवराज इंद्रांचे दहा अनुचर तसेच बरेचसे ऋषि आणि मनुष्यांना खाऊन टाकले आहे. ॥३७ १/२॥
|
अलब्धवरपूर्वेण यत्कृतं राक्षसेन तु ॥ ३८ ॥ यद्येष वरलब्धः स्याद् भक्षयेद् भुवनत्रयम् ।
|
पूर्वी वर मिळालेला नसतांनाही या राक्षसाने जर याप्रकारे प्राण्यांचे भक्षण करण्याचे क्रूरतापूर्ण कर्म करून टाकले आहे तर मग जर ह्याला वर प्राप्त झाला, तर त्या स्थितिमध्ये तो या तीन्ही लोकांना खाऊन टाकील. ॥३८ १/२॥
|
वरव्याजेन मोहोऽस्मै दीयताममितप्रभ ॥ ३९ ॥ लोकानां स्वस्ति चैवं स्याद् भवेदस्य च सम्मतिः ।
|
अमित तेजस्वी देवा ! आपण वराच्या बहाण्याने याला मोह प्रदान करावा. यामुळेच समस्त लोकांचे कल्याण होईल आणि याचाही सन्मान होईल. ॥३९ १/२॥
|
एवमुक्तः सुरैर्ब्रह्मा अचिन्तयत् पद्मसम्भवः ॥ ४० ॥ चिन्तिता नोपतस्थेऽस्य पार्श्वं देवी सरस्वती ।
|
देवतांनी असे म्हटल्यावर कमलयोनि ब्रह्मदेवांनी सरस्वतीचे स्मरण केले. त्यांनी चिंतन करतांच देवी सरस्वती जवळ आली. ॥४० १/२॥
|
प्राञ्जलिः सा तु पार्श्वस्था प्राह वाक्यं सरस्व॥ ४१ ॥ । इयमस्म्यागता देव किं कार्यं करवाण्यहम् ।
|
त्यांच्या पार्श्वभागी उभी राहून सरस्वतीने हात जोडून म्हटले - देवा ! ही मी आले आहे. माझ्यासाठी काय आज्ञा आहे ? मी कोणते कार्य करू ? ॥४१ १/२॥
|
प्रजापतिस्तु तां प्राप्तां प्राह वाक्यं सरस्वतीम॥ ४२ ॥ । वाणि त्वं राक्षसेन्द्रस्य भव या देवतेप्सिता ।
|
तेव्हा प्रजापतिनी तेथे आलेल्या सरस्वती देवीला म्हटले - वाणि ! तू राक्षसराज कुम्भकर्णाच्या जिव्हेवर विराजमान होऊन देवतांच्या अनुकूल वाणीच्या रूपारे प्रकट हो. ॥४२ १/२॥
|
तथेत्युक्त्वा प्रविष्टा सा प्रजापतिरथाब्रवीत् ॥ ४३ ॥ कुम्भकर्ण महाबाहो वरं वरय यो मतः ।
|
तेव्हा फार चांगले म्हणून सरस्वती कुम्भकर्णाच्या मुखात सामावून गेली. यानंतर प्रजापतिनी त्या राक्षसाला म्हटले - महाबाहु कुम्भकर्णा ! तूही आपल्या मनाच्या अनुकूल कुठला तरी वर माग. ॥४३ १/२॥
|
कुम्भकर्णस्तु तद्वाक्यं श्रुत्वा वचनमब्रवी॥ ४४ ॥ । स्वप्तुं वर्षाण्यनेकानि देवदेव ममेप्सितम् । एवमस्त्विति तं चोक्त्वा प्रायाद्ब्रह्मा सुरैःसमम् ॥ ४५ ॥
|
त्याचे बोलणे ऐकून कुम्भकर्ण म्हणाला - देव ! मी अनेकानेक वर्षेपर्यंत झोपून राहावे हीच माझी इच्छा आहे. तेव्हा एवमस्तु (असेच होवो) असे म्हणून ब्रह्मदेव देवतांसहित निघून गेले. ॥४४-४५॥
|
देवी सरस्वती चैव राक्षसं तं जहौ पुनः । ब्रह्मणा सह देवेषु गतेषु च नभःस्थलम् ॥ ४६ ॥ विमुक्तोऽसौ सरस्वत्या स्वां सञ्ज्ञां च ततो गतः । कुम्भकर्णस्तु दुष्टात्मा चिन्तयामास दुःखितः ॥ ४७ ॥
|
नंतर सरस्वती देवीनेही त्या राक्षसाला सोडून दिले. ब्रह्मदेवांच्या बरोबर देवताही आकाशात निघून गेल्यावर जेव्हा सरस्वती त्याच्यावरून उतरून गेली तेव्हा त्या दुष्टात्मा कुम्भकर्णाला शुद्धि आली आणि तो दुःखी होऊन याप्रकारे विलाप करू लागला- ॥४६-४७॥
|
ईदृशं किमिदं वाक्यं ममाद्य वदनाच्च्युतम् । अहं व्यामोहितो देवैः इति मन्ये तदाऽऽगतैः॥ ४८ ॥
|
अहो ! आज माझ्या तोंडातून अशी गोष्ट कशी काय निघून गेली. मला वाटते की ब्रह्मदेवांच्या बरोबर आलेल्या देवतांनीच त्यासमयी मला मोहात पाडले होते. ॥४८॥
|
एवं लब्धवराः सर्वे भ्रातरो दीप्ततेजसः । श्लेष्मातकवनं गत्वा तत्र ते न्यवसन् सुखम् ॥ ४९ ॥
|
याप्रकारे ते तीन्ही तेजस्वी भाऊ वर प्राप्त करून श्लेष्यातक वनात (भोकराच्या वनात) गेले आणि तेथे सुखपूर्वक राहू लागले. ॥४९॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे दशमः सर्गः ॥ १० ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा दहावा सर्ग पूरा झाला. ॥१०॥
|