श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ एकषष्टितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
संपातिना निशाकरमुनिं प्रति स्वपुङ्‌खदाह कारणस्य वर्णनं - संपातिने निशाकर मुनिंना आपले पंख जळण्याचे कारण सांगणे -
ततस्तद् दारुणं कर्म दुष्करं सहसा कृतम् ।
आचचक्षे मुनेः सर्वं सूर्यानुगमनं तदा ॥ १ ॥
 ’वानरांनो ! त्यांनी या प्रकारे विचारल्यावर मी विचार न करता सूर्याचे अनुगमनरूपी जे दुष्कर आणि दारूण कार्य केले होते, ते सर्व त्यांना सांगितले. ॥१॥
भगवन् व्रणयुक्तत्वात् लज्जया चाकुलोंद्रियः ।
परिश्रांतो न शक्नोमि वचनं परिभाषितुम् ॥ २ ॥
’मी म्हटले- ’भगवन ! माझ्या शरीरात घाव (आघात, जखम) झाल्या आहेत तसेच लज्जेमुळे माझी इंद्रिये व्याकुळ झाली आहेत, म्हणून अधिक कष्ट होत असल्यामुळे मी चांगल्या प्रकारे बोलूही शकत नाही. ॥२॥
अहं चैव जटायुश्च सङ्‌घवर्षाद् गर्वमोहितौ ।
आकाशं पतितौ दूरात् जिज्ञासंतौ पराक्रमम् ॥ ३ ॥
’मी आणि जटायु दोघे ही गर्वाने मोहित झालो होतो म्हणून आपल्या पराक्रमाचा अंदाज घेण्यासाठी आम्ही दोघे दूरपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने उडू लागलो. ॥३॥
कैलासशिखरे बध्वा मुनीनामग्रतः पणम् ।
रविः स्यादनुयातव्यो यावदस्तं महागिरिम् ॥ ४ ॥
’कैलास पर्वताच्या शिखरावर मुनिंच्या समोर अशी पैज लावली होती की सूर्य जो पर्यंत अस्ताचलास जाईल त्यापूर्वीच आम्ही दोघांनी त्याच्या जवळ पोहोंचले पाहिजे. ॥४॥
अप्यावां युगपत् प्राप्तौ अपश्याव महीतले ।
रथचक्रप्रमाणानि नगराणि पृथक् पृथक् ॥ ५ ॥
’हा निश्चय करून आम्ही बरोबरच आकाशात जाऊन पोहोंचलो. तेथून पृथ्वीवरील भिन्न भिन्न नगरात आम्ही रथाच्या चाकां (प्रमाणे) एवढे दिसू लागलो. ॥५॥
क्वचिद् वादित्रघोषश्च क्वचित् भूषणनिःस्वनः ।
गायंतीः स्माङ्‌गघना बह्वीः पश्यावो रक्तवाससः ॥ ६ ॥
’वरील लोकात कोठे वाद्यांचा मधुर घोष होत होता, कोठे आभूषणांचा झंकार ऐकू येत होता आणि कोठे लाल रंगाचे वस्त्र नेसलेल्या बर्‍याचशा सुंदर स्त्रिया गीत गात होत्या; ज्यांना आम्ही दोघांनी आपल्या डोळ्यानी पाहिले होते. ॥६॥
तूर्णमुत्पत्य चाकाशं आदित्यपथमास्थितौ ।
आवामालोकयावस्तद् वनं शाद्वलसंस्थितम् ॥ ७ ॥
’त्याहूनही उंच उडून आम्ही तात्काळ सूर्याच्या मार्गावर जाऊन पोहोचलो. तेथून खाली दृष्टि टाकून जेव्हा दोघांनी पाहिले तेव्हा येथील जंगले हिरव्यागार गवतासारखी दिसत होती. ॥७॥
उपलैरिव सञ्छन्ना दृश्यते भूः शिलोञ्चयैः ।
आपगाभिश्च संवीता सूत्रैरिव वसुंधरा ॥ ८ ॥
’पर्वतांमुळे ही भूमी जणु हिच्यावर दगड, शीळा अंथरले गेले आहेत अशी भासत होती आणि नद्यांनी झाकलेली भूमी जणु त्यांना सुताच्या धाग्यांनी गुंडाळेले गेले आहे अशा प्रमाणे भासत होती. ॥८॥
हिमवांश्चैव विंध्यश्च मेरुश्च सुमहागिरिः ।
भूतले संप्रकाशंते नागा इव जलाशये ॥ ९ ॥

तीव्रः स्वेदश्च खेदश्च भयं चासीत् तदावयोः ।
समाविशत मोहश्च तमो मूर्च्छा च दारुणा ॥ १० ॥
’भूतलावर हिमालय, मेरू आणि विंध्य आदि मोठ मोठे पर्वत तलावात उभ्या असलेल्या हत्तीप्रमाणे प्रतीत होत होते. त्यासमयी आम्हां दोघा भावांच्या शरीरातून खूपच घाम निघू लागला. आम्हाला फारच थकवा जाणवू लागला, नंतर तर आमच्यावर भय, मोह आणि भयंकर मूर्च्छेने अधिकार गाजविला. ॥९-१०॥
न च दिग् ज्ञायते याम्या न नाग्नेयी न वारुणी ।
युगांते नियतो लोको हतो दग्ध इवाग्निना ॥ ११ ॥
त्या समयी दक्षिण दिशेचे ज्ञान होत नव्हते, अथवा अग्निकोण अथवा पश्चिम आदि दिशांचे ही ज्ञान होत नव्हते. जर हे जगत् नियमीत रूपाने स्थित होते, तथापि त्या समयी जणु युगांतकाळी अग्निने दग्ध झाल्याप्रमाणे नष्टप्राय दिसून येत होते. ॥११॥
मनश्च मे हतं भूयः चक्षुः प्राप्य तु संश्रयम् ।
यत्‍नेतन महता ह्यस्मिन् मनः संधाय चक्षुषि ॥ १२ ॥

यत्‍नेतन महता भूयो भास्करः प्रतिलोकितः ।
तुल्यपृथ्वीप्रमाणेन भास्करः प्रतिभाति नौ ॥ १३ ॥
’माझे मन नेत्ररूपाचा आश्रय मिळून त्याच्या बरोबरच हतप्राय झाले होते- सूर्याच्या तेजाने त्याची दर्शन-शक्ती लुप्त झाली होती. त्यानंतर महान् प्रयास करून मी पुन्हा मन आणि नेत्रांना सूर्यदेवाकडे लावले. या प्रकारे विशेष प्रयत्‍न केल्यावर नंतर सूर्यदेवाचे दर्शन झाले. ते आम्हांला पृथ्वीतुल्यच भासत होते. ॥१२-१३॥
जटायुर्मामनापृच्छ्य निपपात महीं ततः ।
तं दृष्ट्‍वा तूर्णमाकाशाद् आत्मानं मुक्तवानहम् ॥ १४ ॥
’जटायु मला न विचारताच पृथ्वीवर उतरून गेला. त्याला खाली जातांना पाहून मी ही तात्काळ आपल्या स्वतःला आकाशांतून खालील बाजूस झोकून दिले. ॥१४॥
पक्षाभ्यां च मया गुप्तो जटायुर्न प्रदह्यते ।
प्रमादात्तत्र निर्दग्धः पतन् वायुपथादहम् ॥ १५ ॥

आशङ्‌के तं निपतितं जनस्थाने जटायुषम् ।
अहं तु पतितो विंध्ये दग्धपक्षो जडीकृतः ॥ १६ ॥
’मी आपल्या दोन्ही पंखांनी जटायुला झांकून टाकले, म्हणून तो जळू शकला नाही. मीच असावधानते मुळे तेथे जळून गेलो. वायुच्या मार्गाने खाली पडत असता मला असा संदेह वाटला की जटायु जनस्थानात पडला आहे, परंतु मी या विंध्य पर्वतावर पडलो होतो. माझे दोन्ही पंख जळून गेले होते, म्हणून येथे मी जडवत् होऊन गेलो. ॥१५-१६॥
राज्याच्च हीनो भ्रात्रा च पक्षाभ्यां विक्रमेण च ।
सर्वथा मर्तुमेवेच्छन् पतिष्ये शिखराद् गिरेः ॥ १७ ॥
’राज्यापासून भ्रष्ट झालो, भावापासून दुरावलो आणि पंख तसेच पराक्रम यांना गमावून बसलो. आता मी सर्वथा मरण्याचीच इच्छा धरून त्या पर्वत शिखरावरून खाली पडेन. ॥१७॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे एकषष्टितमः सर्गः ॥ ६१ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा एकसष्टावा सर्ग पूरा झाला. ॥६१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP