सीताया रसातलप्रवेशमनु श्रीरामस्य जीवनचर्या, श्रीरामराज्यस्य स्थितिः, श्रीराममातॄणां परलोकगमनादेर्वर्णनं च -
|
सीतेच्या रसातल प्रवेशानंतरची श्रीरामांची जीवनचर्या, रामराज्याची स्थिति तसेच मातांचे परलोक-गमन आदिंचे वर्णन -
|
रजन्यां तु प्रभातायां समानीय महामुनीन् । गीयतां अविशङ्काभ्यां रामः पुत्रावुवाच ह ॥ १ ॥
|
रात्र संपून जेव्हा प्रभात झाली तेव्हा श्रीरामांनी मोठ मोठ्या मुनिंना बोलावून आपल्या दोन्ही पुत्रांना म्हटले - आता तुम्ही निःशंक होऊन शेष रामायणाच्या गायनाचा आरंभ करा. ॥१॥
|
ततः समुपविष्टेषु ब्रह्मर्षिषु महात्मसु । भविष्यदुत्तरं काव्यं जगतुस्तौ कुशीलवौ ॥ २ ॥
|
महात्मा महर्षि यथास्थान बसल्यावर कुश आणि लवाने भगवंतांच्या भविष्य जीवनाशी संबंध असणार्या उत्तरकांडाचे, जो त्या महाकाव्याचा एक अंश होता, गायन करण्यास आरंभ केला. ॥२॥
|
प्रविष्टायां तु सीतायां भूतलं सत्यसम्पदा । तस्यावसाने यज्ञस्य रामः परमदुर्मनाः ॥ ३ ॥
|
इकडे आपल्या सत्यरूपी संपत्तिच्या बळाने सीतेने रसातलात प्रवेश केल्यावर त्या यज्ञाच्या अंती भगवान् श्रीरामांचे मन फार दुःखी झाले. ॥३॥
|
अपश्यमानो वैदेहीं मेने शून्यमिदं जगत् । शोकेन परमायस्तो न शान्तिं मनसागमत् ॥ ४ ॥
|
वैदेही न दिसल्याने त्यांना हा संसार शून्य भासू लागला, शोकाने व्यथित झाल्यामुळे त्यांच्या मनाला शांति मिळाली नाही. ॥४॥
|
विसृज्य पार्थिवान् सर्वान् ऋक्षवानरराक्षसान् । जनौघं विप्रमुख्यानां वित्तपूर्वं विसृज्य च ॥ ५ ॥
एवं समाप्य यज्ञं तु विधिवत् स तु राघवः । ततो विसृज्य तान् सर्वान् रामो राजीवलोचनः ॥ ६ ॥
हृदि कृत्वा तदा सीतां योध्यां प्रविवेश ह ।
|
त्यानंतर श्रीरघुनाथांनी सर्व राजेलोकांना, अस्वले, वानरे आणि राक्षसांना, जनसमुदायाला तसेच मुख्य मुख्य ब्राह्मणांनाही धन देऊन निरोप दिला. याप्रकारे विधिपूर्वक यज्ञाची समाप्ति करून कमलनयन श्रीरामांनी सर्वांना निरोप दिल्यावर त्या समयी सीतेचेच मनांतल्या मनात स्मरण करत अयोध्येत प्रवेश केला. ॥५-६ १/२॥
|
इष्टयज्ञो नरपतिः पुत्रद्वयसमन्वितः ॥ ७ ॥
न सीतायाः परां भार्यां वव्रे स रघुनन्दनः । यज्ञे यज्ञे च पत्न्यौर्थं जानकी काञ्चनी भवत् ॥ ८ ॥
|
यज्ञ पूरा करून रघुनंदन राजा श्रीराम आपल्या दोन्ही पुत्रांसह राहू लागले. त्यांनी सीतेशिवाय दुसर्या कुणा स्त्रीशी विवाह केला नाही. प्रत्येक यज्ञात जेव्हा जेव्हा धर्मपत्नीची आवश्यकता होती श्रीरघुनाथ सीतेची सुवर्णमयी प्रतिमा बनवून घेत असत. ॥७-८॥
|
दशवर्षसहस्राणि वाजिमेधानथाकरोत् । वाजपेयान् दन्दशगुणान् तथा बहुसुवर्णकान् ॥ ९ ॥
|
त्यांनी दहा हजार वर्षेपर्यंत यज्ञ केले. कित्येक अश्वमेध यज्ञांच्या द्वारा आणि त्यांच्या दसपट वाजपेय यज्ञांचे अनुष्ठान केले ज्यामध्ये असंख्य स्वर्णमुद्रांची दक्षिणा दिली गेली होती. ॥९॥
|
अग्निष्टोमातिरात्राभ्यां गोसवैश्च महाधनैः । ईजे क्रतुभिरन्यैश्च स श्रीमान् आप्तदक्षिणैः ॥ १० ॥
|
श्रीमान् रामांनी पर्याप्त दक्षिणांनी युक्त अग्निष्टोम, अतिरात्र, गोसव तसेच अन्य मोठ मोठ्या यज्ञांचे अनुष्ठान केले, ज्यात अपार धनराशी खर्च केली गेली. ॥१०॥
|
एवं स कालः सुमहान् राज्यस्थस्य महात्मनः । धर्मे प्रयतमानस्य व्यतीयाद् राघवस्य च ॥ ११ ॥
|
याप्रकारे राज्य करत महात्मा भगवान् राघवांच्या बराच समय धर्मपालनाच्या प्रयत्नांतच गेला. ॥११॥
|
ऋक्षवानररक्षांसि स्थिता रामस्य शासने । अनुरञ्जन्ति राजानो ह्यहन्यहनि राघवम् ॥ १२ ॥
|
अस्वले, वानर आणि राक्षस ही श्रीरामांच्या आज्ञेच्या अधीन रहात होते. भूमण्डलावरील सर्व राजे प्रतिदिन श्रीराघवांना प्रसन्न ठेवत होते. ॥१२॥
|
काले वर्षति पर्जन्यः सुभिक्षं विमला दिशः । हृष्टपुष्टजनाकीर्णं पुरं जनपदास्तथा ॥ १३ ॥
|
श्रीरामांच्या राज्यात मेघ समयावर वृष्टि करत होते. सदा सुकाळच राहात होता - कधी अकाळ (दुष्काळ) पडत नव्हता. संपूर्ण दिशा प्रसन्न दिसून येत होत्या तसेच नगरे आणि जनपदे ह्रष्ट-पुष्ट मनुष्यांनी भरलेली राहात होती. ॥१३॥
|
नाकाले म्रियते कश्चित् न व्याधिः प्राणिनां तथा । नानर्थो विद्यते कश्चिद् रामे राज्यं प्रशासति ॥ १४ ॥
|
श्रीराम राज्यशासन करत असता कुणालाही अकाल मृत्यु येत नव्हता. प्राण्यांना कुठलेही रोग सतावीत नव्हते आणि संसारात कुठला ही उपद्रव उत्पन्न होत नव्हता. ॥१४॥
|
अथ दीर्घस्य कालस्य राममाता यशस्विनी । पुत्रपौत्रैः परिवृता कालधर्ममुपागमत् ॥ १५ ॥
|
यानंतर दीर्घकाळ व्यतीत झाल्यावर पुत्र-पौत्रांनी घेरलेली परम यशस्विनी श्रीराममाता कौसल्या कालधर्माला (मृत्युला) प्राप्त झाली. ॥१५॥
|
अन्वियाय सुमित्रा च कैकेयी च यशस्विनी । धर्मं कृत्वा बहुविधं त्रिदिवे पर्यवस्थिता ॥ १६ ॥
सर्वाः प्रमुदिताः स्वर्गे राज्ञा दशरथेन च । समागता महाभागाः सर्वधर्मं च लेभिरे ॥ १७ ॥
|
सुमित्रा आणि यशस्विनी कैकेयीने ही तिच्याच मार्गाचे अनुसरण केले. या सर्व राण्या जीवनकाळात नाना प्रकारच्या धर्माचे अनुष्ठान करून अंती साकेतधामास प्राप्त झाल्या आणि अत्यंत प्रसन्नतेने तेथे राजा दशरथांना भेटल्या. त्या महाभाग राण्यांना सर्व धर्मांचे पूरे पूरे फळ प्राप्त झाले. ॥१६-१७॥
|
तासां रामो महादानं काले काले प्रयच्छति । मातॄणामविशेषेण ब्राह्मणेषु तपस्विषु ॥ १८ ॥
|
श्रीराम वेळोवेळी आपल्या सर्व मातांच्या निमित्ताने कुठलाही भेदभाव न करता तपस्वी ब्राह्मणांना मोठमोठी दाने देत असत. ॥१८॥
|
पित्र्याणि ब्रह्मरत्नासनि यज्ञान् परमदुस्तरान् । चकार रामो धर्मात्मा पितॄन् देवान् विवर्धयन् ॥ १९ ॥
|
धर्मात्मा श्रीराम श्राद्धामध्ये उपयोगी उत्तमोत्तम वस्तु ब्राह्मणांना देत असत आणि पितर आणि देवतांना संतुष्ट करण्यासाठी मोठ मोठ्या दुस्तर यज्ञांचे (पिंडात्मक पितृयज्ञांचे) अनुष्ठान करत असत. ॥१९॥
|
एवं वर्षसहस्राणि बहून्यथ ययुः सुखम् । यज्ञैर्बहुविधं धर्मं वर्धयानस्य सर्वदा ॥ २० ॥
|
याप्रकारे यज्ञांच्या द्वारा विविध धर्माचे पालन करीत श्रीरामांची काही हजार वर्षे सुखपूर्वक निघून गेली. ॥२०॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे एकोनशततमः सर्गः ॥ ९९ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा नव्याण्णवावा सर्ग पूरा झाला. ॥९९॥
|