अश्वमेधानुष्ठानेन इलायाः पुरुषत्वस्य प्राप्तिः -
|
अश्वमेधाच्या अनुष्ठानाने इलेला पुरुषत्वाची प्राप्ति -
|
तथोक्तवति रामे तु तस्य जन्म तदद्भुतम् । उवाच लक्ष्मणो भूयो भरतश्च महायशाः ॥ १ ॥
|
श्रीरामांनी जेव्हा पुरूख्याच्या जन्माची अद्भुत कथा सांगितली, तेव्हा लक्ष्मण तसेच महायशस्वी भरतांनी पुन्हा विचारले - ॥१॥
|
इला सा सोमपुत्रस्य संवत्सरमथोषिता । अकरोत्किं नरश्रेष्ठ तत्त्वं शंसितुमर्हसि ॥ २ ॥
|
नरश्रेष्ठ ! सोमपुत्र बुधाजवळ एक वर्षपर्यंत निवास केल्यानंतर इलाने काय केले हे ठीक ठीक सांगण्याची कृपा करावी. ॥२॥
|
तयोस्तद्वाक्यमाधुर्यं निशम्य परिपृच्छतोः । रामः पुनरुवाचेमां प्रजापतिसुते कथाम् ॥ ३ ॥
|
प्रश्न करते समयी त्या दोघां भावांच्या वाणीत फार माधुर्य होते. ते ऐकून श्रीरामांनी प्रजापति पुत्र इलाच्या विषयात पुन्हा याप्रकारे कथा सांगण्यास आरंभ केला - ॥३॥
|
पुरुषत्वं गते शूरे बुधः परमबुद्धिमान् । संवर्तं परमोदारं आजुहाव महायशाः ॥ ४ ॥
|
शूरवीर ! इल ज्यावेळी एक महिन्याकरिता पुरुषभावात स्थित झाले तेव्हा परम बुद्धिमान् महायशस्वी बुधांनी परम उदार महात्मा संवर्तांना बोलावून घेतले. ॥४॥
|
च्यवनं भृगुपुत्रं च मुनिं चारिष्टनेमिनम् । प्रमोदनं मोदकरं ततो दुर्वाससं मुनिम् ॥ ५ ॥
|
भृगुपुत्र च्यवनमुनि, अरिष्टनेमि, प्रमोदन, मोदकर आणि दुर्वासा मुनिंनाही आमंत्रित केले. ॥५॥
|
एतान् सर्वान् समानीय वाक्यज्ञस्तत्त्वदर्शनः । उवाच सर्वान् सुहृदो धैर्येण सुसमाहितान् ॥ ६ ॥
|
या सर्वांना बोलावून वाक्यज्ञ तत्वदर्शी बुधांनी धैर्याने एकाग्रचित्त राहाणार्या त्या सर्व सुहृदांना सांगितले - ॥६॥
|
अयं राजा महाबाहुः कर्दमस्य इलः सुतः । जानीतैनं यथाभूतं श्रेयो ह्यत्र विधीयताम् ॥ ७ ॥
|
हे महाबाहु राजे इल प्रजापति कर्दमांचे पुत्र आहेत. यांची जी काही स्थिति आहे ती आपण सर्व लोक जाणतच आहात, म्हणून या विषयी असा काही उपाय करावा ज्यायोगे यांचे कल्याण होईल. ॥७॥
|
तेषां संवदतामेव द्विजैः सह महात्मभिः । कर्दमस्तु महातेजा तदाश्रममुपागमत् ॥ ८ ॥
|
ते सर्व प्रकारे संवाद करतच होते की महात्मा द्विजांसहित महातेजस्वी प्रजापति कर्दम ही त्या आश्रमावर येऊन पोहोंचले. ॥८॥
|
पुलस्त्यश्च क्रतुश्चैव वषट्कारस्तथैव च । ओङ्कारश्च महातेजाः स्तमाश्रममुपागमन् ॥ ९ ॥
|
त्याचबरोबर पुलस्त्य, क्रतु, वषट्कार तसेच महातेजस्वी ओंकारही त्या आश्रमावर आले. ॥९॥
|
ते सर्वे हृष्टमनसः परस्परसमागमे । हितैषिणो बाल्हिपतेः पृथग्वाक्यान्यथाब्रुवन् ॥ १० ॥
|
परस्परांना भेटल्यावर ते सर्व महर्षि प्रसन्नचित्त होवून बाह्लिक देशाचे स्वामी राजा इलाचे हिताची इच्छा करत भिन्न-भिन्न मते देऊ लागले. ॥१०॥
|
कर्दमस्त्वब्रवीद् वाक्यं सुतार्थं परमं हितम् । द्विजाः शृणुत मद्वाक्यं यच्छ्रेयः पार्थिवस्य हि ॥ ११ ॥
|
तेव्हा कर्दमांनी पुत्रासाठी अत्यंत हितकर गोष्ट सांगितली - ब्राह्मणांनो ! आपण लोक माझे हे वाक्य ऐका. जे या राजासाठी कल्याणकारीच होईल. ॥११॥
|
नान्यं पश्यामि भैषज्यं अन्तरा वृषभध्वजम् । नाश्वमेधात्परो यज्ञः प्रियश्चैव महात्मनः ॥ १२ ॥
|
मी भगवान् शंकरांशिवाय दुसर्या कोणालाही असे बघत नाही की जे या रोगावर औषध देऊ शकतील. तसेच अश्वमेध यज्ञाहून दुसरा कुठलाही असा यज्ञ नाही जो महात्मा महादेवांना प्रिय आहे. ॥१२॥
|
तस्माद्यजामहे सर्वे पार्थिवार्थे दुरासदम् । कर्दमेनैवमुक्तास्तु सर्व एव द्विजर्षभाः ॥ १३ ॥
रोचयन्ति स्म तं यज्ञं रुद्रस्याराधनं प्रति ।
|
म्हणून आपण सर्वजण राजा इलच्या हितासाठी त्या दुष्कर यज्ञाचे अनुष्ठान करू या. कर्दमांनी असे सांगितल्यावर त्या सर्व श्रेष्ठ ब्राह्मणांनी भगवान् रूद्राच्या आराधनेसाठी त्या यज्ञाचे अनुष्ठानच चांगले असे जाणले. ॥१३ १/२॥
|
संवर्तस्य तु राजर्षेः शिष्यः पुरपुरञ्जयः ॥ १४ ॥
मरुत्त इति विख्यातः तं यज्ञं समुपाहरत् ।
|
संवर्तांचे शिष्य तसेच शत्रुनगरीवर विजय प्राप्त करणार्या सुप्रसिद्ध राजर्षि मरूत्तांनी या यज्ञाचे आयोजन केले. ॥१४ १/२॥
|
ततो यज्ञो महानासीद् बुधाश्रमसमीपतः ॥ १५ ॥
रुद्रश्च परमं तोषं आजगाम महायशाः ।
|
नंतर तर बुधांच्या आश्रमाच्या निकटच हा महान् यज्ञ संपन्न झाला तसेच यामुळे महायशस्वी रूद्रदेवांना फार संतोष प्राप्त झाला. ॥१५ १/२॥
|
अथ यज्ञे समाप्ते तु प्रीतः परमया मुदा ॥ १६ ॥
उमापतिर्द्विजान् सर्वान् उवाच इलसन्निधौ ।
|
यज्ञ समाप्त झाल्यावर परमानंदाने परिपूर्णचित्त झालेल्या भगवान् उमापतिनी इलाच्या समक्षच त्या सर्व ब्राह्मणांना म्हटले - ॥१६ १/२॥
|
प्रीतोऽस्मि हयमेधेन भक्त्या च द्विजसत्तमाः ॥ १७ ॥
अस्य बाह्लिपतेश्चैव किं करोमि प्रियं शुभम् ।
|
द्विजश्रेष्ठगण ! मी तुमची भक्ती तसेच या अश्वमेघ यज्ञाच्या अनुष्ठानाने फार प्रसन्न झालो आहे. सांगा मी बाह्लिक नरेश इलाचे कोणते शुभ आणि प्रिय कार्य करू ? ॥१७ १/२॥
|
तथा वदति देवेशे द्विजास्ते सुसमाहिताः ॥ १८ ॥
प्रसादयन्ति देवेशं यथा स्यात् पुरुषस्त्विला ।
|
देवेश्वर शिवांनी असे म्हटल्यावर ते सर्व ब्राह्मण एकाग्रचित्त होऊन त्या देवाधिदेवांना याप्रकारे प्रसन्न करण्याचा प्रयत्न करू लागले की ज्यायोगे नारी इला कायमची पुरुष इल होऊन जावी. ॥१८ १/२॥
|
ततः प्रीतो महादेवः पुरुषत्वं ददौ पुनः ॥ १९ ॥
इलायै सुमहातेजा दत्त्वा चान्तरधीयत ।
|
तेव्हा प्रसन्न झालेल्या महातेजस्वी महादेवांनी इलेला कायमचे पुरुषत्व प्रदान करून टाकले आणि असे करून ते तेथेच अंतर्धान झाले. ॥१९ १/२॥
|
निवृत्ते हयमेधे च गतश्चादर्शनं हरे ॥ २० ॥
यथागतं द्विजाः सर्वे ह्यगच्छन्दीर्घदर्शिनः ।
|
अश्वमेध यज्ञ समाप्त झाल्यावर जेव्हा महादेव दर्शन देऊन अदृश्य झाले तेव्हा ते सर्व दीर्घदर्शी ब्राह्मण जसे आले होते तसेच परत गेले. ॥२० १/२॥
|
राजा तु बाह्लिमुत्सृज्य मध्यदेशे ह्यनुत्तमम् ॥ २१ ॥
निवेशयामास पुरं प्रतिष्ठानं यशस्करम् ।
|
राजा इलने बाह्लिक देश सोडून मध्यदेशात (गंगा-यमुनेच्या संगमाजवळ) एक परम उत्तम आणि यशस्वी नगर वसविले, ज्याचे नाव होते प्रतिष्ठानपुर(**). ॥२१ १/२॥
|
शशबिन्दुश्च राजर्षिः बाह्लिं पुरपुरञ्जयः ॥ २२ ॥
प्रतिष्ठाने इलो राजा प्रजापतिसुतो बली ।
|
शत्रुनगरीवर विजय प्राप्त करणार्या राजर्षि शराबिंदुने बाह्लिक देशाचे राज्य ग्रहण केले आणि प्रजापति कर्दमांचे पुत्र बलवान् राजा इल प्रतिष्ठानपुरचे शासक झाले. ॥२२ १/२॥
|
स काले प्राप्तवाँल्लोकं इलो ब्राह्ममनुत्तमम् ॥ २३ ॥
ऐलः पुरूरवा राजा प्रतिष्ठानं अवाप्तवान् ।
|
योग्य समय आल्यावर राजा इल शरीर सोडून परम उत्तम ब्रह्मलोकास प्राप्त झाले आणि इलाचे पुत्र राजा पुरूख्यांनी प्रतिष्ठानपुराचे राज्य प्राप्त केले. ॥२३ १/२॥
|
ईदृशो ह्यश्वमेधस्य प्रभावः पुरुषर्षभौ । स्त्रीभूतः पौरुषं लेभे यच्चान्यदपि दुर्लभम् ॥ २४ ॥
|
पुरुषश्रेष्ठ भरत आणि लक्ष्मणा ! अश्वमेध यज्ञाचा असाही प्रभाव आहे. जे स्त्रीरूप झाले होते त्या राजा इलने या यज्ञाच्या प्रभावाने पुरुषत्व प्राप्त केले तसेच आणखी दुर्लभ वस्तु हस्तगत केल्या होत्या. ॥२४॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे नवतितमः सर्गः ॥ ९० ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा नव्वदावा सर्ग पूरा झाला. ॥९०॥
|