श्रीरामप्रभृतीनामगस्त्यस्याश्रमे प्रवेशः तत्र तेषामातिथ्यं मुनेः सकाशाच्च तेभ्यो दिव्यास्त्रशस्त्राणां प्राप्तिः -
|
श्रीराम आदिंचा अगस्त्यांच्या आश्रमात प्रवेश, अतिथि-सत्कार तसेच मुनींच्या कडून त्यांना दिव्य अस्त्र-शस्त्रांची प्राप्ती -
|
स प्रविश्याश्रमपदं लक्ष्मणो राघवानुजः ।
अगस्त्यशिष्यमासाद्य वाक्यमेतदुवाच ह ॥ १ ॥
|
श्रीरामचंद्रांच्या लहान भावाने - लक्ष्मणांनी आश्रमात प्रवेश करुन अगस्त्यांच्या शिष्याची भेट घेतली आणि त्यास म्हटले - ॥१॥
|
राजा दशरथो नाम ज्येष्ठस्तस्य सुतो बली ।
रामः प्राप्तो मुनिं द्रष्टुं भार्यया सह सीतया ॥ २ ॥
|
’मुने ! अयोध्येत जे दशरथ नामाने प्रसिद्ध राजे होते त्यांचे ज्येष्ठ पुत्र महाबली श्रीरामचंद्र आपली पत्नी सीता हिच्यासह महर्षिंच्या दर्शनासाठी आले आहेत. ॥२॥
|
लक्ष्मणो नाम तस्याहं भ्राता त्ववरजो हितः ।
अनुकूलश्च भक्तश्च यदि ते श्रोत्रमागतः ॥ ३ ॥
|
’मी त्यांचा लहान भाऊ, हितैषी आणि अनुकूल वागणारा भक्त आहे. माझे नाव लक्ष्मण आहे. संभव आहे की हे नाव कधी आपल्या कानावर पडले असेल. ॥३॥
|
ते वयं वनमत्युग्रं प्रविष्टाः पितृशासनात् ।
द्रष्टुमिच्छामहे सर्वे भगवन्तं निवेद्यताम् ॥ ४ ॥
|
’आम्ही लोक पित्याच्या आज्ञेने या अत्यंत भयङ्कर वनात आलो आहोत. आणि भगवान अगस्त्य मुनींचे दर्शन करू इच्छितो. आपण त्यांना हा समाचार निवेदन करावा.’ ॥४॥
|
तस्य तद् वचनं श्रुत्वा लक्ष्मणस्य तपोधनः ।
तथेत्युक्त्वाग्निशरणं प्रविवेश निवेदितुम् ॥ ५ ॥
|
लक्ष्मणांचे हे बोलणे ऐकून त्या तपोधनाने ’फार चांगले’ असे म्हणून महर्षिंना समाचार सांगण्यासाठी अग्निशाळेत प्रवेश केला. ॥५॥
|
स प्रविश्य मुनिश्रेष्ठं तपसा दुष्प्रधर्षणम् ।
कृताञ्जलिरुवाचेदं रामागमनमञ्जसा ॥ ६ ॥
यथोक्तं लक्ष्मणेनैव शिष्योऽगस्त्यस्य सम्मतः ।
|
अग्निशाळेत प्रवेश करून, अगस्त्यांच्या त्या प्रिय शिष्याने, जो आपल्या तपस्येच्या प्रभावाने दुसर्यासाठी दुर्जय होते, त्या मुनिश्रेष्ठ अगस्त्यांच्या जवळ जाऊन हात जोडून लक्ष्मणांच्या कथनानुसार त्यांना श्रीरामचंद्रांच्या आगमनाचा समाचार शीघ्रतापूर्वक ऐकविला. ॥६ १/२॥
|
पुत्रौ दशरथस्येमौ रामो लक्ष्मण एव च ॥ ७ ॥
प्रविष्टावाश्रमपदं सीतया सह भार्यया ।
द्रष्टुं भवन्तमायातौ शुश्रूषार्थमरिंदमौ ॥ ८ ॥
यदत्रानन्तरं तत् त्वमाज्ञापयितुमर्हसि ।
|
’महामुने ! राजा दशरथांचे हे दोन पुत्र श्रीराम आणि लक्ष्मण आश्रमात आलेले आहेत. श्रीराम आपली धर्मपत्नी सीता हिच्यासह आले आहेत. ते दोन्ही शत्रुदमन वीर आपल्या सेवेच्या उद्देश्याने आपले दर्शन करण्यासाठी आलेले आहेत. आता या विषयी जे काही सांगावयाचे अथवा करावयाचे असेल त्यासाठी आपण मला आज्ञा द्यावी.’ ॥ ७-८ १/२॥
|
ततः शिष्यादुपश्रुत्य प्राप्तं रामं सलक्ष्मणम् ॥ ९ ॥
वैदेहीं च महाभागामिदं वचनमब्रवीत् ।
|
शिष्याकडून लक्ष्मणासहित श्रीराम आणि महाभागा वैदेही सीतेच्या शुभागमनाचा समाचार ऐकून महर्षिने याप्रकारे म्हटले - ॥९ १/२॥
|
दिष्ट्या रामश्चिरस्याद्य द्ष्टुं मां समुपागतः ॥ १० ॥
मनसा काङ्क्षितं ह्यस्य मयाप्यागमनं प्रति ।
गम्यतां सत्कृतो रामः सभार्यः सहलक्ष्मणः ॥ ११ ॥
प्रवेश्यतां समीपं मे किमसौ न प्रवेशितः ।
|
’सौभाग्याची गोष्ट आहे की आज चिरकालानंतर श्रीरामचंद्र स्वतःच मला भेटण्यासाठी आले आहेत. माझ्या मनातही बरेच दिवसा पासून ही अभिलाषा होती की त्यांनी एक वेळ माझ्या आश्रमात यावे. जा आणि पत्नीसहित श्रीराम आणि लक्ष्मण यांना सत्कारपूर्वक आश्रमाच्या आत माझ्या समीप घेऊन ये. तू आतापर्यत त्यांना का घेऊन आला नाहीस ?’ ॥१०-११ १/२॥
|
एवमुक्तस्तु मुनिना धर्मज्ञेन महात्मना ॥ १२ ॥
अभिवाद्याब्रवीच्छिष्यस्तथेति नियताञ्जलिः ।
|
धर्मज्ञ महात्मा अगस्त्य मुनिनी असे म्हटल्यावर शिष्याने त्यांना प्रणाम केला आणि म्हटले - ’फार चांगले; आत्ता घेऊन येतो.’ ॥१२ १/२॥
|
तदा निष्क्रम्य संभ्रान्तः शिष्यो लक्ष्मणमब्रवीत् ॥ १३ ॥
कोऽसौ रामो मुनिं द्रष्टुं एतु प्रविशतु स्वयम् ।
|
यानंतर तो शिष्य आश्रमातून निघून शीघ्रतापूर्वक लक्ष्मणांजवळ गेला आणि म्हणाला - ’श्रीरामचंद्र कोण आहेत ? त्यांनी स्वतः आश्रमात प्रवेश करावा आणि मुनींचे दर्शन करण्यास चलावे.’ ॥१३ १/२॥
|
ततो गत्वाऽऽश्रमपदं शिष्येण सह लक्ष्मणः ॥ १४ ॥
दर्शयामास काकुत्स्थं सीतां च जनकात्मजाम् ।
|
तेव्हा लक्ष्मणानी शिष्यासह आश्रमाच्या द्वारावर जाऊन त्याला श्रीरामचंद्र तसेच जनकनंदिनी सीतेचे दर्शन करविले. ॥१४ १/२॥
|
तं शिष्यः प्रश्रितं वाक्यमगस्त्यवचनं ब्रुवन् ॥ १५ ॥
प्रावेशयद् यथान्यायं सत्कारार्हं सुसत्कृतम् ।
|
शिष्याने अत्यंत विनयाने महर्षि अगस्त्यांनी सांगितलेली वचने परत उच्चारून दाखविली आणि जे सत्कारास योग्य होते त्या श्रीरामांचा यथोचित रीतीने उत्तम प्रकारे सत्कार करून तो त्यांना आश्रमात घेऊन गेला. ॥१५ १/२॥
|
प्रविवेश ततो रामः सीतया सह लक्ष्मणः ॥ १६ ॥
प्रशान्तहरिणाकीर्णमाश्रमं ह्यवलोकयन् ।
स तत्र ब्रह्मणः स्थानमग्नेः स्थानं तथैव च ॥ १७ ॥
|
त्या वेळी श्रीरामांनी लक्ष्मण आणि सीतेसह आश्रमात प्रवेश केला. तो आश्रम शांतभावाने राहाणार्या हरिणांनी भरलेला होता. आश्रमाची शोभा पहात त्यांनी तेथे ब्रह्मदेवांचे स्थान आणि अग्निदेवांचे स्थान पाहिले. ॥१६-१७॥
|
विष्णोः स्थानं महेन्द्रस्य स्थानं चैव विवस्वतः ।
सोमस्थानं भगस्थानं स्थानं कौबेरमेव च ॥ १८ ॥
धातुर्विधातुः स्थानं च वायोः स्थानं तथैव च ।
स्थानं च पाशहस्तस्य वरुणस्य महात्मनः ॥ १९ ॥
स्थानं तथैव गायत्र्या वसूनां स्थानमेव च ।
स्थानं च नागराजस्य गरुडस्थानमेव च ॥ २० ॥
कार्तिकेयस्य च स्थानं धर्मस्थानं च पश्यति ।
|
नंतर क्रमशः भगवान विष्णु, महेंद्र, सूर्य, चंद्रमा, भग, कुबेर, धाता, विधाता, वायु, पाशधारी महात्मा वरूण, गायत्री, वसु, नागराज अनंत, गरूड, कार्तिकेय तसेच धर्मराज यांच्या पृथक पृथक स्थानांचे निरीक्षण केले. ॥१८-२० १/२॥
|
ततः शिष्यैः परिवृतो मुनिरप्यभिनिष्पतत् ॥ २१ ॥
तं ददर्शाग्रतो रामो मुनीनां दीप्ततेजसाम् ।
अब्रवीद्वचनं वीरो लक्ष्मणं लक्ष्मिवर्धनम् ॥ २२ ॥
|
इतक्यातच शिष्यांनी घेरलेले मुनिवर अगत्स्यही अग्निशाळेच्या बाहेर आले. वीर श्रीरामांनी मुनिंच्या पुढे पुढे येणार्या उद्दीप्त तेजस्वी अगस्त्यांचे दर्शन केले आणि आपल्या शोभेचा विस्तार करणार्या लक्ष्मणास या प्रकारे म्हटले - ॥२१-२२॥
|
बहिर्लक्ष्मण निष्क्रामत्यगस्त्यो भगवानृषिः ।
औदार्येणावगच्छामि निधानं तपसामिमम् ॥ २३ ॥
|
लक्ष्मणा ! भगवान अगस्त्य मुनि आश्रमातून बाहेर पडत आहेत. ते तपस्येचे निधि आहेत. त्यांच्या विशिष्ट तेजाच्या आधिक्यानेच मला पत्ता लागला आहे की अगस्त्यच आहेत.’ ॥२३॥
|
एवमुक्त्वा महाबाहुरगस्त्यं सूर्यवर्चसम् ।
जग्राहपततस्तस्य पादौ च रघुनन्दनः ॥ २४ ॥
|
सूर्यतुल्य तेजस्वी महर्षि अगस्त्यांच्या विषयी असे म्हणून महाबाहु रघुनंदनांनी समोरून येणार्या त्या मुनीश्वरांचे दोन्ही चरण पकडले. ॥२४॥
|
अभिवाद्य तु धर्मात्मा तस्थौ रामः कृताञ्जलिः ।
सीतया सह वैदेह्या तदा रामः सलक्ष्मणः ॥ २५ ॥
|
ज्यांच्यामध्ये योग्यांचे मन रमण करते अथवा जे भक्तांना आनंद प्रदान करणारे आहेत ते धर्मात्मा राम त्यावेळी वैदेही सीता आणि लक्ष्मणासहित महर्षिंच्या चरणी प्रणाम करून हात जोडून उभे राहिले. ॥२५॥
|
प्रतिजग्राह काकुत्स्थमर्चयित्वाऽऽसनोदकैः ।
कुशलवप्रश्नमुक्त्वा च आस्यतामिति चाब्रवीत् ॥ २६ ॥
|
महर्षिंनी भगवान श्रीरामांना हृदयाशी धरले आणि आसन तथा जल (पाद्य, अर्घ्य आदि) देऊन त्यांचा आतिथ्य सत्कार केला. नंतर कुशल समाचार विचारून त्यांना बसण्यास सांगितले. ॥२६॥
|
अग्निं हुत्वा प्रदायार्घ्यमतिथीन् प्रतिपूज्य च ।
वानप्रस्थेन धर्मेण स तेषां भोजनं ददौ ॥ २७ ॥
|
अगस्त्यांनी पहिल्याने अग्नित आहुति दिली, नंतर वानप्रस्थ धर्मास अनुसरून अर्घ्य देऊन अतिथिंचे उत्तम प्रकारे पूजन करून त्यांच्यासाठी भोजन दिले. ॥२७॥
|
प्रथमं चोपविश्याथ धर्मज्ञो मुनिपुंगवः ।
उवाच राममासीनं प्राञ्जलिं धर्मकोविदम् ॥ २८ ॥
अग्निं हुत्वा प्रदायार्घ्यमतिथिं प्रतिपूजयेत् ।
अन्यथा खलु काकुत्स्थ तपस्वी समुदाचरन् ।
दुःसाक्षीव परे लोके स्वानि मांसानि भक्षयेत् ॥ २९ ॥
|
धर्माचे ज्ञाते मुनिवर अगस्त्य प्रथम स्वतः बसले आणि धर्मज्ञ श्रीरामचंद्र हात जोडून आसनावर विराजमान झाले. यानंतर महर्षिंनी त्यांना म्हटले - ’काकुत्स्थ ! वानप्रस्थाने प्रथम अग्नित आहुती देणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्घ्य देऊन त्याने अतिथीचे पूजन करावे. जो तपस्वी याच्या विपरीत आचरण करतो, त्याला खोटी साक्ष देणाराप्रमाणे परलोकात आपल्याच शरीराचे मांस खावे लागते. ॥२८-२९॥
|
राजा सर्वस्य लोकस्य धर्मचारी महारथः ।
पूजनीयश्च मान्यश्च भवान् प्राप्तः प्रियातिथिः ॥ ३० ॥
|
’आपण संपूर्ण लोकांचे राजे, महारथी आणि धर्माचे आचरण करणारे आहात तसेच माझ्या प्रिय अतिथिच्या रूपात या आश्रमात आला आहात म्हणून आपण आम्हा लोकांना माननीय आणि पूजनीय आहात.’ ॥३०॥
|
एवमुक्त्वा फलैर्मूलैः पुष्पैश्चान्येश्च राघवम् ।
पूजयित्वा यथाकामं पुनरेव ततोऽगस्त्यमब्रवीत् ॥ ३१ ॥
|
असे म्हणून महर्षि अगस्त्यांनी फल, मूल, फुले तसेच अन्य उपकरणांनी इच्छेनुसार भगवान श्रीरामांचे पूजन केले. तत्पश्चात अगस्त्य या प्रकारे बोलले - ॥३१॥
|
इदं दिव्यं महच्चापं हेमवज्रविभूषितम् ।
वैष्णवं पुरुषव्याघ्र निर्मितं विश्वकर्मणा ॥ ३२ ॥
अमोघः सूर्यसङ्काशो ब्रह्मदत्तः शरोत्तमः ।
दत्तौ मम महेन्द्रेण तूणी चाक्षय्यसायकौ ॥ ३३ ॥
संपूर्णौ निशितैर्बाणैर्ज्वलद्भिरिव पावकैः ।
महाराजतकोशोऽयमसिर्हेमविभूषितः ॥ ३४ ॥
|
’पुरुषसिंह ! हे महान दिव्य धनुष्य विश्वकर्म्याने बनविलेले आहे. यात सुवर्ण आणि हिरे जडविलेले आहेत. हे भगवान विष्णुनी दिलेले आहे. तसेच हा जो सूर्यासमान देदीप्यमान अमोघ उत्तम बाण आहे तो ब्रह्मदेवांनी दिलेला आहे. याशिवाय इंद्रांनी हे दोन तरकस (भाते) दिलेले आहेत जे तीक्ष्ण आणि प्रज्वलित अग्निसमान तेजस्वी बाणांनी सदा भरलेले राहातात. कधी रिक्त होत नाहीत. त्याचबरोबर ही तलवार ही आहे जिच्या मूठीमध्ये सोने जडविलेले आहे. हिची म्यानही सोन्याचीच बनविलेली आहे. ॥३२-३४॥
|
आनेन धनुषा राम हत्वा सङ्ख्ये महासुरान् ।
आजहार श्रियं दीप्तां पुरा विष्णुर्दिवौकसाम् ॥ ३५ ॥
तद्धनुस्तौ च तूणी चरौ शरं खड्गं च मानद ।
जयाय प्रतिगृह्णीष्व वज्रं वज्रधरो यथा ॥ ३६ ॥
|
’श्रीरामा ! पूर्वकाळी भगवान विष्णुनी याच धनुष्याने युद्धात मोठमोठ्या असुरांचा संहार करून देवतांच्या उद्दीप्त लक्ष्मीला त्यांच्या अधिकारात परत आणून दिली होती. मानद ! आपण हे धनुष्य, हे दोन्ही भाते, हे बाण आणि ही तलवार (राक्षसांच्यावर) विजय प्राप्त करण्यासाठी ग्रहण करा; ज्याप्रमाणे वज्रधारी इंद्र वज्र ग्रहण करतो त्या प्रमाणेच.’ ॥३५-३६॥
|
एवमुक्त्वा महातेजाः समस्तं तद्वरायुधम् ।
दत्त्वा रामाय भगवानगस्त्यः पुनरब्रवीत् ॥ ३७ ॥
|
असे म्हणून महान तेजस्वी अगस्त्यांनी ती सर्वश्रेष्ठ आयुधे श्रीरामांच्या हाती सोपविली. त्यानंतर ते परत म्हणाले - ॥३७॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे द्वादशः सर्गः ॥ १२ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्ष रामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा बारावा सर्ग पूरा झाला. ॥१२॥
|