क्षुत्तृडभिभूतानां वानराणां एकस्यां गुहायां प्रवेशः, तत्रतैर्दिव्यवृक्षसरोवर भवनानाण् एकस्या वृद्धायाः तपस्विन्याः च अवलोकनं, हनुमता तां प्रति तस्याः परिचयस्य जिज्ञासम् -
|
भुकेल्या तहानलेल्या वानरांनी एका गुहेमध्ये घुसून तेथे दिव्य वृक्ष, दिव्य सरोवर, दिव्य भवन तसेच एका वृद्ध तपस्विनीला पहाणे आणि हनुमानांनी तिला तिचा परिचय विचारणे -
|
सह ताराङ्गीदाभ्यां तु संगम्य हनुमान् कपिः । विचिनोति च विंध्यस्य गुहाश्च गहनानि च ॥ १ ॥
|
हनुमान्, तार आणि अंगदाला बरोबर घेऊन विंध्यगिरिच्या गुहांमध्ये आणि घनदाट जंगलात सीतेचा शोध घेऊ लागले. ॥१॥
|
सिंहशार्दूलजुष्टाश्च गुहाश्च परितस्तदा । विषमेषु नगेंद्रस्य महाप्रस्रवणेषु च ॥ २ ॥
|
त्यांनी सिंह आणि वाघांनी भरलेल्या गुहा आणि त्यांच्या आसपासच्या भूमिलाही पिंजून काढले. गिरिराज विंध्यावर जे मोठ मोठे झरे आणि दुर्गम स्थाने होती तेथेही अन्वेषण केले. ॥२॥
|
आसेदुस्तस्य शैलस्य कोटिं दक्षिणपश्चिमाम् । तेषां तत्रैव वसतां स कालो व्यत्यवर्तत ॥ ३ ॥
|
हिंडत फिरत ते तीन्ही वानर त्या पर्वताच्या नैऋत्य कोनातील शिखरावर जाऊन पोहोचले. तेथे राहात असतांनाच त्यांचा जो अवधि सुग्रीवांनी निश्चित केला होता तो पूर्ण झाला. ॥३॥
|
स हि देशो दुरन्वेष्यो गुहागहनवान् महान् । तत्र वायुसुतः सर्वं विचिनोति स्म पर्वतम् ॥ ४ ॥
|
गुहांनी आणि जंगलांनी भरलेल्या त्या महान् प्रदेशात सीतेला शोधण्याचे काम फारच कठीण होते. तरीही तेथे वायुपुत्र हनुमान् सर्व पर्वतांचा शोध घेऊ लागले. ॥४॥
|
परस्परेण रहिता अन्योन्यस्याविदूरतः । गजो गवाक्षो गवयः शरभो गंधमादनः ॥ ५ ॥ मैंदश्च द्विविदश्चैव सुषेणो जांबवानपि । अङ्गशदो युवराजश्च तारश्च वनगोचरः ॥ ६ ॥ गिरिजालावृतान् देशान् मार्गित्वा दक्षिणां दिशम् । विचिन्वंतस्ततस्तत्र ददृशुर्विवृतं बिलम् ॥ ७ ॥
|
नंतर वेगवेगळे एक दुसर्यापासून थोड्याच अंतरावर राहून गज, गवाक्ष, गवय, शरभ, गंधमादन, मैंद, द्विविद्, हनुमान्, जाम्बवान् , युवराज अंगद तसेच वनवासी वानर तार- हे दक्षिण दिशेच्या देशांमध्ये, जे पर्वत मालांनी घेरलेले होते. सीतेचा शोध करू लागले. शोधता शोधता तेथे त्यांना एक गुहा दिसून आली, जिचे द्वार उघडे होते. ॥५-७॥
|
दुर्गमृक्षबिलं नाम दानवेनाभिरक्षितम् । क्षुत्पिपासापरीतास्तु श्रांतास्तुश्च सलिलार्थिनः ॥ ८ ॥
|
तिच्यात प्रवेश करणे फार कठीण होते. ती गुहा ऋक्षबिल नामाने विख्यात होती आणि एक दानव तिचे रक्षण करीत होता. सर्व वानर भूक-तहानेने त्रस्त झाले होते. ते खूप थकले होते आणि पाणी पिऊ इच्छित होते. ॥८॥
|
अवकीर्णं लतावृक्षैः ददृशुस्ते महाबिलम् । ततः क्रौञ्चाश्च हंसाश्च सारसाश्चापि निष्क्रमन् ॥ ९ ॥ जलार्द्राश्चक्रवाकाश्च रक्ताङ्गाः पद्मरेणुभिः ।
|
म्हणून लता आणि वृक्षांनी आच्छादित असलेल्या त्या विशाल गुहेकडे ते पाहू लागले. इतक्यातच आंतून क्रौंच, हंस, सारस तसेच जलाने भिजलेले चक्रवाक पक्षी, ज्यांचे अंग कमलांच्या परागांनी रक्तवर्णाचे झाले होते, बाहेर निघाले. ॥९ १/२॥
|
ततस्तद् बिलमासाद्य सुगंधि दुरतिक्रमम् ॥ १० ॥ विस्मयव्यग्रमनसो बभूवुर्वानरर्षभाः । सञ्जातपरिशङ्कासस्ते तद् बिलं प्लवगोत्तमाः ॥ ११ ॥
|
तेव्हा त्या सुगंधित आणि दुर्लंघ्य गुहेच्या जवळ जाऊन त्या सर्व श्रेष्ठ वानरांचे मन आश्चर्यचकीत झाले. त्या बिळाच्या आत त्यांना जल असल्याचा संशय आला. ॥१०-११॥
|
अभ्यपद्यंत संहृष्टाः तेजोवंतो महाबलाः । नानासत्त्वसमाकीर्णं दैत्येंद्रनिलयोपमम् ॥ १२ ॥ दुर्दर्शमिव घोरं च दुर्विगाह्यं च सर्वशः ।
|
ते महाबली आणि तेजस्वी वानर अत्यंत हर्षाने त्या गुहेजवळ आले जी नाना प्रकारच्या जंतुनी भरलेली होती, तसेच दैत्यराजांच्या निवास स्थानासमान वा पाताळासमान भयंकर प्रतीत होत होती. ती इतकी भयंकर होती की तिच्याकडे पहाणेही कठीण वाटत होते. तिच्या आत घुसणे सर्वथा कष्टसाध्य होते. ॥१२ १/२॥
|
ततः पर्वतकूटाभो हनुमान् मारुतात्मजः ॥ १३ ॥ अब्रवीतद् वानरान् घोरान् कांतारवनकोविदः ।
|
त्यावेळी पर्वताच्या शिखरासमान प्रतीत होणारे पवनपुत्र हनुमान् जे दुर्धर वनाचे ज्ञाते होते त्या घोर वानरांना म्हणाले - ॥१३ १/२॥
|
गिरिजालावृतान् देशान् मार्गित्वा दक्षिणां दिशम् ॥ १४ ॥
वयं सर्वे परिश्रांता न च पश्याम मैथिलीम् ।
|
’बंधुंनो ! दक्षिण दिशेकडील देश प्रायः पर्वतामालांनी घेरलेले आहेत. यात मैथिली सीतेचा शोध घेता घेता आम्ही लोक खूप थकून गेलो आहोत, परंतु कोठेही आपल्याला तिचे दर्शन झाले नाही. ॥१४ १/२॥
|
अस्माच्चापि बिलाद्धंसाः क्रौञ्चाश्च सह सारसैः ॥ १५ ॥ जलार्द्राश्चक्रवाकाश्च निष्पतंति स्म सर्वशः । नूनं सलिलवानत्र कूपो वा यदि वा ह्रदः ॥ १६ ॥ तथा चेमे बिलद्वारे स्निग्धास्तिष्ठंति पादपाः ।
|
’समोरच्या या गुहेतून हंस, क्रौंच, सारस आणि जलानी भिजलेले चक्रवाक बाहेर येत आहेत. म्हणून निश्चितच हिच्यामध्ये पाण्याची विहीर किंवा कोणतातरी जलाशय असला पाहिजे, म्हणून तर या गुहेच्या द्वारवर्ती वृक्ष हिरवेगार आहेत.’ ॥१५-१६ १/२॥
|
इत्युक्त्वा तद् बिलं सर्वे विविशुस्तिमिरावृतम् ॥ १७ ॥ अचंद्रसूर्यं हरयो ददृशू रोमहर्षणम् ।
|
हनुमानांनी असे म्हटल्यावर ते सर्व वानर अंधकाराने भरलेल्या गुहेमध्ये जेथे चंद्रमा अथवा सूर्याचे किरणही पोहोचत नव्हते, घुसून गेले. आत जाऊन त्यांनी पाहिले की ती गुहा अंगावर काटे आणणारी होती. ॥१७ १/२॥
|
निशाम्य तस्मात् सिंहांश्च तांस्तांश्च मृगपक्षिणः ॥ १८ ॥ प्रविष्टा हरिशार्दूला बिलं तिमिरसंवृतम् ।
|
त्या बिळातून निघत असलेल्या सिंह, मृग आणि पक्ष्यांना पाहून ते श्रेष्ठ वानर अंधाकाराने आच्छादित झालेल्या त्या गुफेमध्ये प्रवेश करू लागले. ॥१८ १/२॥
|
न तेषां सज्जते चक्षुः न तेजो न पराक्रमः ॥ १९ ॥ वायोरिव गतिस्तेषां दृष्टिस्तमसि वर्तते ।
|
त्यांची दृष्टी कुठे अडखळत नव्हती. त्यांचा तेज आणि पराक्रमही अवरूद्ध होत नव्हता. त्यांची गति वायुसमान होती. अंधकारामध्येही त्यांची दृष्टी काम करीत होती. ॥१९ १/२॥
|
ते प्रविष्टास्तु वेगेन तद् बिलं कपिकुञ्जराः ॥ २० ॥ प्रकाशमभिरामं च ददृशुर्देशमुत्तमम् ।
|
ते श्रेष्ठ वानर त्या बिळात वेगपूर्वक घुसले. आंत जाऊन त्यांनी पाहिले, ते स्थान फारच उत्तम, प्रकाशमान आणि मनोहर होते. ॥२० १/२॥
|
ततस्तस्मिन् बिले दुर्गे नानापादपसंकुले ॥ २१ ॥ अन्योन्यं संपरष्वज्य जग्मुर्योजनमंतरम् ।
|
नाना प्रकारच्या वृक्षांनी भरलेल्या त्या भयंकर गुहेत ते एक योजनपर्यंत एक दुसर्याला धरून गेले. ॥२१ १/२॥
|
ते नष्टसंज्ञास्तृषिताः संभ्रांताः सलिलार्थिनः ॥ २२ ॥ परिपेतुर्बिले तस्मिन् कञ्चित् कालमतंद्रिताः ।
|
तहानेमुळे त्यांची चेतना जणु लुप्त झाली होती. ते जल पिण्यासाठी उत्सुक होऊन घाबरे झाले होते आणि काही काळपर्यंत आलस्यरहित होऊन त्या बिळांत निरंतर पुढे चालत राहिले. ॥२२ १/२॥
|
ते कृशा दीनवदनाः परिश्रांताः प्लवंगमाः ॥ २३ ॥ आलोकं ददृशुर्वीरा निराशा जीविते तदा ।
|
ते वानरवीर जेव्हा दुर्बल, खिन्न आणि श्रांत होऊन जीवनासंबंधी निराश झाले; तेव्हा त्यांना तेथे प्रकाश दिसून आला. ॥२३ १/२॥
|
ततस्तं देशमागम्य सौम्यं वितिमिरं वनम् ॥ २४ ॥ ददृशुः काञ्चनान् वृक्षान् दीप्तवैश्वानरप्रभान् ।
|
त्यानंतर त्या अंधकारातून प्रकाशपूर्ण देशात जाऊन त्या सौम्य वानरांनी तेथे अंधकाररहित वन पाहिले, जेथील सर्व वृक्ष सुवर्णमय होते आणि त्यांच्यापासून अग्निप्रमाणे प्रभा निघत होती. ॥२४ १/२॥
|
सालांस्तालांश्चमालांश्च पुन्नागान् वञ्जुलान् धवान् ॥ २५ ॥ चंपकान् नागवृक्षांश्च कर्णिकारांश्च पुष्पितान् ।
|
’साल, ताल, तमाल, नागकेसर, अशोक, धव, चंपा, नागवृक्ष आणि कण्हेर - हे सर्व वृक्ष फुलांनी लगडलेले होते. ॥२५ १/२॥
|
स्तबकैः काञ्चनैश्चित्रै रक्तैः किसलयैस्तथा ॥ २६ ॥ आपीडैश्च लताभिश्च हेमाभरणभूषितान् ।
|
विचित्र सुवर्णमय गुच्छ आणि लाल-लाल पल्लव जणु त्या वृक्षांचे मुकुट होते. त्यांना लता चिकटलेल्या होत्या आणि ते आपल्या फलस्वरूप सुवर्णमय आभूषणांनी विभूषित होते. ॥२६ १/२॥
|
तरुणादित्यसंकाशान् वैदूर्यकृतवेदिकान् ॥ २७ ॥ विभ्राजमानान् वपुषा पादपांश्च हिरण्मयान् ।
|
ते दिसण्यात प्रातःकालीन सूर्याप्रमाणे भासत होते. त्यांच्या खाली वैडूर्य मण्यांनी वेदी बनविलेली होती. ते सुवर्णमय वृक्ष आपल्या दीप्तिमान् स्वरूपांनीच प्रकाशित होत होते. ॥२७ १/२॥
|
नीलवैडूर्यवर्णाश्च पद्मिनीः पतगैर्वृताः ॥ २८ ॥
महद्भिः काञ्चनैः वृक्षैः वृता बालार्कसंनिभैः । जातरूपमयैर्मत्स्यैः महद्भिश्चाथ पंकजैः ॥ २९ ॥ नलिनीस्तत्र ददृशुः प्रसन्नसलिलायुताः ।
|
तेथे नील वैडूर्य मण्यासारखी कांति असणार्या पद्मलता दिसून येत होत्या ज्या पक्ष्यांनी आवृत्त होत्या. काही अशी सरोवरे दिसली जी बाल-सूर्यासारख्या आभा असलेल्या विशाल कांचन वृक्षांनी घेरलेली होती. त्यांच्यात सोनेरी रंगाचे मोठ मोठे मत्स्य शोभून दिसत होते. ती सरोवरे सुवर्णमय कमलांनी सुशोभित तसेच स्वच्छ जलांनी भरलेली होती. ॥२८-२९ १/२॥
|
काञ्चनानि विमानानि राजतानि तथैव च ॥ ३० ॥ तपनीयगवाक्षाणि मुक्ताजालावृतानि च । हैमराजतभौमानि वैडूर्यमणिमंति च ॥ ३१ ॥ ददृशुस्तत्र हरयो गृहमुख्यानि सर्वशः ।
|
वानरांनी तिकडे सर्व बाजूस सोने-चांदी यांनी बनविलेली बरीचशी श्रेष्ठ भुवने पाहिली. त्या भवनातील खिडक्या मोत्यांच्या जाळ्यांनी झाकलेल्या होत्या. त्या भवनात सोन्याचे कठडे लावलेले होते. सोनेचांदीचीच विमानेही होती. काही घरे सोन्याची बनविलेली होती तर काही चांदीची. कित्येक गृहे तर पार्थिव वस्तूंची (विटा, दगड, लाकूड आदिची) निर्माण केली होती. त्यात वैडूर्यमणी जडविलेले होते. ॥३०-३१ १/२॥
|
पुष्पितान् फलिनो वृक्षान् प्रवालमणिसंनिभान् ॥ ३२ ॥ काञ्चनभ्रमरांश्चैव मधूनि च समंततः । मणिकाञ्चनचित्राणि शयनान्यासनानि च ॥ ३३ ॥ विविधानि विशालानि ददृशुस्ते समंततः । हैमराजतकांस्यानां भाजनानां च सञ्चयान् ॥ ३४ ॥ अगरूणां च पानानि मधूनि रसवंति च । शुचीन्यभ्यवहाराणि मूलानि च फलानि च ॥ ३५ ॥ महार्हाणि च यानानि मधूनि रसवंति च । दिव्यानांमबराणां च महार्हाणां च सञ्चयान् ॥ ३६ ॥
कंबलानां च चित्राणां अजिनानां च सञ्चयान् । तत्र तत्र च विन्यस्तान् दीप्तान् वैश्वानरप्रभान् ॥ ३७ ॥ ददृशुर्वानराः शुभ्रान् जातरूपस्य सञ्चयान् ।
|
’तेथील वृक्षांना फुले फळे लागलेली होती. ते वृक्ष प्रवाळ आणि मण्यांप्रमाणे चमकदार होते. त्यांच्यावर सोनेरी रंगाचे भुंगे गुंजारव करीत होते. तेथील घरांमध्ये सर्व बाजूस मधु सांठविलेला होता. मणि आणि सुवर्ण जडित विचित्र पलंग तसेच आसने सर्वत्र सजवून ठेवलेली होती; जी विविध प्रकारची आणि विशाल होती. वानरांनी त्यांनाही पाहिले. तेथे ढीगच्या ढीग सोने, चांदी आणि काशाची पात्रे ठेवली गेली होती. अगुरू तसेच दिव्य चंदनाच्या राशी सुरक्षित ठेवलेल्या होत्या. पवित्र भोजनाचे सामान तसेच फळे-मुळेही विद्यमान होती. बहुमूल्य वाहने, सरस मधु, महामूल्यवान् दिव्य वस्त्रांचे ढीग, विचित्र कांबळी (शाली) तसेच गालिच्यांच्या राशी आणि मृगचर्मांचे समूह जेथे-तेथे ठेवलेले होते. ते सर्व अग्निसमान प्रभेने उद्दीप्त होत होते. वानरांनी तेथे चमकणार्या सुवर्णाचे ढीगही पाहिले. ॥३२-३७ १/२॥
|
तत्र तत्र विचिन्वंतो बिले तत्र महाप्रभाः ॥ ३८ ॥ ददृशुर्वानराः शूराः स्त्रियं काञ्चिददूरतः । तां चते ददृशुस्तत्र चीरकृष्णाजिनांबराम् ॥ ३९ ॥ तापसीं नियताहारां ज्वलंतीमिव तेजसा । विस्मिता हरयस्तत्र व्यवातिष्ठंत सर्वशः । पप्रच्छ हनुमांस्तत्र कासि त्वं कस्य वा बिलम् ॥ ४० ॥
|
त्या गुहेमध्ये इकडे तिकडे शोध करीत असता त्या महातेजस्वी शूरवीर वानरांनी थोड्याशाच अंतरावर कुणा स्त्रीला पाहिले. जी वल्कले आणि काळे मृगचर्म धारण करून नियमित आहार करीत तपस्येमध्ये संलग्न होती आणि आपल्या तेजाने प्रकाशित झाली होती. वानरांनी तेथे तिला अत्यंत लक्षपूर्वक पाहिले आणि आश्चर्यचकीत होऊन ते सर्व बाजूस उभे राहिले. त्या समयी हनुमानांनी तिला विचारले - ’देवी ! तू कोण आहेस आणि ही कोणाची गुहा आहे ?’ ॥३८-४०॥
|
ततो हनूमान् गिरिसंनिकाशः कृताञ्जलिस्तामभिवाद्य वृद्धाम् । पप्रच्छ का त्वं भवनं बिलं च रत्ना्नि हेमानि वदस्व कस्य ॥ ४१ ॥
|
पर्वतासमान विशालकाय हनुमानांनी हात जोडून त्या वृद्ध तपस्विनीला प्रणाम केला आणि विचारले - ’देवी ! तू कोण आहेस ? ही गुहा, हे भवन तसेच ही रत्ने कोणाची आहेत ? हे सर्व तू आम्हांला सांग.’ ॥४१॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे पञ्चाशः सर्गः ॥ ५० ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा पन्नासावा सर्ग पूरा झाला. ॥५०॥
|