ब्रह्मणः कथनेन वसिष्ठस्य वरुणरेतसि समावेशो वरुणेनोर्वशीसमीपे एकस्मिन् कलशे स्ववीर्यस्याधानं मित्रशापेनोर्वश्या भूतले पुरूरवसः पार्श्वे स्थित्वा पुत्रस्योत्पादनम् -
|
ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून वसिष्ठांचा वरुणाच्या वीर्यात आवेश, वरुणाने उर्वशी समीप एका कुम्भात आपले वीर्य ठेवणे तसेच मित्राच्या शापाने उर्वशीने भूतलावर राजा पुरुरव्यांच्या जवळ राहून पुत्र उत्पन्न करणे -
|
रामस्य भाषितं श्रुत्वा लक्ष्मणः परवीरहा । उवाच प्राञ्जलिर्भूत्वा राघवं दीप्ततेजसम् ॥ १ ॥
|
श्रीरामांच्या मुखाने सांगितली गेलेली ही कथा ऐकून शत्रूवीरांचा संहार करणारे लक्ष्मण उद्दीप्त तेज असणार्या राघवांना हात जोडून म्हणाले - ॥१॥
|
निक्षिप्य देहौ काकुत्स्य कथं तौ द्विजपार्थिवौ । पुनर्देहेन संयोगं जग्मतुर्देवसम्मतौ ॥ २ ॥
|
काकुत्स्थ ! ते ब्रह्मर्षि आणि ते भूपाल दोघेही देवतांनाही - सन्मानपात्र होते. त्यांनी आपल्या शरीराचा त्याग करून परत नूतन शरीर कसे धारण केले ? ॥२॥
|
लक्ष्मणेनैवमुक्तस्तु राम इक्ष्वाकुनन्दनः । प्रत्युवाच महातेजा लक्ष्मणं पुरुषर्षभः ॥ ३ ॥
|
लक्ष्मणांनी याप्रकारे विचारल्यावर इक्ष्वाकुकुलनंदन महातेजस्वी पुरुषश्रेष्ठ श्रीरामांनी त्यांना या प्रकारे म्हटले - ॥३॥
|
तौ परस्परशापेन देहामुत्सृज्य धार्मिकौ । अभूतां नृपविप्रर्षी वायुभूतौ तपोधनौ ॥ ४ ॥
|
सौमित्रा ! एक-दुसर्याच्या शापाने देह त्याग केल्यावर ते तपोधन धर्मात्मा राजर्षि आणि ब्रह्मर्षि वायुरूप झाले. ॥४॥
|
अशरीरः शरीरस्य कृतेऽन्यस्य महामुनिः । वसिष्ठः सुमहातेजा जगाम पितुरन्तिकम् ॥ ५ ॥
|
महातेजस्वी महामुनि वसिष्ठ शरीररहित झाल्यावर दुसर्या शरीराच्या प्राप्तिसाठी आपले पिता ब्रह्मदेवांकडे गेले. ॥५॥
|
सोऽभिवाद्य ततः पादौ देवदेवस्य धर्मवित् । पितामहमथोवाच वायुभूत इदं वचः ॥ ६ ॥
|
धर्माचे ज्ञाते वायुरूप वसिष्ठांनी देवाधिदेव ब्रह्मदेवांच्या चरणी प्रणाम करून त्या पितामहांना याप्रकारे म्हटले - ॥६॥
|
भगवन् निमिशापेन विदेहत्वमुपागमम् । लोकनाथ महादेव वायुभूतोऽहमण्डज ॥ ७ ॥
|
ब्रह्माण्ड कमण्डलूपासून प्रकट झालेल्या देवाधिदेव महादेवा ! भगवन् ! मी राजा निमिच्या शापाने देहहीन झालो आहे, म्हणून वायुरूपात रहात आहे. ॥७॥
|
सर्वेषां देहहीनानां महद् दुखं भविष्यति । लुप्यन्ते सर्वकार्यणि हीनदेहस्य वै प्रभो ॥ ८ ॥
देहस्यान्यस्य सद्भावे प्रसादं कर्तुमर्हसि ।
|
समस्त देहहीनांना महान् दुःख होत असते आणि होत राहील, कारण देहहीन प्राण्याची सर्व कार्ये लुप्त होऊन जातात, म्हणून दुसर्या शरीराच्या प्राप्तिसाठी आपण माझ्यावर कृपा करावी. ॥८ १/२॥
|
तमुवाच ततो ब्रह्मा स्वयम्भूरमितप्रभः ॥ ९ ॥
मित्रावरुणजं तेज आविश त्वं महायशः । अयोनिजस्त्वं भविता तत्रापि द्विजसत्तम । धर्मेण महता युक्तः पुनरेष्यसि मे वशम् ॥ १० ॥
|
तेव्हा अमित तेजस्वी स्वयंभू ब्रह्मदेवांनी त्यांना म्हटले - महायशस्वी द्विजश्रेष्ठ ! तू मित्र आणि वरूणाच्या सोडलेल्या तेजात (वीर्यात) प्रविष्ट होऊन जा. तेथे गेल्यावरही तू अयोनिज रूपानेच उत्पन्न होशील आणि महान् धर्माने युक्त होऊन पुत्ररूपाने मला वश होऊन जाशील. (माझा पुत्र असल्याने तुला पूर्ववत् प्रजापतिचे पद प्राप्त होईल.) ॥९-१०॥
|
एवमुक्तस्तु देवेन चाभिवाद्य प्रदक्षिणम् । कृत्वा पितामहं तूर्णं प्रययौ वरुणालयम् ॥ ११ ॥
|
ब्रह्मदेवांनी असे म्हटल्यावर त्यांच्या चरणी प्रणाम करून आणि त्यांची परिक्रमा करून वायुरूप वसिष्ठ वरुणलोकास निघून गेले. ॥११॥
|
तमेव कालं मित्रोऽपि वरुणत्वमकारयत् । क्षीरोदेन सहोपेतः पूज्यमानः सुरेश्वरैः ॥ १२ ॥
|
त्याच काळात मित्र देवताही वरुणाच्या अधिकाराचे पालन करीत होते. ते वरुणाबरोबर राहून समस्त देवेश्वरांकडून पूजित होत होते. ॥१२॥
|
एतस्मिन्नेव काले तु उर्वशी परमाप्सराः । यदृच्छया तमुद्देशं आगता सखिभिर्वृता ॥ १३ ॥
|
त्याच समयी अप्सरांमध्ये श्रेष्ठ उर्वशी सख्यांनी घेरलेली अकस्मात् त्या स्थळी आली. ॥१३॥
|
तां दृष्ट्वा रूपसम्पन्नां क्रीडन्तीं वरुणालये । आविशत्परमो हर्षो वरुणं चोर्वशीकृते ॥ १४ ॥
|
ती परम सुंदर अप्सरा क्षीरसागरात नहातांना आणि जलक्रीडा करतांना पाहून वरुणांच्या मनात उर्वशीसाठी परम मोह प्रकट झाला. ॥१४॥
|
स तां पद्मपलाशाक्षीं पूर्णचन्द्रनिभाननाम् । वरुणो वरयामास मैथुनायाप्सरोवराम् ॥ १५ ॥
|
त्यांनी प्रफुल्ल कमलासारखे नेत्र आणि पूर्ण चंद्रम्यासारखे मनोहर मुख असलेल्या त्या सुंदर अप्सरेला समागमासाठी आमंत्रित केले. ॥१५॥
|
प्रत्युवाच ततः सा तु वरुणं प्राञ्जलिः स्थिता । मित्रेणाहं वृता साक्षात् पूर्वमेव सुरेश्वर ॥ १६ ॥
|
तेव्हा उर्वशी हात जोडून वरुणास म्हणाली - सुरेश्वर ! साक्षात् मित्रदेवाने पूर्वीच माझे वरण केलेले आहे. ॥१६॥
|
वरुणस्त्वब्रवीद् वाक्यं कन्दर्पशरपीडितः । इदं तेजः समुत्स्रक्ष्ये कुम्भेऽस्मिन् देवनिर्मिते ॥ १७ ॥
एवमुत्सृज्य सुश्रोणि त्वय्यहं वरवर्णिनि । कृतकामो भविष्यामि यदि नेच्छसि सङ्गमम् ॥ १८ ॥
|
हे ऐकून वरुणाने कामदेवाच्या बाणांनी पीडित होऊन म्हटले -सुंदर रूप रंग असणार्या सुश्रोणी ! जर तू माझ्याशी समागम करू इच्छित नसलीस तर मी तुझ्या समीप या देवनिर्मित कुंभामध्ये आपले हे वीर्य सोडीन आणि याप्रमाणे सोडूनच सफल मनोरथ होऊन जाईन. ॥१७-१८॥
|
तस्य तल्लोकपालस्य वरुणस्य सुभाषितम् । उर्वशी परमप्रीता श्रुत्वा वाक्यमुवाच ह ॥ १९ ॥
|
लोकनाथ वरुणाचे हे मनोहर वचन ऐकून उर्वशी प्रसन्न झाली आणि म्हणाली - ॥१९॥
|
काममेतद् भवत्वेवं हृदयं मे त्वयि स्थितम् । भावश्चाप्यधिकं तुभ्यं देहो मित्रस्य तु प्रभो ॥ २० ॥
|
प्रभो ! आपल्या इच्छेनुसार असेच होवो ! माझे हृदय विशेषतः आपल्या मध्ये अनुरक्त आहे आणि आपला अनुरागही माझ्यात अधिक आहे. म्हणून आपण माझ्या उद्देश्याने त्या कुंभात वीर्याधान करावे. या शरीरावर तर या समयी मित्राचा अधिकार होऊन चुकला आहे. ॥२०॥
|
उर्वश्या एवमुक्तस्तु रेतस्तन्महदद्भुतम् । ज्वलदग्निसमप्रख्यं तस्मिन् कुम्भे ह्यपासृजत् ॥ २१ ॥
|
उर्वशीने असे म्हटल्यावर वरुणाने प्रज्वलित अग्निसमान प्रकाशमान आपले अत्यंत अद्भुत तेज त्या कुंभात घातले. ॥२१॥
|
उर्वशी त्वगमत् तत्र मित्रो वै यत्र देवता । तां तु मित्रः सुसंक्रुद्धद्ध उर्वशीमिदमब्रवीत् ॥ २२ ॥
|
तदनंतर उर्वशी जेथे मित्रदेव विराजमान होते त्या स्थानावर गेली. त्या समयी मित्र अत्यंत कुपित होऊन त्या उर्वशीला या प्रकारे बोलले - ॥२२॥
|
मया निमन्त्रिता पूर्वं कस्मात् त्वममवसर्जिता । पतिमन्यं वृतवती किमर्थं दुष्टचारिणी ॥ २३ ॥
|
दुराचारिणी ! प्रथम मी तुला समागमासाठी आमंत्रित केले होते. तरीही कशासाठी तू माझा त्याग केलास आणि का दुसर्या पतिचे वरण केलेस ? ॥२३॥
|
अनेन दुष्कृतेन त्वं मत्क्रोधकलुषीकृता । मनुष्यलोकमास्थाय कञ्चित्कालं निवत्स्यसि ॥ २४ ॥
|
आपल्या या पापाच्या कारणाने माझ्या क्रोधाने कलुषित होऊन तू काही काळपर्यंत मनुष्यलोकात जाऊन निवास करशील. ॥२४॥
|
बुधस्य पुत्रो राजर्षिः काशीराजः पुरूरवाः । तमद्य गच्छ दुर्बुद्धे स ते भर्ता भविष्यति ॥ २५ ॥
|
दुर्बुद्धे ! बुधाचा पुत्र राजर्षि, जो काशिदेशाचा राजा आहे, त्याच्याजवळ चालती हो, तोच तुझा पति होईल. ॥२५॥
|
ततः सा शापदोषेण पुरूरवसमभ्यगात् । प्रतिष्ठाने पुरूरवं बुधस्यात्मजमौरसम् ॥ २६ ॥
|
तेव्हा त्या शाप-दोषाने दूषित होऊन ती प्रतिष्ठानपुर (प्रयाग-झांसी) मध्ये बुधाचा औरस पुत्र पुरुरवा याच्याजवळ गेली. ॥२६॥
|
तस्य जज्ञे ततः श्रीमान् आयुः पुत्रो महाबलः । नहुषो यस्य पुत्रस्तु बभूवेन्द्रसमद्युतिः ॥ २७ ॥
|
पुरुरव्याला उर्वशीच्या गर्भापासून श्रीमान् आयु नामक महाबली पुत्र झाला. ज्यांचा पुत्र इंद्रतुल्य तेजस्वी महाराज नहुष झाले. ॥२७॥
|
वज्रमुत्सृज्य वृत्राय भ्रान्तेऽथ त्रिदिवेश्वरे । शतं वर्षसहस्राणि येनेन्द्रत्वं प्रशासितम् ॥ २८ ॥
|
वृत्रासुरावर वज्राचा प्रहार करून जेव्हा देवराज इंद्र ब्रह्महत्येच्या भयाने दुःखी होऊन लपून राहिले होते तेव्हा नहुषानेच एक लाख वर्षेपर्यंत इंद्र पदावर प्रतिष्ठित होऊन त्रैलोक्याच्या राज्याचे शासन केले होते. ॥२८॥
|
सा तेन शापेन जगाम भूमिं तदोर्वशी चारुदती सुनेत्रा । बहूनि वर्षाण्यवसच्च सुभ्रूः शापक्षयादिन्द्रसदो ययौ च ॥ २९ ॥
|
मनोहर दात आणि सुंदर नेत्र असलेली उर्वशी मित्राने दिलेल्या त्या शापाने भूतलावर निघून गेली. तेथे ती सुंदरी बरेच वर्षेपर्यंत राहिली. नंतर शापाचा क्षय झाल्यावर इंद्रसभेत निघून गेली. ॥२९॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे षट्पञ्चाशः सर्गः ॥ ५६ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा छप्पन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५६॥
|