शार्दूलप्रेरणया रावणेन शुकं दूतीकृत्य तद्द्वारा सुग्रीवसविधे संदेशस्य प्रेषणम्; तत्र वानरकृता तदीया दुरवस्था; श्रीरामस्यानुग्रहेण तस्य क्लेशतो मोक्षणं सुग्रीवेण च रावणं प्रत्युत्तरदानम् -
|
शार्दूलाच्या सांगण्यावरून रावणाने शुकाला दूत बनवून सुग्रीवांजवळ संदेश धाडणे, तेथे वानरांच्या द्वारे त्याची दुर्दशा, श्रीरामांच्या कृपेने त्याचे संकटातून सुटणे आणि सुग्रीवांनी रावणासाठी उत्तर देणे -
|
ततो निविष्टां ध्वजिनीं सुग्रीवेणाभिपालिताम् । ददर्श राक्षसोऽभ्येत्य शार्दूलो नाम वीर्यवान् ॥ १ ॥
चारो राक्षसराजस्य रावणस्य दुरात्मनः । तां दृष्ट्वा सर्वतोऽव्यग्रां प्रतिगम्य स राक्षसः ॥ २ ॥
प्रविश्य लङ्कां वेगेन राजानं इदमब्रवीत् ।
|
या अवधित दुरात्मा राक्षसराज रावणाचा गुप्तचर पराक्रमी राक्षस शार्दूल याने तेथे येऊन सागर-तटावर छावणी ठोकून राहिलेल्या सुग्रीव द्वारा सुरक्षित वानरी सेनेला पाहिले. सर्व बाजूस शांतभावाने स्थित झालेली ती विशाल सेना पाहून तो राक्षस परत गेला आणि घाईने लंकापुरीत जाऊन राजा रावणास असे बोलला - ॥१-२ १/२॥
|
एष वानरऋक्षौघो लङ्कां समभिवर्तते ॥ ३ ॥
अगाधश्चाप्रमेयश्च द्वितीय इव सागरः ।
|
महाराज ! लंकेकडे वानर आणि अस्वलांचा एक जणु प्रवाहाच वाढत वाढत येत राहिला आहे. तो दुसर्या समुद्राप्रमाणे अगाध आणि असीम आहे. ॥३ १/२॥
|
पुत्रौ दशरथस्येमौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ ४ ॥
उत्तमायुधसंपन्नौ सीतायाः पदमागतौ ।
|
राजा दशरथांचे हे पुत्र दोन्ही भाऊ श्रीराम आणि लक्ष्मण फारच रूपवान् आणि श्रेष्ठ वीर आहेत. ते सीतेचा उद्धार करण्यासाठी येत आहेत. ॥४ १/२॥
|
एतौ सागरमासाद्य सन्निविष्टौ महाद्युते ॥ ५ ॥
बलं चाकाशमावृत्य सर्वतो दशयोजनम् । तत्त्वभूतं महाराज क्षिप्रं वेदितुमर्हसि ॥ ६ ॥
|
महातेजस्वी महाराज ! हे दोन्ही रघुवंशी बंधु या समयी समुद्र तटावरच येऊन थांबलेले आहेत. वानरांची ती सेना सर्व बाजूनी दहा योजना पर्यंतच्या मोकळ्या स्थानाला घेरून तेथे थांबलेली आहे. ही बिलकुल निश्चित बातमी आहे. आपण शीघ्रच या विषयात विशेष माहिती प्राप्त करून घ्यावी. ॥५-६॥
|
तव दूता महाराज क्षिप्रमर्हन्ति वेदितुम् । उपप्रदानं सान्त्वं वा भेदो वाऽत्र प्रयुज्यताम् ॥ ७ ॥
|
राक्षससम्राट ! आपले दूत शीघ्र सर्व गोष्टींचा पत्ता लावून घेण्यास योग्य आहेत म्हणून त्यांना धाडावे. तत्पश्चात् जसे उचित समजाल तसे करावे. वाटल्यास त्यांना सीता परत करा, वाटल्यास सुग्रीवाशी गोड गोड गोष्टी बोलून त्यांना आपल्या पक्षात सामील करून घ्यावे अथवा सुग्रीव आणि श्रीरामांमध्ये फूट पाडावी. ॥७॥
|
शार्दूलस्य वचः श्रुत्वा रावणो राक्षसेश्वरः । उवाच सहसा व्यग्रः संप्रधार्यार्थमात्मनः । शुकं साधु तदा रक्षो वाक्यमर्थविदां वरम् ॥ ८ ॥
|
शार्दूलाचे म्हणणे ऐकून राक्षसराज रावण एकाएकी व्यग्र झाले आणि आपल्या कर्तव्याचा निश्चय करून अर्थवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ शुक नामक राक्षसाला हे उत्तम वचन बोलले- ॥८॥
|
सुग्रीवं ब्रूहि गत्वाऽऽशु राजानं वचनान्मम । यथासंदेशमक्लीबं श्लक्ष्णया परया गिरा ॥ ९ ॥
|
दूता ! तू माझ्या सांगण्यावरून शीघ्रच वानरराज सुग्रीवापाशी जा आणि मधुर तसेच उत्तम वाणी द्वारा निर्भीकतापूर्वक त्यांना माझा हा संदेश सांग - ॥९॥
|
त्वं वै महाराजकुलप्रसूतो महाबलश्चर्क्षरजःसुतश्च । न कश्चिदर्थस्तव नास्त्यनर्थः तथापि मे भ्रातृसमो हरीश ॥ १० ॥
|
वानरराज ! आपण वानरांच्या महाराजांच्या कुळात उत्पन्न झाला आहात. आदरणीय ऋक्षराजांचे पुत्र आहात आणि स्वत:ही फार बलवान् आहात. मी आपल्याला माझ्या भावाप्रमाणे समजतो. जर माझ्याकडून आपल्याला काही लाभ झाला नसेल तरी माझ्याकडून आपली काही हानीही झालेली नाही. ॥१०॥
|
अहं यद्यहरं भार्यां राजपुत्रस्य धीमतः । किं तत्र तव सुग्रीव किष्किन्धां प्रति गम्यताम् ॥ ११ ॥
|
सुग्रीवा ! जरी मी बुद्धिमान् राजपुत्र रामाच्या स्त्रीला हरण करून आणले आहे तरी यात आपली काय हानी झाली आहे ? म्हणून आपण किष्किंधेला परत जावे. ॥११॥
|
न हीयं हरिभिर्लङ्का प्राप्तुं शक्याकथंचन । देवैरपि सगंधर्वैः किं पुनर्नरवानरैः ॥ १२ ॥
|
आमच्या या लंकेत वानरलोक कुठल्या ही प्रकारे पोहोचू शकत नाहीत. येथे देवता आणि गंधर्व यांचाही प्रवेश होणे अअसंभव आहे मग मनुष्य आणि वानरांची तर गोष्टच काय आहे ? ॥१२॥
|
स तथा राक्षसेन्द्रेण सन्दिष्टो रजनीचरः । शुको विहङ्गमो भूत्वा तूर्णमाप्लुत्य चाम्बरम् ॥ १३ ॥
|
राक्षसराज रावणाने या प्रकारे संदेश दिल्यावर त्या समयी निशाचर शुक पोपट नामक पक्ष्याचे रूप धारण करून तात्काळ आकाशात उडून निघाला. ॥१३॥
|
स गत्वा दूरमध्वानं उपर्युपरि सागरम् । संस्थितो ह्यम्बरे वाक्यं सुग्रीवमिदमब्रवीत् ॥ १४ ॥
सर्वमुक्तं यथाऽऽदिष्टं रावणेन दुरात्मना ।
|
समुद्राच्या वरून वरूनच फार दूरचा रस्ता पार करून तो सुग्रीवांजवळ जाऊन पोहोचला आणि आकाशांतच राहून त्याने दुरात्मा रावणाच्या आज्ञेनुसार त्या सर्व गोष्टी सुग्रीवास सांगितल्या. ॥१४ १/२॥
|
तत् प्रापयन्तं वचनं तूर्णमाप्लुत्य वानराः ॥ १५ ॥
प्रापद्यन्त तदा क्षिप्रं लोप्तुं हन्तुं च मुष्टिभिः ।
|
ज्या समयी तो संदेश ऐकवीत होता त्याच वेळी वानर उडी मारून तात्काळ त्याच्या जवळ जाऊन पोहोचले. त्यांची इच्छा होती की आपण लवकरच त्याचे पंख उपटून टाकू आणि याला घुस्से मारूनच ठार करू. ॥१५ १/२॥
|
स तैः प्लवंगैः प्रसभं निगृहीतो निशाचरः ॥ १६ ॥
गगनाद् भूतले चाशु परिगृह्यावतारितः ।
|
या निश्चया बरोबर सार्या वानरांनी त्या निशाचराला बलपूर्वक पकडले आणि त्याला कैद करून तात्काळ आकाशातून भूतळावर उतरविले. ॥१६ १/२॥
|
वानरैः पीड्यमानस्तु शुको वचनमब्रवीत् ॥ १७ ॥
न दूतान् घ्नन्ति काकुत्स्थ वार्यन्तां साधु वानराः । यस्तु हित्वा मतं भर्तुः स्वमतं संप्रधारयेत् । अनुक्तवादी दूतः सन् स दूतो वधमर्हति ॥ १८ ॥
|
याप्रकारे वानरांनी पीडा दिल्यावर शुक ओरडला - काकुत्स्थ राम ! राजे लोक दूताचा वध करत नाहीत म्हणून आपण या वानरांना चांगल्याप्रकारे रोखून धरा. जो स्वामींचा अभिप्राय सोडून आपले मत प्रकट करू लागतो, तो दूत न सांगितली गेलेली गोष्ट सांगितल्याबद्दल अपराधी असतो, म्हणून तोच वधासाठी योग्य असतो. ॥१७-१८॥
|
शुकस्य वचनं रामः श्रुत्वा तु परिदेवितम् । उवाच मावधिष्ठेति घ्नतः शाखामृगर्षभान् ॥ १९ ॥
|
शुकाचे वचन आणि विलाप ऐकून भगवान् श्रीरामांनी त्याला बदडून काढणार्या प्रमुख वानरांना हाका मारून म्हटले - याला मारू नका. ॥१९॥
|
स च पत्रलघुर्भूत्वा हरिभिर्दर्शितेऽभये । अन्तरिक्षे स्थितो भूत्वा पुनर्वचनमब्रवीत् ॥ २० ॥
|
या समयापर्यंत शुकाच्या पंखांचा भार काहीसा हलका झाला होता. (कारण की वानरांनी ते उपटले होते) नंतर त्यांनी अभय दिल्यावर शुक आकाशात जाऊन उभा राहिला आणि पुन्हा बोलला - ॥२०॥
|
सुग्रीव सत्त्वसंपन्न महाबलपराक्रम । किं मया खलु वक्तव्यो रावणो लोकरावणः ॥ २१ ॥
|
महान बळ आणि पराक्रमाने युक्त शक्तिशाली सुग्रीवा ! समस्त लोकांना रडविणार्या रावणाला मी आपल्या वतीने काय उत्तर दिले पाहिजे ॥२१॥
|
स एवमुक्तः प्लवगाधिपस्तदा प्लवंगमानामृषभो महाबलः । उवाच वाक्यं रजनीचरस्य चारं शुकं शुद्धमदीनसत्त्वः ॥ २२ ॥
|
शुकाने या प्रकारे विचारल्यावर त्यासमयी कपिशिरोमणी महाबली उदारचेता वानरराज सुग्रीवांनी त्या निशाचर दूताला ही स्पष्ट आणि निश्छल गोष्ट सांगितली - ॥२२॥
|
न मेऽसि मित्रं न तथानुकम्प्यो न चोपकर्तासि न मे प्रियोऽसि । अरिश्च रामस्य सहानुबंधः ततोऽसि वालीव वधार्ह वध्यः ॥ २३ ॥
|
दूता ! तू रावणास याप्रकारे सांग- वधास योग्य दशानना ! तू माझा मित्रही नाहीस, दयेलाही पात्र नाहीस, माझा उपकारी नाहीस, आणि माझ्या प्रिय व्यक्तींपैकीही कोणी नाहीस. भगवान् श्रीरामांचा शत्रु आहेस याच कारणाने आपल्या सगेसोयर्यासहित तूही वाली प्रमाणेच माझ्या साठी वध्य आहेस. ॥२३॥
|
निहन्म्यहं त्वां ससुतं सबंधुं सज्ञातिवर्गं रजनीचरेश । लङ्कां च सर्वां महता बलेन सर्वैः करिष्यामि समेत्य भस्म ॥ २४ ॥
|
निशाचरराज ! मी पुत्र, बंधु आणि कुटुंबीजनांसहित तुमचा संहार करीन आणि फार मोठ्या सेनेसह येऊन समस्त लंकापुरीला भस्म करून टाकीन. ॥२४॥
|
न मोक्ष्यसे रावण राघवस्य सुरैः सहेन्द्रैरपि मूढ गुप्तः । अन्तर्हितः सूर्यपथं गतोऽपि तथैव पातालमनुप्रविष्टः । गिरीशपादांबुज संगतो वा हतोऽसि रामेण सहानुजस्त्वम् ॥ २५ ॥
|
मूर्ख रावणा ! जरी इंद्र आदि समस्त देवता तुझे रक्षण करतील तरीही राघवाच्या हातातून आता तू जिवंत सुटू शकणार नाहीस. तू अंतर्धान होऊन जा, आकाशात निघून जा, पाताळात घुसून जा अथवा महादेवांच्या चरणारविंदांचा आश्रय घे, तरी ही आपल्या भावांसहित तू अवश्यच श्रीरामांच्या हातून मारला जाशील. ॥२५॥
|
तस्य ते त्रिषु लोकेषु न पिशाचं न राक्षसम् । त्रातारमनुपश्यामि न गंधर्वं न चासुरम् ॥ २६ ॥
|
तीन्ही लोकामध्ये मला कोणीही पिशाच्च, राक्षस, गंधर्व अथवा असुर असा दिसून येत नाही, जो तुझे रक्षण करू शकेल. ॥२६॥
|
अवधीस्त्वं जरावृद्धं गृध्रराजं जटायुषम् । किं नु ते रामसान्निध्ये सकाशे लक्ष्मणस्य वा । हृता सीता विशालाक्षी यां त्वं गृह्य न बुद्ध्यसे ॥ २७ ॥
|
चिरकालपर्यंत वृद्ध गृध्रराज जटायुला तू का मारलेस ? जर तुझ्यात खूप बळ होते तर श्रीराम आणि लक्ष्मणासमक्ष तू विशाल लोचना सीतेचे अपहरण का नाही केलेस ? तू सीतेला घेऊन येऊन आपल्या शिरावर आलेल्या विपत्तीला का समजत नाहीस ? ॥२७॥
|
महाबलं महात्मानं दुराधर्षं सुरैरपि । न बुद्ध्यसे रघुश्रेष्ठं यस्ते प्राणान् हरिष्यति ॥ २८ ॥
|
रघुकुळतिलक श्रीराम महाबली, महात्मा आणि देवतांसाठी ही दुर्जय आहेत, परंतु तू त्यांना अद्याप पर्यंत समजू शकला नाहीस. तू लपून सीतेचे हरण केले आहेस, परंतु ते सामोरे येऊन तुझ्या प्राणांचे अपहरण करतील. ॥२८॥
|
ततोऽब्रवीद् वालिसुतः अङ्गदो हरिसत्तमः । नायं दूतो महाराज चारकः प्रतिभाति मे ॥ २९ ॥
तुलितं हि बलं सर्वं अनेन तव तिष्ठता । गृह्यतां मा गमल्लङ्कां एतद्धि मम रोचते ॥ ३० ॥
|
तत्पश्चात वानरशिरोमणी वालिकुमार अंगदाने म्हटले- महाराज ! मला तर दूत नाही, कोणी गुप्तचर प्रतीत होत आहे. याने येथे उभ्या उभ्या आपल्या सार्या सेनेचा अंदाज घेतला आहे. - पूरा पूरा अंदाज प्राप्त केला आहे. म्हणून याला पकडले जावे, लंकेला जाऊ देऊ नये. मला हेच ठीक वाटते आहे. ॥२९-३०॥
|
ततो राज्ञा समादिष्टाः समुत्पत्य वलीमुखाः । जगृहुश्च बबंधुश्च विलपन्तमनाथवत् ॥ ३१ ॥
|
मग तर राजा सुग्रीवाच्या आदेशावरून वानरांनी उड्या मारून त्याला पकडले आणि बांधून टाकले. तो बिचारा अनाथासारखा विलाप करत राहिला. ॥३१॥
|
शुकस्तु वानरैश्चण्डैः तत्र तैः संप्रपीडितः । व्याक्रोशत महात्मानं रामं दशरथात्मजम् । लुप्येते मे बलात् पक्षौ भिद्येते च तथाक्षिणी ॥ ३२ ॥
यां च रात्रिं मरिष्यामि जाये रात्रिं च यामहम् । एतस्मिन्नन्तरे काले यन्मया ह्यशुभं कृतम् । सर्वं तदुपपद्येथा जह्यां चेद् यदि जीवितम् ॥ ३३ ॥
|
त्या प्रचंड वानरांपासून पीडित होऊन शुकाने दशरथनंदन महात्मा श्रीरामांना जोरजोराने हाका मारल्या आणि म्हटले - प्रभो ! बलपूर्वक माझे पंख उपटले जात आहेत आणि माझे डोळे फोडले जात आहेत. जर आज मी प्राण त्याग केला तर ज्या रात्री माझा जन्म झाला होता आणि ज्या रात्री मी मरेन, जन्म आणि मरण यांच्या या मध्यवर्ती मी जी जी पापे केली आहेत, ती सर्व आपल्यालाच लागतील. ॥३२-३३॥
|
नाघातयत् तदा रामः श्रुत्वा तत्परिदेवितम् । वानरान् अब्रवीद् रामो मुच्यतां दूत आगतः ॥ ३४ ॥
|
त्या समयी त्याचा तो विलाप ऐकून श्रीरामांनी त्याचा वध होऊ दिला नाही. त्यांनी वानरांना सांगितले - सोडून द्या ! हा दूत होऊनच आला होता. ॥३४॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे विंशः सर्गः ॥ २० ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा विसावा सर्ग पूर्ण झाला. ॥२०॥
|