दशरथपालिताया अयोध्याया उत्कर्षस्य वर्णनम् -
|
राजा दशरथ द्वारा सुरक्षित अयोध्यापुरीचे वर्णन -
|
सर्वापूर्वमियं येषामासीत् कृत्स्ना वसुंधरा ।
प्रजापतिमुपादाय नृपाणां जयशालिनाम् ॥ १ ॥
येषां स सगरो नाम सागरो येन खानितः ।
षष्टिः पुत्रसहस्राणि यं यान्तं पर्यवारयन् ॥ २ ॥
इक्ष्वाकूणामिदं तेषां राज्ञां वंशे महात्मनाम् ।
महदुत्पन्नमाख्यानं रामायणमिति श्रुतम् ॥ ३ ॥
|
पूर्वकाली प्रजापति मनुपासून आत्तापर्यंत ही सर्व पृथ्वी ज्या वंशाच्या विजयशाली नरेशांच्या अधिकारात राहिली आहे; ज्यांनी समुद्र खणून काढला होता आणि जे प्रवासात साठ हजार पुत्र घेरून चालत असत ते महाप्रतापी राजा सगर ज्या कुळात उत्पन्न झाले होते त्याच इक्ष्वाकुवंशीय महात्मा राजांच्या कुलपरंपरेमध्ये रामायण नावाने प्रसिद्ध या महान् ऐतिहासिक काव्याचे अवतरण झाले. ॥ १-३ ॥
|
तदिदं वर्तयिष्यावः सर्वं निखिलमादितः ।
धर्मकामार्थसहितं श्रोतव्यमनसूयता ॥ ४ ॥
|
आम्ही दोघे आदिपासून अंतापर्यंत या सार्या काव्याचे पूर्णरूपाने गान करू. याच्या द्वारा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष चारही पुरुषार्थांची सिद्धि होते; म्हणून आपण सर्व दोष दृष्टिचा परित्याग करून याचे श्रवण करावे. ॥ ४ ॥
|
कोशलो नाम मुदितः स्फीतो जनपदो महान् ।
निविष्टः सरयूतीरे प्रभूतधनधान्यवान् ॥ ५ ॥
|
कोशल नामक एक फार मोठे प्रसिद्ध जनपद आहे, जे शरयू नदीच्या किनार्यावर वसलेले आहे. ते प्रचुर धनधान्यांनी संपन्न, सुखी आणि समृद्धशाली आहे. ॥ ५ ॥
|
अयोध्या नाम नगरी तत्रासील्लोकविश्रुता ।
मनुना मानवेन्द्रेण या पुरी निर्मिता स्वयम् ॥ ६ ॥
|
त्या जनपदात अयोध्या नावाची एक नगरी आहे, जी समस्त लोकात विख्यात आहे. ती पुरी स्वयं महाराज मनुने बनविली आणि वसविली होती. ॥ ६ ॥
|
आयता दश च द्वे च योजनानि महापुरी ।
श्रीमती त्रीणि विस्तीर्णा सुविभक्तमहापथा ॥ ७ ॥
|
ही शोभासंपन्न महापुरी बारा योजने लांब आणि तीन योजने रूंद होती. तेथून बाहेरच्या जनपदास जाण्याचा जो विशाल राजमार्ग होता, तो उभय पार्श्वभागी विविध वृक्षवल्लींनी विभूषित असल्यामुळे सुस्पष्टतया अन्य मार्गाहून वेगळा कळून येत होता. ॥ ७ ॥
|
राजमार्गेण महता सुविभक्तेन शोभिता ।
मुक्तपुष्पावकीर्णेन जलसिक्तेन नित्यशः ॥ ८ ॥
|
सुंदर विभागपूर्ण बनविलेला तो महान राजमार्ग त्या पुरीची शोभा वाढवित होता. त्यावर फुललेली फुले विखुरली जात असत आणि प्रतिदिन त्यावर जलाचे सडे शिंपले जात असत. ॥ ८ ॥
|
तां तु राजा दशरथो महाराष्ट्रविवर्धनः ।
पुरीमावासयामास दिवि देवपतिर्यथा ॥ ९ ॥
|
ज्याप्रमाणे स्वर्गात देवराज इंद्राने अमरावती पुरी वसविली होती त्याचप्रमाणे धर्म आणि न्यायाच्या बलाने आपल्या महान राष्ट्राची वृद्धि करणार्या राजा दशरथांनी अयोध्यापुरीला पहिल्यापेक्षाही विशेष रूपाने वसविले होते. ॥ ९ ॥
|
कपाटतोरणवतीं सुविभक्तान्तरापणाम् ।
सर्वयन्त्रायुधवतीमुषितां सर्वशिल्पिभिः ॥ १० ॥
|
ती पुरी मोठमोठ्या फाटकांनी आणि तोरणांनी सुशोभित झालेली होती. तिच्यामध्ये पृथक् पृथक् बाजार होते. तेथे सर्व प्रकारची यंत्रे आणि अस्त्र शस्त्र संचित केलेली होती. त्या पुरीत सर्व कलांचे शिल्पी निवास करीत होते. ॥ १० ॥
|
सूतमागधसम्बाधां श्रीमतीमतुलप्रभाम् ।
उच्चाट्टालध्वजवतीं शतघ्नीशतसङ्कुलाम् ॥ ११ ॥
|
स्तुतिपाठ करणारे सूत आणि वंशावळीचे वर्णन करणारे मागध तेथे होते. ती पुरी सुंदर शोभेने संपन्न होती. तिच्या शोभेची कशाशीही तुलना करणे शक्य नव्हते. तेथे उंच उंच अट्टालिका (गच्ची) होत्या, ज्यांच्यावर ध्वज फडकत होते. शेकडो तोफांनी ती पुरी व्याप्त होती. ॥ ११ ॥
|
वधूनाटकसङ्घैश्च संयुक्तां सर्वतः पुरीम् ।
उद्यानाम्रवणोपेतां महतीं सालमेखलाम् ॥ १२ ॥
|
त्या पुरीमध्ये अशी बरीच नाटक मंडळे होती ज्यात केवळ स्त्रियाच नृत्य आणि अभिनय करीत असत. त्या नगरीत चारही बाजूला उद्यान आणि आमराया (आंबाच्या बागा) होत्या. लांबी रूंदीच्या दृष्टीने ती पुरी खूप विशाल होती आणि साल वृक्षांनी घेरलेली होती. ॥ १२ ॥
|
दुर्गगम्भीरपरिखां दुर्गामन्यैर्दुरासदाम् ।
वाजिवारणसम्पूर्णां गोभिरुष्ट्रैः खरैस्तथा ॥ १३ ॥
|
तिच्या चारी बाजूस खोल खंदक खणलेले होते, ज्यांच्यात प्रवेश करणे किंवा ज्यांना ओलांडणे अत्यंत कठीण होते. ती नगरी इतरांसाठी सर्वथा दुर्गम आणि दुर्जय होती. घोडे, हत्ती, गाय, बैल, ऊंट आणि गाढवे आदि उपयुक्त पशुंनी ती भरलेली होती. ॥ १३ ॥
|
सामन्तराजसङ्घैश्च बलिकर्मभिरावृताम् ।
नानादेशनिवासैश्च वणिग्भिरुपशोभिताम् ॥ १४ ॥
|
कर देणार्या सामंत नरेशांचा समुदाय तिला सदा घेरून राहात असे. विभिन्न देशातले व्यापार करणारे निवासी (वैश्य) त्या पुरीची शोभा वाढवित होते. ॥ १४ ॥
|
प्रासादै रत्नविकृतैः पर्वतैरिव शोभिताम् ।
कूटागारैश्च सम्पूर्णामिन्द्रस्येवामरावतीम् ॥ १५ ॥
|
तेथील प्रासादांची निर्मिती नाना प्रकारच्या रत्नांनी केलेली होती. ते गगनचुंबी प्रासाद पर्वताप्रमाणे भासत होते. त्यांच्यामुळे त्या पुरीला मोठी शोभा आली होती. अनेक कूटागारांनी (गुप्तगृहांनी अथवा स्त्रियांच्या क्रीडाभवनांनी) परिपूर्ण असलेली ती नगरी इंद्राच्या अमरावती प्रमाणे वाटत होती. ॥ १५ ॥
|
चित्रामष्टापदाकारां वरनारीगणायुताम् ।
सर्वरत्नसमाकीर्णां विमानगृहशोभिताम् ॥ १६ ॥
|
तिची शोभा विचित्र होती. तिच्या महालांवर सोन्याचे पाणी चढविलेले होते. (अथवा ती पुरी** द्युतफलकाच्या आकारात वसविली गेली होती). श्रेष्ठ आणि सुंदर स्त्रियांचे समूह त्या नगरीची शोभा वाढवित होते. ती सर्व प्रकारच्या रत्नांनी भरलेली आणि सात मजली प्रासादांनी सुशोभित होती. ॥ १६ ॥
|
गृहगाढामविच्छिद्रां समभूमौ निवेशिताम् ।
शालितण्डुलसम्पूर्णामिक्षुकाण्डरसोदकाम् ॥ १७ ॥
|
पुरवासी जनांच्या संख्येमुळे वस्ती इतकी दाट झाली होती की कोठेही थोडीदेखील मोकळी जागा दिसत नव्हती. ही नगरी समतल भूमीवर वसलेली होती. ती नगरी साळीच्या भाताच्या पिकांनी परिपूर्ण होती आणि तेथील जल इतके गोड व स्वादिष्ट होते की जणु उसाचा रसच होय. ॥ १७ ॥
|
दुन्दुभीभिर्मृदङ्गैश्च वीणाभिः पणवैस्तथा ।
नादितां भृशमत्यर्थं पृथिव्यां तामनुत्तमाम् ॥ १८ ॥
|
भूमंडलावरील ती सर्वोत्तम नगरी दुंदुभि, मृदंग, वीणा, पणव आदि वाद्यांच्या मधुर ध्वनीने अत्यंत गुंजत राहात असे. ॥ १८ ॥
|
विमानमिव सिद्धानां तपसाधिगतं दिवि ।
सुनिवेशितवेश्मान्तां नरोत्तमसमावृताम् ॥ १९ ॥
|
देवलोकातील तपस्येने प्राप्त झालेल्या सिद्धांच्या विमानाप्रमाणे या पुरीला भूमंडलावरील सर्वोतम स्थान प्राप्त झाले होते. तेथील सुंदर महाल अत्यंत उत्तम रीतीने बनविले आणि वसविले झाले होते. त्यांचे आतील भाग फारच सुंदर होते. अनेक श्रेष्ठ पुरुष त्या नगरीत वास करीत होते. ॥ १९ ॥
|
ये च बाणैर्न विध्यन्ति विविक्तमपरापरम् ।
शब्दवेध्यं च विततं लघुहस्ता विशारदाः ॥ २० ॥
सिंहव्याघ्रवराहाणां मत्तानां नदतां वने ।
हन्तारो निशितैः शस्त्रैर्बलाद् बाहुबलैरपि ॥ २१ ॥
तादृशानां सहस्रैस्तामभिपूर्णां महारथैः ।
पुरीमावासयामास राजा दशरथस्तदा ॥ २२ ॥
|
जो आपल्या समूहापासून दुरावून असहाय झाला आहे, ज्याला मागेपुढे कुणी नाही (अर्थात जो पिता आणि पुत्र या दोन्हीच्या विरहित आहे) आणि जो शब्दवेधी बाणद्वारा वेधण्यास योग्य आहे, अथवा जो युद्धात हरून पळून जात आहे, अशा पुरुषांवर जे लोक बाणांचा प्रहार करीत नाहीत; ज्यांचे अभ्यस्त हात शीघ्रतापूर्वक लक्ष्यवेध करण्यात समर्थ आहेत; अस्त्र-शस्त्रांच्या प्रयोगात ज्यांना कुशलता प्राप्त आहे, तसेच वनात गर्जना करणार्या मदोन्मत्त सिंह, व्याघ्र आणि डुकरांना तीक्ष्ण शस्त्रांनी तसेच भुजांच्या बळावर बलपूर्वक मारून टाकण्यास जे समर्थ आहेत अशा हजारो महारथी वीरांनी अयोध्या पुरी परिपूर्ण आहे. तिला महाराज दशरथांनी वसविले आहे आणि तिचे पालन केले आहे. ॥ २०-२२ ॥
|
तामग्निमद्भिर्गुणवद्भिरावृतां
द्विजोत्तमैर्वेदषडङ्गपारगैः ।
सहस्रदैः सत्यरतैर्महात्मभि-
र्महर्षिकल्पैर्ऋषिभिश्च केवलैः ॥ २३ ॥
|
अग्निहोत्री, शम, दम आणि उत्तम गुणांनी संपन्न, तसेच सहा अंगांसहित संपूर्ण वेदांत पारंगत विद्वान श्रेष्ठ ब्राह्मण या पुरीला सदा घेरून राहात असत. ते (राजा दशरथ) सहस्रांचे दान करणारे आणि सत्यात तत्पर राहणारे होते; अशा महर्षिकल्प महात्म्यांनी आणि ऋषींनी अयोध्यापुरी सुशोभित होती, तथा राजा दशरथ तिचे रक्षण करीत होते. ॥ २३ ॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे पञ्चमः सर्गः ॥ ५ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा पाचवा सर्ग समाप्त झाला. ॥ ५ ॥
|