श्रीरामस्य पार्श्वे देवानां आगमनं ब्रह्मणा तस्य भगवत्तायाः प्रतिपादनं स्तवनं च -
|
भगवान् श्रीरामांजवळ देवतांचे आगमन तसेच ब्रह्मदेवांच्या द्वारा त्यांच्या भगवत्तेचे प्रतिपादन तसेच स्तवन -
|
ततो हि दुर्मना रामः श्रुत्वैवं वदतां गिरः । दध्यौ मुहूर्तं धर्मात्मा बाष्पव्याकुललोचनः ।। १ ।।
|
त्यानंतर धर्मात्मा श्रीराम हाहाकार करणार्या वानर आणि राक्षसांचे बोलणे ऐकून मनातल्या मनात फार दुःखी झाले आणि डोळ्यात अश्रू आणून एक मुहूर्तपर्यंत काही विचार करत राहिले. ॥१॥
|
ततो वैश्रवणो राजा यमश्च पितृभिः सह । सहस्राक्षश्च देवेशो वरुणश्च जलेश्वरः ।। २ ।।
षडर्धनयनः श्रीमान् महादेवो वृषध्वजः । कर्ता सर्वस्य लोकस्य ब्रह्मा ब्रह्मविदां वरः ।। ३ ।।
एते सर्वे समागम्य विमानैः सूर्यसन्निभैः । आगम्य नगरीं लङ्कां अभिजग्मुश्च राघवम् ।। ४ ।।
|
याच समयी विश्रव्याचे पुत्र यक्षराज कुबेर, पितरांसहित यमराज, देवतांचे स्वामी सहस्त्र नेत्रधारी इंद्र, जलाचे अधिपति वरूण, त्रिनेत्रधारी श्रीमान् वृषभध्वज महादेव तथा संपूर्ण जगताचे स्त्रष्टा ब्रह्मवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ ब्रह्मदेव - या सर्व देवता सूर्यतुल्य विमानांच्या द्वारा लंकापुरीत येऊन राघवांजवळ गेल्या. ॥२-४॥
|
ततः सहस्ताभरणान् प्रगृह्य विपुलान् भुजान् । अब्रुवंस्त्रिदशश्रेष्ठाः राघवं प्राञ्जलिं स्थितम् ।। ५ ।।
|
भगवान् राघव त्यांच्या समोर हात जोडून उभे होते. त्या श्रेष्ठ देवता आभूषणांनी अलंकृत आपल्या विशाल भुजा उचलून त्यांना म्हणाल्या - ॥५॥
|
कर्ता सर्वस्य लोकस्य श्रेष्ठो ज्ञानविदां विभुः । उपेक्षसे कथं सीतां पतन्तीं हव्यवाहने । कथं देवगणश्रेष्ठं आत्मानं नावबुध्यसे ।। ६ ।।
|
श्रीराम ! आपण संपूर्ण विश्वाचे उत्पादक, ज्ञान्यांच्या मध्ये श्रेष्ठ आणि सर्वव्यापक आहात. मग या समयी आगीत पडलेल्या सीतेची उपेक्षा कशी काय करत आहात ? आपण सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ विष्णुच आहात. ही गोष्ट आपण समजून कसे घेत नाही. ॥६॥
|
ऋतधामा वसुः पूर्वं वसूनां त्वं प्रजापतिः । त्रयाणामपि लोकानां आदिकर्ता स्वयंप्रभुः ।। ७ ।।
|
पूर्वकाळी वास्तुंचे प्रजापति जे ऋतुधामा नामक वास्तु होते, ते आपणच होतात. तीन्ही लोकांचे आदिकर्ता आपण स्वयं प्रभुच आहात. ॥७॥
|
रुद्राणामष्टमो रुद्रः साध्यानामपि पञ्चमः । अश्विनौ चापि कर्णौ ते सूर्याचन्द्रमसौ दृशौ ।। ८ ।।
|
रूद्रामध्ये आठवे रुद्र आणि साध्यांमध्ये पाचवे साध्य ही आपणच आहात. दोन अश्विनीकुमार आपले कान आहेत आणि सूर्य तथा चंद्रमा नेत्र आहेत. ॥८॥
|
अन्ते चादौ च मध्ये च दृश्यसे च परन्तप । उपेक्षसे च वैदेहीं मानुषः पाकृतो यथा ।। ९ ।।
|
हे परंतपा देवा ! सृष्टिच्या आदि, अंत आणि मध्यांतही आपणच दिसून येत असता. मग एका साधारण मनुष्याप्रमाणे आपण सीतेची उपेक्षा का बरे करत आहात ? ॥९॥
|
इत्युक्तो लोकपालैस्तैः स्वामी लोकस्य राघवः । अब्रवीत् त्रिदशश्रेष्ठान् रामो धर्मभृतां वरः ।। १० ।।
|
त्या लोकपालांनी असे म्हटल्यावर धर्मात्म्यांमध्ये श्रेष्ठ लोकनाथ राघव श्रीरामांनी त्या श्रेष्ठ देवतांना म्हटले - ॥१०॥
|
आत्मानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजम् । सोऽहं यस्य यतश्चाहं भगवांस्तद् ब्रवीतु मे ।। ११ ।।
|
देवगणांनो ! मी तर स्वतःला मनुष्य दशरथपुत्र रामच समजतो. भगवन् ! मी जो कोण आहे आणि जेथून आलो आहे हे सर्व आपणच मला सांगावे. ॥११॥
|
इति ब्रुवाणं काकुत्स्थं ब्रह्मा ब्रह्मविदां वरः । अब्रवीच्छृणु मे वाक्यं सत्यं सत्यपराक्रम ।। १२ ।।
|
काकुत्स्थ रामांनी असे म्हटल्यावर ब्रह्मवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ ब्रह्मदेवांनी त्यांना याप्रकारे म्हटले - सत्यपराक्रमी श्रीरघुवीरा ! आपण माझे सत्यवचन ऐकावे. ॥१२॥
|
भवान् नारायणो देवः श्रीमांश्चक्रायुधः विभुः । एकशृङ्गो वराहस्त्वं भूतभव्यसपत्नजित् ।। १३ ।।
|
आपण चक्रधारी सर्व समर्थ श्रीमान् भगवान् नारायण देव आहात, एक दाढ असणारे पृथ्वीधारी वराह आहात तसेच देवतांच्या भूत आणि भावी शत्रूंना जिंकणारे आहात. ॥१३॥
|
अक्षरं ब्रह्म सत्यं च मध्ये चान्ते च राघव । लोकानां त्वं परो धर्मो विष्वक्सेनश्चतुर्भुजः ।। १४ ।।
|
रघुनंदना ! आपण अविनाशी परब्रह्म आहात. सृष्टिच्या आदि, मध्य आणि अंती सत्यरूपाने विद्यमान आहात. आपणच लोकांचे परमधर्म आहात. आपणच चतुर्भुज श्रीहरी आहात. ॥१४॥
|
शार्ङ्गधन्वा हृषीकेशः पुरुषः पुरुषोत्तमः । अजितः खड्गधृग् विष्णुः कृष्णश्चैव बृहद्बलः ।। १५ ।।
|
आपणच शार्ङ्गधन्वा, हृषीकेश, आंतर्यामी पुरुष आणि पुरुषोत्तम आहात. आपण कुणाकडूनही पराजित होत नाही. आपण नंदक नामक खङ्ग धारण करणारे विष्णु एवं महाबली कृष्ण आहात. ॥१५॥
|
सेनानीर्ग्रामणीश्च त्वं बुद्धिः सत्त्वं क्षमा दमः । प्रभवश्चाप्ययश्च त्वं उपेन्द्रो मधुसूदनः ।। १६ ।।
|
आपणच देव -सेनापति तसेच गावांचे मुख्य अथवा नेता आहात. आपणच बुद्धि, सत्त्व, क्षमा, इंद्रियनिग्रह तसेच सृष्टि एवं प्रलयाचे कारण आहात. आपणच उपेंद्र (वामन) आणि मधुसूदन आहात. ॥१६॥
|
इन्द्रकर्मा महेन्द्रस्त्वं पद्मनाभो रणान्तकृत् । शरण्यं शरणं च त्वामाहुर्दिव्या महर्षयः ।। १७ ।।
|
इंद्रालाही उत्पन्न करणारे महेंद्र आणि युद्धाचा अंत करणारे शान्तस्वरूप पद्मनाभही आपणच आहात. दिव्य महर्षिगण आपल्याला शरणदाता आणि शरणागतवत्सल म्हणतात. ॥१७॥
|
सहस्रशृंगो वेदात्मा शतशीर्षो महर्षभः । त्वं त्रयाणां हि लोकानां आदिकर्ता स्वयंप्रभुः ॥ १८ ॥
|
आपणच हजारो शाखारूप शिंग तसेच शेकडो विधिवाक्यरूप मस्तकांनी युक्त वेदरूप महावृषभ आहात. आपणच तीन्ही लोकांचे आदिकर्ता आणि स्वयंप्रभु (परम स्वतंत्र) आहात. ॥१८॥
|
सिद्धानामपि साध्यानां आश्रयश्चासि पूर्वजः । त्वं यज्ञस्त्वं वषट्कारः त्वण् ओङ्कारः परात्परः ।। १९ ।।
|
आपण सिद्धांचे आणि साध्यांचे आश्रय तसेच पूर्वज आहात. यज्ञ, वषट्कार आणि ओंकारही आपणच आहात. आपण श्रेष्ठांहूनही श्रेष्ठ परमात्मा आहात. ॥१९॥
|
प्रभवं निधनं चापि नो विदुः को भवानिति । दृश्यसे सर्वभूतेषु गोषु च ब्राह्मणेषु च ।। २० ।।
|
आपल्या आविर्भाव आणि तिरोभावाला कोणी जाणत नाही. आपण कोण आहात याचाही कुणाला पत्ता नाही आहे. समस्त प्राण्यांमध्ये श्रेष्ठ, गाईंमध्ये आणि ब्राह्मणांमध्येही आपणच दिसून येता. ॥२०॥
|
दिक्षु सर्वासु गगने पर्वतेषु नदीषु च । सहस्रचरणः श्रीमान् शतशीर्षः सहस्रदृक् ।। २१ ।।
|
समस्त दिशांमध्ये, आकाशात, पर्वतात आणि नद्यांमध्येही आपलीच सत्ता आहे. आपल्याला हजारो चरण, शेकडो मस्तके आणि हजारो नेत्र आहेत. ॥२१॥
|
त्वं धारयसि भूतानि वसुधां च सपर्वताम् । अन्ते पृथिव्याः सलिले दृश्यसे त्वं महोरगः ।। २२ ।।
|
आपणच संपूर्ण प्राण्यांना, पृथ्वीला आणि समस्त पर्वतांना धारण करता. पृथ्वीचा अंत झाल्यावरही आपणच जलावर महान् सर्प-शेषनागाच्या रूपात दिसून येता. ॥२२॥
|
त्रील्लोकान् धारयन् राम देवगन्धर्वदानवान् । अहं ते हृदयं राम जिह्वा देवी सरस्वती ।। २३ ।।
|
श्रीरामा ! आपणच तीन्ही लोक तसेच देवता, गंधर्व आणि दानवांना धारण करणारे विराट् पुरुष नारायण आहात. सर्वांच्या हृदयात रमण करणार्या परमात्मन ! मी ब्रह्मा आपले हृदय आहे आणि देवी सरस्वती आपली जिव्हा आहे. ॥२३॥
|
देवा रोमाणि गात्रेषु ब्रह्मणा निर्मिता प्रभो । निमेषस्ते स्मृता रात्रिः उन्मेषो दिवसस्तथा ।। २४ ।।
|
प्रभो ! मी ब्रह्म्याने ज्यांची सृष्टि केली आहे त्या सर्व देवता आपल्या विराट शरीरात रोम आहेत. आपले नेत्र बंद होणे रात्र आहे आणि उघडणे दिवस आहे. ॥२४॥
|
संस्कारास्तेऽभवन् वेदा नैतदस्ति त्वया विना । जगत् सर्वं शरीरं ते स्थैर्यं ते वसुधातलम् ।। २५ ।।
|
वेद आपले संस्कार आहेत. आपल्या शिवाय या जगाला अस्तित्वच नाही आहे. संपूर्ण विश्व आपले शरीर आहे. पृथ्वी आपली स्थिरता आहे. ॥२५॥
|
अग्निः कोपः प्रसादस्ते सोमः श्रीवत्सलक्षणः । त्वया लोकास्त्रयः क्रान्ताः पुरा स्वैविक्रमैस्त्रिभिः ।। २६ ।।
|
अग्नि आपला क्रोध आहे आणि चंद्रमा प्रसन्नता आहे. वक्षःस्थळावर श्रीवत्साचे चिह्न धारण करणारे भगवान् विष्णु आपणच आहात. पूर्वकाळी (वामनावताराचे वेळी) आपणच आपल्या तीन पावलांनी तीन्ही लोक व्यापून टाकले होते. ॥२६॥
|
महेन्द्रश्च कृतो राजा बलिं बद्ध्वा सुदारुणम् । सीता लक्ष्मीर्भवान् विष्णुः देवः कृष्णः प्रजापतिः ।। २७ ।।
|
आपण अत्यंत दारूण दैत्यराज बळिला बांधून इंद्राला तीन्ही लोकांचा राजा बनविले होते. सीता साक्षात् लक्ष्मी आहे आणि आपण भगवान् विष्णु आहात. आपणच सच्चिदानंद स्वरूप भगवान् श्रीकृष्ण आणि प्रजापति आहात. ॥२७॥
|
वधार्थं रावणस्येह प्रविष्टो मानुषीं तनुम् । तदिदं नस्त्वया कार्यं कृतं धर्मभृतां वर ।। २८ ।।
|
धर्मात्म्यांमध्ये श्रेष्ठ रघुवीरा ! आपण रावणाचा वध करण्यासाठीच या लोकात मनुष्य शरीरात प्रवेश केला आहे. आम्हां लोकांचे कार्य आपण संपन्न केले आहे. ॥२८॥
|
निहतो रावणो राम प्रहृष्टो दिवमाक्रम । अमोघं देव वीर्यं ते न तेऽमोघाः पराक्रमाः ।। २९ ।।
|
श्रीरामा ! आपल्या द्वारा रावण मारला गेला. आता आपण प्रसन्नतापूर्वक आपल्या दिव्य धामाला यावे. देवा ! आपले बळ अमोघ आहे. आपले पराक्रमही व्यर्थ होणारे नाहीत. ॥२९॥
|
अमोघं दर्शनं राम अमोघस्तव संस्तव । अमोघास्ते भविष्यन्ति भक्तिमन्तो नरा भुवि ।। ३० ।।
|
श्रीरामा ! आपले दर्शन अमोघ आहे. आपले स्तवनही अमोघ आहे. तसेच आपली भक्ति करणारी माणसेही या भूमण्डलात अमोघच असतील. ॥३०॥
|
ये त्वां देवं ध्रुवं भक्ताः पुराणं पुरुषोत्तमम् । प्राप्नुवन्ति सदा कामान् इह लोके परत्र च ।। ३१ ।।
|
आपण पुराण पुरुषोत्तम आहात. दिव्यरूपधारी परमात्मा आहात. जे लोक आपली भक्ती करतील ते लोक या लोकी आणि परलोकात आपले सर्व मनोरथ प्राप्त करून घेतील. ॥३१॥
|
इममार्षं स्तवं नित्यं इतिहासं पुरातनम् । ये नराः कीर्तयिष्यन्ति नास्ति तेषां पराभवः ।। ३२ ।।
|
हे परम ऋषि ब्रह्मदेवांनी केलेले दिव्य स्तोत्र तसेच पुरातन इतिहास आहे. जे लोक याचे कीर्तन करतील त्यांचा कधी पराभव होणार नाही. ॥३२॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे सप्तदशाधिकशततमः सर्गः ।। ११७ ।।
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशेसतरावा सर्ग पूरा झाला. ॥११७॥
|