॥ अद्भुत रामायणम् ॥ पञ्चमः सर्गः कौशिकादीनां वैकुण्ठगमनं तथा सीतायाः जन्मग्रहणकारणकथनम् - भरद्वाज शृणुष्वाथ सीताजन्मनि कारणम् ।
पुरा त्रेतायुगे कश्चित्कौशिको नाम वै द्विजः ॥ १ ॥ हे भारद्वाजा, सीतेच्या जन्माचे कारण ऐक. प्राचीन काळी त्रैतायुगात कौशिक नावाचा एक ब्राह्मण होता. १ वासुदेवपरो नित्यं नामगानरतः सदा ।
भोजनासनशय्यासु सदा तद्गतमानसः । उदारचरितं विष्णोर्गायमानः पुन पुनः ॥ २ ॥ तो वासुदेवपरायण असून सदैव त्याच्या नामस्मरणामधे मग्न राहात असे. बसल्यावर, जेवताना, झोपल्यावरही त्याचे मन सतत त्याच्याशीच एकरूप झालेले असे. विष्णूच्या उदार चरित्राचे तो सतत गायन करीत असे. २ विष्णुस्थलं समासाद्य हरेः क्षेत्रमनुत्तमम् ।
अगायत हरिं तत्र तालवल्गुलयान्वितम् ॥ ३ ॥ पावन अशा उत्तम तीर्थक्षेत्री येऊन तो सुंदर आणि ताललयबद्ध असे विष्णूचे चरित्रगान करीत असे. ३ मूर्च्छनामूर्च्छायोगेन श्रुतिमण्डलवेदितम् ।
भक्तियोगसमापन्नो भिक्षामश्नाति तत्र वै ॥ ४ ॥ मूर्छना (स्वरनियमन, स्वरभेद) आणि मूर्च्छा (संगीतातील स्वरप्रकार) यांच्या योगाने तो भक्तियोगी होऊन भिक्षा मागून उदरभरण करीत असे. ४ तत्रैनं गायमानं च दृष्ट्वा कञ्चिद्द्विजस्तदा ।
पद्माक्ष इति विख्यातस्तस्मै चान्नं ददौ सदा ॥ ५ ॥ त्याला इथे तसे गाताना पाहून पद्माक्ष नावाचा एक प्रसिद्ध ब्राह्मण त्याला कायम अन्न देत असे. ५ सकुटुम्बो महातेजा अश्नन्नंन्न च तस्य वै ।
कौशिकोऽपि तदा हृष्टो गायन्नास्ते हरि प्रभुम् ॥ ६ ॥ कुटुंबासह त्या अन्नाचे सेवन करताना कौशिक मोठ्या आनंदाने प्रभू हरीचे गुणगायन करीत असे. ६ शृण्वन्नास्ते स पद्माक्षः काले काले च भक्तितः ।
कालयोगेन सम्प्राप्ताः शिष्या वै कौशिकस्य च ॥ ७ ॥ प्रभुचे ते गुणगान भक्तिपूर्वक अंतःकरणाने पद्माक्ष वेळोवेळी श्रवण करीत असे. कालांतराने तो कौशिकाचा शिष्य झाला. ७ सप्तराजन्यवैश्यानां विप्राणां कुलसम्भवाः ।
ज्ञानविद्याधिका शुद्धा वासुदेवपरायणाः ॥ ८ ॥ क्षत्रिय, वैश्य आणि ब्राह्मणाच्या कुळात जन्माला आलेले असे ज्ञानी, विद्यावान आणि शुद्धाचरणी, वासुदेवभक्तीत रममाण असणाऱ्या इतर सात जणांनाही पद्माक्ष भोजन देत असे. ८ तेषामपि तथान्नाद्यं पद्माक्षः प्रददौ स्वयम् ।
शिष्यैश्च सहितो नित्यं कौशिको हृष्टमानसः ॥ ९ ॥ आपल्या शिष्यांसहित असणाऱ्या कौशिकाचे मन नेहमी प्रसन्न राहत असे. ९ विष्णुस्थले हरिं तत्र आस्ते गायन्यथाविधि ।
तत्रैव मालवो नाम वैद्यो विष्णुपरायणः ॥ १० ॥ दीपमालां हरेर्नित्यं करोति प्रीतमानसः । मालतीनाम भार्यासीत्तस्य नित्यं पतिव्रता ॥ ११ ॥ मालव नावाचा एक विष्णुभक्त वैद्यही तेथे विधीपूर्वक विष्णूचे गुणगायन करीत असे. आणि विष्णुमंदिरात मोठ्या प्रेमाने नेहमी दीपमाळा लावीत असे. मालती नावाची पतिव्रता स्त्री त्याची पत्नी होती. १०-११ गोमयेन समालिप्य हरेः क्षेत्रं समन्ततः ।
भर्त्रा सहास्ते सम्प्रीता शृण्वती गानमुत्तमम् ॥ १२ ॥ विष्णुमंदिराचा परिसर गाईच्या शेणाने सारवून आपल्या पतीसह हरिगुणगान ऐकत ऐकत ती मोठ्या आनंदाने तेथे राहात होती. १२ कुशस्थलीसमुत्पन्ना ब्राह्मणाः शंसितव्रताः ।
पञ्चाशद्वै समापन्ना हरेर्गानार्थमुत्तमा ॥ १३ ॥ नंतर एकदा कुशस्थलीमध्ये जन्मलेले उत्तम व व्रताचरणी पन्नास ब्राह्मण हरीचे गुणगान करण्यासाठी तेथे आले. १३ साधयन्तो हि कार्याणि कौशिकस्य महात्मनः ।
ज्ञानविद्यार्थतत्त्वज्ञाः शृण्वन्तो ह्यवसंस्तु ते ॥ १४ ॥ ते ज्ञानसंपन्न, विद्याभ्यासू, तत्वज्ञ महात्म्या कौशिकाच्या कार्याची पूर्ती करीत त्याचे गायन ऐकत तेथेच राहिले. १४ ख्यातमासीत्तदा तस्य गानं वै कौशिकस्य च ।
श्रुत्वा राजा समभ्येत्य कालिङ्गो वाक्यमब्रवीत् ॥ १५ ॥ त्यावेळी कौशिकाच्या गायनकलेची खूपच ख्याती झाली. तेव्हा ती ऐकून कलिंग देशाचा राजा तेथे येऊन असे म्हणाला - १५ कौशिकाद्यगणैः सार्धं गायस्वेह च मां पुनः ।
शृणुध्वं च तथा यूयं कुशस्थलजना अपि ॥ १६ ॥ 'कौशिका, आता आपल्या गणांसह तू माझे गुणगान कर. सर्व कुशस्थली वासियांनाही ते माझे गुणगान ऐकू दे.' १६ तच्छ्रुत्वा कौशिकः प्राह राजानं सान्त्वयान्गिरा ।
न जिह्वाग्रे महाराज वाणी च मम सर्वदा ॥ १७ ॥ हरेरन्यमपीन्द्रं वा स्तौति नापि न वक्ति च । एवमुक्ते च तच्छिष्या वसिष्ठो गौतमोऽरुणिः ॥ १८ ॥ ते ऐकून कौशीक नम्रपणे राजाला म्हणाला - ' महाराज, माझी वाणी हरीशिवाय इतर कोणाहीबद्दल स्तुती वाचक बोलत नाही किंवा स्तुतीही करीत नाही अगदी इंद्राची सुद्धा. १७-१८ सारस्वतस्तथा वैश्यश्चित्रमालस्तथा शिशुः ।
ऊचुस्तं पार्थिवं तत्त्वं यथा प्राह स कौशिकः ॥ ।१९ ॥ असे म्हटल्यावर त्याचे शिष्य वशिष्ठ, गौतम, अरुणी,, सारस्वत, तसेच वैश्य, चित्रमाल, शिशू यांनी कौशिकाचे बोलणे जसेच्या तसे राजाला सांगितले. १९ श्रीकराश्च तथा प्रोचुः पार्थिवं विष्णुतत्पराः ।
श्रोत्राणीमानि वृण्वन्ति हरेरन्यं न पार्थिवम् ॥ २० ॥ विष्णुभक्ती परायण श्रीकरांनीही राजाला असेच सांगितले की आमचे कान हरीच्या कीर्तिच्या गुणगानाशिवाय इतर काही ऐकत नाहीत. तेव्हा आम्ही आपले गुणगान ऐकू शकत नाही'. २० मा ते कीर्तिं वयं तस्माच्छृणुमो नैव वा स्तुतिम् ।
तच्छ्रुत्वा पार्थिवो रुष्टो गीयतामिति चाब्रवीत् ॥ ।२१ ॥ स्वभृत्यान्ब्राह्मणा ह्येते कीर्तिं शृण्वन्ति वै यथा । न शृण्वन्ति कथं तस्माद्गीयमानं समन्ततः ॥ २२ ॥ ते ऐकून राजा अतिशय रागावला व आपल्या सेवकांना त्याने आपले गुणगान करावयास सांगितले. तो पुढे म्हणाला -' हे ब्राह्मण हरीच्या कीर्तीचे गायन ऐकू शकतात मग आमचे का बरे नाही ?' २१-२२ एवमुक्तास्ततो भृत्या जगुः पार्थिवसत्तमम् ।
निरुद्धकर्णा विप्रास्ते गाने वृत्ते सुदुःखिताः ॥ २३ ॥ काष्ठशंकुभिरन्योन्यं श्रोत्राणि बिभिदुः किल । कौशिकाद्यास्तु तां ज्ञात्वा मनोवृत्तिं नृपस्य वै ॥ २४ ॥ निर्बन्धं कुरुते कस्मात्स्वगानेऽसौ नृपः स्थिरम् । इत्युक्त्वा ते सुनियता जिह्वाग्रं चिच्छिदुः स्वकम् ॥ २५ ॥ राजाने असे म्हटल्यावर सेवकांनी त्याचे गुणगान करण्यास सुरुवात केली. ते ऐकून ब्राह्मण मात्र अत्यंत दुःखी झाले, आणि त्यांनी आपले कान झाकून टाकले (कानात बोटे घातली). एकमेकांचे कानाला खिळ्यांनी छिद्रे पाडली. राजाची ही वृत्ती पाहून कौशिकादि ब्राह्मण म्हणू लागले, 'हा राजा आपने गुणगान करण्याबद्दल सेवकांवर का बरे जबरदस्ती करतो आहे ?' असे म्हणून त्यांनी आपली जिव्हाग्रे छाटून टाकली. २३-२५ ततो राजा सुसंक्रुद्धः स्वदेशात्तान्व्यवासयत् ।
आदाय वित्तं सर्वेषां ततस्ते जग्मुरुत्तराम् ॥ २६ ॥ त्यामुळे राजा अत्यंत संतापला आणि त्या ब्राह्मणांचे धन हिरावून घेऊन त्यांना देशाबाहेर हाकलून लावले. तेव्हा ते सर्व ब्राह्मण उत्तरेला निघून गेले. २६ दिशामासाद्य कालेन कालधर्मेण योजिताः ।
तानागतान्यमो दृष्ट्वा किंकर्तव्यमिति स्म ह ॥ २७ ॥ मृत्यूने (यमाने) योजना केलेले ते ब्राह्मण कालांतराने यमदिशेला येत असलेले पाहून यम 'आता आपल्याला योग्य असे काय बरे करावे लागेल ?' असा विचार करू लागला. २७ विस्मितस्तत्क्षणे विप्र ब्रह्मा प्राह सुराधिपान् ।
कौशिकादीन्द्विजानद्य वासुदेवपरायणान् ॥ २८ ॥ गानयोगेन ये नित्यं पूजयन्ति जनार्दनम् । तानादाय भद्रं वो यदि देवत्वमिच्छथ ॥ २९ ॥ त्यावेळी त्यांना विस्मित झालेले पाहून ब्रह्मा देवश्रेष्ठांना म्हणाले -'वासुदेवपरायण असलेले कौशिक आदि ब्राह्मण नेहमी गानसेवा करून जनार्दनाची नित्य आराधना करीत असतात. तर हे भद्रा जर त्यांना देवत्व हवे असेल तर त्यांना आमच्याकडे घेऊन ये.' २८-२९ इत्युक्त्वा लोकपालास्ते कौशिकेति पुनः पुनः ।
मालतीति तथा केचित्पद्माक्षेति तथापरे ॥ ३० ॥ क्रोशमानाः समभ्येत्य तानादाय विहायसा । ब्रह्मलोकं गताः शीघ्रं मुहूर्तार्द्धेन वै सुराः ॥ ३१ ॥ असे म्हटल्यावर ते लोकपाल आणि इतर काहीजण 'हे कौशीका, हे मालती, हे पद्माक्ष, अशा हाका मारू लागले आणि अशा हाका मारीत मारीत ते देव त्यांना घेऊन क्षणार्धातच आकाशमार्गाने ब्रह्मलोकी गेले. ३०-३१ कौशिकादींस्तथा दृष्ट्वा ब्रह्मा लोकपितामहः ।
प्रत्यागम्य यथान्यायं स्वागतेनाभ्यपूजयत् ॥ ३२ ॥ कौशिकासह इतरांना येत असलेले पाहून लोकपितामह ब्रह्माने त्यांचे यथायोग्य स्वागत करून त्यांची पूजा केली. ३२ ततः कोलाहलश्चाभूदतिगौरवमुल्बणम् ।
ब्रह्मणा च कृतं दृष्ट्वा देवानां द्विजसत्तम ॥ ३३ ॥ तशाप्रकारे ब्रह्मदेवाकडून त्यांचा योग्य सत्कार होत असलेला पाहून, हे ब्राह्मणश्रेष्ठा, देवांच्या मध्ये भयानक कोलाहल निर्माण झाला. ३३ हिरण्यगर्भो भगवांस्तान्निवार्य सुरोत्तमान् ।
कौशिकादींस्तदाऽऽदाय मुनिदेवैः समावृत्तः ॥ ३४ ॥ मग भगवान ब्रह्मदेवाने त्या कोलाहल करणाऱ्या देवांना शांत केले आणि कौशिक आदींना घेऊन मुनी व देवश्रेष्ठ यांसह ते वासुदेव परायण ब्रह्मदेव ताबडतोब विष्णुलोकी निघून गेले. ३४ विष्णुलोकं ययौ शीघ्रं वासुदेवपरायणः ।
तत्र नारायणो देवः श्वेतद्वीपनिवासिभिः ॥ ३५ ॥ ज्ञानयोगेश्वरैः सिद्धैर्विष्णुभक्तिपरायणैः । नारायणसमैर्दिव्यैश्चतुर्बाहुधरैः शुभैः ॥ ३६ ॥ विष्णुचिह्नसमापन्नैर्दीप्यमानैरकल्मषैः । अष्टाशीतिसहस्रैस्तु सेव्यमानो मनोजवैः ॥ ३७ ॥ अस्माभिर्नारदाद्यैश्च सनकाद्यैरकल्मषैः । भुतैर्नानाविधैश्चैव दिव्यस्त्रीभिः समन्ततः ॥ ३८ ॥ सेव्यमानोऽथ मध्ये वै सहस्रद्वारसंवृत्ते । सहस्रयोजनायामे दिव्ये मणिमये शुभे ॥ ३९ ॥ विमाने विमले चित्रे भद्रपीठासने हरिः । लोककार्यप्रसक्तानां दत्त्वा दृष्टिं समास्थितः ॥ ४० ॥ तेथे श्रीहरी हजारो दारे असलेल्या, दिव्य रत्नांनी मढवलेल्या, सहस्र योजने लांबीच्या अशा सुंदर विमानातच भद्रासनावर बसले होते. त्यांची सेवा श्वेतदीप निवासी, श्रेष्ठ ज्ञानयोगी, विष्णुभक्ती परायण, नारायण परायण, चतुर्भुज (शंख, चक्र, गदा पद्म इ.) अशा विष्णू चिन्हाने युक्त दीप्तिमान अशा हजारो( ८८ हजार) महात्म्यांनी केली होती. आमच्याप्रमाणे तसेच नारद सनकादि अशा अनेक प्रकारच्या पापरहित मानव प्राणी व दिव्य स्त्रिया यांचा त्यांच्याभोवती घोळका होता. त्यावेळी श्रीहरीची दृष्टी लोककार्यामध्ये मग्न अशा पुरुषांवर होती. ३५-४० तस्मिन्कालेऽथ भगवान्कौशिकाद्यैश्च संवृत्तः ।
आगम्य प्रणिपत्याग्रे तुष्टाव गरुडध्वजम् ॥ ४१ ॥ त्यावेळी भगवान ब्रह्मदेव कौशिक व इत्यादींसह तेथे आले आणि प्रणाम करून गरुडध्वजाची स्तुती करू लागले. ४१ ततोऽवलोक्य भगवान्हरिर्नारायणः प्रभुः ।
कौशिकेत्याह सम्प्रीत्या तान्सर्वांश्च यथाक्रमम् ॥ ४२ ॥ त्यावेळी भगवान हरीनारायणांनी त्या सर्वांना पाहिले आणि कौशिकाचे प्रति प्रेम व्यक्त करीत क्रमाक्रमाने ते सर्वांना म्हणाले -४२ जयघोषो महानासीन्माहाश्चर्ये समागते ।
ब्रह्माणमाह विश्वात्मा शृणु ब्रह्मन्यथोदितम् ॥ ४३ ॥ कौशिकस्य च ये विप्राः साध्यसाधनतत्पराः । हिताय सम्प्रवृत्ता वै कुशस्थलनिवासिनः ॥ ४४ ॥ (सगळीकडे महान आश्चर्य व्यक्त होऊन जयघोष होऊ लागला तेव्हां विश्वात्मा ब्रह्मदेवाला म्हणाले) ' हे ब्रह्मन हा वृत्तांत ऐक. हे ब्राह्मण कौशिकाच्या साध्य साधनात तत्पर आहेत आणि कुशस्थली निवासी त्यांच्या हितामध्ये तत्पर आहेत. ४३-४४ मत्कीर्तिश्रवणे युक्ता गानतत्त्वार्थकोविदाः ।
अनन्यदेवता भक्ताः साध्या देवा भवन्त्विमे ॥ ४५ ॥ गानतत्व जाणणारे असे लोक माझी किती ऐकण्यामध्ये मग्न आहेत. सर्वांना श्रेष्ठ देवभक्त आणि साध्यदेव समजले जावे, त्यांना माझ्याकडे प्रवेश मिळावा. ४५ मत्समीपे तथा ह्यस्य प्रवेशं देहि सर्वदा ।
एवमुक्त्वा पुनर्देवः कौशिकं प्राह माधवः ॥ ४६ ॥ स्वशिष्यैस्त्वं महाप्राज्ञ दिग्बलो नाम वै सदा । गणाधिपत्यमापन्नो यत्राहं तत्समास्व वै ॥ ४७ ॥ असे म्हणून माधव पुन्हा कौशिकाला म्हणाले - 'हे श्रेष्ठ बुद्धिमंता आपल्या शिष्यांसह तुझे नाव आता चहूदिशा पसरेल. तू गणाधिपती होऊन माझ्याजवळ सदा निवास कर. ४६-४७ मालतीमालवं चेति प्राह दामोदरो वचः ।
मम लोके यथाकामं भार्यया सह मालव ॥ ४८ ॥ दिव्यरूपधरः श्रीमाञ्छृण्वन्गानमिहानुगैः । आस्व नित्यं यथाकामं यावल्लोका भवन्ति वै ॥ ४९ ॥ नंतर मालती व मालव यांना दामोदर म्हणाले - 'हे बुद्धिमंता, तू आपल्या पत्नीसह माझ्या लोकात दिव्यरूप धारण करून आपल्या अनुयायांसह गान श्रवण कर. तसेच जोपर्यंत हे जग अस्तित्वात आहे तोपर्यंत तू तुझ्या इच्छेनुसार इथे वास्तव्य कर. ४८-४९ पद्माक्षमाह भनवान् धनदो भव मानद ।
धनानामीश्वरो भूत्वा विहरस्य यथासुखम् ॥ ५० ॥ नंतर ते पद्माक्षाला म्हणाले, हे मानद, तू धनद (धन देणारा) हो व आणि धनाधिपती होऊन इथे सुखाने संचार कर. ५० ब्रह्माणं च ततः प्राह कौशिकोऽभूद्गणाधिपः ।
गणाः स्तोष्यन्ति तं चाशु प्राप्तो मेऽस्ति सलोकताम् ॥ ५१ ॥ त्यानंतर ब्रह्मदेवाला म्हणाले - 'हा कौशिक गुणांचा अधिपती (अत्यंत गुणवान) होवो. इतर गणांनी त्याला संतुष्ट करावे आणि त्याला सलोकता प्राप्त व्हावी.' ५१ एते च विप्रा नियतं मम भक्ता यशस्विनः ।
श्रोत्रच्छिद्रं यथाहत्य शंकुभिर्वै परस्परम् ॥ ५२ ॥ श्रोष्यामो नैव चान्यद्वै हरेः कीर्तिं विनेति ये । महाव्रतधरा विप्रा मम भक्तिपरायणाः ॥ ५३ ॥ एते प्राप्ताश्च देवत्वं मम सान्निध्यमेव च । मालवो भार्यया सार्द्धं मत्क्षेत्रं परिगृह्य वै ॥ ५४ ॥ हे सर्व यशस्वी ब्राह्मण माझे एकनिष्ठ भक्त आहेत. त्यांनी परस्परांच्या कानांना शंकूने छिद्रे पाडून हरीच्या कीर्तिशिवाय इतर कोणाच्याही कीर्तिचे गाणे ऐकायचे नाही, अशी प्रतिज्ञा केली होती. हे ब्राह्मण माझ्या भक्तीत सतत रममाण झाले असून महाव्रत धारण करणारे आहेत. त्यांना देवत्व प्राप्त होऊन आमचे सान्निध्य प्राप्त व्हावे. आणि मानव व त्याच्या पत्नीसह त्यांनी आमचे क्षेत्र ग्रहण करावे. ५२-५४ मानमानादिभिर्नित्यमभ्यर्च्य सततं हि माम् ।
गानं शृणोति नियतो मत्कीर्तिचरितान्वितम् ॥ ५५ ॥ तो ब्राह्मण सतत माझी पूजा-अर्चा करून माझे किर्तियुक्त गुणगान ऐकतो. ५५ तेनासौ प्राप्तवाँल्लोकं मम ब्रह्मन् सनातनम् ।
पद्माक्षोऽसौ महाभागः कौशिकस्य महात्मनः ॥ ५६ ॥ हे ब्रह्मन, यामुळेच त्याला माझा सनातन लोक प्राप्त झाला आहे. ५६ धनेशत्वमवाप्तोऽसौ मम सान्निध्यमेव च ।
एवमुक्त्वा हरिस्तत्र समास्ते लोकपूजितः ॥ ५७ ॥ ततो हरिर्भक्तजनैः समावृतः सुखेन तस्थौ कनकासने शुभे । भक्तैकगम्यो निजभक्तलोकान् स लालयन्पाणिसरोरुहेण ॥ ५८ ॥ हा महात्मा कौशिकाचा पद्माक्ष नावाचा शिष्य. त्याला श्रीमंती प्राप्त होऊन आमच्याही सान्निध्याचा लाभ व्हावा. असे म्हणून सर्व लोकांनी त्याची पूजा केल्यानंतर श्रीहरी आपल्या भक्तांसह शांतपणे सुवर्णासनावर बसले आणि आपल्या वरदहस्त कमलाने लोकांना अभय देऊन त्या सर्वांचे पालन करू लागले. ५७-५८ इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये अद्भुतोत्तरकाण्डे
कौशिकादि वैकुण्ठगमनं नाम पंचमः सर्गः ॥ ५ ॥ कौशिकादि संतांचे वैकुण्ठ गमन नामक पाचवा अध्याय समाप्त. |