श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ चतुःपञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
राज्ञा नृगेण स्वपुत्राय राज्यं दत्त्वा भूमौ रुचिरं गर्तं निर्माण्य तत्र प्रविश्य शापस्योपभोगकरणम् -
राजा नृगाने एक सुंदर खड्‍डा बनवून आपल्या पुत्राला राज्य देऊन स्वयं त्यात प्रवेश करून शाप भोगणे -
रामस्य भाषितं श्रुत्वा लक्ष्मणः परमार्थवित् ।
उवाच प्राञ्जलिर्वाक्यं राघवं दीप्ततेजसम् ॥ १ ॥
श्रीरामांचे हे भाषण ऐकून परमार्थवेत्ता लक्ष्मण दोन्ही हात जोडून उद्दीप्त तेज असणार्‍या राघवांना म्हणाले - ॥१॥
अल्पापराधे काकुत्स्थ द्विजाभ्यां शाप ईदृशः ।
महान्नृगस्य राजर्षेः यमदण्ड इवापरः ॥ २ ॥
काकुत्स्थ ! त्या दोन्ही ब्राह्मणांनी थोड्‍याशाच अपराधासाठी राजर्षि नृगाला प्रति यमदण्डासमान असा महान्‌ शाप देऊन टाकला ? ॥२॥
श्रुत्वा तु पापसंयुक्तं आत्मानं पुरषर्षभ ।
किमुवाच नृगो राजा द्विजौ क्रोधसमन्वितौ ॥ ३ ॥
पुरुषश्रेष्ठ ! आपल्याला शापरूपी पापांनी संयुक्त झालेले ऐकून राजा नृगाने त्या क्रोधी ब्राह्मणांना काय म्हटले ? ॥३॥
लक्ष्मणेनैवमुक्तस्तु राघवः पुनरब्रवीत् ।
शृणु सौम्य यथा पूर्वं स राजा शापविक्षतः ॥ ४ ॥
लक्ष्मणांनी याप्रकारे विचारल्यावर राघव परत म्हणाले - सौम्य ! पूर्वी शापग्रस्त झाल्यावर राजा नृगाने जे काही सांगितले ते मी सांगत आहे, ऐक. ॥४॥
अथाध्वनि गतौ विप्रौ विज्ञाय स नृपस्तदा ।
आहूय मन्त्रिणः सर्वान् नैगमान् सपुरोधसः ॥ ५ ॥

तानुवाच नृगो राजा सर्वाश्च प्रकृतीस्तथा ।
दुःखेन सुसमाविष्टः श्रूयतां मे समाहिताः ॥ ६ ॥
जेव्हा राजा नृगाला कळले की ते दोन्ही ब्राह्मण निघून गेले आहेत आणि कुठे रस्त्यात असतील तेव्हा त्यांनी मंत्र्यांना, पुरवासी लोकांना, पुरोहितांना तसेच समस्त प्रकृतिनाही बोलावून घेऊन दुःखानी पीडित होऊन म्हटले - आपण लोकांनी सावधान होऊन माझे म्हणणे ऐकावे - ॥५-६॥
नारदः पर्वतश्चैव मम दत्त्वा महद्‌भयम् ।
गतौ त्रिभुवनं भद्रौ वायुभूतावनिन्दितौ ॥ ७ ॥
नारद आणि पर्वत - हे दोघेही कल्याणकारी आणि अनिंद्य देवर्षि माझ्याजवळ आले होते. त्या दोघा ब्राह्मणांनी दिलेल्या शापाची गोष्ट मला सांगून मला महान्‌ भय देऊन वायुसमान तीव्र गतिने ते ब्रह्मलोकाला निघून गेले. ॥७॥
कुमारोऽयं वसुर्नाम स चेहाद्याभिषिच्यताम् ।
श्वभ्रं च यत् सुखस्पर्शं क्रियतां शिल्पिभिर्मम ॥ ८ ॥
हा जो वसु नामक राजकुमार आहे, त्यास या राज्यावर अभिषिक्त केले जावे आणि कारागिरांनी माझ्यासाठी असा एक खड्‍डा तयार करावा की ज्याच्या स्पर्श सुखद असेल. ॥८॥
यत्राहं संक्षयिष्यामि शापं ब्राह्मणनिःसृतम् ।
वर्षघ्नमेकं श्वभ्रं तु हिमघ्नमपरं तथा ॥ ९ ॥

ग्रीष्मघ्नं तु सुखस्पर्शं एकं कुर्वन्तु शिल्पिनः ।
ब्राह्मणांच्या मुखातून निघालेल्या त्या शापाला तेथेच राहून मी भोगेन. एक खड्‍डा असा असावा की जो वर्षाकालच्या कष्टाचे निवारण करेल. दुसरा थंडीपासून बचाव करणारा असावा आणि शिल्पी लोकांनी तिसरा एक खड्‍डा तयार करावा जो उष्णतेचे निवारण करील आणि ज्याचा स्पर्श सुखदायक असेल. ॥९ १/२॥
फलवन्तश्च ये वृक्षाः पुष्पवत्यश्च या लताः ॥ १० ॥

विरोप्यन्तां बहुविधाः छायावन्तश्च गुल्मिनः ।
क्रियतां रमणीयं च श्वभ्राणां सर्वतोदिशम् ॥ ११ ॥

सुखमत्र वसिष्यामि यावत्कालस्य पर्ययः ।
पुष्पाणि च सुगन्धीनि क्रियतां तेषु नित्यशः ॥ १२ ॥

परिवार्य यथा मे स्युः अध्यर्धं योजनं तथा ।
जे फळ देणारे वृक्ष आहेत आणि फुले देणार्‍या लता आहेत त्या खड्‍ड्यांत त्या लावल्या जाव्यात. दाट छाया असणार्‍या अनेक वृक्षांचे तेथे आरोपण केले जावे. त्या खड्‍ड्याच्या चोहोबाजूस दीड दीड योजनापर्यंतची भूमि वेढून खूप रमणीय बनविली जावी. जो पर्यंत शापाचा कालावधि सरत नाही तोपर्यंत मी तेथेच सुखपूर्वक राहीन. त्या खड्‍ड्यात प्रतिदिन सुगंधित पुष्पे संचित केली जावीत. ॥१०-१२ १/२॥
एवं कृत्वा विधानं स संनिवेश्य वसुं तदा ॥ १३ ॥

धर्मनित्यः प्रजाः पुत्र क्षत्रधर्मेण पालय ।
अशी व्यवस्था करून राजकुमार वसुला राजसिंहासनावर बसवून राजाने त्यासमयी त्याला म्हटले -मुला ! तू प्रतिदिन धर्मपरायण राहून क्षत्रिय-धर्मास अनुसरून प्रजेचे पालन कर. ॥१३ १/२॥
प्रत्यक्षं ते यथा शापो द्विजाभ्यां मयि पातितः ॥ १४ ॥

नरश्रेष्ठ सरोषाभ्यां अपराधेऽपि तादृशे ।
दोन्ही ब्राह्मणांनी माझ्यावर ज्याप्रकारे शापद्वारा प्रहार केला आहे तो तुझ्या डोळ्यासमोर आहेच. नरश्रेष्ठ ! तसा थोड्‍याशा अपराधावरून रुष्ट होऊन त्यांनी मला शाप देऊन टाकला आहे. ॥१४ १/२॥
मा कृथास्त्वनुसंतापं मत्कृतेऽपि नरर्षभ ॥ १५ ॥

कृतान्तः कुशलः पुत्र येनास्मि व्यसनीकृतः ।
पुरुषश्रेष्ठ ! तू माझ्यासाठी संताप करू नको. मुला ! ज्याने मला व्यसनी बनविले आहे - संकटात पाडले आहे, आपल्याकडून केले गेलेले ते प्राचीन कर्मच अनुकूल-प्रतिकूल फल देण्यास समर्थ होत असते. ॥१५ १/२॥
प्राप्तव्यान्येव प्राप्नोति गन्तव्यान्येव गच्छति ॥ १६ ॥

लब्धव्यान्येव लभते दुःखानि च सुखानि च ।
पूर्वे जात्यन्तरे वत्स मा विषादं कुरुष्व ह ॥ १७ ॥
वत्सा ! पूर्वजन्मात केल्या गेलेल्या कर्मानुसार मनुष्यास त्याच गोष्टींची प्राप्ती होते, ज्या प्राप्त करण्याचा तो अधिकारी असतो. तो त्याच स्थानांवर जातो जेथे जाणे त्याच्यासाठी अनिवार्य आहे तसेच त्यास दुःख आणि सुखे उपलब्ध होतात जी त्याच्यासाठी नियत आहेत. म्हणून तू विषाद करू नको. ॥१६-१७॥
एवमुक्त्वा नृपस्तत्र सुतं राजा महायशाः ।
श्वभ्रं जगाम सुकृतं वासाय पुरुषर्षभ ॥ १८ ॥
नरश्रेष्ठ ! आपल्या पुत्राला असे सांगून महायशस्वी नरपाल राजा नृगाने आपल्याला राहाण्यासाठी सुंदर रीतिने तयार केल्या गेलेल्या त्या खड्‍ड्यामध्ये प्रवेश केला. ॥१८॥
एवं प्रविश्यैव नृपस्तदानीं
श्वभ्रं महारत्‍नविभूषितं तत् ।
सम्पादयामास तदा महात्मा
शापं द्विजाभ्यां हि रुषा विमुक्तम् ॥ १९ ॥
याप्रकारे त्या रत्‍नविभूषित महान्‌ गर्तेमध्ये प्रवेश करून त्यासमयी महात्मा राजा नृगाने ब्राह्मणांच्या द्वारा रोषपूर्वक दिल्या गेलेल्या त्या शापास भोगण्यास आरंभ केला. ॥१९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे चतुःपञ्चाशः सर्गः ॥ ५४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा चोप्पन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP