वाल्मीकितो लब्धानुज्ञस्य शत्रुघ्नस्य अयोध्यायां गत्वा श्रीरामादिभिः सह समागमः, सप्त दिनानि तत्रोषित्वा ततः पुनः मधुरां प्रति प्रस्थानं च -
|
वाल्मीकिंचा निरोप घेऊन शत्रुघ्नांचे अयोध्येत जाऊन श्रीराम आदिना भेटणे आणि सात दिवसपर्यंत तेथे राहून पुन्हा मधुपुरीला प्रस्थान करणे -
|
तं शयानं नरव्याघ्रं निद्रा नाभ्यागमत् तदा । चिन्तयानं अनेकार्थं रामगीतमनुत्तमम् ॥ १ ॥
|
झोपते समयी पुरुषसिंह शत्रुघ्न त्या उत्तम श्रीराम-चरित्र संबंधी गानाच्या विषयी अनेक प्रकारच्या गोष्टींचा विचार करीत राहिले, म्हणून रात्री त्यांना बराच वेळपर्यंत झोप आली नाही. ॥१॥
|
तस्य शब्दं सुमधुरं तन्त्रीलयसमन्वितम् । श्रुत्वा रात्रिर्जगामाशु शत्रुघ्नस्य महात्मनः ॥ २ ॥
|
वीणेच्या लयीसह त्या रामचरित गानाचे सुमधुर शब्द ऐकून महात्मा शत्रुघ्नाची उरलेली रात्र फार लवकर निघून गेली. ॥२॥
|
तस्यां निशायां व्युष्टायां कृत्वा पौर्वाह्णिकक्रमम् । उवाच प्राञ्जलिर्वाक्यं शत्रुघ्नो मुनिपुङ्गवम् ॥ ३ ॥
|
जेव्हा ती रात्र सरली आणि प्रातःकाळ आला तेव्हा पूर्वाह्न कालोचित नित्यकर्म करून शत्रुघ्नांनी हात जोडून मुनिवर वाल्मीकिंना म्हटले - ॥३॥
|
भगवन् द्रष्टुमिच्छामि राघवं रघुनन्दनम् । त्वयाऽनुज्ञातुमिच्छामि सहैभिः संशितव्रतैः ॥ ४ ॥
|
भगवन् ! आता मी रघुनंदनांचे दर्शन करू इच्छित आहे. म्हणून आपली आज्ञा झाली तर कठोर व्रताचे पालन करणार्या या सोबत्यांसह माझी अयोध्येला जाण्याची इच्छा आहे. ॥४॥
|
इत्येवंवादिनं तं तु शत्रुघ्नं शत्रुतापनम् । वाल्मीकिः सम्परिष्वज्य विससर्ज च राघवम् ॥ ५ ॥
|
याप्रकारे बोलणार्या राघव शत्रुसूदन शत्रुघ्नाला वाल्मीकिंनी हृदयाशी धरले आणि जाण्याची आज्ञा दिली. ॥५॥
|
सोऽभिवाद्य मुनिश्रेष्ठं रथमारुह्य सुप्रभम् । अयोध्यामगमत् तूर्णं राघवोत्सुकदर्शनः ॥ ६ ॥
|
शत्रुघ्न राघवांच्या दर्शनासाठी उत्सुक झालेले होते म्हणून मुनिश्रेष्ठ वाल्मीकींना प्रणाम करून ते एका सुंदर दीप्तिमान् रथावर आरूढ झाले आणि तात्काळ अयोध्येकडे निघाले. ॥६॥
|
स प्रविष्टः पुरीं रम्यां श्रीमान् इक्ष्वाकुनन्दनः । प्रविवेश महाबाहुः यत्र रामो महाद्युतिः ॥ ७ ॥
|
इक्ष्वाकुकुळाला आनंदित करणारे महाबाहु श्रीमान् शत्रुघ्न रमणीय अयोध्यापुरीत प्रवेश करून सरळ जेथे महातेजस्वी श्रीराम विराजमान होते त्या राजमहालात गेले. ॥७॥
|
स रामं मन्त्रिमध्यस्थं पूर्णचन्द्रनिभाननम् । पश्यन्नमरमध्यस्थं सहस्रनयनं यथा ॥ ८ ॥
सोऽभिवाद्य महात्मानं ज्वलन्तमिव तेजसा । उवाच प्राञ्जलिर्भूत्वा रामं सत्यपराक्रमम् ॥ ९ ॥
|
जसे सहस्त्र नेत्रधारी इंद्र देवतांच्या मध्ये बसतात त्याचप्रकारे पूर्णचंद्रासमान मनोहर मुख असणारे भगवान् श्रीराम मंत्र्यांच्या मध्यभागी विराजमान होते. शत्रुघ्नांनी आपल्या तेजाने प्रज्वलित होणार्या सत्यपराक्रमी महात्मा श्रीरामांना पाहिले, प्रणाम केला आणि हात जोडून म्हटले - ॥८-९॥
|
यदाज्ञप्तं महाराज सर्वं तत्कृतवानहम् । हतः स लवणः पापः पुरी चास्य निवेशिता ॥ १० ॥
|
महाराज ! आपण मला ज्या कामासाठी आज्ञा दिली होती, ते सर्व मी करून आलो आहे, पापी लवण मारला गेला आणि त्याची पुरीही वसली आहे. ॥१०॥
|
द्वादशैतानि वर्षांइ त्वां विना रघुनन्दन । नोत्सहेयमहं वस्तुं त्वया विरहितो नृप ॥ ११ ॥
|
रघुनंदना ! आपल्या दर्शनाशिवाय बारा वर्षे तर कशी तरी निघून गेली; परंतु नरेश्वर ! आता आणखी अधिक काळपर्यंत आपल्यापासून दूर राहण्याचे साहस माझ्यात नाही आहे. ॥११॥
|
स मे प्रसादं काकुत्स्थ कुरुष्वामितविक्रम । मातृहीनो यथा वत्सो न चिरं प्रवसाम्यहम् ॥ १२ ॥
|
अमित पराक्रमी काकुत्स्थ ! जसे लहान मूल आपल्या मातेपासून अलग राहू शकत नाही, त्याच प्रकारे मी चिरकालपर्यंत आपल्यापासून दूर राहू शकणार नाही, म्हणून आपण माझ्यावर कृपा करावी. ॥१२॥
|
एवं ब्रुवाणं शत्रुघ्नं परिष्वज्येदमब्रवीत् । मा विषादं कृथाः शूर नैतत् क्षत्रियचेष्टितम् ॥ १३ ॥
|
असे वचन बोलणार्या शत्रुघ्नाला हृदयाशी धरून श्रीरामांनी म्हटले - शूरवीर ! विषाद करू नको ! याप्रकारे कातर होणे क्षत्रियाला उचित नाही. ॥१३॥
|
नावसीदन्ति राजानो विप्रवासेषु राघव । प्रजा नः परिपाल्या हि क्षत्रधर्मेण राघव ॥ १४ ॥
|
राघवा ! राजे लोक परदेशात राहिल्यावरही दुःखी होत नाहीत. रघुवीर ! राजाने क्षत्रिय धर्मास अनुसरून प्रजेस उत्तमप्रकारे पालनपोषण करावयास पाहिजे. ॥१४॥
|
काले काले तु मां वीर अयोध्यां अवलोकितुम् । आगच्छ त्वं नरश्रेष्ठ गन्तासि च पुरं तव ॥ १५ ॥
|
नरश्रेष्ठ वीरा ! तू वरचेवर अनुकूल समयी मला भेटण्यासाठी अयोध्येला येत जा आणि आपल्या पुरीला परत जात जा. ॥१५॥
|
ममापि त्वं सुदयितः प्राणैरपि न संशयः । अवश्यं करणीयं च राज्यस्य परिपालनम् ॥ १६ ॥
|
निःसंदेह तू मला प्राणांहूनही प्रिय आहेस. परंतु राज्याचे पालन पोषण करणे हे तर आवश्यक कर्तव्य आहे. ॥१६॥
|
तस्मात्त्वं वस काकुत्स्थ सप्तरात्रं मयासह । ऊर्ध्वं गन्तासि मधुरां सभृत्यबलवाहनः ॥ १७ ॥
|
म्हणून काकुत्स्थ ! आता सात दिवस तू माझ्या बरोबर रहा आणि त्यानंतर सेवक, सेना आणि वहानांसह मधुरापुरीला निघून जा. ॥१७॥
|
रामस्यैतद् वचः श्रुत्वा धर्मयुक्तं मनोगतम् । शत्रुघ्नो दीनया वाचा बाढमित्येव चाब्रवीत् ॥ १८ ॥
|
श्रीरामांचे ते वचन धर्मयुक्त असण्याबरोबरच मनास अनुकूलही होते. ते ऐकून शत्रुघ्नांनी श्रीरामवियोगाच्या भयाने दीन वाणीद्वारा म्हटले - जशी प्रभूंची आज्ञा. ॥१८॥
|
सप्तरात्रं च काकुत्स्थो राघवस्य यथाज्ञया । उष्य तत्र महेष्वासो गमनायोपचक्रमे ॥ १९ ॥
|
राघवांच्या आज्ञेने सात दिवस अयोध्येत राहून महाधनुर्धर काकुत्स्थ शत्रुघ्न तेथून जाण्यास तयार झाले. ॥१९॥
|
आमन्त्र्य तु महात्मानं रामं सत्यपराक्रमम् । भरतं लक्ष्मणं चैव महारथमुपारुहत् ॥ २० ॥
|
सत्यपराक्रमी महात्मा श्रीराम, भरत आणि लक्ष्मणांचा निरोप घेऊन शत्रुघ्न एका विशाल रथावर आरूढ झाले. ॥२०॥
|
दूरं पद्भ्यामनुगतो लक्ष्मणेन महात्मना । भरतेन च शत्रुघ्नो जगामाशु पुरीं ततः ॥ २१ ॥
|
महात्मा लक्ष्मण आणि भरत पायीच त्यांना पोहोचविण्यासाठी बरेच दूरपर्यंत मागोमाग गेले. त्यानंतर शत्रुघ्न रथाद्वारे शीघ्रच आपल्या राजधानीकडे निघून गेले. ॥२१॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे द्विसप्ततितमः सर्गः ॥ ७२ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा बाहत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥७२॥
|