श्रीरामायण काव्यस्य उपसंहारः तस्य महिमा च -
|
रामायण काव्याचा उपसंहार आणि त्याचा महिमा -
|
एतावदेतद् आख्यानं सोत्तरं ब्रह्मपूजितम् । रामायणमिति ख्यातं मुख्यं वाल्मीकीना कृतम् ॥ १ ॥
|
(कुश आणि लव म्हणतात -) महर्षि वाल्मीकि द्वारा निर्मित हे रामायण नामक श्रेष्ठ आख्यान उत्तरकांडासहित इतकेच आहे. ब्रह्मदेवांनीही याचा आदर केला आहे. ॥१॥
|
ततः प्रतिष्ठितो विष्णुः स्वर्गलोके यथा पुरम् । येन व्याप्तमिदं सर्वं त्रैलोक्यं सचराचरम् ॥ २ ॥
|
याप्रकारे श्रीराम पूर्वीप्रमाणेच आपल्या विष्णुरूपाने परमधामात प्रतिष्ठित झाले. त्याच्या द्वारा चराचर प्राण्यांसहित हे समस्त त्रैलोक्य व्याप्त आहे. ॥२॥
|
ततो देवाः सगन्धर्वाः सिद्धाश्च परमर्षयः । नित्यं शृण्वन्ति संहृष्टाः दिव्यं रामायणं दिवि ॥ ३ ॥
|
त्या भगवंताच्या पावन चरित्राने युक्त असल्याने देवता, गंधर्व, सिद्ध आणि महर्षि सदा प्रसन्नतापूर्वक देवलोकात या रामायण काव्याचे श्रवण करतात. ॥३॥
|
इदं आख्यानमायुष्यं सौभाग्यं पापनाशनम् । रामायणं वेदसमं श्राद्धेषु श्रावयेद् बुधः ॥ ४ ॥
|
हे प्रबंधकाव्य आयुष्य तसेच सौभाग्याला वाढवते आणि पापांचा नाश करत असते. रामायण वेदांसमान आहे. विद्वान् पुरूषांनी श्राद्धात हे वाचून ऐकविले पाहिजे. ॥४॥
|
अपुत्रो लभते पुत्रं अधनो लभते धनम् । सर्वपापैः प्रमुच्येत पादमप्यस्य यः पठेत् ॥ ५ ॥
|
याच्या पाठाने पुत्रहीनाला पुत्र आणि धनहीनाला धन मिळते. जो प्रतिदिन याच्या श्लोकाच्या एका चरणाचाही पाठ करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो. ॥५॥
|
पापान्यपि च यः कुर्याद् अहन्यहनि मानवः । पठति एकमपि श्लोकं पापात् स परिमुच्यते ॥ ६ ॥
|
जो मनुष्य प्रतिदिन पाप करतो तोही जर याच्या एका श्लोकाचाही नित्य पाठ करील तर तो सार्या पापराशीपासून मुक्त होऊन जातो. ॥६॥
|
वाचकाय च दातव्यं वस्त्रं धेनु हिरण्यकम् । वाचके परितुष्टे तु तुष्टाः स्युः सर्वदेवताः ॥ ७ ॥
|
याची कथा ऐकविण्यार्या वाचकाला वस्त्र, गाय आणि सुवर्णाची दक्षिणा दिली पाहिजे. वाचक संतुष्ट झाल्यावर सर्व देवता संतुष्ट होतात. ॥७॥
|
एतद् आख्यानमायुष्यं पठन् रामायणं नरः । सपुत्रपौत्रो लोकेऽस्मिन् प्रेत्य चेह महीयते ॥ ८ ॥
|
हे रामायण नामक प्रबंध काव्य आयुष्याची वृद्धि करणारे आहे. जो मनुष्य प्रतिदिन याचा पाठ करतो त्याला या लोकात पुत्र-पौत्रांची प्राप्ती होते आणि मृत्युनंतर परलोकातही त्याचा मोठा सन्मान होतो. ॥८॥
|
रामायणं गोविसर्गे मध्याह्ने वा समाहितः । सायाह्ने वापराह्णे च वाचयन् नावसीदति ॥ ९ ॥
|
जो प्रतिदिन एकाग्रचित्त होऊन प्रातःकाळ, मध्याह्न, अपराह्न अथवा सायंकाळी रामायणाचा पाठ करतो, त्याला कधी काही दुःख होत नाही. ॥९॥
|
अयोध्याऽपि पुरी रम्या शून्या वर्षगणान् बहून् । ऋषभं प्राप्य राजानं निवासं उपयास्यति ॥ १० ॥
|
(श्री रघुनाथ परमधामास गेल्यानंतर) रमणीय अयोध्या पुरी बरीच वर्षेपर्यंत ओसाड पडून राहील. नंतर राजा ऋषभाच्या समयी ती वसविली जाईल. ॥१०॥
|
एतद् आख्यानमायुष्यं सभविष्यं सहोत्तरम् । कृतवान् प्रचेतसः पुत्रः तद् ह्माप्यन्वमन्यत ॥ ११ ॥
|
प्रचेतांचे पुत्र वाल्मीकिनी अश्वमेध यज्ञाच्या समाप्तिनंतरची कथा एवं उत्तरकांडासहित रामायण नामक हा ऐतिहासिक काव्याची निर्मिती केली आहे. ब्रह्मदेवांनीही हिचे अनुमोदन केले आहे. ॥११॥
|
अश्वमेधसहस्रस्य वाजपेयायुतस्य च । लभते श्रावणादेव सर्गस्यैकस्य मानवः ॥ १२ ॥
|
या काव्याच्या एका सर्गाच्या श्रवणमात्रे करुनही मनुष्य एक हजार अश्वमेध आणि दहा हजार वाजपेय यज्ञाचे फळ प्राप्त करू शकतो. ॥१२॥
|
प्रयागादीनि तीर्थानि गङ्गाद्याः सरितस्तथा । नैमिशादीनि अरण्यानि कुरुक्षेत्रादिकान्यपि ॥ १३ ॥
गतानि तेन लोकेऽस्मिन् येन रामायणं श्रुतम् ।
|
ज्याने या लोकात रामायणाची कथा ऐकली त्याने जणु प्रयाग आदि तीर्थे, गंगा आदि पवित्र नद्या, नैमिषारण्य आदि वने आणि कुरूक्षेत्र आदि पुण्यक्षेत्रांची यात्राच पूर्ण केली. ॥१३ १/२॥
|
हेमभारं कुरुक्षेत्रे ग्रस्ते भानौ प्रयच्छति ॥ १४ ॥
यश्च रामायणं लोके शृणोति सदृशावुभौ ।
|
जो सूर्यग्रहणाच्या समयी कुरूक्षेत्रात एक भार सुवर्णाचे दान करतो आणि जो लोकांत प्रतिदिन रामायण ऐकतो, ते दोघेही समान पुण्याचे भागी होतात. ॥१४ १/२॥
|
सम्यक् श्रद्धासमायुक्तः शृणुते राघवीं कथाम् ॥ १५ ॥
सर्वपापात् प्रमुच्येत विष्णुलोकं स गच्छति ।
|
जो उत्तम श्रद्धेने संपन्न होऊन राघवांची कथा ऐकतो तो सर्व पापांतून मुक्त होतो आणि विष्णुलोकात जातो. ॥१५ १/२॥
|
आदिकाव्यं इदं त्वार्षं पुरा वाल्मीकिना कृतम् ॥ १६ ॥
यः शृणोति सदा भक्त्या स गच्छेद् वैष्णवीं तनुम् ।
|
जो पूर्वकाळी वाल्मीकिद्वारा निर्मित या आर्षरामायण आदिकाव्याचे सदा भक्तिभावाने श्रवण करतो, तो भगवान् विष्णूंचे सारूण्य प्राप्त करतो. ॥१६ १/२॥
|
पुत्रदाराश्च वर्धन्ते सम्पदः सन्ततिस्तथा ॥ १७ ॥
सत्यमेतद् विदित्वा तु श्रोतव्यं नियतात्मभिः । गायत्र्याश्च स्वरूपं तद् रामायणं अनुत्तमम् ॥ १८ ॥
|
याच्या श्रवणाने स्त्री पुत्रांची प्राप्ति होते, धन आणि संतति वाढते. हे पूर्णतः सत्य समजून मनाला अधीन ठेवून याचे श्रवण केले पाहिजे. हे परम उत्तम रामायण काव्य गायत्रीचे स्वरूप आहे. ॥१७-१८॥
|
यः पठेत् शृणुयान्नित्यं चरितं राघवस्य ह । भक्त्या निष्कल्मषो भूत्वा दीर्घमायुरवाप्नुयात् ॥ १९ ॥
|
जो पुरूष प्रतिदिन भक्तिभावाने राघवाचे हे चरित्र ऐकतो अथवा वाचतो, तो निष्पाप होऊन दीर्घायुष्य प्राप्त करतो. ॥१९॥
|
चिन्तयेद् राघवं नित्यं श्रेयः प्राप्तुं य इच्छति । श्रावयेद् इदमाख्यानं ब्राह्मणेभ्यो दिने दिने ॥ २० ॥
|
जो कल्याण प्राप्तिची इच्छा ठेवतो त्याने नित्य निरंतर राघवांचे चिंतन केले पाहिजे. ब्राह्मणांना प्रतिदिन हे प्रबंधकाव्य ऐकविले पाहिजे. ॥२०॥
|
यस्त्विदं रघुनाथस्य चरितं सकलं पठेत् । सोऽसुक्षये विष्णुलोकं गच्छत्येव न संशयः ॥ २१ ॥
|
जो या रघुनाथ चरित्राचा पाठ पूर्ण करतो, तो प्राणांत झाल्यावर भगवान् विष्णुंच्याच धामात जातो, यात संशय नाही. ॥२१॥
|
पिता पितामहस्तस्य तथैव प्रपितामहः । तत्पिता तत्पिता चैव विष्णुं यान्ति न संशयः ॥ २२ ॥
|
इतकेच नव्हे तर त्याचे पिता, पितामह, प्रपितामह, वृद्ध प्रपितामह तसेच त्यांचेही पिता भगवान् विष्णुंना प्राप्त करतात यात संशय नाही. ॥२२॥
|
चतुर्वर्गप्रदं नित्यं चरितं राघवस्य तु । तस्माद् यत्नणवता नित्यं श्रोतव्यं परमं सदा ॥ २३ ॥
|
श्रीराघवेन्द्रांचे हे चरित्र सदा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारी पुरूषार्थांना देणारे आहे, म्हणून प्रतिदिन यत्नपूर्वक निरंतर या उत्तम काव्याचे श्रवण केले पाहिजे. ॥२३॥
|
शृण्वन् रामायणं भक्त्या यः पादं पदमेव वा । स याति ब्रह्मणः स्थानं ब्रह्मणा पूज्यते सदा ॥ २४ ॥
|
जो रामायण काव्याच्या श्लोकाचा एक चरण अथवा एका पदाचे भक्तिभावाने श्रवण करतो, तो ब्रह्मदेवांच्या धामी जातो आणि सदा त्यांच्या द्वारा पूजित होत असतो. ॥२४॥
|
एवमेतत् पुरावृत्तं आख्यानं भद्रमस्तु वः । प्रव्याहरत विस्रब्धं बलं विष्णोः प्रवर्धताम् ॥ २५ ॥
|
याप्रकारे या पुरातन आख्यानाचा आपण विश्वासपूर्वक पाठ करावा. आपले कल्याण होवो आणि भगवान् विष्णुंच्या बळाचा जय होवो. ॥२५॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे श्रीमद् वाल्मीकीये आदिकाव्ये चतुर्विंशत्सहस्रिकायां संहितायां श्रीमद् उत्तरकाण्डे एकादशोत्तरशततमः सर्गः ॥ १११ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा एकशे अकरावा सर्ग पूरा झाला. ॥१११॥
|
॥ इत्युत्तरकाण्डः समाप्तः ॥ ॥ इत्यार्षे श्रीमद् वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् रामायणं सम्पूर्णम् ॥
|
॥ उत्तरकांडं संपूर्णम् ॥ ***** महर्षि वाद्वाल्मीकीकृत श्रीरामायण महाकाव्य समाप्त *****
|