राज्ञो दशरथस्यान्त्येष्टिसंस्कारः -
|
राजा दशरथांचा अन्त्येष्टि संस्कार -
|
तमेवं शोकसंतप्तं भरतं कैकयीसुतम् ।
उवाच वदतां श्रेष्ठो वसिष्ठः श्रेष्ठवागृषिः ॥ १ ॥
|
याप्रकारे शोकाने संतप्त झालेल्या कैकेयीकुमार भरताला वक्त्यांमध्ये श्रेष्ठ असलेले महर्षि वसिष्ठ श्रेष्ठ वाणिमध्ये म्हणाले - ॥ १॥
|
अलं शोकेन भद्रं ते राजपुत्र महायशः ।
प्राप्तकालं नरपतेः कुरु संयानमुत्तमम् ॥ २ ॥
|
’महायशस्वी राजकुमार ! तुझे कल्याण होवो. हा शोक सोडून दे कारण की त्याने काहीही साध्य होणार नाही. आता समयोचित कर्तव्याकडे लक्ष दे. राजा दशरथांच्या शवाला दाहसंस्कारासाठी घेऊन जाण्यासाठी उत्तम व्यवस्था कर. ॥ २॥
|
वसिष्ठस्य वचः श्रुत्वा भरतो धरणीं गतः ।
प्रेतकृत्यानि सर्वाणि कारयामास धर्मवित् ॥ ३ ॥
|
वसिष्ठांचे हे वचन ऐकून धर्मज्ञ भरतांनी पृथ्वीवर पडून त्यांना साष्टाङ्ग प्रणाम केला आणि मन्त्र्यांच्या द्वारे पित्याच्या संपूर्ण प्रेतकर्माची व्यवस्था करविली. ॥ ३॥
|
उद्धृत्य तैलसंसेकात् स तु भूमौ निवेशितम् ।
आपीतवर्णवदनं प्रसुप्तमिव भूपतिम् ॥ ४ ॥
|
राजा दशरथांचे शव तेलाच्या काहीलीतून काढून जमिनीवर ठेवले गेले. दीर्घकाळापर्यंत तेलात पडून राहिल्याने त्याचे मुख थोडेसे पिवळसर झाले होते. ते पाहून असे वाटत होते की जणु भूमिपाल दशरथ झोपलेलेच आहेत. ॥ ४॥
|
संवेश्म शयने चाग्र्ये नानारत्नपरिष्कृते ।
ततो दशरथं पुत्रो विललाप सुदुःखितः ॥ ५ ॥
|
त्यानंतर मृत राजा दशरथांना धुवून-पुसून नाना प्रकारच्या रत्नांनी विभूषित उत्तम शय्येवर झोपवून त्यांचे पुत्र भरत अत्यन्त दुःखी होऊन विलाप करू लागले- ॥ ५॥
|
किं ते व्यवसितं राजन् प्रोषिते मय्यनागते ।
विवास्य रामं धर्मज्ञं लक्ष्मणं च महाबलम् ॥ ६ ॥
|
’राजन ! मी परदेशात होतो आणि आपल्याजवळ पोहोचूही शकलो नाही, तोपर्यंतच धर्मज्ञ राम आणि महाबली लक्ष्मण यांना वनांत पाठवून आपण याप्रकारे स्वर्गात जाण्याचा निश्चय कसा काय केलात ? ॥ ६॥
|
क्व यास्यसि महाराज हित्वेमं दुःखितं जनम् ।
हीनं पुरुषसिंहेन रामेणाक्लिष्टकर्मणा ॥ ७ ॥
|
’महाराज ! अनायासेच महान कर्म करणार्या पुरूषसिंह श्रीरामा विरहित या दुःखी दीन सेवकाला सोडून आपण कोठे निघून गेलात ? ॥ ७॥
|
योगक्षेमं तु तेऽव्यग्रं कोऽस्मिन् कल्पयिता पुरे ।
त्वयि प्रयाते स्वस्तात रामे च वनमाश्रिते ॥ ८ ॥
|
’तात ! आपण स्वर्गात निघून गेलात आणि रामानी वनाचा आश्रय घेतला, अशा स्थितीत या नगरात निश्चिन्तपणे प्रजेच्या योगक्षेमाची व्यवस्था कोण करील ? ॥ ८॥
|
विधवा पृथिवी राजंस्त्वया हीना न राजते ।
हीनचन्द्रेव रजनी नगरी प्रतिभाति माम् ॥ ९ ॥
|
’राजन ! आपल्यावाचून ही पृथ्वी विधवेप्रमाणे होऊन गेली आहे आणि म्हणून ही शोभून दिसत नाही. ही पुरी ही मला चन्द्राशिवायच्या रात्रीप्रमाणे श्रीहीन प्रतीत होत आहे’. ॥ ९॥
|
एवं विलपमानं तं भरतं दीनमानसम् ।
अब्रवीद् वचनं भूयो वसिष्ठस्तु महामुनिः ॥ १० ॥
|
याप्रकारे दीनमानस होऊन विलाप करणार्या भरताला महामुनी वसिष्ठ याप्रकारे बोलले--॥ १०॥
|
प्रेतकार्याणि यान्यस्य कर्तव्यानि विशाम्पतेः ।
तान्यव्यग्रं महाबाहो क्रियतामविचारितम् ॥ ११ ॥
|
’महाबाहो ! या महाराजांच्या साठी जे काही प्रेतकार्य करावयाचे आहे ते कुठलाही विचार न करता शान्तचित्त होऊन कर.’ ॥ ११॥
|
तथेति भरतो वाक्यं वसिष्ठस्याभिपूज्य तत् ।
ऋत्विक्पुरोहिताचार्यांस्त्वरयामास सर्वशः ॥ १२ ॥
|
तेव्हां ’ठीक आहे’ असे म्हणून भरतांनी वसिष्ठांची आज्ञा शिरोधार्य केली आणि ऋत्विज आणि याजकांच्या द्वारा विधिपूर्वक हवन केले. ॥ १२॥
|
ये त्वग्नयो नरेन्द्रस्य अग्न्यगाराद् बहिष्कृताः ।
ऋत्विग्भिर्याजकैश्चैव ते हूयन्ते यथाविधि ॥ १३ ॥
|
राजमहालाच्या अग्निशाळेतून विधिपूर्वक आणलेल्या अग्नित याजकांनी व ऋत्विजांनी विधिपूर्वक हवन केले. ॥ १३ ॥
|
शिबिकायामथारोप्य राजानं गतचेतसम् ।
वाष्पकण्ठा विमनसस्तमूचुः परिचारकाः ॥ १४ ॥
|
त्यानंतर दशरथ महाराजांच्या प्राणहीन शरीरास शिबिकेत बसवून परिचारकगण त्यांना स्मशानभूमी कडे घेऊन निघाले. त्यावेळी अश्रूंनी त्यांचा कंठ दाटून आला होता आणि ते मनातल्या मनात फार दुःखी झालेले होते. ॥ १४॥
|
हिरण्यं च सुवर्णं च वासांसि विविधानि च ।
प्रकिरन्तो जना मार्गे नृपतेरग्रतो ययुः ॥ १५ ॥
|
मार्गात राजकीय पुरूष राजाच्या शवापुढे सोने, चांदी तसेच विविध प्रकारची वस्त्रे उधळत चालले होते. ॥ १५॥
|
चन्दनागुरुनिर्यासान् सरलं पद्मकं तथा ।
देवदारूणि चाहृत्य क्षेपयन्ति तथापरे ॥ १६ ॥
गन्धानुच्चावचांश्चान्यांस्तत्र गत्वाथ भूमिपम् ।
ततः संवेशयामासुश्चितामध्ये तमृत्विजः ॥ १७ ॥
|
स्मशानभूमीत पोहोचल्यावर चिता तयार केली जाऊ लागली. कुणी चन्दन आणून ठेवले तर कुणी अगुरू, तर कुणी कुणी गुग्गुळ तसेच कोणी सरल, पद्मक आणि देवदारूची लाकडे आणून चितेमध्ये टाकू लागले. काही लोकांनी विविध प्रकारचे सुगंधी पदार्थ आणून टाकले. यानंतर ऋत्विजांनी राजाचे शव चितेवर ठेवले. ॥ १६-१७॥
|
तथा हुताशनं हुत्वा जेपुस्तस्य तदृत्विजः ।
जगुश्च ते यथाशास्त्रं तत्र सामानि सामगाः ॥ १८ ॥
|
यावेळी अग्निमध्ये आहुती देऊन त्यांच्या ऋत्विजांनी वेदोक्त मत्रांचा जप केला. सामगान करणारे विद्वान शस्त्रीय पद्धतीस अनुसरून सामश्रुतींचे गायन करू लागले. ॥ १८॥
|
शिबिकाभिश्च यानैश्च यथार्हं तस्य योषितः ।
नगरान्निर्ययुस्तत्र वृद्धैः परिवृतास्तथा ॥ १९ ॥
प्रसव्यं चापि तं चक्रुर्ऋत्विजोऽग्निचितं नृपम् ।
स्त्रियश्च शोकसंतप्ताः कौसल्याप्रमुखास्तदा ॥ २० ॥
|
या नंतर चिता पेटविण्यास आली. त्यानंतर राजा दशरथांच्या कौसल्या आणि राण्या वृद्ध रक्षकांनी घेरलेल्या यथायोग्य शिबिकामध्ये तसेच रथांवर आरूढ होऊन नगरांतून निघाल्या, तसेच शोकाने संतप्त होऊन स्मशानभूमीत येऊन अश्वमेधांत यज्ञाचे अनुष्ठाता राजा दशरथांच्या शवाची परिक्रमा करू लागल्या. त्याच बरोबर ऋत्विजांनीही त्या शवाची परिक्रमा केली. ॥ १९-२०॥
|
क्रौञ्चीनामिव नारीणां निनादस्तत्र शुश्रुवे ।
आर्तानां करुणं काले क्रोशन्तीनां सहस्रशः ॥ २१ ॥
|
त्यासमयी तेथे करूण क्रन्दन करणार्या हजारो शोकार्त राण्यांचा आर्तनाद टिटव्यांच्या (कुररींच्या) चित्काराप्रमाणे ऐकू येत होता. ॥ २१ ॥
|
ततो रुदन्त्यो विवशा विलप्य च पुनः पुनः ।
यानेभ्यः सरयूतीरमवतेरुर्नृपाङ्गनाः ॥ २२ ॥
|
दाहकर्मानंतर विवश होऊन रडत रडत त्या सर्व राजराण्या वारंवार विलाप करीत वाहनांतून जाऊन शरयूच्या तटावर जाऊन उतरल्या. ॥ २२॥
|
कृत्वोदकं त भरतेन सार्धं
नृपाङ्गना मन्त्रिपुरोहिताश्च ।
पुरं प्रविश्याश्रुपरीतनेत्रा
भूमौ दशाहं व्यनयन्त दुःखम् ॥ २३ ॥
|
भरताबरोबरच सर्व राण्या, मन्त्री आणि पुरोहितांनीही राजासाठी जलाञ्जली दिली आणि नंतर ती सर्व नेत्रातून अश्रु ढाळीत नगरांत आली आणि दहा दिवस पर्यंत भूमीवर शयन करीत त्यांनी अत्यन्त दुःखाने आपला समय व्यतीत केला. ॥ २३॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे षट्सप्ततितमः सर्गः ॥ ७६ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्या काण्डाचा शाहात्तरावा सर्ग पूरा झाला. ॥ ७६ ॥
|