॥ अद्भुत रामायणम् ॥ चतुर्थः सर्गः श्रीरामचन्द्रस्य जन्मग्रहणकारणम् - तावागतौ समीक्ष्याथ राजा संभ्रान्तमानसः ।
दिव्यमासनमादिश्य पूजयामास तावुभौ ॥ १ ॥ नारद व पर्वत यांना आलेले पाहून राजा आश्चर्यचकीत झाला. तरीही त्याने त्या दोघांना बसावयास आसने दिली व त्यांचे पूजन केले. १ उभौ देवऋषी दिव्यौ नित्यज्ञानवतां वरौ ।
समासीनौ महात्मानौ कन्यार्थे मुनिसत्तमौ ॥ २ ॥ त्या कन्येच्या प्राप्तीची इच्छा करणारे ते दोघे ज्ञानी मुनिश्रेष्ठ आसनस्थ झाले. २ तावुभौ प्रणिपत्याग्रे कन्यां तां श्रीमतीं शुभाम् ।
स्थितां कमलपत्राक्षीं प्राह राजा यशस्विनीम् ॥ ३ ॥ त्या दोघांना राजाने नमस्कार केला व तेथे असलेल्या आपल्या कमललोचना, शुभा, यशस्विनी अशा कन्येला तो म्हणाला - ३ अनयोर्यं वरं भद्रे ! मनसा त्वमिहेच्छसि ।
तस्मै मालामिमां देहि प्रणिपत्य यथाविधि ॥ ४ ॥ 'हे कल्याणी, या दोघांपैकी तुला पसंत असणाऱ्या अशा एकाला प्रणाम करून ही वरमाला त्याला घाल.' ४ एवमुक्ता तु सा कन्या स्त्रीभिः परिवृता तदा ।
मालां हिरण्मयीं दिव्यामादाय शुभलोचना ॥ ५ ॥ तो असे बोलल्या नंतर स्त्रियांच्या घोळक्यात असलेली ती शुभनयना दिव्य सुवर्णमाला घेऊन तेथे आली. ५ यत्रासीनौ महात्मानौ तत्रागम्य स्थिता यदा ।
ईक्षमाना मुनिश्रेष्ठौ नारदं पर्वतं तथा ॥ ६ ॥ गोलांगुलमुखं भीता किञ्चिद्धास्य समन्विता । सम्भ्रान्तमनसा तत्र प्रवाते कदली यथा ॥ ७ ॥ तेथे आल्यानंतर मुनिश्रेष्ठ नारद आणि पर्वत यांना तिने मार्कटरूपात पाहिले. त्यांचे ते मर्कटाप्रमाणे मुख पाहून तिला काहीसे हसू आले. मात्र वाऱ्याच्या झोताप्रमाणे कंप पावणाऱ्या केळीच्या पानाप्रमाणे तिच्या मनाचा थरकाप झाला आणि ती बावरून तशीच तिथे उभी राहिली. ६-७ तस्थौ तामाह राजासौ वत्से किं त्वं करिष्यसि ।
अनयोरेकमुद्दिश्य देहि मालामिमां शुभे ॥ ८ ॥ तिला तशीच उभी असलेली पाहून राजा म्हणाला - 'बाळ, असं काय करतेस ? या दोघांपैकी एकाला माळ घाल.' ८ सा प्राह पितरं त्रस्ता इमौ तु वानराननौ ।
मुनिश्रेष्ठौ न पश्यामि नारदं पर्वतं तथा ॥ ९ ॥ तेव्हा ती अतिशय त्रासून वडिलांना म्हणाले - 'या दोघांचे तोंड तर वानराप्रमाणे आहे. मला मुनिश्रेष्ठ नारद आणि पर्वत दिसतच नाहीत. तर या दोघांच्या मध्ये एक सोळा वर्षाचा तरुणचा दिसतो आहे. ९ अनयोर्मध्यतस्त्वेकं वरं षोडशवार्षिकम् ।
सर्वाभरणसंयुक्तमतसीपुष्पसंनिभम् ॥ १० ॥ दीर्घबाहुं विशालाक्षं तुङ्गोरःस्थलमुत्तमम् । चामीकराभं करणपटयुग्मकशोभितम् ॥ ११ ॥ त्याने अनेक सुवर्णाची आभरणे धारण केली असून तो अलशीच्या फुलाप्रमाणे सुंदर आहे. बाहू व वक्षःस्थळ विशाल असून तो सुवर्णाप्रमाणे तेजस्वी आहे. त्याचे उदर कृश आहे आणि सुरेखा वस्त्रांनी त्याचे शरीर सुशोभित झाले आहे. १०-११ विभक्तत्रिवलीयुक्तनाभिं व्यक्तकृशोदरम् ।
हिरण्याभरणोपेतं सुरङ्गकनखं शुभम् ॥ १२ ॥ पद्माकारकरं त्वेनं पद्यास्यं पद्मलोचनम् । पद्मांघ्रिं पद्महृदयं पद्मनाभं श्रिया वृतम् ॥ १३ ॥ त्याची नखे सुंदर व शुभ आहेत. हात, मुख, लोचन, चरण हे सर्व कमलाप्रमाणे सुंदर आहे. त्या पद्मनाभाचे हृदय कमलाप्रमाणे असून तो लक्ष्मीने युक्त आहे. त्याची दंतपंक्ति कुंदकळ्यांप्रमाणे आहे. १२-१३ दंतपंक्तिभिरत्यर्थं कुन्दकुड्मलसन्निभम् ।
हसन्तं मां समालोक्य दक्षिणं च प्रसार्य वै ॥ १४ ॥ मला पाहून स्मितहास्य करीत त्याने आपला उजवा बाहू पसरला आहे. अशा शुभ दर्शनास मी पहात आहे.' १४ पाणिं स्थितमिमं छत्रं पश्यामि शुभमूर्धजम् ।
एवमुक्ते मुनिः प्राह नारदः संशयं गतः ॥ १५ ॥ असे तिने म्हटल्यावर नारद शंकित होऊन म्हणाले - 'मुली, त्याला किती हात आहेत ? हे जरा नीट सांग.' १५ कियन्तो बाहवस्तस्य कन्ये वद यथातथम् ।
बाहुद्वयं च पश्यामीत्याह कन्या सुविस्मिता ॥ १६ ॥ ते ऐकून आश्चर्य चकित झालेली ही कन्या म्हणाले - 'त्याला तर दोनच हात आहेत, असे दिसते.' १६ प्राह तां पर्वतस्तत्र तस्य वक्षःस्थले शुभे ।
किञ्च पश्यसि मे ब्रूहि करे किं धारयत्ययि ॥ १७ ॥ पर्वत व म्हणाला - 'हे शुभे ! त्याच्या वक्षःस्थळावर काय आहे ? त्याने हातात काय धारण केले आहे, हे बघ आणि मला सांग.' १७ कन्या तमाह मालां वै चंचद्रूपामनुत्तमाम् ।
वक्षःस्थलेऽस्य पश्यामि करे कार्मुकसायकौ ॥ १८ ॥ तेव्हा ती कन्या म्हणाली - 'त्याने आपल्या वक्षःस्थळावर अतिशय सुंदर माला धारण केली आहे, आणि त्याच्या हातात धनुष्यबाण दिसत आहे.' १८ एवमुक्तौ मुनिश्रेष्ठौ परस्परमनुत्तमौ ।
मनसा चिन्तयन्तौ तौ मायेयं कस्यचिद्भवेत् ॥ १९ ॥ तिने असे म्हटल्यावर ते दोन मुनिश्रेष्ठ आपल्या मनात विचार करू लागले, ही कोणाची तरी माया असावी, आणि हा मायावी स्वतः जनार्दनाचा असावा. १९ मायावी तस्करो नूनं स्वयमेव जनार्दनः ।
आगतो नान्यथा कुर्यात्कथं मेऽन्यो मुखं त्विदम् ॥ २० ॥ तोच असावा, नाहीतर आमचे तोंड मर्कटाप्रमाणे कसे बरे झाले असते ? अशा विचारात नारद पडले. २० गोलांगूलीयमित्येवं चिन्तयामास नारदः ।
पर्वतोऽपि तथैवैतद्वानरत्वं कथं मया ॥ २१ ॥ वानराप्रमाणे अचानक आपले मुख कसे बरे झाले असावे, या विचाराने त्या दोघांनाही फारच काळजी वाटू लागली. २१ प्राप्तमित्येव सहसा चिन्तामापेदिवांस्तथा ।
ततो राजा प्रणम्यासौ नारदं पर्वतं तथा ॥ २२ ॥ तेव्हा नारद व पर्वत यांना प्रणाम करून राजा म्हणाला - २२ भवद्भ्यां किमिदं भद्रौ कृतं बुद्धिविमोहनम् ।
स्वस्थौ भवन्तौ तिष्ठेतां यदि कन्यार्थमुद्यतौ ॥ २३ ॥ 'सज्जनहो ! आपल्याला हा बुद्धिभ्रम कसे बरे झाला ? आपले मन असे का बरे विचलित झाले ? आपणास कन्येच्या प्राप्तीची इच्छा असेल, तर स्वस्थ व शांत बसून रहा.' २३ एवमुक्तौ मुनिश्रेष्ठौ नृपमूचतुरुल्वणौ ।
त्वमेव मोहं कुरुषे नावामिह कथञ्चन ॥ २४ ॥ त्याने असे म्हटल्यावर ते दोघे मुनिश्रेष्ठ राजाला म्हणाले - 'आम्हाला कोणताही भ्रम झाला नाही. तूच ही माया निर्माण केली आहेस. आम्हा दोघांपैकी एकाला या सुंदरीनें माळ घालावी.' २४ आवयोरेकमेषा ते वरयत्वेव भामिनी ।
ततः सा कन्यका भूयः प्रणिपत्य च देवताम् ॥ २५ ॥ पित्रा नियुक्ता सहसा मुनिशापभयाद्द्विज । मालामादाय तिष्ठन्ती तयोर्मध्ये समाहिता ॥ २६ ॥ पूर्ववत्पुरुषं दृष्ट्वा माल्ये तस्मै ददौ हि सा । अनन्तरं च सा कन्या दृष्टा न मनुजैः पुनः ॥ २७ ॥ वडिलांच्या आज्ञेवरून तिने पुन्हा एकदा देवाला नमस्कार केला. पण मुनींच्या शापाच्या भीतीने सावधानतेने माला हातात घेऊन ती त्या दोघांच्या मध्ये उभी राहिली आणि पुन्हा एकदा त्या तरुणाला तिथे पाहून तिने त्याला माला अर्पण केली. मात्र त्यानंतर ती कन्या कुणाच्याच दृष्टीला पडली नाही. २५-२७ ततो नादः समभवत्किमेतदिति विस्मयात्
तामादाय गतो विष्णुः स्वस्थानं पुरुषोत्तमः ॥ २८ ॥ तेव्हा 'अरे हे काय झाले ?' असे आश्चर्याने उदगार तेथे ऐकू येऊ लागले. भगवान विष्णू तिला घेऊन आपल्या निवासस्थानी गेले. २८ पुरा तदर्थमनिशं तपस्तप्त्वा वराङ्गना ।
श्रीमतीयं समुत्पन्ना सा गता च तथा हरिम् ॥ २९ ॥ विष्णूच्या प्राप्तीसाठी तिने तप केल्याने या कन्येचा जन्मा झाला होता, आणि आता ती त्याच्याकडेच निघून गेली आणि त्याच्याशी एकरूप झाली. २९ तावुभौ मुनिशार्दूलौ धिक्त्वामित्येव दुःखितौ ।
वासुदेवं प्रति सदा जग्मतुर्भवनं हरेः ॥ ३० ॥ नंतर ते दोघे दुखी झालेले मुनि 'तुझा धिक्कार असो' असे म्हणत म्हणत हरीच्या निवासस्थानी गेले. ३० तावागतौ समीक्ष्याह श्रीमतीं भगवान्हरिः ।
मुनि श्रेष्ठौ समायातौ गूढस्वात्मानमत्र वै ॥ ३१ ॥ ते दोघे मुनिश्रेष्ठ तेथे आलेले पाहून भगवान हरी श्रीमतीला म्हणाले - ' ते मुनिश्रेष्ठ येत आहेत, तू आपणास स्वतःला गुप्त कर.' ३१ तथेत्युक्ता च सा देवी प्रहसन्ती चकार ह ।
नारदः प्रणिपत्याग्रे प्राह दामोदरं हरिम् ॥ ३२ ॥ 'ठीक आहे' असे म्हणून ती हसली व तिने तसे केले (स्वतःला गुप्त केले). पुढे नारदाने प्रणाम करून हरीला विचारले - ३२ किमिदं कृतवानद्य मम त्वं पर्वतस्य च ।
त्वमेव नूनं गोविन्द कन्यां तां हृतवानसि ॥ ३३ ॥ 'तुम्ही माझे व पर्वताचे रूप असे का केले ? गोविंदा तु खात्रीने या कन्येचे हरण केले असले पाहिजे. ते ऐकून विष्णुने कानावर हात ठेवले व म्हणाले - ३३ तच्छ्रुत्वा पुरुषो विष्णुः पिधाय श्रोत्रमच्युतः ।
पाणिभ्यां प्राह भगवन्भवता किमुदीरितम् ॥ ३४ ॥ 'हे भगवन आपण हे काय बोलता ? हा तर कामवादच. असे वागणे मुनीला शोभत नाही.' ३४ कामवादो न भावोऽयं मुनिवृत्तेरहो किल ।
एवमुक्तो मुनिः प्राह वासुदेवं स नारदः ॥ ३५ ॥ असे बोलल्यावर नारदमुनी वासुदेवाच्या कानांत म्हणाले, मग माझे मुख मर्कटाप्रमाणे कसे झाले ? ३५ कर्णमूले मम कथं गोलागलमुखं त्विति ।
तदाकर्ण्य महाबुद्धिर्देवो नारायणो हरिः ॥ ३६ ॥ ते ऐकून चाणाक्ष नारायण हरी नारदाच्या कानात म्हणाले - ३६ कर्णमूले तमाहेदं वानरास्यं कृतं मया ।
पर्वतस्य तथा विप्र गोलांगूलमुखं तव ॥ ३७ ॥ यथा भवांस्तथा सोऽपि प्रार्थयामास निर्जने । मामेवं भक्तिवशगस्तथास्म्यकरवं मुने ॥ ३८ ॥ 'तुझे आणि तुझ्याच प्रमाणे पर्वताचेही मुख मर्कटाप्रमाणे केले आहे. तू तशी विनंती केली होतीस, तशीच एकांतात त्यानेही केली होती. हे मुने, तुम्हा दोघांची भक्ती पाहून आणि तुमचे प्रिय व्हावे म्हणून मी तसे केले, आपल्या मनाने नाही.' ३७-३८ न स्वेच्छया कृतं तद्वां प्रियार्थं नान्यथा त्विति ।
याचते यच्च यश्चैव तच्च तस्य ददाम्यहम् ॥ ३९ ॥ न दोषोऽत्र गुणो वापि युवयोर्मम वा द्विजः । पर्वतोऽपि तथा प्राह तस्याप्येवं जगाद सः ॥ ४० ॥ जो ज्या प्रकारची मागणी माझ्याकडे करतो, मी त्याला देतो. या बाबतीत माझाही कोणताच गुणदोष नाही, आणि तुम्हा दोघांचाही नाही. पर्वताने विचारल्यावर त्यालाही त्यांनी हेच सांगितले. ३९-४० शृण्वतोरुभयोस्तत्र प्राह दामोदरो वचः ।
प्रियं भवतोः कृतवान्सत्येनायुधमालभे ॥ ४१ ॥ ते दोघे त्याचे बोलणे ऐकत असता दामोदर म्हणाला, 'मी आयुधांची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला आवडेल असेच मी केले आहे.' ४१ नारदः प्राह धर्मात्मा आवयोर्मध्यतः स्थितः ।
धनुष्मान्द्विभुजःको नु तां हृत्वा गतवान्किल ॥ ४२ ॥ धर्मात्मा नारद म्हणाले - 'दोन भुजा आणि त्यामध्ये धनुष्यबाण धारण केलेला असा आम्हा दोघांमध्ये उभा असणारा असा तो पुरुष कोण होता ? खरे म्हणजे त्यानेच कन्येचे हरण केले.' ४२ तच्छ्रुत्वा वासुदेवोऽसौ प्राह तौ मुनिसत्तमौ ।
मायाविनौ महात्मानौ बहवः सन्ति सत्तमौ ॥ ४३ ॥ तेव्हा त्या दोन श्रेष्ठ मुनींना वासुदेव - 'सज्जन श्रेष्ठ हो ! या जगात अनेक मायावी असतात. त्यापैकी कुणीतरी तिचे हरण केले असावे.' ४३ तत्र सा श्रीमती देवी हृता केनापि सुव्रतौ ।
चक्रपाणिरहं नित्यं चतुर्बाहुरिति स्थितिः ॥ ४४ ॥ 'मी तर चतुर्भुज असून हातामध्ये नेहमी चक्र धारण करतो हे आपणास चांगलेच माहित आहे. तेव्हा मी काही तिथे असू शकत नाही.' ४४ तस्मान्नाहमतथ्यो वै भवद्भ्यां विदितं हि तत् ।
इत्युक्तौ प्रणिपत्यैनमूचतुः प्रतिमानसौ ॥ ४५ ॥ असे म्हटल्यावर ते त्याला प्रणाम करून आनंदाने म्हणाले- 'हे नारायण जगत्पते ! या बाबतीत तुझा काय दोष ?' ४५ कोऽत्र दोषस्तव विभो नारायण जगत्पते ।
दौरात्म्यं तु नृपस्यैव मायां हि कृतवानसौ ॥ ४६ ॥ या दुष्ट राजाचीच हे माया असावी असे म्हणून नारद आणि पर्वत तिथून निघून गेले. ४६ इत्युक्त्वा जग्मतुस्तस्मान्मुनी नारदपर्वतौ ।
अम्बरीषं समासाद्य शापेनैनमयोजयत् ॥ ४७ ॥ नारदः पर्वतश्चैव यस्मादावामिहागतौ । आहूय पश्चादन्यस्मै कन्यां त्वं दत्तवानसि ॥ ४८ ॥ नंतर ते अंबरीषाकडे आले आणि त्यांनी त्याला शाप दिला - 'मी नारद आणि पर्वत इथे आलो होतो. पण मग आम्हाला इथे बोलावून तू आपली कन्या दुसऱ्याला कशी काय दिली ?' ४७-४८ मायायोगेन तस्मात्त्वं तमोऽज्ञानी भविष्यसि ।
तेन नात्मानमत्यर्थं यथावत्त्वं हि वेत्स्यसि ॥ ४९ ॥ 'तर तू आता मायायोगाने अज्ञ (मूढ) होशील. स्वतःला नीट योग्य तऱ्हेने ओळखू शकणार नाहीस.' ४९ एवं शापे प्रवृत्तेतु तमोराशि रथोत्थितः ।
नृपं प्रति ततश्चक्रं विष्णोः प्रादुरभूत्क्षणात् ॥ ५० ॥ असा शाप दिल्यावर तेथे भयानक अंधकार झाला. आणि जेव्हां तो राजा पर्यंत येऊ लागला, तेव्हां क्षणार्धात तेथे विष्णूचे चक्र प्रगट झाले. ५० चक्रवित्रासितं घोरं तावुभावभ्यगात्तमः ।
ततः संत्रस्तसर्वांगौ धावमानौ महामुनी ॥ ५१ ॥ पृष्ठतश्चक्रमालोक्य तमोराशिं च दुर्मदौ । कन्यासिद्धिरहो प्राप्तस्त्वावयोरिति वेगितौ ॥ ५२ ॥ त्या चक्राच्या येण्याने त्रस्त झालेला अंधार त्या दोन मुनींकडे सरकू लागला. पूर्णपणे बावरलेले ते दोघे महामुनी पाठीमागे भयानक अंधार व त्यामागे चक्र पाहून 'कन्येची प्राप्ती आपणास छान झाली' असे म्हणता धावत सुटले. ५१-५२ लोकालोकं दिवानिशं धावमानौ तमोऽर्दितौ ।
त्राहि त्राहीति गोविन्दं भाषमाणौ भयार्दितौ ॥ ५३ ॥ अंधाराने वेढलेले ते दोघे रात्रंदिवस लोकालोक पर्वताकडे पळत राहील. त्यावेळी ते सतत 'हे गोविंदा ! आमचे रक्षण कर असे घाबरून म्हणत होते.' ५३ विष्णुलोकं ततो गत्वा नारायण जगत्पते ।
वासुदेव हृषीकेश पद्मनाभ जनार्दन ॥ ५४ ॥ नंतर विष्णूलोकी जाऊन ते म्हणाले- 'हे नारायणा, जगत्पते, हे वासुदेवा, ऋषिकेशा, पद्मनाभा, जनार्दना, पुंडरीकाक्षा, तू आमचा स्वामी आहेस.' ५४ त्राह्यावां पुण्डरीकाक्ष नाथोऽसि पुरुषोत्तम ।
इत्यूचतुर्वासुदेवं मुनी नारदपर्वतौ । ततो नारायणोऽचिन्त्यः श्रीमांछ्रीवत्सलक्षणः ॥ ५५ ॥ आमचे रक्षण कर. ते दोघे म्हणजे नारद आणि पर्वत जेव्हां वासुदेवाला असे म्हणाले, तेव्हा श्रीवत्सलक्षणांनी युक्त, अशा श्रीमान् नारायणांनी भक्तांवर कृपा करावी म्हणून त्या चक्राचे आणि अंधाराचे निवारण केले आणि ते म्हणाले आपणां दोघां मुनिश्रेष्ठांप्रमाणे अंबरीषही माझा भक्त आहे. ५५ निवार्य चक्रं ध्वान्तं च भक्तानुग्रहकाम्यया ।
अम्बरीषश्च मद्भक्तस्तथेमौ मुनिसत्तमौ ॥ ५६ ॥ मग मनांतल्या मनांत म्हणाले, या दोघांबरोबरच मला राजाचेही हित करावयास हवे. त्यानंतर श्रीहरीने त्या दोघांना बोलाविले व आपल्या मधुर वाणीने त्यांना आनंदित करीत ते म्हणाले - ५६ अनयोर्नृपस्य च तथा हितं कार्यं मया पुनः ।
आहूय तौ ततः श्रीमान्गिरा प्रह्लादयन्हरिः ॥ ५७ ॥ 'मुनिश्रेष्ठ हो, माझे बोलणे ऐका. भक्तांचे रक्षण करण्यासाठी माझ्या चक्राने जे काही केले, (मी चक्रा कडून करविले) त्याबद्दल क्षमा करा. ५७ उवाच भगवान्विष्णुः श्रूयतामिति मे वचः ।
क्षमेतां मुनिशार्दूलौ भक्तसंरक्षणाय मे ॥ ५८ ॥ कारण क्षमा करणे हा साधूंचा स्वभावधर्मच आहे. तेव्हां त्या दोघां मुनिश्रेष्ठांना ती त्याचीच माया आहे हे कळून चुकले. ५८ अपराद्धं च चक्रेण क्षमाशीला हि साधवः ।
ततस्तौ मुनिशार्दूलौ मायां तस्यावबुध्य च ॥ ५९ ॥ अत्यंत संतप्त होऊन त्यांनी विष्णूला शाप दिला. ते म्हणाले - 'हे विष्णू, तू अतिशय कपटाने श्रीमतीचे हरण केलेस. ५९ ददतुश्च ततः शापं विष्णुमुद्दिश्य कोपनौ ।
श्रीमतीहरणं विष्णो यत्कृतं छद्मना त्वया ॥ ६० ॥ यया मूर्त्या तथैव त्वं जायेथाः मधुसूदन । अम्बरीषस्यान्ववाये राज्ञो दशरथस्य हि ॥ ६१ ॥ हे मधुसूदना, ज्या मूर्तीतून तू निर्माण झालास, त्याच मूर्तीतून तू अंबरीषाच्या कुळामध्ये राजा दशरथाच्या पोटी पुत्ररूपाने जन्म घेशील. ही श्रीमती धरणीची पुत्री होईल. राजा विदेहास तिची प्राप्ती झाल्यानंतर तो तिचे पालनपोषण करेल. ६०-६१ पुत्रस्त्वं भविता पुत्री श्रीमती धरणी प्रजा ।
भविष्यति विदेहश्च प्राप्य तां पालयिष्यति ॥ ६२ ॥ हे अच्युता, आपल्या राक्षसी नीतीला धरून तू असे या कल्याणीचे हरण केलेस. तसेच एक राक्षस तुझ्या पत्नीचे कपटाने हरण करेल. ६२ राक्षसापदः कश्चित्तां ते भार्यां हरिष्यति ।
यतो राक्षसधर्मेण हृतासि श्रीमती शुभा ॥ ६३ ॥ अतस्ते रक्षसा भार्या हर्तव्या छद्मनाऽच्युत । यथा प्राप्तं महद्दुःखमावाभ्यां श्रीमतीकृते ॥ ६४ ॥ या श्रीमतीसाठी आम्हा दोघांना जसे तीव्र दुःख झाले, तसेच भयंकर दुःख आपल्या पत्नीसाठी तुलाही होईल. तू 'हाय हाय' करीत वनामध्ये रडत फिरशील. ६३-६४ हाहेति रुदता लक्ष्यं तथा दुःखं च तत्कृते ।
इत्युक्तवन्तौ तौ विप्रौ प्रोवाच मधुसूदनः ॥ ६५ ॥ अम्बरीषस्यान्ववाये भविष्यति महायशाः । श्रीमान्दशरथो नाम भूमिपालोऽतिधार्मिकः ॥ ६६ ॥ त्या दोघां ब्राह्मणांनी असे म्हटल्यावर मधुसूदन म्हणाला, अंबरीषाच्या वंशामध्ये अत्यंत धार्मिक आणि महान यशस्वी असा राजा दशरथ निर्माण होईल (जन्म घेईल). ६५-६६ तस्याहमग्रजः पुत्रो रामो नाम भवाम्यहम् ।
तत्र मे दक्षिणो बाहुर्भरतो भविता किल ॥ ६७ ॥ त्याचा मी राम नावाचा मोठा मुलगा होईन, भरत नावाचा माझा भाऊ माझा उजवा हात होईल. ६७ शत्रुघ्नो वामबाहुश्च शेषोऽसौ लक्ष्मणः स्वयम् ।
ऋषिशापो न चैव स्यादन्यथा चक्र गम्यताम् ॥ ६८ ॥ शत्रुघ्न डावा हात होईल आणि स्वतः शेष लक्ष्मण होईल. चक्राला ते म्हणाले आता तू जा. ऋषींचा शाप फुकट जाणार नाही. ६८ ऋषिशापतमोराशे यदा रामो भवाम्यहम् ।
तत्र मां समुपागच्छ गच्छेदानीं नृपं विना ॥ ६९ ॥ मी जेव्हा ऋषीशापरूपी भयंकर अंधकाराने रामाचा जन्म घेईन, माझ्याकडे ये. आता तू यांना न घेताच राजाकडे जा (राजाला न घेताच जा). ६९ त्यक्त्वापि च मुनिश्रेष्ठाविति स्म प्राह माधवः ।
एवमुक्ते तमोनाशं तत्क्षणाच्च जगाम वै ॥ ७० ॥ माधव असे बोलत असतात त्याच क्षणी अंधार नाहीसा झाला. ७० त्यक्त्वापि च मुनिश्रेष्ठाविति स्म प्राह माधवः ।
एवमुक्ते तमोनाशं तत्क्षणाच्च जगाम वै ॥ ७१ ॥ त्या भक्तवत्सल प्रभुने आपल्यासाठी तो गोळा केला होता. हरीचे चक्रही पूर्वीप्रमाणे स्थिर राहिले. ७१ आत्मार्थं सञ्चितं तेन प्रगुणा भक्तरक्षिणा ।
निवारितं हरेश्चक्रं यथापूर्वमतिष्ठत ॥ ७२ ॥ भयमुक्त झालेले ते दोन्ही वर जनार्दनाला प्रणाम करून निघून गेले. मात्र अत्यंत दुःखी होऊन ते एकमेकांशी बोलू लागले - ७२ मुनिश्रेष्ठौ भयान्मुक्तौ प्रणिपत्य जनार्दनम् ।
निर्गतौ शोकसन्तप्तावूचतुस्तौ परस्परम् ॥ ७३ ॥ 'आज पासून अगदी मरेपर्यंत आपण स्त्रीचा स्वीकार करायचा नाही अशी प्रार्थना करू या.' ७३ अद्यप्रभृति देहान्तमावां कन्यापरिग्रहम् ।
न करिष्याव इत्युक्त्वा प्रतिज्ञाय च तावृषी ॥ ७४ ॥ अशाप्रकारे मौन स्विकारून आणि शुद्ध होऊन ते ध्यानमग्न झाले, आणि त्यांना आपली पूर्वीची स्थिती प्राप्त झाली. ७४ मौनध्यानपरौ शुद्धौ यथापूर्वं व्यवस्थितौ ।
अम्बरीषोऽपि राजासौ परिपाल्य च मेदिनीम् ॥ ७५ ॥ राजा अंबरीषानेही योग्य रीतीने पृथ्वीचा प्रतिपाळ करून आपल्या सेवक आणि ज्ञातिबांधवांचेसह विष्णूलोकी प्रयाण केले. ७५ सभृत्यज्ञातिसम्बन्धो विष्णुलोकं जगाम वै ।
मानार्थमम्बरीषस्य तथैव मुनिसिंहयोः ॥ ७६ ॥ अंबरीष आणि दोघां मुनिश्रेष्ठांच्या सन्मानासाठी (त्यांचा शाप खरा व्हावा म्हणून) स्वतः विष्णू दशरथपुत्र राम झाला. मात्र अज्ञानामुळे त्याची बुद्धी नष्ट झाली. परंतु कारणपरत्वे कधी कधी त्याला पूर्वी घडलेल्या गोष्टींचे स्मरण होत असे. ७६ रामो दाशरथिर्भूत्वा तमसा लुप्तबुद्धिकः ।
कदाचित्कार्यवशतः स्मृतिः स्यादात्मनः प्रभोः ॥ ७७ ॥ तो महापराक्रमी भगवान परिपूर्ण असूनही अपूर्ण असल्याप्रमाणे भासत असे. भक्तांवर कृपा करतेवेळी (कृपा करतांना) सर्वशक्तिमान प्रभूची ही अवस्था होत असते. ७७ पूर्णार्थोऽपि महाबाहुरपूर्णार्थ इव प्रभुः ।
अनुग्रहाय भक्तानां प्रभूणामीदृशी गतिः ॥ ७८ ॥ त्या महान ईश्वराला मायेमुळे मानवी शरीर प्राप्त झाले. अशाप्रकारे दोष जाणणार्या विद्वानांनी मायेत पडणे योग्य नाही. ७८ मायां कृत्वा महेशस्य प्रोत्थिता मानुषी तनुः ।
तस्मान्माया न कर्तव्या विद्वद्भिर्दोषदर्शिभिः ॥ ७९ ॥ अशी ही रामजन्माची कथा, तिचा उद्देश तसेच अंबरीषाचे महात्म्य आणि हरीचा मायावतार या सर्वांबद्दल मी सांगितले. ७९ एतत्ते कथितं सर्वं रामजन्मकथाश्रयम् ।
अम्बरीषस्य माहात्म्यं मायावित्त्वं च वै हरेः ॥ ८० ॥ जो मनुष्य महात्मा हरीचे हे मायाचरित्र वाचेल, निदान ऐकेल, तो पुण्यात्मा होऊन मायेचा त्याग करेल आणि विष्णूलोकी जाईल. ८० यः पठेच्छृणुयाद्वापि मायावित्त्वं हरेर्विभोः ।
मायां विसृज्य पुण्यात्मा विष्णुलोकं स गच्छति ॥ ८१ ॥ दशरथसुत जन्मकारणं यः पठति शृणोत्यनुमोदते द्विजेन्द्रः । व्रजति सभगवद्गृहातिथित्वं नहि शमनस्य भवं कृतश्चिदस्य ॥ ८२ ॥ जो दशरथपुत्राच्या जन्माच्या हेतूबद्दल वाचतो, ऐकतो, किंवा निदान मान्य करतो, तो भगवंताच्या घरचा अतिथी होतो आणि त्याला यमाचे भय राहात नाही. ८१-८२ इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये अद्भुतोत्तरकाण्डे
श्रीरामजन्मोपक्रमश्चतुर्थः सर्गः ॥ ४ ॥ रामजन्महेतु प्रसंग नामक चतुर्थ अध्याय समाप्त. |