स्वकुलस्य परिचयं ददता जनकेन श्रीरामलक्ष्मणयोः कृते सीतोर्मिलयोः प्रदानाय प्रतिज्ञाकरणम् -
|
राजा जनकांनी आपल्या कुलाचा परीचय देऊन श्रीराम आणि लक्ष्मणासाठी क्रमशः सीता आणि ऊर्मिलेला देण्याची प्रतिज्ञा करणे -
|
एवं ब्रुवाणं जनकः प्रत्युवाच कृताञ्जलिः ।
श्रोतुमर्हसि भद्रं ते कुलं नः परिकीर्तितम् ॥ १ ॥
प्रदाने हि मुनिश्रेष्ठ कुलं निरवशेषतः ।
वक्तव्यं कुलजातेन तन्निबोध महामते ॥ २ ॥
|
महर्षि वसिष्ठांनी जेव्हां या प्रकारे इक्ष्वाकु वंशाचा परीचय करून दिला तेव्हां राजा जनकांनी हात जोडून त्यांना म्हटले - 'मुनिश्रेष्ठ ! आपले भले होवो ! आता आम्हीही आपल्या कुलाचा परीचय करून देत आहो. ऐकावे. महामते ! कुलीन पुरुषांसाठी कन्यादानाच्या समयी आपल्या कुलाचा पूर्णरूपाने परीचय करून देणे आवश्यक आहे म्हणून आपण ऐकण्याची कृपा करवी. ॥ १-२ ॥
|
राजाभूत् त्रिषु लोकेषु विश्रुतः स्वेन कर्मणा ।
निमिः परमधर्मात्मा सर्वसत्त्ववतां वरः ॥ ३ ॥
|
'प्राचीन काली निमि नामक एक परम धर्मात्मा राजा झाला आहे, जो संपूर्ण धैर्यशाली महापुरुषांच्या मध्ये श्रेष्ठ तथा आपला पराक्रमाने तिन्ही लोकात विख्यात होता. ॥ ३ ॥
|
तस्य पुत्रो मिथिर्नाम जनको मिथिपुत्रकः ।
प्रथमो जनको नाम जनकादप्युदावसुः ॥ ४ ॥
|
'त्यांचा मिथि नामक एक पुत्र झाला. मिथिच्या पुत्राचे नाव जनक होते. हेच आमच्या कलातील पहिले जनक झाले आहेत. त्यांच्या नावावरून आमच्या वंशाचा प्रत्येक राजा 'जनक' म्हणून संबोधला जातो. जनकांपासून उदावसुचा जन्म झाला. ॥ ४ ॥
|
उदावसोस्तु धर्मात्मा जातो वै नन्दिवर्धनः ।
नन्दिवर्धसुतः शूरः सुकेतुर्नाम नामतः ॥ ५ ॥
|
'उदावसुपासून धर्मात्मा नन्दिवर्धन उत्पन्न झाला. नन्दिवर्धनाच्या शूरवीर पुत्राचे नाव सुकेतु होते. ॥ ५ ॥
|
सुकेतोरपि धर्मात्मा देवरातो महाबलः ।
देवरातस्य राजर्षेर्बृहद्रथ इति स्मृतः ॥ ६ ॥
|
'सुकेतुचा देवरात नामक पुत्र झाला. देवरात महान् बलवान आणि धर्मात्मा होते. राजर्षि देवरातांचे बृहद्रथ नावाने एक पुत्र झाला. ॥ ६ ॥
|
बृहद्रथस्य शूरोऽभून्महावीरः प्रतापवान् ।
महावीरस्य धृतिमान् सुधृतिः सत्यविक्रमः ॥ ७ ॥
|
'बृहद्रथांचे पुत्र महावीर झाले, जे शूर आणि प्रतापी होते. महावीरांचे पुत्र सुधृति झाले, जे धैर्यवान आणि सत्यपराक्रमी होते. ॥ ७ ॥
|
सुधृतेरपि धर्मात्मा धृष्टकेतुः सुधार्मिकः ।
धृष्टकेतोश्च राजर्षेर्हर्यश्व इति विश्रुतः ॥ ८ ॥
|
'सुधृतिचे पुत्र धर्मात्मा धृतकेतु झाले जे परम धार्मिक होते. राजर्षि धृष्टकेतूंचे पुत्र हर्यश्व नामाने विख्यात झाले. ॥ ८ ॥
|
हर्यश्वस्य मरुः पुत्रो मरोः पुत्रः प्रतीन्धकः ।
प्रतीन्धकस्य धर्मात्मा राजा कीर्तिरथः सुतः ॥ ९ ॥
|
'हरिश्वांचे पुत्र मरु, मरुचे पुत्र प्रतीन्धक तथा प्रतीन्धकांचे पुत्र धर्मात्मा राजा कीर्तिरथ झाले. ॥ ९ ॥
|
पुत्रः कीर्तिरथस्यापि देवमीढ इति स्मृतः ।
देवमीढस्य विबुधो विबुधस्य महीध्रकः ॥ १० ॥
|
'कीर्तिरथांचे पुत्र देवमीढ्य नामाने विख्यात झाले. देवमीढाचे विबुद्ध आणि विबुधाचे पुत्र महीध्रक् झाले. ॥ १० ॥
|
महीध्रकसुतो राजा कीर्तिरातो महाबलः ।
कीर्तिरातस्य राजर्षेर्महारोमा व्यजायत ॥ ११ ॥
|
'महीध्रकाचे पुत्र महाबलि राजा कीर्तिरात झाले. राजर्षि कीर्तिरातांचा महारोमा नामक पुत्र उत्पन्न झाला. ॥ ११ ॥
|
महारोम्णस्तु धर्मात्मा स्वर्णरोमा व्यजायत ।
स्वर्णरोम्णस्तु राजर्षेर्ह्रस्वरोमा व्यजायत ॥ १२ ॥
तस्य पुत्रद्वयं राज्ञो धर्मज्ञस्य महात्मनः ।
ज्येष्ठोऽहमनुजो भ्राता मम वीरः कुशध्वजः ॥ १३ ॥
|
'महारोमापासून धर्मात्मा स्वर्णरोमाचा जन्म झाला. राजर्षि स्वर्णरोमापासून र्हस्वरोमा उत्पन्न झाले. धर्मज्ञ महात्मा राजा र्हस्वरोमांचे दोन पुत्र उत्पन्न झाले. ज्यांत मीच ज्येष्ठ आहे आणि माझा कनिष्ठ भाऊ वीर कुशध्वज आहे. ॥ १२-१३ ॥
|
मां तु ज्येष्ठं पिता राज्ये सोऽभिषिच्य नराधिपः ।
कुशध्वजं समावेश्य भारं मयि वनं गतः ॥ १४ ॥
|
'माझे पिता मला ज्येष्ठ पुत्राला राज्यावर अभिषिक्त करून शध्वजाचा सर्व भार माझ्यावर सोपवून वनांत निघून गेले. ॥ १४ ॥
|
वृद्धे पितरि स्वर्याते धर्मेण धुरमावहम् ।
भ्रातरं देवसंकाशं स्नेहात् पश्यन् कुशध्वजम् ॥ १५ ॥
|
'वृद्ध पिता स्वर्गवासी झाल्यावर आपल्या देवतुल्य भावाला, कुशध्वजाला, स्नेह दृष्टीने पहात मी या राज्याचा भार धर्मास अनुसरून वाहू लागलो. ॥ १५ ॥
|
कस्यचित्त्वथ कालस्य सांकाश्यादागतः पुरात् ।
सुधन्वा वीर्यवान् राजा मिथिलामवरोधकः ॥ १६ ॥
|
'काही काळानंतर पराक्रमी सुधन्वाने सांकाश्य नगराहून येऊन मिथिलेला चारी बाजूने वेढा घातला. ॥ १६ ॥
|
स च मे प्रेषयामास शैवं धनुरनुत्तमम् ।
सीता कन्या च पद्माक्षी मह्यं वै दीयतामिति ॥ १७ ॥
|
त्याने माझ्याकडे दूत पाठवून कळविले की "तुम्ही शिवाचे परम उत्तम धनुष्य तसेच आपली कमलनयना कन्या सीता हिला माझ्या हवाली करावे." ॥ १७ ॥
|
तस्याप्रदानान्महर्षे युद्धमासीन्मया सह ।
स हतोऽभिमुखो राजा सुधन्वा तु मया रणे ॥ १८ ॥
|
'महर्षे ! मी त्याची मागणी पूरी केली नाही. म्हणून माझ्याशी त्याचे युद्ध सुरू झाले. त्या संग्रामात सन्मुख युद्ध करीत असता राजा सुधन्वा माझ्या हातून मारला गेला. ॥ १८ ॥
|
निहत्य तं मुनिश्रेष्ठ सुधन्वानं नराधिपम् ।
सांकाश्ये भ्रातरं शूरमभ्यषिञ्चं कुशध्वजम् ॥ १९ ॥
|
'मुनिश्रेष्ठ ! राजा सुधन्वाचा वध करून मी सांकाश्या नगराच्या राज्यावर आपल्या शूरवीर भ्रात्याला, कुशध्वजाला अभिषिक्त केले. ॥ १९ ॥
|
कनीयानेष मे भ्राता अहं ज्येष्ठो महामुने ।
ददामि परमप्रीतो वध्वौ ते मुनिपुङ्गव ॥ २० ॥
|
'महामुनि ! हे माझे लहान बंधु कुशध्वज आहेत आणि मी त्याचा मोठा भाऊ आहे. मुनिवर मी अत्यंत प्रसन्नपणे आपल्याला दोन वधु प्रदान करीत आहे. ॥ २० ॥
|
सीतां रामाय भद्रं ते ऊर्मिलां लक्ष्मणाय वै ।
वीर्यशुल्कां मम सुतां सीतां सुरसुतोपमाम् ॥ २१ ॥
द्वितीयामूर्मिलां चैव त्रिर्वदामि न संशयः ।
ददामि परमप्रीतो वध्वौ ते मुनिपुङ्गव ॥ २२ ॥
|
'आपले भले होवो ! मी सीतेला रामासाठी आणि ऊर्मिलेला लक्ष्मणासाठी समर्पित करीत आहे. पराक्रम हेच जिला प्राप्त करण्याचे शुल्क होते, त्या देवकन्येसमान, सुंदर आपली प्रथम कन्या सीता रामासाठी व दुसरी कन्या लक्ष्मणासाठी मी देत आहे. मी या गोष्टी त्रिवार सांगतो, यात संशय नाही. मुनिप्रवर ! मी परम प्रसन्न होऊन आपल्याला दोन वधु देत आहे." ॥ २१-२२ ॥
|
रामलक्ष्मणयो राजन् गोदानं कारयस्व ह ।
पितृकार्यं च भद्रं ते ततो वैवाहिकं कुरु ॥ २३ ॥
|
(वसिष्ठांना असे सांगून राजा जनकांनी महाराज दशरथांना म्हटले) - "राजन् ! आता आपण राम आणि लक्ष्मणांच्या मंगलासाठी त्यांच्याकडून गोदान करवावे. आपले कल्याण होवो. नांदीमुख श्राद्धाचे कार्यही संपन्न करावे. यानंतर विवाहाच्या कार्यास आरंभ करावा. ॥ २३ ॥
|
मघा ह्यद्य महाबाहो तृतीयदिवसे विभो ।
फल्गुन्यामुत्तरे राजंस्तस्मिन् वैवाहिकं कुरु ।
रामलक्ष्मणयोरर्थे दानं कार्यं सुखोदयम् ॥ २४ ॥
|
'महाबाहो ! प्रभो ! आज मघा नक्षत्र आहे. राजन् ! आजपासून तिसर्या दिवशी उत्तम फाल्गुनी नक्षत्रात वैवाहिक कार्य करावे. आज राम-लक्ष्मणांच्या अभ्युदयासाठी (गो, भूमि, तिळ आणि सुवर्ण आदिंचे) दान करविले पाहिजे, कारण ते भविष्यात सुख देणारे असते. ॥ २४ ॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे एकसप्ततितमः सर्गः ॥ ७१ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा एकाहत्तरावा सर्ग समाप्त झाला. ॥ ७१ ॥
|