केकयदेशादुपायनमादाय गार्ग्यस्य गमनं तत्प्रत्तं संदेशमनुसृत्य श्रीरामस्यादेशेन कुमारद्वयसहितस्य भरतस्य गन्धर्वदेशोपर्याक्रमणं कर्तुं प्रस्थानं च -
|
केकय देशातून ब्रह्मर्षि गार्ग्यांचे भेट घेऊन येणे आणि त्यांच्या संदेशानुसार श्रीरामांच्या आज्ञेनुसार कुमारांसहित भरतांचे गंधर्वदेशावर आक्रमण करण्यासाठी प्रस्थान -
|
कस्यचित् त्वथ कालस्य युधाजित् केकयो नृपः । स्वगुरुं प्रेषयामास राघवाय महात्मने ॥ १ ॥
गार्ग्यमङ्गिरसः पुत्रं ब्रह्मर्षिममितप्रभम् ।
|
काही काळानंतर केकयदेशाचा राजा युधाजित यांनी आपले पुरोहित अमित तेजस्वी ब्रह्मर्षि गार्ग्य, जे अंगिरांचे पुत्र होते, महात्मा राघवांकडे धाडले. ॥१ १/२॥
|
दश चाश्वसहस्राणि प्रीतिदानमनुत्तमम् ॥ २ ॥
कम्बलानि च रत्नाानि चित्रवस्त्रमथोत्तमम् । रामाय प्रददौ राजा शुभान्याभरणानि च ॥ ३ ॥
|
त्यांच्याबरोबर श्रीरामचंद्रासाठी परम उत्तम प्रेमोपहाराच्या रूपात अर्पण करण्यासाठी त्यांनी दहा हजार घोडे, बरेच (गालीचे आणि शाल आदि) लोकरीचे सामान, नाना प्रकारची रत्ने, विचित्र-विचित्र सुंदर वस्त्रे तसेच मनोहर आभूषणेही दिली होती. ॥२-३॥
|
श्रुत्वा तु राघवो धीमान् महर्षिं गार्ग्यमागतम् । मातुलस्याश्वपतिनः प्रहितं तन्महाधनम् ॥ ४ ॥
प्रत्युद्गम्य च काकुत्स्थः क्रोशमात्रं सहानुजः । गार्ग्यं सम्पूजयामास यथा शक्रो बृहस्पतिम् ॥ ५ ॥
|
परम बुद्धिमान् श्रीमान् राघवेंद्रांनी जेव्हा ऐकले की मामा अश्वपति पुत्र युधाजितांनी धाडलेले महर्षि गार्ग्य बहुमूल्य भेट-सामग्री घेऊन अयोध्येत येत आहेत तेव्हा त्यांनी भावांसह एक कोस पुढे जाऊन त्यांचे स्वागत केले आणि इंद्र जशी बृहस्पतींची पूजा करतात त्याप्रकारे महर्षि गार्ग्यांचे पूजन (स्वागत-सत्कार) केला. ॥४-५॥
|
तथा सम्पूज्य तमृषिं तद्धनं प्रतिगृह्य च । पृष्ट्वा प्रतिपदं सर्वं कुशलं मातुलस्य च ॥ ६ ॥
उपविष्टं महाभागं रामः प्रष्टुं प्रचक्रमे ।
|
याप्रकारे महर्षिंचा आदर-सत्कार वरून ते धन ग्रहण करून नंतर त्यांनी त्यांचा आणि मामांच्या घरचा सर्व कुशल समाचार विचारला. नंतर जेव्हा ते महाभाग ब्रह्मर्षि सुंदर आसनावर विराजमान झाले तेव्हा श्रीरामांनी त्यांना याप्रमाणे विचारण्यास आरंभ केला. ॥६ १/२॥
|
किमाह मातुलो वाक्यं यदर्थं भगवानिह ॥ ७ ॥
प्राप्तो वाक्यविदां श्रेष्ठः साक्षादिव बृहस्पतिः ।
|
ब्रह्मर्षे ! माझ्या मामांनी काय संदेश दिला आहे, ज्यासाठी साक्षात् बृहस्पतिसमान वाक्यवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ आपण पूज्यपाद महर्षिनी येथे येण्याचे कष्ट केले आहेत ? ॥७ १/२॥
|
रामस्य भाषितं श्रुत्वा महर्षिः कार्यविस्तरम् ॥ ८ ॥
वक्तुं अद्भुतसङ्काशं राघवायोपचक्रमे ।
|
श्रीरामांचे ते भाषण ऐकून महर्षिनी त्यांच्याजवळ अद्भुत कार्यविस्ताराचे वर्णन करण्यास आरंभ केला - ॥८ १/२॥
|
मातुलस्ते महाबाहो वाक्यमाह नरर्षभः ॥ ९ ॥
युधाजित् प्रीतिसंयुक्तं श्रूयतां यदि रोचते ।
|
महाबाहो ! आपले मामा नरश्रेष्ठ युधाजितांनी जो प्रेमपूर्वक संदेश दिला आहे, तो जर रुचकर वाटला तर ऐकावा. ॥९ १/२॥
|
अयं गन्धर्वविषयः फलमूलोपशोभितः ॥ १० ॥
सिन्धोरुभयतः पार्श्वे देशः परमशोभनः ।
|
त्यांनी सांगितले आहे की हा जो फळ-मूळांनी सुशोभित गंधर्वदेश सिंधु नदीच्या दोन्ही तटावर वसलेला आहे, फारच सुंदर आहे. ॥१० १/२॥
|
तं च रक्षन्ति गन्धर्वाः सायुधा युद्धकोविदाः ॥ ११ ॥
शैलूषस्य सुता वीर त्रिस्रः कोट्यो महाबलाः ।
|
वीर रघुनंदन ! गंधर्वराज शैलूषची संताने, तीन कोटी महाबली गंधर्व जे युद्धकलेत कुशल आणि अस्त्रा-शस्त्रांनी संपन्न आहेत, त्या देशाचे रक्षण करत आहेत. ॥११ १/२॥
|
तान् विनिर्जित्य काकुत्स्थ गन्धर्वनगरं शुभम् ॥ १२ ॥
निवेशय महाबोहो स्वे पुरे सुसमाहिते । अन्यस्य न गतिस्तत्र देशः परमशोभनः । रोचतां ते महाबाहो नाहं त्वामहितं वदे ॥ १३ ॥
|
काकुत्स्थ ! महाबाहो ! आपण त्या गंधर्वांना जिंकून तेथे सुंदर गंधर्वनगर वसवावे. आपल्यासाठी उत्तम साधनांनी संपन्न दोन नगरांची निर्मिति करावी. तो देश फारच सुंदर आहे. तेथे दुसर्या कोणाची गति नाही आहे. आपण तो आपल्या अधिकारात घेणे स्वीकार करावे. मी असा सल्ला आपल्याला देणार नाही, जो अहितकारक असेल. ॥१२-१३॥
|
तच्छ्रुत्वा राघवः प्रीतो महर्षेर्मातुलस्य च । उवाच बाढमित्येव भरतं चान्ववैक्षत ॥ १४ ॥
|
महर्षि आणि मामांचे हे कथन ऐकून राघवांना फार प्रसन्नता वाटली. त्यांनी फार चांगले असे म्हणून भरतांकडे पाहिले. ॥१४॥
|
सोऽब्रवीद् राघवः प्रीतः साञ्जलिप्रग्रहो द्विजम् । इमौ कुमारौ तं देशं ब्रह्मर्षे विचरिष्यतः ॥ १५ ॥
भरतस्यात्मजौ वीरौ तक्षः पुष्कल एव च । मातुलेन सुगुप्तौ तु धर्मेण सुसमाहितौ ॥ १६ ॥
|
त्यानंतर श्रीराघवेंद्रांनी त्या महर्षिंना प्रसन्नतापूर्वक हात जोडून म्हटले - ब्रह्मर्षे ! हे दोन्ही कुमार तक्ष आणि पुष्कल जे भरतांचे वीर पुत्र आहेत त्या देशात विचरतील आणि मामांच्या द्वारे सुरक्षित राहून धर्मपूर्वक एकाग्रचित्त होऊन त्या देशाचे शासन करतील. ॥१५-१६॥
|
भरतं चाग्रतः कृत्वा कुमारौ सबलानुगौ । निहत्य गन्धर्वसुतान् द्वे पुरे विभजिष्यतः ॥ १७ ॥
|
हे दोन्ही कुमार भरतांना पुढे ठेवून सेना आणि सेवकांसहित तेथे जातील तसेच त्या गंधर्वपुत्रांचा संहार करून अलग अलग दोन नगरे वसवतील. ॥१७॥
|
निवेश्य ते पुरवरे आत्मजौ सन्निवेश्य च । आगमिष्यति मे भूयः सकाशमतिधार्मिकः ॥ १८ ॥
|
त्या दोन श्रेष्ठ नगरांना वसवून त्यांत आपल्या दोन्ही पुत्रांना स्थापित करून अत्यंत धर्मात्मा भरत, परत माझ्याकडे येतील. ॥१८॥
|
ब्रह्मर्षिमेवमुक्त्वा तु भरतं सबलानुगम् । आज्ञापयामास तदा कुमारौ चाभ्यषेचयत् ॥ १९ ॥
|
ब्रह्मर्षिंना असे सांगून श्रीरामचंद्रांनी भरतांना तेथे सेनेसहित बरोबर जाण्याची आज्ञा दिली आणि दोन्ही कुमारांचा प्रथमच राज्याभिषेक करून टाकला. ॥१९॥
|
नक्षत्रेण च सौम्येन पुरस्कृत्य अङ्गिरःसुतम् । भरतः सह सैन्येन कुमाराभ्यां विनिर्ययौ ॥ २० ॥
|
त्यानंतर सौम्य नक्षत्रांत (मृगशीर्ष) अंगिरांचे पुत्र महर्षि गार्ग्य यांना पुढे करून सेना आणि कुमारांसह भरतांनी यात्रा केली. ॥२०॥
|
सा सेना शक्रयुक्तेव नगरान्निर्ययावथ । राघवानुगता दूरं दुराधर्षा सुरैरपि ॥ २१ ॥
|
इंद्रद्वारा प्रेरित झालेल्या देवसेने समान ती सेना नगरांतून बाहेर पडली. भगवान् श्रीरामही दूरपर्यंत तिच्या बरोबर बरोबर गेले. ती देवतांसाठी ही दुर्जय होती. ॥२१॥
|
मांसाशिनश्च ये सत्त्वा रक्षांसि सुमहान्ति च । अनुजग्मुर्हि भरतं रुधिरस्य पिपासया ॥ २२ ॥
|
मांसाहारी जंतु आणि मोठमोठे राक्षस युद्धात रक्तपानाच्या इच्छेने भरतांच्या पाठोपाठ गेले. ॥२२॥
|
भूतग्रामाश्च बहवो मांसभक्षाः सुदारुणाः । गन्धर्वपुत्रमांसानि भोक्तुकामाः सहस्रशः ॥ २३ ॥
|
अत्यंत भयंकर कित्येक हजार मांसभक्षी भूतसमूह गंधर्वपुत्रांचे मांस खाण्यासाठी त्या सेनेच्या बरोबर गेले. ॥२३॥
|
सिंहव्याघ्रवराहाणां खेचराणां च पक्षिणाम् । बहूनि वै सहस्राणि सेनाया ययुरग्रतः ॥ २४ ॥
|
सिंह, व्याघ्र, डुक्करे आणि आकाशचारी पक्षी कित्येक हजारांच्या संख्येने सेनाच्या पुढे पुढे चालू लागले. ॥२४॥
|
अध्यर्धमासमुषिता पथि सेना निरामया । हृष्टपुष्टजनाकीर्णा केकयं समुपागमत् ॥ २५ ॥
|
मार्गात दीड महिना घालवून हृष्ट-पुष्ट मनुष्यांनी भरलेली ती सेना कुशलपूर्वक केकय देशात जाऊन पोहोंचली. ॥२५॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे शततमः सर्गः ॥ १०० ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा शंभरावा सर्ग पूरा झाला. ॥१००॥
|