प्रहस्त दुर्मुख वज्रदंष्ट्र निकुंभ वज्रहनुभी रावणस्य समक्षं शत्रुसेनां निपातयितुं स्वोत्साहस्य प्रदर्शनम् -
|
प्रह्स्त, दुर्मुख, वज्रदंष्ट्र, निकुम्भ आणि वज्रहनु यांचे रावणासमोर शत्रु-सैन्याला ठार मारण्यासंबंधी उत्साह दाखविणे -
|
ततो नीलाम्बुदप्रख्यः प्रहस्तो नाम राक्षसः । अब्रवीत् प्राञ्जलिर्वाक्यं शूरः सेनापतिस्तदा ॥ १ ॥
|
यानंतर नील मेघासमान श्याम वर्णाच्या शूर सेनापति प्रहस्त नामक राक्षसाने हात जोडून म्हटले- ॥१॥
|
देवदानवगंधर्वाः पिशाचपतगोरगाः । न त्वां धर्षयितुं शक्याः किं पुनर्मानवौ रणे ॥ २ ॥
|
महाराज ! आपण सर्व देवता, दानव, गंधर्व, पिशाच, पक्षी आणि सर्व सर्वांना पराजित करू शकतो, मग त्या दोन मनुष्यांना रणभूमी मध्ये हरविणे काय मोडी अवघड गोष्ट आहे. ॥२॥
|
सर्वे प्रमत्ता विश्वस्ता वञ्चिताः स्म हनूमता । न हि मे जीवतो गच्छेत् जीवन् स वनगोचरः ॥ ३ ॥
|
प्रथम आपण असावधान होतो. आमच्या मनात शत्रुंच्या संबंधी काही शंका नव्हती, म्हणून आम्ही निश्चिंत बसलो होतो. हेच कारण आहे की ज्यायोगे हनुमानांनी आम्हांला धोका दिला. नाही तर मी जिवंत असतांना तो वानर येथून जिवंतपणे जाऊच शकला नसता. ॥३॥
|
सर्वां सागरपर्यन्तां सशैलवनकाननाम् । करोम्यवानरां भूमिं आज्ञापयतु मां भवान् ॥ ४ ॥
|
जर आपली आज्ञा होईल तर पर्वत, वन आणि काननांसह समुद्र पर्यंतची सारी भूमि वानरहीन करून टाकीन. ॥४॥
|
रक्षां चैव विधास्यामि वानराद् रजनीचर । नागमिष्यति ते दुःखं किञ्चिदात्मापराधजम् ॥ ५ ॥
|
राक्षसराज ! मी वानरमात्रापासून आपले रक्षण करीन, म्हणून आपल्या द्वारा केल्या गेलेल्या सीता-हरणरूपी अपराधामुळे कुठलेही दु:ख आपल्यावर येऊ शकणार नाही. ॥५॥
|
अब्रवीत् तु सुसंक्रुद्धो दुर्मुखो नाम राक्षसः । इदं न क्षमणीयं हि सर्वेषां नः प्रधर्षणम् ॥ ६ ॥
|
तत्पश्चात् दुर्मुख नामक राक्षसाने अत्यंत कुपित होऊन म्हटले- हा क्षमा करण्यायोग्य अपराध नाही आहे; कारण की याच्या द्वारे आम्हा सर्वांचा तिरस्कार (अपमान) झाला आहे. ॥६॥
|
अयं परिभवो भूयः पुरस्यान्तःपुरस्य च । श्रीमतो राक्षसेन्द्रस्य वानरेण प्रधर्षणम् ॥ ७ ॥
|
वानराकडून आम्हावर जे आक्रमण झाले आहे, हे समस्त लंकापुरीचा महाराजांच्या अंत:पुराचा आणि श्रीमान् राक्षसराज रावणांचा ही फार मोठा पराभव आहे. ॥७॥
|
अस्मिन् मुहूर्ते गत्वैको निवर्तिष्यामि वानरान् । प्रविष्टान् सागरं भीमं अंबरं वा रसातलम् ॥ ८ ॥
|
मी आत्ता याच मुहूर्तावर एकटाच जाऊन सर्व वानरांना मारून पळवून लावीन. मग भले ही ते भयंकर समुद्रात, आकाशात अथवा रसातळात कां घुसलेले असेनात. ॥८॥
|
ततोऽब्रवीत् सुसंक्रुद्धो वज्रदंष्ट्रो महाबलः । प्रगृह्य परिघं घोरं मांसशोणितरूषितम् ॥ ९ ॥
|
इतक्यांतच महाबळी वज्रदंष्ट्र अत्यंत क्रोधाविष्ट होऊन रक्त, मांसानी लडबडलेल्या भयानक परिघास हातात घेऊन बोलला- ॥९॥
|
किं नो हनुमता कार्यं कृपणेन तपस्विना । रामे तिष्ठति दुर्धर्षे सुग्रीवेऽपि सलक्ष्मणे ॥ १० ॥
|
दुर्जय वीर राम, सुग्रीव आणि लक्ष्मण विद्यमान असता आम्हांला त्या बिचार्या तपस्वी हनुमानाशी काय काम आहे ? ॥१०॥
|
अद्य रामं ससुग्रीवं परिघेण सलक्ष्मणम् । आगमिष्यामि हत्वैको विक्षोभ्य हरिवाहिनीम् ॥ ११ ॥
|
आज मी एकटाच वानरसेनेमध्ये खळबळ उडवून देईन आणि या परिघाने सुग्रीव तसेच लक्ष्मणासहित रामांना ठार मारूनच परत येईन. ॥११॥
|
इदं ममापरं वाक्यं शृणु राजन् यदिच्छसि । उपाय कुशलो ह्येव जयेत् शत्रून् अतन्द्रितः ॥ १२ ॥
|
राजन ! जर आपली इच्छा असेल तर आपण माझी दुसरी गोष्ट ऐका. उपायकुशल पुरूष जर आळस सोडून प्रयत्न करील तर तोही शत्रूवर विजय मिळवू शकतो. ॥१२॥
|
कामरूपधराः शूराः सुभीमा भीमदर्शनाः । राक्षसा वा सहस्राणि राक्षसाधिप निश्चिताः ॥ १३ ॥
काकुत्स्थमुपसङ्गम्य बिभ्रतो मानुषं वपुः । सर्वे ह्यसंभ्रमा भूत्वा ब्रुवन्तु रघुसत्तमम् ॥ १४ ॥
प्रेषिता भरतेनैव भ्रात्रा तव यवीयसा । स हि सेनां समुत्थाप्य क्षिप्रमेवोपयास्यति ॥ १५ ॥
|
म्हणून राक्षसराज ! माझा दुसरा सल्ला असा आहे की इच्छेनुसार रूप धारण करणारे, अत्यंत भयानक तसेच भयंकर दृष्टि असणारे हजारो शूरवीर राक्षस एक निश्चित विचार करून मनुष्यांचे रूप धारण करून रामांच्या जवळ जावोत आणि सर्वजण जराही न कचरता त्या रघुवंशशिरोमणिला म्हणोत की आम्ही आपले सैनिक आहोत, आम्हांला आपला लहान भाऊ भरतांनी धाडले आहे. इतके ऐकताच ते वानरसेनेला उठवून तात्काळ लंकेवर आक्रमण करण्यासाठी तेथून निघतील. ॥१३-१५॥
|
ततो वयमितस्तूर्णं शूलशक्तिगदाधराः । चापबाणासिहस्ताश्च त्वरितास्तत्र यामहे ॥ १६ ॥
|
त्यानंतर आम्ही सर्व येथून शूल, शक्ति, गदा, धनुष्य, बाण आणि खङ्ग धारण करून शीघ्रच मार्गात त्यांच्या जवळ जाऊन पोहोचू. ॥१६॥
|
आकाशे गणशः स्थित्वा हत्वा तां हरिवाहिनीम् । अश्मशस्त्रमहावृष्ट्या प्रापयाम यमक्षयम् ॥ १७ ॥
|
नंतर आकाशात अनेक यूथ बनवून उभे राहू आणि दगडांनी तसेच शस्त्र समूहांची मोठी वृष्टि करून त्या वानरसेनेला यमलोकात पोहोचवून देऊ. ॥१७॥
|
एवं चेदुपसर्पेतां अनयं रामसक्ष्मणौ । अवश्यमपनीतेन जहतामेव जीवितम् ॥ १८ ॥
|
जर याप्रमाणे आमचे म्हणणे ऐकून ते दोघे भाऊ राम आणि लक्ष्मण सेनेला कूच करण्याची आज्ञा देतील आणि तेथून निघतील तर त्यांना आमच्या अनीतिची शिकार व्हावे लागेल, त्यांना आमच्या छलपूर्ण प्रहारांनी पीडित होऊन आपल्या प्राणांचा परित्याग करावा लागेल. ॥१८।
|
कौम्भकर्णिस्ततो वीरो निकुम्भो नाम वीर्यवान् । अब्रवीत् परमक्रुद्धो रावणं लोकरावणम् ॥ १९ ॥
|
त्यानंतर पराक्रमी वीर कुंभकर्णकुमार निकुंभाने अत्यंत कुपित होऊन समस्त लोकांना रडविणार्या रावणास म्हटले- ॥१९॥
|
सर्वे भवन्तस्तिष्ठन्तु महाराजेन संगताः । अहमेको हनिष्यामि राघवं सहलक्ष्मणम् ॥ २० ॥
सुग्रीवं च हनूमन्तं सर्वांश्चैवात्र वानरान् ।
|
आपण सर्व लोक येथे महाराजांच्या बरोबर गुपचुप बसून रहा. मी एकटाच राम, लक्ष्मण, सुग्रीव, हनुमान् तसेच अन्य सर्व वानरांनाही येथे मृत्युच्या स्वाधीन करीन. ॥२० १/२॥
|
ततो वज्रहनुर्नाम राक्षसः पर्वतोपमः ॥ २१ ॥
क्रुद्धः परिलिहन् सृक्कां जिह्वया वाक्यमब्रवीत् ।
|
तेव्हा पर्वतासमान विशालकाय वज्रहनु नामक राक्षस कुपित होऊन जीभेने आपला जबडा चाटीत बोलला- ॥२१ १/२॥
|
स्वैरं कुर्वन्तु कार्याणि भवन्तो विगतज्वराः ॥ २२ ॥
एकोऽहं भक्षयिष्यामि तान् सर्वान् हरिवाहिनीम् ।
|
आता आपण सर्व लोक निश्चिंत होऊन इच्छेनुसार आपले आपले काम करा. मी एकटाच सार्या वानरसेनेला खाऊन टाकीन. ॥२२ १/२॥
|
स्वस्थाः क्रीडन्तु निश्चिन्ताः पिबन्तो मधु वारुणीम् ॥ २३ ॥
अहमेको वधिष्यामि सुग्रीवं सहलक्ष्मणम् । साङ्गदं च हनूमन्तं सर्वांश्चैवात्र वानरान् ॥ २४ ॥
|
आपण लोक स्वस्थ राहून क्रीडा करावी आणि निश्चिंत होऊन वारूणी मदिरा प्यावी. मी एकटाच सुग्रीव, लक्ष्मण, अंगद, हनुमान् आणि अन्य सर्व वानरांचा ही येथे वध करून टाकीन. ॥२३-२४॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे अष्टमः सर्गः ॥ ८ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा आठवा सर्ग पूरा झाला. ॥८॥
|