श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ द्विसप्ततितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

रावणस्य चिन्ता, पुरीरक्षणायावधानार्थं राक्षसान् प्रत्यादेशश्च -
रावणाची चिंता तसेच त्याचा राक्षसांना पुरीचे रक्षणासाठी सावधान राहण्याचा आदेश -
अतिकायं हतं श्रुत्वा लक्ष्मणेन महात्मना ।
उद्वेगमगमद् राजा वचनं चेदमब्रवीत् ॥ १ ॥
महात्मा लक्ष्मणाच्या द्वारे अतिकाय मारला गेल्याचे ऐकून राजा रावण उद्विग्न झाला आणि याप्रकारे बोलला- ॥१॥
धूम्राक्षः परमामर्षी सर्वशस्त्रभृतां वरः ।
अकम्पनः प्रहस्तश्च कुंभकर्णस्तथैव च ॥ २ ॥

एते महाबला वीरा राक्षसा युद्धकाङ्‌क्षिणः ।
जेतारः परसैन्यानां परैर्नित्यापराजिताः ॥ ३ ॥
अत्यंत अमर्षशील धूम्राक्ष, संपूर्ण शस्त्रधार्‍यामध्ये श्रेष्ठ अकंपन, प्रहस्त तथा कुंभकर्ण - हे महाबली वीर राक्षस सदा युद्धाची अभिलाषा ठेवत होते. ते सर्वच्या सर्व शत्रुंच्या सेनांवर विजय मिळवत असत आणि स्वतः विपक्षियांकडून कधी पराजित होत नव्हते. ॥२-३॥
ससैन्यास्ते हता रामेणाक्लिष्टकर्मणा ।
राक्षसाः सुमहाकाया नानाशस्त्रविशारदाः ॥ ४ ॥
परंतु अनायासही महान्‌ कर्म करणार्‍या रामांनी नाना प्रकारच्या शस्त्रांच्या ज्ञानात निपुण त्या विशालकाय वीर राक्षसांचा सेनेसहित संहार करून टाकला. ॥४॥
अन्ये च बहवः शूरा महात्मानो निपातिताः ।
प्रख्यातबलवीर्येण पुत्रेणेन्द्रजिता मम ॥ ५ ॥

तौ भ्रातरौ तदा बद्धौ घोरैर्दत्तवरैः शरैः ।
यन्न शक्यं सुरैः सर्वैः असुरैर्वा महाबलैः ॥ ६ ॥

मोक्तुं तद् बंधनं घोरं यक्षगन्धर्वपन्नगैः ।
तन्न जाने प्रभावैर्वा मायया मोहनेन वा ॥ ७ ॥
आणखीही बरेचसे महामनस्वी शूरवीर राक्षस त्यांच्या द्वारा मारले गेले. ज्याचे बळ आणि पराक्रम सर्वत्र विख्यात आहे त्या माझ्या मुलाने - इंद्रजिताने त्या दोघा भावांना वरदानप्राप्त घोर नागस्वरूप बाणांनी बांधून ठेवले होते. ते घोर बंधन समस्त देवता आणि महाबली असुरही सोडवू शकत नव्हते. यक्ष, गंधर्व आणि नागांसाठीही त्या बंधनापासून सुटका करणे असंभव होते, तरीही ते दोघे बंधु राम आणि लक्ष्मण त्या बाण-बंधनातून मुक्त झाले. न जाणो कुठला प्रभाव होता, कशी माया होती अथवा कसल्या प्रकारची मोहिनी औषधी आदिचा प्रयोग केला गेला होता; ज्यायोगे ते त्या बंधनातून सुटले. ॥५-७॥
शरबंधाद् विमुक्तौ तौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।
ये योधा निर्गताः शूरा राक्षसा मम शासनात् ॥ ८ ॥

ते सर्वे निहता युद्धे वानरैः सुमहाबलैः ।
माझ्या आज्ञेने जे जे शूरवीर योद्धे राक्षस युद्धासाठी निघाले, त्या सर्वांना समरांगणामध्ये महाबली वानरांनी मारून टाकले. ॥८ १/२॥
तं न पश्याम्यहं युद्धे योऽद्य रामं सलक्ष्मणम् ॥ ९ ॥

शासयेत् सबलं वीरं ससुग्रीवं विभीषणम् ।
मी आज अशा कुणा वीराला पहात नाही आहे जो युद्धात लक्ष्मणासहित रामाला आणि सेना तसेच सुग्रीवासहित वीर विभीषणाला नष्ट करेल. ॥९ १/२॥
अहो सुबलवान् रामो महदस्त्रबलं च वै ॥ १० ॥

यस्य विक्रममासाद्य राक्षसा निधनं गताः ।
अहो ! राम फार बलवान्‌ आहेत, निश्चितच त्यांचे अस्त्र-बल महान आहे, ज्यांच्या बल-विक्रमाचा सामना करून असंख्य राक्षस काळाच्या मुखात गेले. ॥१० १/२॥
तं मन्ये राघवं वीरं नारायणमनामयम् ॥ ११ ॥

तद्‌भयाद्धि पुरी लङ्‌का पिहितद्वारतोरणा ।
मी त्या वीर राघवास रोग-शोक रहित साक्षात्‌ नारायणरूप मानत आहे, कारण त्यांच्या भयाने लंकापुरीची सारी द्वारे आणि सदर फाटके सदा बंद राहात आहेत. ॥११ १/२॥
अप्रमत्तैश्च सर्वत्र गुल्मे रक्ष्या पुरी त्वियम् ॥ १२ ॥

अशोकवनिका चैव यत्र सीताभिरक्ष्यते ।
राक्षसांनो ! तुम्ही लोक प्रत्येक वेळी सावधान राहून सैनिकांसहित या पुरीचे आणि जेथे सीता ठेवली गेली आहे त्या अशोक - शिविर वाटिकेचे विशेषरूपाने रक्षण करा. ॥१२ १/२॥
निष्क्रामो वा प्रवेशो वा ज्ञातव्यः सर्वथैव नः ॥ १३ ॥

यत्र यत्र भवेद् गुल्मस्तत्रतत्र पुनः पुनः ।
सर्वतश्चापि तिष्ठध्वं स्वैः स्वैः परिवृता बलैः ॥ १४ ॥
अशोक - वाटिकेत केव्हा कोण प्रवेश करत आहे आणि केव्हा तेथून बाहेर पडत आहे, त्याची आपण सदाच माहिती प्राप्त केली पाहिजे. जेथे जेथे सैनिकांची शिबिरे आहेत तेथे वारंवार लक्ष ठेवावे, सर्व बाजूस आपापल्या सैनिकांसह पहार्‍यावर राहावे. ॥१३-१४॥
द्रष्टव्यं च पदं तेषां वानराणां निशाचराः ।
प्रदोषे वाऽर्धरात्रे वा प्रत्यूषे वापि सर्वशः ॥ १५ ॥
निशाचरांनो ! प्रदोषकाळ, अर्धीरात्र तसेच प्रातःकाळीही सर्वथा वानरांच्या येण्या-जाण्यावर दृष्टि ठेवा. ॥१५॥
नावज्ञा तत्र कर्तव्या वानरेषु कदाचन ।
द्विषतां बलमुद्युक्तं आपतत् किं स्थितं यथा ॥ १६ ॥
वानरांच्या विषयी कधी उपेक्षाभाव ठेवता कामा नये आणि सदा शत्रूंची सेना युद्धासाठी उद्यमशील तर नाही ना या गोष्टीवर दृष्टि ठेवली पाहिजे. आक्रमण तर करत नाहीत ना अथवा पूर्ववत्‌ जेथल्या तेथेच उभी आहे ना ? ॥१६॥
ततस्ते राक्षसाः सर्वे श्रुत्वा लङ्‌काधिपस्य तत् ।
वचनं सर्वमातिष्ठन् यथावत् तु महाबलाः ॥ १७ ॥
लंकापतिचा हा आदेश ऐकून समस्त महाबली राक्षस त्या सर्व गोष्टींचे यथावत्‌ रूपाने पालन करू लागले. ॥१७॥
तान् सर्वान् हि समादिश्य रावणो राक्षसाधिपः ।
मन्युशल्यं वहन् दीनः प्रविवेश स्वमालयम् ॥ १८ ॥
त्या सर्वांना पूर्वोक्त आदेश देऊन राक्षसराज रावण आपल्या हृदयांत सलणारे दुःख आणि क्रोधरूपी काट्‍याच्या पीडेचा भार वाहत, दीन भावाने आपल्या महालात गेला. ॥१८॥
ततः स संदीपितकोपवह्निः
निशाचराणामधिपो महाबलः ।
तदेव पुत्रव्यसनं विचिन्तयन्
मुहुर्मुहुश्चैव तदा व्यनिःश्वसन् ॥ १९ ॥
महाबली निशाचरराज रावणाचा क्रोधाग्नि भडकला होता. तो आपल्या पुत्राच्या मृत्युचेच स्मरण करत त्यासमयी वारंवार दीर्घ श्वास घेत राहिला होता. ॥१९॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे द्विसप्ततितमः सर्गः ॥ ७२ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा बहात्तरावा सर्ग पूरा झाला. ॥७२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP