वसिष्ठाज्ञया पञ्चानां दूतानामयोध्यातः केकयदेशस्य राजगृहे नगरे गमनम् -
|
वसिष्ठांच्या आज्ञेने पाच दूतांचे अयोध्येहून केकयदेशाच्या राजगृह नगरात जाणे -
|
तेषां तद् वचनं श्रुत्वा वसिष्ठः प्रत्युवाच ह ।
मित्रामात्यगणान् सर्वान् ब्राह्मणांस्तानिदं वचः ॥ १ ॥
|
मार्कण्डेय आदिंचे असे वचन ऐकून महर्षि वसिष्ठांनी मित्र मन्त्री आणि त्या समस्त ब्राह्मणांना या प्रकारे उत्तर दिले. ॥ १ ॥
|
यदसौ मातुलकुले दत्तराज्यः परं सुखी ।
भरतो वसति भ्रात्रा शत्रुघ्नेन समन्वितः ॥ २ ॥
|
’राजा दशराथांनी ज्यांना राज्य दिले आहे ते भरत या समयी आपला भाऊ शत्रुघ्न यांच्यासह मामाच्या घरी अत्यन्त सुखात प्रसन्नतेने निवास करीत आहेत. ॥ २ ॥
|
तच्छीघ्रं जवना दूता गच्छन्तु त्वरितं हयैः ।
आनेतुं भ्रातरौ वीरौ किं समीक्षामहे वयम् ॥ ३ ॥
|
’त्या दोन्ही वीर बन्धुंना बोलाविण्यासाठी तात्काळ वेगाने चालणारे दूत घोड्यांवर स्वार होऊन येथून जाऊ देत. याशिवाय आपण (दुसरा) काय विचार करू शकतो. ॥ ३ ॥
|
गच्छन्त्विति ततः सर्वे वसिष्ठं वाक्यमब्रुवन् ।
तेषां तद्वचनं श्रुत्वा वसिष्ठो वाक्यमब्रवीत् ॥ ४ ॥
|
यावर सर्वांनी वसिष्ठांनी म्हटले- हाँ ! दूत अवश्य धाडले जावेत ! त्यांचे हे कथन ऐकून वसिष्ठांनी दूतांना सम्बोधित करून म्हटले- ॥ ४ ॥
|
एहि सिद्धार्थ विजय जयन्ताशोकनन्दन ।
श्रूयतामितिकर्तव्यं सर्वानेव ब्रवीमि वः ॥ ५ ॥
|
’सिध्दार्थ ! विजय ! जयंत ! अशोक ! आणि नंदन ! तुम्ही सर्व येथे या तुम्हांला जे काम करावयाचे आहे ते ऐका. मी तुम्हा सर्वांना ते सांगतो. ॥ ५ ॥
|
पुरं राजगृहं गत्वा शीघ्रं शीघ्रजवैर्हयैः ।
त्यक्तशोकैरिदं वाच्यः शासनाद् भरतो मम ॥ ६ ॥
|
’तुम्ही सर्व वेगवान (शीघ्रगामी) घोड्यांवर स्वार होऊन तात्काळच राजगृह नगराला जा आणि शोकाचा भाव प्रकट न करतां माझ्या आज्ञेस अनुसरून भरताला याप्रकारे सांगा- ॥ ६ ॥
|
पुरोहितस्त्वां कुशलं प्राह सर्वे च मन्त्रिणः ।
त्वरमाणश्च निर्याहि कृत्यमात्ययिकं त्वया ॥ ७ ॥
|
’कुमार ! पुरोहित आणि समस्त मन्त्रांनी आपल्याला कुशल-मंगल सांगितले आहे. आता आपण येथून तात्काल (लवकरच) निघावे. अयोध्येमध्ये आपल्या साठी आवश्यक कार्य आहे. ॥ ७ ॥
|
मा चास्मै प्रोषितं रामं मा चास्मै पितरं मृतम् ।
भवन्तः शंसिषुर्गत्वा राघवाणामितः क्षयम् ॥ ८ ॥
|
’भरतांना श्रीरामांचा वनवास आणि पित्याच्या मृत्युविषयी काही सांगू नका आणि या परिस्थितीमुळे रघुवंशियांमध्ये येथे जो हलकल्लोळ उडाला आहे त्याची ही चर्चा करू नका. ॥ ८ ॥
|
कौशेयानि च वस्त्राणि भूषणानि वराणि च ।
क्षिप्रमादाय राज्ञश्च भरतस्य च गच्छत ॥ ९ ॥
|
’केकयराज आणि भरत यांना भेट देण्यासाठी रेशमी वस्त्रे आणि उत्तम आभूषणे घेऊन तुम्ही येथून लवकर चालू लागा. ॥ ९ ॥
|
दत्तपथ्यशना दूता जग्मुः स्वं स्वं निवेशनम् ।
केकयांस्ते गमिष्यन्तो हयानारुह्य सम्मतान् ॥ १० ॥
|
’केकय देशाला जाणार्या त्या दूतांनी प्रवास खर्च घेऊन उत्तम घोड्यावर बसून ते आपापल्या घरी गेले. ॥ १० ॥
|
ततः प्रास्थानिकं कृत्वा कार्यशेषमनन्तरम् ।
वसिष्ठेनाभ्यनुज्ञाता दूताः संत्वरिता ययुः ॥ ११ ॥
|
त्यानंतर यात्रे सम्बन्धी शेष तयारी पूरी करून वसिष्ठांची आज्ञा घेऊन सर्व दूत तात्काळ तेथून प्रस्थापित झाले. ॥ ११ ॥
|
न्यन्तेनापरतालस्य प्रलम्बस्योत्तरं प्रति ।
निषेवमाणास्ते जग्मुर्नदीं मध्येन मालिनीम् ॥ १२ ॥
|
अपरताल नामक पर्वताचे अन्तिम टोक अर्थात दक्षिणभाग आणि प्रलम्बगिरीच्या उत्तरभगात दोन पर्वतांच्या मधून वाहाणार्या मालिनी नदीच्या तटावर जाऊन ते दूत पुढे निघाले. ॥ १२ ॥
|
ते हस्तिनपुरे गङ्गां तीर्त्वा प्रत्यङ्मुखा ययुः ।
पाञ्चालदेशमासाद्य मध्येन कुरुजाङ्ग्लम् ॥ १३ ॥
|
हस्तिनापुरात गंगेला पार करून ते पश्चिमकडे गेले आणि पान्चाल देशात पोहोचून कुरूजाङ्गल प्रदेशाच्या मध्यभागांतून पुढे निघाले. ॥ १३ ॥
|
सरांसि च सुफुल्लानि नदीश्च विमलोदकाः ।
निरीक्षमाणाजग्मुस्ते दूताः कार्यवशाद् द्रुतम् ॥ १४ ॥
|
मार्गात सुंदर फुलांनी सुशोभित सरोवरे आणि निर्मल जल असणार्या नद्यांचे दर्शन करीत ते दूत कार्यवश तीव्र गतीने पुढे जाऊ लागले. ॥ १४ ॥
|
ते प्रसन्नोदकां दिव्यां नानाविहगसेविताम् ।
उपातिजग्मुर्वेगेन शरदण्डां जनाकुलाम् ॥ १५ ॥
|
त्यानंतर ते स्वच्छ जलाने सुशोभित, पाण्यांनी भरलेल्या आणि विविध प्रकारच्या पक्ष्यांनी सेवित दिव्य नदी शरदण्डेच्या तटावर पोहोचून वेगपूर्वक तिला ओलांडून गेले. ॥ १५ ॥
|
निकूलवृक्षमासाद्य दिव्यं सत्योपयाचनम् ।
अभिगम्याभिवाद्यं तं कुलिड्गां प्राविशन् पुरीम् ॥ १६ ॥
|
शरदण्डेच्या पश्चिम तटावर एक दिव्य वृक्ष होता, त्याच्यावर कुणा देवतेचे वास्तव्य होते म्हणून तेथे जी याचना केली जात असे ती सत्य होत असे; म्हणून त्याचे नाव सत्योपयाचन झाले होते. त्या वन्दनीय वृक्षाच्या निकट पोहोचून दूतांनी त्याची परिक्रमा केली आणि तेथून पुढे जाऊन त्यांनी कुलिङ्गा नामक पुरीमध्ये प्रवेश केला. ॥ १६ ॥
|
अभिकालं ततः प्राप्य तेजोऽभिभवनाच्च्युताः ।
पितृपैतामहीं पुण्यां तेरुरिक्षुमतीं नदीम् ॥ १७ ॥
|
तेथून ते जोडभिन्नवन नामक गावाला पार करून ते अभिकाल नामक गावात पोहोचले आणि तेथून पुढे गेल्यावर त्यांनी राजा दशरथांच्या पिता-पितामहांच्या द्वारे सेवित पुण्यसलिला इक्षुमती नदीला पार केले. ॥ १७ ॥
|
अवेक्ष्याञ्जलिपानांश्च ब्राह्मणान् वेदपारगान् ।
ययुर्मध्येन बाह्लीकान् सुदामानं च पर्वतम् ॥ १८ ॥
|
तेथे केवळ अंजलिभर जल पिऊन तपस्या करणार्या वेदांच्या पारगामी ब्राह्मणांचे दर्शन करून ते दूत बाह्लीक देशाच्या मध्यभागी स्थित सुदामानामक पर्वताजवळ जाऊन पोहोंचले. ॥ १८ ॥
|
विष्णोः पदं प्रेक्ष्यमाणा विपाशां चापि शाल्मलीम् ।
नदीर्वापीतटाकानि पल्वलानि सरांसि च ॥ १९ ॥
पश्यन्तो विविधांश्चापि सिंहान् व्याघ्र्यान् मृगान् द्विपान् ।
ययुः पथातिमहता शासनं भर्तुरीप्सवः ॥ २० ॥
|
त्या पर्वतशिखरावर स्थित भगवान विष्णूंच्या चरणचिह्नांचे दर्शन करून ते विपाशा (व्यास) नदी आणि तिच्या तट्वर्ती शाल्मली वृक्षाच्या निकट गेले. तेथून पुढे गेल्यावर बर्याचशा नद्या, विहिरी, पुष्करिणी, लहान तलाव, सरोवरे आणि विविध प्रकारचे वनजन्तुंचे - सिंह, व्याघ्र, मृग, आणि हत्ती यांचे दर्शन करीत ते दूत अत्यन्त विशाल मार्गाने पुढे जाऊ लागले. ते आपल्या स्वामींच्या आज्ञेचे (शीघ्र) तात्काळ पालन करण्याची इच्छा बाळगीत होते. ॥ १९-२० ॥
|
ते श्रान्तवाहना दूता विकृष्टेन सता पथा ।
गिरिव्रजं पुरवरं शीघ्रमासेदुरञ्जसा ॥ २१ ॥
|
त्या दूतांची वाहने (घोडे) चालता चालता थकून गेले होते. हा मार्ग अत्यन्त दूरचा असूनही उपद्रव रहित होता. तो पार करून सारे दूत लवकरच कुठल्याही कष्टाशिवाय श्रेष्ठ नगर गिरिव्रजमध्ये जाऊन पोहोंचले. ॥ २१ ॥
|
भर्तुः प्रियार्थं कुलरक्षणार्थं
भर्तुश्च वंशस्य परिग्रहार्थम् ।
अहेडमानास्त्वरया स्म दूता
रात्र्यां तु ते तत्पुरमेव याताः ॥ २२ ॥
|
आपले स्वामी (आज्ञा देणारे वसिष्ठ मुनि) यांचे प्रिय आणि प्रजावर्गाचे रक्षण करण्यासाठी आणि महाराज दशरथांचे वंशपरम्परागत राज्य भरताकडून स्वीकारले जावे म्हणून सादर तप्तर झालेले ते दूत उतावळेपणाने चालून एका रात्री त्या नगरात जाऊन पोहोंचले. ॥ २२ ॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे अष्टषष्टितमः सर्गः ॥ ६८ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा अडुसष्टावा सर्ग पूरा झाला ॥ ६८ ॥
|