वसिष्ठवामदेवौ प्रति श्रीरामराज्याभिषेकसामग्रीसंग्रहार्थं राज्ञो दशरथस्यानुरोधस्ताभ्यां सेवकान् प्रति तदनुरूपादेशस्य दानम् राजाज्ञया सुमन्त्रेण श्रीरामस्य राजसभायामानयनं राज्ञा श्रीरामं प्रति हितस्योपदेशश्च -
|
राजा दशरथांनी वसिष्ठ आणि वामदेव यांना श्रीरामाच्या राज्याभिषेकाची तयारी करण्यास सांगणे आणि त्यांनी सेवकांना त्याप्रमाणे आदेश देणे, राजाच्या आज्ञेने सुमंत्रांनी श्रीरामांना राजसभेत बोलावून आणणे आणि राजांनी आपला पुत्र श्रीराम यांस हितकर राजनीतिच्या गोष्टी सांगणे -
|
तेषामञ्जलिपद्मानि प्रगृहीतानि सर्वशः ।
प्रतिगृह्याब्रवीद् राजा तेभ्यः प्रियहितं वचः ॥ १ ॥
|
सभासदांनी कमलपुष्पा सारख्या आकृतीच्या आपल्या अंजलींना मस्तकास लावून सर्व प्रकारे महाराजांच्या प्रस्तावाचे समर्थन केले, त्यांची ती पद्मांजली स्वीकार करून राजा दशरथ त्या सर्वांना प्रिय आणि हितकर वाटणारे वचन बोलले- ॥१॥
|
अहोऽस्मि परमप्रीतः प्रभावश्चातुलो मम ।
यन्मे ज्येष्ठं प्रियं पुत्रं यौवराज्यस्थमिच्छथ ॥ २ ॥
|
'अहो ! आपण सर्व जे माझ्या परमप्रिय ज्येष्ठ पुत्र श्रीरामाला युवराज पदावर प्रतिष्ठीत झालेले पाहू इच्छिता त्यामुळे मला फार प्रसन्नता वाटत आहे. तथा माझा प्रभाव अनुपम झाला आहे. ॥२॥
|
इति प्रत्यर्चितान् राजा ब्राह्मणानिदमब्रवीत् ।
वसिष्ठं वामदेवं च तेषामेवोपशृण्वताम् ॥ ३ ॥
|
याप्रकारे बोलून पुरवासी आणि अन्यान्य सभासदांचा सत्कार करुन राजांनी ते ऐकत असताच वामदेव आणि वसिष्ठ आदि ब्राह्मणांना याप्रकारे सांगितले - ॥३॥
|
चैत्रः श्रीमानयं मासः पुण्यः पुष्पितकाननः ।
यौवराज्याय रामस्य सर्वमेवोपकल्प्यताम् ॥ ४ ॥
|
'हा चैत्र महिना फार सुंदर आणि पवित्र आहे- त्यात सारी वने, उपवने प्रफुल्लित झाली आहेत, म्हणून या समयी रामाचा युवराज पदावर अभिषेक करण्यासाठी आपण सर्वांनी सामग्री एकत्र करवावी.' ॥४॥
|
राज्ञस्तूपरते वाक्ये जनघोषो महानभूत् ।
शनैस्तस्मिन् प्रशान्ते च जनघोषे जनाधिपः ॥ ५ ॥
वसिष्ठं मुनिशार्दूलं राजा वचनमब्रवीत् ।
|
राजाचे हे बोलणे समाप्त झाल्या बरोबर सर्व लोक आनंदाने महान कोलाहल करू लागले. हळू हळू तो जनरव शांत झाल्यावर प्रजापालक नरेश दशरथांनी मुनिप्रवर वसिष्ठांना सांगितले - ॥५-१/२॥
|
अभिषेकाय रामस्य यत्कर्म सपरिच्छदम् ॥ ६ ॥
तदद्य भगवन् सर्वमाज्ञापयितुमर्हसि ।
|
'भगवन् ! रामाच्या अभिषेकासाठी जी कर्मे आवश्यक आहेत ती सर्व साङ्गोपाङ्ग सांगावी आणि आजच त्या सर्वांची तयारी करण्यासाठी सेवकांना आज्ञा द्यावी. ॥६-१/२॥
|
तच्छ्रुत्वा भूमिपालस्य वसिष्ठो मुनिसत्तमः ॥ ७ ॥
आदिदेशाग्रतो राज्ञः स्थितान् युक्तान् कृताञ्जलीन् ।
|
महाराजांचे हे वचन ऐकून मुनिवर वसिष्ठांनी राजाच्या समोरच हात जोडून उभे असलेल्या आज्ञापालना साठी तयार राहण्यार्या सेवकांना म्हटले- ॥७-१/२॥
|
सुवर्णादीनि रत्नानि बलीन् सर्वौषधीरपि ॥ ८ ॥
शुक्लमाल्यानि लाजांश्च पृथक् च मधुसर्पिषी ।
अहतानि च वासांसि रथं सर्वायुधान्यपि ॥ ९ ॥
चतुरङ्गबलं चैव गजं च शुभलक्षणम् ।
चामरव्यजने चोभे ध्वजं छत्रं च पाण्डरम् ॥ १० ॥
शतं च शातकुम्भानां कुम्भानामग्निवर्चसाम् ।
हिरण्यशृङ्गमृषभं समग्रं व्याघ्रचर्म च ॥ ११ ॥
यच्चान्यत् किञ्चिदेष्टव्यं तत् सर्वमुपकल्प्यताम् ।
उपस्थापयत प्रातरग्न्यागारे महीपतेः ॥ १२ ॥
|
'तुम्ही लोक सुवर्ण आदि रत्न, देवपूजनाची सामग्री, सर्व प्रकारच्या औषधी, श्वेत पुष्पांच्या माळा, लाह्या, अलग अलग पात्रात मध आणि तूप, नवीन वस्त्रे, रथ, सर्व प्रकारची अस्त्रे-शस्त्रे, चतुरङ्गिणी, उत्तम लक्षणांनी युक्त हत्ती, चमरी गायीच्या पुच्छाच्या केसांपासून बनविलेले दोन (पंखे) चवर्या, ध्वज, श्वेत छ्त्र, अग्निसमान देदीप्यमान सोन्याचे शंभर कलश, सुवर्णांनी शिंगे मढविलेला एक सांड (वळू) संपूर्ण व्याघ्रचर्म तथा आणखीही ज्या काही वाञ्छनीय वस्तु आहेत, त्या सर्व एकत्रित करा आणि उद्या प्रातःकाळी महाराजांच्या अग्निशाळेत पोहोचत्या करा. ॥८-१२॥
|
अन्तःपुरस्य द्वाराणि सर्वस्य नगरस्य च ।
चन्दनस्रग्भिरर्च्यन्तां धूपैश्च घ्राणहारिभिः ॥ १३ ॥
|
अंतःपुर तथा समस्त नगरांतील सर्व दरवाजांना चंदन आणि माळांनी सजवा तथा तेथे धूप जाळा की जे आपल्या सुगंधाने लोकांना आकर्षित करून घेतील. ॥१३॥
|
प्रशस्तमन्नं गुणवद् दधिक्षीरोपसेचनम् ।
द्विजानां शतसाहस्रं यत्प्रकाममलं भवेत् ॥ १४ ॥
|
दही, दूध आणि तूप आदिनी संयुक्त अत्यंत उत्तम आणि गुणकारी अन्न तयार करवा, जे एक लाख ब्राह्मणांच्या भोजनासाठी पर्याप्त होईल. ॥१४॥
|
सत्कृत्य द्विजमुख्यानां श्वः प्रभाते प्रदीयताम् ।
घृतं दधि च लाजाश्च दक्षिणाश्चापि पुष्कलाः ॥ १५ ॥
सूर्येऽभ्युदितमात्रे श्वो भविता स्वस्तिवाचनम् ।
ब्राह्मणाश्च निमन्त्र्यन्तां कल्प्यन्तामासनानि च ॥ १६ ॥
|
उद्या प्रातःकाळी श्रेष्ठ ब्राह्मणांचा सत्कार करून त्यांना ते अन्न प्रदान करा. त्याच बरोबर तूप, दही लाह्या आणि पर्याप्त दक्षिणाही द्या. ॥१६॥
|
आबध्यन्तां पताकाश्च राजमार्गश्च सिच्यताम् ।
सर्वे च तालापचरा गणिकाश्च स्वलङ्कृताः ॥ १७ ॥
कक्ष्यां द्वितीयामासाद्य तिष्ठन्तु नृपवेश्मनः ।
|
नगरात सर्व बाजुस पताका फडकल्या जाव्यात तथा राजमार्गांवर सडे टाकले जावेत. समस्त तालजीवी (संगीतनिपुण) पुरुष आणि सुंदर वेषभूषेने विभूषित वाराङ्गना (नर्तकी) राजमहालाच्या दुसर्या कप्प्यात (देवडी) पोहोंचून उभ्या राहू देत. ॥१७-१/२॥
|
देवायतनचैत्येषु सान्नभक्ष्याः सदक्षिणाः ॥ १८ ॥
उपस्थापयितव्याः स्युर्माल्ययोग्याः पृथक्पृथक् ।
|
देव-मंदिरात तथा चैत्यवृक्षांच्या खाली अथवा चौकातून ज्या पूजनीय देवता आहेत त्यांना पृथक-पृथक भक्ष्य-भोज्य पदार्थ एवं दक्षिणा प्रस्तुत करणे आवश्यक आहे. ॥१८-१/२॥
|
दीर्घासिबद्धगोधाश्च सन्नद्धा मृष्टवाससः ॥ १९ ॥
|
लांब तलवार घेऊन तसे घोरपडीच्या चर्माच्या (कातडीचे) बनलेल्या ढाली (हात मोजे) घालून कंबर कसून तयार राहणारे शूरवीर योद्धे स्वच्छ वस्त्रे धारण करून महाराजांच्या महान अभ्यूदयशाली अंगणात प्रवेश करोत. ॥१९॥
|
महाराजाङ्गनं शूराः प्रविशन्तु महोदयम् ।
एवं व्यादिश्य विप्रौ तौ क्रियास्तत्र विनिष्ठितौ ॥ २० ॥
चक्रतुश्चैव यच्छेषं पार्थिवाय निवेद्य च ।
|
सेवकांना याप्रकारे कार्य करण्याचे आदेश देऊन दोन्ही ब्राह्मण वसिष्ठ आणि वामदेवांनी पुरोहितद्वारा संपादित होण्यायोग्य क्रियांना स्वतः पूर्ण केले. राजांनी सांगितलेल्या कार्यांच्या अतिरिक्त ही जी शेष आवश्यक कर्तव्ये होती तीही त्या दोघांनी राजांना विचारून स्वतःच संपन्न केली. ॥२०-१/२॥
|
कृतमित्येव चाब्रूतामभिगम्य जगत्पतिम् ॥ २१ ॥
तथोक्तवचनं प्रीतौ हर्षयुक्तौ द्विजोत्तमौ ।
|
त्यानंतर महाराजांच्या जवळ जाऊन प्रसन्नता आणि हर्षाने युक्त झालेले ते दोन्ही श्रेष्ठ द्विज म्हणाले- 'राजन ! आपण जसे सांगितले होते त्याप्रमाणे (त्यास अनुसरून) सर्व कार्य संपन्न झाले आहे'. ॥२१-१/२॥
|
ततः सुमन्त्रं द्युतिमान् राजा वचनमब्रवीत् ॥ २२ ॥
रामः कृतात्मा भवता शीघ्रमानीयतामिति ।
|
यानंतर तेजस्वी राजा दशरथांनी सुमंत्रास म्हटले- "सख्या ! पवित्रात्मा रामाला तुम्ही शीघ्र येथे बोलावून घेऊन या.' ॥२२-१/२॥
|
स तथेति प्रतिज्ञाय सुमन्त्रो राजशासनात् ॥ २३ ॥
|
तेव्हा 'जशी आज्ञा' असे म्हणून सुमंत्र गेले आणि राजाच्या आदेशानुसार रथींच्या मध्ये श्रेष्ठ रामांना रथात बसवून घेऊन आले. ॥२३॥
|
रामं तत्रानयाञ्चक्रे रथेन रथिनां वरम् ।
अथ तत्र समासीनास्तदा दशरथं नृपम् ॥ २४ ॥
प्राच्योदीच्या प्रतीच्याश्च दाक्षिणात्याश्च भूमिपाः ।
म्लेच्छाश्चार्याश्च ये चान्ये वनशैलान्तवासिनः ॥ २५ ॥
|
त्या राजभवनात एकत्र बसलेले पूर्व, उत्तर, पश्चिम आणि दक्षिणेचे भूपाल, म्लेन्छ, आर्य तथा वनांत आणि पर्वतात राहाणारे अन्यान्य मनुष्य सर्वच्या सर्व त्या समयी राजा दशरथांची अशा प्रकारे उपासना करत होते जशी देवता देवराज इंद्रांची करतात. ॥२४-२५॥
|
उपासाञ्चक्रिरे सर्वे तं देवा वासवं यथा ।
तेषां मध्ये स राजर्षिर्मरुतामिव वासवः ॥ २६ ॥
प्रासादस्थो दशरथो ददर्शायान्तमात्मजम् ।
गन्धर्वराजप्रतिमं लोके विख्यातपौरुषम् ॥ २७ ॥
|
त्यांच्या मध्ये (अद्यलिकांच्या आंत) प्रासादात बसलेले महाराज दशरथ मरुद्गणांमध्ये बसलेल्या देवराज इंद्रांप्रमाणे शोभून दिसत होते. त्यांनी तेथूनच आपला पुत्र श्रीराम यास आपल्या जवळ येत असतांना पाहिले, जे गंधर्वराजा प्रमाणे तेजस्वी होते आणि ज्यांचे पौरुष समस्त लोकात प्रसिद्ध होते. ॥२६-२७॥
|
दीर्घबाहुं महासत्त्वं मत्तमातङ्गगामिनम् ।
चन्द्रकान्ताननं राममतीव प्रियदर्शनम् ॥ २८ ॥
रूपौदार्यगुणैः पुंसां दृष्टिचित्तापहारिणम् ।
घर्माभितप्ताः पर्जन्यं ह्लादयन्तमिव प्रजाः ॥ २९ ॥
|
त्यांच्या भुजा विशाल आणि बल महान होते. ते मदोन्मत्त गजराजाप्रमाणे अत्यंत मस्तीत (ऐटीत ) चालत होते. त्यांचे मुख चंद्रमाहूनही अधिक कांतिमान होते. त्यांचे दर्शन सर्वांना अत्यंत प्रिय वाटत होते. ते आपल्या रूप आणि उदारता आदि गुणांनी लोकांची दृष्टी आणि मन आकर्षित करत होते. ज्याप्रमाणे उन्हात तापलेल्या प्राण्यांना मेघ आनंद प्रदान करतो त्याप्रकारे ते समस्त प्रजेला परम आल्हाद देत होते. ॥२८-२९॥
|
न ततर्प समायान्तं पश्यमानो नराधिपः ।
अवतार्य सुमन्त्रस्तु राघवं स्यन्दनोत्तमात् ॥ ३० ॥
पितुः समीपं गच्छन्तं प्राञ्जलिः पृष्ठतोऽन्वगात् ।
|
येणार्या श्रीरामचंद्रांकडे एकटक पाहून राजा दशरथांची तृप्ति होत नव्हती. सुमंत्रांनी त्या श्रेष्ठ रथांतून राघवास उतरविले आणि जेव्हा ते पित्याच्या समीप जाऊ लागले तेव्हा सुमंत्रही त्यांच्या मागोमाग हात जोडून तेथे गेले. ॥३०-१/२॥
|
स तं कैलासशृङ्गाभं प्रासादं रघुनन्दनः ॥ ३१ ॥
आरुरोह नृपं द्रष्टुं सहसा तेन राघवः ।
|
तो राजमहाल कैलासशिखराप्रमाणे उज्ज्वल आणि उंच होता. रघुनंदन राम महाराजांचे दर्शन करण्यासाठी सुमंत्रासह सहसा त्यावर चढून गेले. ॥३१-१/२॥
|
स प्राञ्जलिरभिप्रेत्य प्रणतः पितुरन्तिके ॥ ३२ ॥
नाम स्वं श्रावयन् रामो ववन्दे चरणौ पितुः ।
|
रामांनी दोन्ही हात जोडून विनीत भावाने पित्याच्या जवळ जाऊन आपले नाव ऐकवून त्यांच्या चरणांवर प्रणाम केला. ॥३२-१/२॥
|
तं दृष्ट्वा प्रणतं पार्श्वे कृताञ्जलिपुटं नृपः ॥ ३३ ॥
गृह्याञ्जलौ समाकृष्य सस्वजे प्रियमात्मजम् ।
|
श्रीरामांना जवळ येऊन हात जोडून प्रणाम करतांना पाहून राजांनी त्यांचे दोन्ही हात पकडून ठेवले आणि आपल्या प्रिय पुत्राला जवळ ओढून घेऊन छातीशी धरले. ॥३३-१/२॥
|
तस्मै चाभ्युदितं सम्यङ्मणिकाञ्चनभूषितम् ॥ ३४ ॥
|
त्यासमयी राजांनी, तेथे प्रथमच त्यांच्यासाठी तेथे आणून ठेवलेल्या रत्नजडित सुवर्णभूषित एका परम सुंदर सिंहासनावर बसण्याची रामांना आज्ञा दिली. ॥३४॥
|
दिदेश राजा रुचिरं रामाय परमासनम् ।
तथाऽऽसनवरं प्राप्य व्यदीपयत राघवः ॥ ३५ ॥
स्वयैव प्रभया मेरुमुदये विमलो रविः ।
|
ज्याप्रमाणे निर्मल सूर्य उदयकाली मेरूपर्वताला आपल्या किरणांनी उद्भासित करतो त्याच प्रकारे राघवांनी ते श्रेष्ठ आसन ग्रहण करून आपल्याच प्रभेने त्यास प्रकाशित केले. ॥३५-१/२॥
|
तेन विभ्राजिता तत्र सा सभापि व्यरोचत ॥ ३६ ॥
विमलग्रहनक्षत्रा शारदी द्यौरिवेन्दुना ।
|
त्यांच्या योगे प्रकाशित होऊन ती सभाही फार शोभू लागली. ज्याप्रमाणे निर्मल ग्रह आणि नक्षत्रांनी भरलेले शरत-कालातील आकाश चंद्रम्याच्या योगे उद्भासित होत होते अगदी त्याच प्रमाणे ती सभा शोभू लागली. ॥३६-१/२॥
|
तं पश्यमानो नृपतिस्तुतोष प्रियमात्मजम् ॥ ३७ ॥
अलङ्कृतमिवात्मानमादर्शतलसंस्थितम् ।
|
ज्याप्रमाणे सुंदर वेशभूषाने अलंकृत झालेले आपलेच प्रतिबिंब दर्पणात पाहून मनुष्याला अत्यंत संतोष प्राप्त होतो त्याच प्रकारे आपल्या शोभाशाली प्रिय पुत्राला पाहून राजा दशरथ फार प्रसन्न झाले. ॥३७-१/२॥
|
स तं सुस्थितमाभाष्य पुत्रं पुत्रवतां वरः ॥ ३८ ॥
उवाचेदं वचो राजा देवेन्द्रं इव कश्यपः ।
|
जसे कश्यप देवराज इंद्रास संबोधतात त्याच प्रकारे पुत्रवानांत श्रेष्ठ राजा दशरथ सिंहासनवर बसलेल्या आपला पुत्र श्रीराम यास संबोधून त्यास याप्रकारे बोलले- ॥३८-१/२॥
|
जेष्ठायामसि मे पत्न्यां सदृश्यां सदृशः सुतः ॥ ३९ ॥
उत्पन्नस्त्वं गुणश्रेष्ठो मम रामात्मजः प्रियः ।
त्वया यतः प्रजाश्चेमाः स्वगुणैरनुरञ्जिताः ॥ ४० ॥
|
'मुला ! तुझा जन्म माझी ज्येष्ठ पत्नी महाराणी कौसल्येच्या गर्भापासून झाला आहे. तू आपल्या मातेला अनुरूपच उत्पन्न झाला आहेस. रामा ! तू गुणांनी माझ्यापेक्षा वरचढ आहेस. म्हणून माझा परम प्रिय पुत्र आहेस. तू आपल्या गुणांनी या समस्त प्रजांना प्रसन्न केले आहेस म्हणून उद्या पुष्यनक्षत्राच्या योगावर युवराज पद ग्रहण कर. ॥३९-४० १/२॥
|
तस्मात् त्वं पुष्ययोगेन यौवराज्यमवाप्नुहि ।
कामतस्त्वं प्रकृत्यैव विनीतो गुणवानिति ॥ ४१ ॥
गुणवत्यपि तु स्नेहात् पुत्र वक्ष्यामि ते हितम् ।
भूयो विनयमास्थाय भव नित्यं जितेन्द्रियः ॥ ४२ ॥
|
'मुला ! जरी तू स्वभावानेच गुणवान आहेस आणि तुझ्या संबंधी हाच सर्वांचा निर्णय आहे तथापि मी स्नेहवश तू सदगुणसंपन्न असलास तरीही तुला काही हिताच्या गोष्टी सांगत आहे. तू आणखी अधिकच विनयाचा आश्रय घेऊन सदा जितेंद्रिय बनून रहा. ॥४१-४२॥
|
कामक्रोधसमुत्थानि त्यजस्व व्यसनानि च ।
परोक्षया वर्त्तमानो वृत्त्या प्रत्यक्षया तथा ॥ ४३ ॥
|
काम आणि क्रोधाने उत्पन्न होणार्या दुर्व्यसनांचा सर्वथा त्याग करून टाक. परोक्ष वृत्तीने ( अर्थात गुप्तचरांकडून यथार्थ गोष्टींचा पत्ता लावून घेऊन) तथा प्रत्यक्ष वृत्तीने (अर्थात दरबारात समोर येऊन सांगणार्या जनतेने मुखाने त्यांचे वृतांत प्रत्यक्ष पाहून- (ऐकून) ठीक ठीक (यथा-योग्य) न्यायविचारात तत्पर रहा. ॥४३॥
|
अमात्यप्रभृतीः सर्वाः प्रजाश्चैवानुरञ्जय
कोष्ठागारायुधागारैः कृत्वा सन्निचयान् बहून् ॥ ४४ ॥
इष्टानुरक्तप्रकृतिर्यः पालयति मेदिनीम् ।
तस्य नन्दन्ति मित्राणि लब्ध्वामृतमिवामराः ॥ ४५ ॥
|
मंत्री, सेनापति आदि समस्त अधिकार्यांना तसेच प्रजाजनांना सदा प्रसन्न राख. जो राजा कोष्ठागार (भाण्डारगृह) तथा शस्त्रागार आदिंच्या द्वारा उपयोगी वस्तूंचा फार मोठा संग्रह करून मंत्री, सेनापति आणि प्रजा आदि समस्त प्रकृतिंना प्रिय मानून त्यांना आपल्या प्रति अनुरक्त आणि प्रसन्न राखून पृथ्वीचे पालन करतो, त्याचे मित्र जसे अमृत मिळाल्याने देव प्रसन्न झाले होते, त्याप्रकारे आनंदित होतात. ॥४४-४५॥
|
तस्मात् पुत्र त्वमात्मानं नियम्यैवं समाचर ।
तच्छ्रुत्वा सुहृदस्तस्य रामस्य प्रियकारिणः ॥ ४६ ॥
त्वरिताः शीघ्रमागत्य कौसल्यायै न्यवेदयन् ।
|
म्हणून पुत्रा ! तू आपल्या चित्ताला आपल्या ताब्यांत ठेवून या प्रकारच्या उत्तम आचरणांचे पालन करीत राहा.' राजाचे हे म्हणणे ऐकून रामाचे प्रिय करणार्या सुहृदांनी तात्काळ माता कौसल्ये जवळ जाऊन तिला हा शुभ समाचार निवेदन केला. ॥४६-१/२॥
|
सा हिरण्यं च गाश्चैव रत्नानि विविधानि च ॥ ४७ ॥
व्यादिदेश प्रियाख्येभ्यः कौसल्या प्रमदोत्तमा ।
|
स्त्रियांमध्ये श्रेष्ठ कौसल्येने हा प्रिय संवाद ऐकविणारांना त्या सुहृदांना निरनिराळ्या प्रकारची रत्ने, सुवर्ण आणि गाई पुरस्कार रूपाने दिल्या. ॥४७-१/२॥
|
अथाभिवाद्य राजानं रथमारुह्य राघवः ।
ययौ स्वं द्युतिमद् वेश्म जनौघैः प्रतिपूजितः ॥ ४८ ॥
|
यानंतर राघवांनी राजांना प्रणाम करून रथांत बसून आणि प्रजाजनांकडून सन्मानित होऊन आपल्या शोभाशाली भवनांत प्रवेश केला. ॥४८॥
|
ते चापि पौरा नृपतेर्वचस्त-
च्छ्रुत्वा तदा लाभमिवेष्टमाशु ।
नरेन्द्रमामन्त्र्य गृहाणि गत्वा
देवान् समानर्चुरभिप्रहृष्टाः ॥ ४९ ॥
|
नगरनिवासी लोकांनी राजाचे भाषण ऐकून मनातल्या मनात हा अनुभव घेतला की आतां शीघ्रच आम्हाला अभिष्ट वस्तुची प्राप्ति होईल. नंतर महाराजांची आज्ञा घेऊन आपल्या घरी गेले आणि अत्यंत हर्षाने युक्त होऊन अभीष्ट - सिद्धिच्या उपलक्षात देवतांचे पूजन करू लागले. ॥४९॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे तृतीयः सर्गः ॥ ३ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा तीसरा सर्ग पूरा झाला. ॥३॥
|