ययातिं प्रति शुक्राचार्यस्य शापः -
|
ययातिला शुक्राचार्यांचा शाप -
|
एवं ब्रुवति रामे तु लक्ष्मणः परवीरहा । प्रत्युवाच महात्मानं ज्वलन्तमिव तेजसा ॥ १ ॥
|
श्रीरामांनी असे म्हटल्यावर शत्रुवीरांचा संहार करणारे लक्ष्मण तेजाने प्रज्वलित झाल्याप्रमाणे दिसणार्या महात्मा रामांना संबोधित करून या प्रकारे बोलले - ॥१॥
|
महदद्भुतमाश्चर्यं विदेहस्य पुरातनम् । निर्वृत्तं राजशार्दूल वसिष्ठस्य निमेस्सह ॥ २ ॥
|
नृपश्रेष्ठ ! राजा विदेह (निमि) तसेच वसिष्ठ मुनिंचा पुरातन वृत्तांत अत्यंत अद्भुत आणि आश्चर्यजनक आहे. ॥२॥
|
निमिस्तु क्षत्रियः शूरो विशेषेण च दीक्षितः । न क्षमां कृतवान् राजा वसिष्ठस्य महात्मनः ॥ ३ ॥
|
परंतु राजा निमि क्षत्रिय, शूरवीर आणि विशेषतः यज्ञाची दीक्षा घेतलेले होते, म्हणून त्यांनी महात्मा वसिष्ठांच्या प्रति उचित आचरण केले नाही. ॥३॥
|
एवमुक्तस्तु तेनायं रामः क्षत्रियपुङ्गवः । उवाच लक्ष्मणं वाक्यं सर्वशास्त्रविशारदम् ॥ ४ ॥
रामो रमयतां श्रेष्ठो भ्रातरं दीप्ततेजसम् ।
|
लक्ष्मणांनी याप्रकारे म्हटल्यावर दुसर्यांच्या मनाला रमविणारे (प्रसन्न करणारामध्ये) श्रेष्ठ क्षत्रिय शिरोमणी श्रीरामांनी, संपूर्ण शास्त्रांचे ज्ञाते आणि उद्दीप्त तेजस्वी भ्राता लक्ष्मणास म्हटले - ॥४ १/२॥
|
न सर्वत्र क्षमा वीर पुरुषेषु प्रदृश्यते ॥ ५ ॥
सौमित्रे दुःसहो रोषो यथा क्षान्तो ययातिना । सत्त्वानुगं पुरस्कृत्य तन्निबोध समाहितः ॥ ६ ॥
|
वीर सौमित्र ! सर्व पुरुषांमध्ये राजा ययातिमध्ये जशी क्षमा होती, तशी क्षमा दिसून येत नाही. राजा ययातिंनी सत्वगुणास अनुकूल मार्गाचा आश्रय घेऊन दुःसह शेषास क्षमा केली होती, तो प्रसंग सांगतो, एकाग्रचित्त होऊन ऐका. ॥५-६॥
|
नहुषस्य सुतो राजा ययातिः पौरवर्धनः । तस्य भार्याद्वयं सौम्य रूपेणाप्रतिमं भुवि ॥ ७ ॥
|
सौम्य ! नहुषाचा पुत्र राजा ययाति पुरवासी लोकांची, प्रजाजनांची वृद्धि करणारे होते. त्यांच्या दोन पत्नी होत्या, ज्यांच्या रूपाची या भूतलावर कोठे तुलना होत नव्हती. ॥७॥
|
एका तु तस्य राजर्षेः नाहुषस्य पुरस्कृता । शर्मिष्ठा नाम दैतेयी दुहिता वृषपर्वणः ॥ ८ ॥
|
नहुषनंदन राजर्षि ययातीच्या एका पत्नीचे नाव शर्मिष्ठा होते, जी राजाच्या द्वारा फारच सन्मानित होती. शर्मिष्ठा दैत्यकुळाची कन्या आणि वृषपर्वाची पुत्री होती. ॥८॥
|
अन्या तूशनसः पत्नी ययातेः पुरुषर्षभ । न तु सा दयिता राज्ञो देवयानी सुमध्यमा ॥ ९ ॥
तयोः पुत्रौ तु सम्भूतौ रूपवन्तौ समाहितौ । शर्मिष्ठाऽजनयत् पूरुं देवयानी यदुं तदा ॥ १० ॥
|
पुरुषप्रवर ! त्यांची दुसरी पत्नी शुक्राचार्यांची पुत्री देवयानी होती. देवयानी सुंदर असूनही राजाला अधिक प्रिय नव्हती. त्या दोघींचेही पुत्र फार रूपावान होते. शर्मिष्ठेने पुरुला जन्म दिला आणि देवयानीने यदुला. ते दोन्ही बालक आपल्या चित्ताला एकाग्र ठेवणारे होते. ॥९-१०॥
|
पूरुस्तु दयितो राज्ञो गुणैर्मातृकृतेन च । ततो दुःखसमाविष्टो यदुर्मातरमब्रवीत् ॥ ११ ॥
|
आपल्या मातेच्या प्रेमयुक्त व्यवहाराने आणि आपल्या गुणांनी पुरु राजाला अधिक प्रिय होता. यामुळे यदुंच्या मनाला फार दुःख झाले. ते मातेला म्हणाले - ॥११॥
|
भार्गवस्य कुले जाता देवस्याक्लिष्टकर्मणः । सहसे हृद्गतं दुःखं अवमानं च दुःसहम् ॥ १२ ॥
|
आई ! तू अनायासेच महान् कर्म करणार्या देवस्वरूप शुक्राचार्यांच्या कुळात उत्पन्न झाली आहेस तरीही येथे हार्दिक दुःख आणि दुःसह अपमान सहन करत आहेस. ॥१२॥
|
आवां च सहितौ देवि प्रविशाव हुताशनम् । राजा तु रमतां सार्धं दैत्यपुत्र्या बहुक्षपाः ॥ १३ ॥
|
म्हणून देवी ! आपण दोघे एकदमच अग्निमध्ये प्रवेश करू या. राजा दैत्यपुत्री शर्मिष्ठे बरोबर अनंत रात्रिपर्यंत रमत राहो. ॥१३॥
|
यदि वा सहनीयं ते मामनुज्ञातुमर्हसि । क्षम त्वं न क्षमिष्येऽहं मरिष्यामि न संशयः ॥ १४ ॥
|
जर तुला हे सर्व काही सहन करावयाचे असेल तर मला तरी प्राणत्यागाची आज्ञा देऊन टाक. तू सहन कर. मी सहन करणार नाही. मी निःसंदेह मरून जाईन. ॥१४॥
|
पुत्रस्य भाषितं श्रुत्वा परमार्तस्य रोदतः । देवयानी तु संक्रुद्धा सस्मार पितरं तदा ॥ १५ ॥
|
अत्यंत आर्त होऊन रडत असलेल्या आपला पुत्र यदुचे हे बोलणे ऐकून देवयानीला फार क्रोध आला आणि तिने तात्काळ आपला पिता शुक्राचार्य यांचे स्मरण केले. ॥१५॥
|
इङ्गितं तदभिज्ञाय दुहितुर्भार्गवस्तदा । आगतस्त्वरितं तत्र देवयानी तु यत्र सा ॥ १६ ॥
|
शुक्राचार्य आपल्या पुत्रीचे हे इंगित जाणून तात्काळ त्या स्थानावर येऊन पोहोचले, जेथे देवयानी विद्यमान होती. ॥१६॥
|
दृष्ट्वा चाप्रकृतिस्थां तां अप्रहृष्टामचेतनाम् । पिता दुहितरं वाक्यं किमेतदिति चाब्रवीत् ॥ १७ ॥
|
मुलीला अस्वस्थ, अप्रसन्न आणि अचेतसी पाहून पित्याने विचारले - वत्से ! असे अस्वस्थ होण्याचे काय कारण आहे ? ॥१७॥
|
पृच्छन्तमसकृत् तं वै भार्गवं दीप्ततेजसम् । देवयानी तु सङ्क्रुद्धा पितरं वाक्यमब्रवीत् ॥ १८ ॥
अहमग्निं विषं तीक्ष्णं अपो वा मुनिसत्तम । भक्षयिष्ये प्रवेक्ष्ये वा न तु शक्ष्यामि जीवितुम् ॥ १९ ॥
|
उद्दीप्त तेज असणारे पिता भृगुनंदन शुक्राचार्य जेव्हा वारंवार याप्रकारे विचारू लागले तेव्हा देवयानीने अत्यंत कुपित होऊन त्यांना म्हटले - मुनिश्रेष्ठ ! मी प्रज्वलित अग्नि अथवा अगाध जलात प्रवेश करीन अथवा विष खाईन, परंतु याप्रकारे अपमानित होऊन जीवित राहू शकणार नाही. ॥१८-१९॥
|
न मां त्वमवजानीषे दुःखितामवमानिताम् । वृक्षस्यावज्ञया ब्रह्मन् छिद्यन्ते वृक्षजीविनः ॥ २० ॥
|
आपल्याला कल्पनाही नाही की मी येथे किती दुःखी आणि अपमानित आहे. ब्रह्मन् ! वृक्षाप्रति अवहेलना होण्याने त्याच्या आश्रित फुलांना आणि पानांनाही तोडले अथवा नष्ट केले जाते. (याप्रमाणेच आपल्या प्रति राजाची अवहेलना होत असल्यामुळेच माझा येथे अपमान होत आहे.) ॥२०॥
|
अवज्ञया च राजर्षिः परिभूय च भार्गव । मय्यवज्ञां प्रयुङ्क्ते हि न च मां बहु मन्यते ॥ २१ ॥
|
भृगुनंदन ! राजर्षि ययाति आपल्या विषयी अनादराचा भाव ठेवल्याने माझीही अवहेलना करतात आणि मला अधिक आदर देत नाहीत. ॥२१॥
|
तस्यास्तद् वचनं श्रुत्वा कोपेनाभिपरिवृतः । व्याहर्तुमुपचक्राम भार्गवो नहुषात्मजम् ॥ २२ ॥
|
देवयानीचे हे वचन ऐकून भृगुनंदन शुक्राचार्यांना फार क्रोध आला आणि त्यांनी नहुषपुत्र ययातिला लक्ष्य करून याप्रकारे बोलण्यास आरंभ केला - ॥२२॥
|
यस्मान्मामवजानीषे नाहुष त्वं दुरात्मवान् । जरया परया जीर्णः शैथिल्यमुपयास्यसि ॥ २३ ॥
|
नहुषकुमारा ! तू दुरात्मा आहेस त्यामुळे माझी अवहेलना करीत आहेस म्हणून तुझी अवस्था जरा-जीर्ण वृद्धासमान होईल - तू सर्वथा शिथिल होऊन जाशील. ॥२३॥
|
एवमुक्त्वा दुहितरं समाश्वास्य च भार्गवः । पुनर्जगाम ब्रह्मर्षिः भवनं स्वं महायशाः ॥ २४ ॥
|
राजाला असे म्हणून पुत्रीला आश्वासन देऊन महायशस्वी ब्रह्मर्षि शुक्राचार्य पुन्हा आपल्या घरी निघून गेले. ॥२४॥
|
स एवमुक्त्वा द्विजपुङ्गवाग्र्यः सुतां समाश्वास्य च देवयानीम् । पुनर्ययौ सूर्यसमानतेजा दत्त्वा च शापं नहुषात्मजाय ॥ २५ ॥
|
सूर्यासमान तेजस्वी तसेच द्विजातील श्रेष्ठ पुरुषांमध्ये अग्रगण्य शुक्राचार्य देवयानीला आश्वासन देऊन नहुषपुत्र ययातिला असे सांगून त्यांना पूर्वोक्त शाप देऊन नंतर निघून गेले. ॥२५॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डेऽष्टपञ्चाशः सर्गः ॥ ५८ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा अठ्ठावन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५८॥
|