श्रीरामस्य विलापः -
|
श्रीरामांचा विलाप -
|
स राजपुत्रः प्रियया विहीनः
शोकेन मोहेन च पीड्यमानः ।
विषादयन् भ्रातरमार्तरूपो
भूयो विषादं प्रविवेष तीव्रम् ॥ १ ॥
|
आपली प्रिया सीता हिच्या विरहित झालेले राजकुमार श्रीराम शोक आणि मोहाने पीडित होऊ लागले. ते स्वतःच पीडित होतेच, शिवाय आपला भाऊ लक्ष्मण यासही विषादात पाडून पुन्हा तीव्र शोकात मग्न होऊन गेले. ॥१॥
|
स लक्ष्मणं शोकवशाभिपन्नं
शोके निमग्रो विपुले तु रामः ।
उवाच वाक्यं व्यसनानुरूप-
मुष्णं विनिःश्वस्य रुदन् सशोकम् ॥ २ ॥
|
लक्ष्मण शोकाच्या अधीन होत होते, त्यांना महान शोकात बुडालेले श्रीराम दुःखाने रडत गरम उच्छ्वास घेऊन आपल्यावर आलेल्या संकटास अनुरूप असे वचन बोलले- ॥२॥
|
न मद्विधो दुष्कृतकर्मकारी
मन्ये द्वितीयोऽस्ति वसुंधरायाम् ।
शोकानु शोको हि परम्पराया
मामेति भिन्दन् हृदयं मनश्च ॥ ३ ॥
|
सुमित्रानंदन ! असे कळूण येत आहे की माझ्या सारखा पापकर्म करणारा मनुष्य या पृथ्वीतलावर दुसरा कोणी नाही; कारण की एका पाठोपाठ दुसरा शोक माझे हृदय आणि मनाला विदीर्ण करीत निरंतर माझ्यावर येऊन कोसळत आहे. ॥३॥
|
पूर्वं मया नूनमभीप्सितानि
पापानि कर्माण्यसकृत्कृतानि ।
तत्रायमद्यापतितो विपाको
दुःखेन दुःखं यदहं विशामि ॥ ४ ॥
|
निश्चितच पूर्वजन्मात मी आपल्या इच्छेनुसार वारंवार बरीचशी पापकर्मे केली आहेत, त्यांच्यापैकी काही कर्मांचा हा परिणाम प्राप्त झालेला आहे, ज्यामुळे मी एका दुःखातून दुसर्या दुःखात पडत राहिलो आहे. ॥४॥
|
राज्यप्रणाशः स्वजनैर्वियोगः
पितुर्विनाशो जननी वियोगः ।
सर्वाणि मे लक्ष्मण शोकवेग-
मापूरयन्ति प्रविचिन्तितानि ॥ ५ ॥
|
प्रथम तर मी राज्यापासून वञ्चित झालो, नंतर माझा स्वजनांशी वियोग झाला. तत्पश्चात पित्याचा परलोकवास झाला नंतर मातेची ही माझ्याशी ताटातूट झाली, लक्ष्मणा ! या सर्व गोष्टी ज्यावेळी मला आठवतात तेव्हा त्या माझा शोकच वाढवीत असतात. ॥५॥
|
सर्वं तु दुःखं मम लक्ष्मणेदं
शान्तं शरीरे वनमेत्य क्लेशम् ।
सीतावियोगात् पुनरप्युदीर्णं
काष्ठैरिवाग्निः सहसोपदीप्तः ॥ ६ ॥
|
लक्ष्मणा ! वनात येऊन क्लेशाचा अनुभव करूनही हे सारे दुःख सीता जवळ असल्याने माझ्या शरीरातच शांत झाले होते. परंतु सीतेच्या वियोगाने ते परत उद्दीप्त झाले आहे. सुकलेल्या लाकडांचा संयोग झाल्याने आग जशी एकाएकी प्रज्वलित होते, त्याप्रमाणे माझी स्थिति झाली आहे. ॥६॥
|
सा नूनमार्या मम राक्षसेन
ह्यभ्याहृता खं समुपेत्य भीरुः ।
अपस्वरं सस्वरविप्रलापा
भयेन विक्रन्दितवत्यभीक्ष्णम् ॥ ७ ॥
|
हाय ! माझी श्रेष्ठ स्वभाव असणारी भीरू पत्नी अवश्यच राक्षसाने आकाशमार्गाने हरण केली आहे. त्या समयी सुमधुर स्वरात विलाप करणार्या सीतेने भयामुळे वारंवार विकृत स्वरात क्रंदन करण्यास आरंभ केला असेल. ॥७॥
|
तौ लोहितस्य प्रियदर्शनस्य
सदोचितावुत्तमचन्दनस्य ।
वृत्तौ स्तनौ शोणितपङ्कदिग्धौ
नूनं प्रियाया मम नाभिपातः ॥ ८ ॥
|
माझ्या प्रियेचे ते दोन्ही गोल गोल स्तन, जे सदा लाल चंदनांनी चर्चित होण्यायोग्य होते, निश्चितच रक्ताच्या चिखलात माखले गेले असतील. इतके होऊनही माझ्या शरीराचे पतन होत नाही.॥८॥
|
तच्छ्लक्ष्णसुव्यक्तमृदुप्रलापं
तस्या मुखं कुञ्चितकेशभारम् ।
रक्षोवशं नूनमुपागताया
न भ्राजते राहुमुखे यथेन्दुः ॥ ९ ॥
|
राक्षसाच्या तावडीत सापडलेल्या माझ्या प्रियेचे ते मुख जे स्निग्ध तसेच सुस्पष्ट मधुर वार्तालाप करणारे तसेच काळ्या-काळ्या कुरळ्या केशसंभाराने सुशोभित दिसत होते ते राहुच्या मुखात पडलेल्या चंद्रम्याप्रमाणे श्रीहीन होऊन गेले असेल, त्याची शोभा नष्ट झाली असेल. ॥९॥
|
तां हारपाशस्य सदोचितान्तां
ग्रीवां प्रियाया मम सुव्रतायाः ।
रक्षांसि नूनं परिपीतवन्ति
शून्ये हि भित्त्वा रुधिराशनानि ॥ १० ॥
|
हाय ! उत्तम व्रताचे पालन करणार्या माझ्या प्रियतमेचा कण्ठ नेहमी हारांनी सुशोभित होण्यायोग्य होता; परंतु रक्तभोजी राक्षसांनी शून्य वनात निश्चितच तिला फाडून तिचे रक्त पिऊन टाकले असेल. ॥१०॥
|
मया विहीना विजने वने सा
रक्षोभिराहृत्य विकृष्यमाणा ।
नूनं विनादं कुररीव दीना
सा मुक्तवत्यायतकान्तनेत्रा ॥ ११ ॥
|
मी नसल्याने निर्जन वनात राक्षसांनी तिला धरून फरफटत नेले असेल आणि विशाल आणि मनोहर नेत्र असणारी ती जानकी अत्यंत दीन भावाने टिटवी प्रमाणे विलाप करीत राहिली असेल. ॥११॥
|
अस्मिन् मया सार्धमुदारशीला
शिलातले पूर्वमुपोपविष्टा ।
कान्तस्मिता लक्ष्मण जातहासा
त्वामाह सीता बहुवाक्यजातम् ॥ १२ ॥
|
लक्ष्मणा ! हे तेच शिलातल आहे ज्यावर उदार स्वभावाची सीता पूर्वी एक दिवस माझ्या सह बसली होती. तिचे हास्य किती मनोहर होते; त्यासमयी तिने हसत हसत तुझ्याशी बर्याच गोष्टी केल्या होत्या. ॥१२॥
|
गोदावरीयं सरितां वरिष्ठा
प्रिया प्रियाया मम नित्यकालम् ।
अप्यत्र गच्छेदिति चिन्तयामि
नैकाकिनी यति हि सा कदाचित् ॥ १३ ॥
|
सरितांमध्ये श्रेष्ठ ही गोदावरी माझ्या प्रियतमेची सदाच प्रिय राहिली होती. असा विचार करतो आहे की कदाचित् ती हिच्या तटावर गेली असेल परंतु ती एकटी तर तेथे कधीच जात नसे. ॥१३॥
|
पद्मानना पद्मविशालनेत्रा
पद्मानि वानेतुमभिप्रयाता ।
तदप्ययुक्तं नहि सा कदाचि-
न्मया विना गच्छति पङ्कजानि ॥ १४ ॥
|
तिचे मुख आणि विशाल नेत्र प्रफुल्ल कमळांप्रमाणे सुंदर आहेत. संभव आहे कि ती कमलपुष्प आणण्यासाठीच गोदावरीच्या तटावर गेली असेल, परंतु हेही संभव नाही कारण मला बरोबर घेतल्या शिवाय ती कधी कमलांच्या जवळ जात नव्हती. ॥१४॥
|
कामं त्विदं पुष्पितवृक्षषण्डं
नानाविधैः पक्षिगणैरुपेतम् ।
वनं प्रयाता नु तदप्ययुक्त
मेकाकिनी साति बिभेति भीरुः ॥ १५ ॥
|
असेही होऊ शकते की ती त्या पुष्पित वृक्षसमूहांनी युक्त आणि नाना प्रकारच्या पक्ष्यांनी सेवित वनात भ्रमण करण्यासाठी गेली असेल, परंतु हेही ठीक वाटत नाही कारण ती भीरू तर एकटी वनात जाण्यास फार घाबरत होती. ॥१५॥
|
आदित्य भो लोककृताकृतज्ञ
लोकस्य सत्यानृतकर्मसाक्षिन् ।
मम प्रिया सा क्व गता हृता वा
शंसस्व मे शोकहतस्य सर्वम् ॥ १६ ॥
|
सूर्यदेव ! संसारात कुणी काय केले आणि काय केले नाही- हे तुम्ही जाणता. लोकांच्या सत्य-असत्य (पुण्य आणि पाप) कर्मांचे तुम्ही साक्षी आहात. माझी प्रिया सीता कोठे गेली अथवा कुणी तिचे हरण केले, हे सर्व मला सांगा कारण मी तिच्या शोकाने पीडित आहे. ॥१६॥
|
लोकेषु सर्वेषु न नास्ति किञ्चिद्
यत् ते न नित्यं विदितं भवेत् तत् ।
शंसस्व वायो कुलपालिनीं तां
हृता मृता वा पथि वर्तते वा ॥ १७ ॥
|
वायुदेव ! समस्त विश्वात अशी कुठलीही गोष्ट नाही जी तुम्हाला सदा ज्ञात असत नाही. माझी कुलपालिनी सीता कोठे आहे, हे सांगा. ती मरून गेली, तिचे हरण झाले अथवा ती मार्गातच आहे. ॥१७॥
|
इतीव तं शोकविधेयदेहं
रामं विसंज्ञं विलपन्तमेव ।
उवाच सौमित्रिरदीनसत्त्वो
न्याय्ये स्थितः कालयुतं च वाक्यम् ॥ १८ ॥
|
याप्रकारे शोकाच्या अधीन होऊन जेव्हा श्रीराम संज्ञाशून्य होऊन विलाप करू लागले, तेव्हा त्यांची अवस्था पाहून न्यायोचित मार्गावर स्थित राहाणार्या उदारचित्त सुमित्राकुमार लक्ष्मणांनी त्यांना या प्रमाणे समयोचित गोष्टी सांगितल्या- ॥१८॥
|
शोकं विसृज्याद्य धृतिं भजस्व
सोत्साहता चास्तु विमार्गणेऽस्याः ।
उत्साहवन्तो हि नरा न लोके
सीदन्ति कर्मस्वतिदुष्करेषु ॥ १९ ॥
|
आर्य ! आपण शोक सोडून धैर्य धारण करावे. सीतेच्या शोधासाठी मनात उत्साह ठेवावा; कारण की उत्साही मनुष्य जगात अत्यंत दुष्कर कार्य उपस्थित झाल्यावरही कधी दुःखी होत नाही. ॥१९॥
|
इतीव सौमित्रिमुदग्रपौरुषं
ब्रुवन्तमार्तो रघुवंशवर्धनः ।
न चिन्तयामास धृतिं विमुक्तवान्
पुनश्च दुःखं महदभ्युपागमत् ॥ २० ॥
|
ज्यांचा पुरुषार्थ वाढलेला होता अशा सौमित्र लक्ष्मणानी जेव्हा याप्रकारची गोष्ट सांगण्यास सुरूवात केली त्यासमयी रघुवंशाची वृद्धि करणारे श्रीरामांनी आर्त होऊन त्यांच्या कथनाच्या औचित्यावर काही लक्ष्य दिले नाही. त्यांनी धैर्य सोडून दिले आणि ते पुन्हा महान् दुःखात पडले. ॥२०॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे त्रिषष्टितमः सर्गः ॥ ६३ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा त्रेसष्टावा सर्ग पूरा झाला. ॥६३॥
|