नावा सीतां गङ्गापारं नीत्वा लक्ष्मणेन तां प्रति दुःखेन तदीयपरित्यागवार्तायाः प्रकटनम् -
|
लक्ष्मणांनी सीतेला नावेने गंगेच्या पैलतीरास पोहोचवून अत्यंत दुःखाने तिला तिचा त्याग केला गेला असल्याची गोष्ट सांगणे -
|
अथ नावं सुविस्तीर्णां नैषादीं राघवानुजः । आरुरोह समायुक्तां पूर्वमारोप्य मैथिलीम् ॥ १ ॥
|
नावाड्यांची ती नाव विस्तृत आणि सुसज्जित होती. लक्ष्मणांनी प्रथम सीतेला चढविले आणि स्वतःही चढले. ॥१॥
|
सुमन्त्रं चैव सरथं स्थीयतामिति लक्ष्मणः । उवाच शोकसन्तप्तः प्रयाहीति च नाविकम् ॥ २ ॥
|
त्यांनी रथासहित सुमंत्राला तेथेच थांबण्यास सांगितले आणि शोकाने संतप्त होऊन नाविकास म्हटले - चल ॥२॥
|
ततस्तीरमुपागम्य भागीरथ्याः स लक्ष्मणः । उवाच मैथिलीं वाक्यं प्राञ्जलिर्बाष्पसम्प्लुतः ॥ ३ ॥
|
त्यानंतर भागीरथीच्या दुसर्या तटावर पोहोचताच लक्ष्मणांच्या नेत्रात अश्रु दाटून आले आणि त्यांनी मैथिली सीतेस हात जोडून म्हटले - ॥३॥
|
हृद्गतं मे महच्छल्यं यस्मादार्येण धीमता । अस्मिन्निमित्ते वैदेहि लोकस्य वचनीकृतः ॥ ४ ॥
|
वैदेही ! माझ्या हृदयात सगळ्यात मोठा काटा हाच खटकत आहे की आज आर्यांनी (श्रीरामांनी) बुद्धिमान् असूनही माझ्यावर असे काम सोपविले आहे की ज्यामुळे लोकात माझी फार निन्दा होईल. ॥४॥
|
श्रेयो हि मरणं मेऽद्य मृत्युर्वा यत्परं भवेत् । न चास्मिन् ईदृशे कार्ये नियोज्यो लोकनिन्दिते ॥ ५ ॥
|
अशा दशेत जर मला मृत्युसमान यंत्रणा प्राप्त झाली असती अथवा माझा साक्षात् मृत्युच झाला असता तरी तो माझ्यासाठी परम कल्याणकारक झाला असता. परंतु या लोकनिन्दित कार्याता मला लावणे उचित नव्हते. ॥५॥
|
प्रसीद च न मे पापं कर्तुमर्हसि शोभने । इत्यञ्जलिकृतो भूमौ निपपात स लक्ष्मणः ॥ ६ ॥
|
शोभने ! आपण प्रसन्न व्हावे ! मला काही दोष देऊ नये. असे म्हणून हात जोडून लक्ष्मण पृथ्वीवर कोसळले. ॥६॥
|
रुदन्तं प्राञ्जलिं दृष्ट्वा काङ्क्षन्तं मृत्युमात्मनः । मैथिली भृशसंविग्ना लक्ष्मणं वाक्यमब्रवीत् ॥ ७ ॥
|
लक्ष्मण हात जोडून रडत आहेत आणि आपले मरण इच्छित आहेत हे पाहून मैथिली सीता अत्यंत उद्विग्न झाली आणि लक्ष्मणांना म्हणाली - ॥७॥
|
किमिदं नावगच्छामि ब्रूहि तत्त्वेन लक्ष्मण । पश्यामि त्वां न च स्वस्थं अपि क्षेमं महीपतेः ॥ ८ ॥
|
लक्ष्मणा ! ही काय गोष्ट आहे ? मला तर काहीच समजत नाही आहे. ठीक ठीक सांगा. महाराज कुशल तर आहेत ना ? मी पहात आहे की तुमचे मन स्वस्थ नाही आहे. ॥८॥
|
शापितोऽसि नरेन्द्रेण यत् त्वं सन्तापमागतः । तद् ब्रूयाः सन्निधौ मह्यं अहमाज्ञापयामि ते ॥ ९ ॥
|
मी महाराजांची शपथ देऊन विचारत आहे, ज्या गोष्टीमुळे तुम्हांला इतका संताप होत आहे ती सर्व माझ्याजवळ खरीखरी सांगा. मी त्यासाठी तुम्हाला आज्ञा देत आहे. ॥९॥
|
वैदेह्या चोद्यमानस्तु लक्ष्मणो दीनचेतनः । अवाङ्मुखो बाष्पगलो वाक्यमेतदुवाच ह ॥ १० ॥
|
वैदेहीने याप्रकारे प्रेरित केल्यावर लक्ष्मण दुःखी मनाने खाली मान घालून अश्रु गद्गद कण्ठद्वारा या प्रकारे बोलले - ॥१०॥
|
श्रुत्वा परिषदो मध्ये ह्यपवादं सुदारुणम् । पुरे जनपदे चैव त्वत्कृते जनकात्मजे ॥ ११ ॥ रामः सन्तप्तहृदयो मा निवेद्य गृहं गतः ।
|
जनकनंदिनी ! नगरात आणि जनपदात आपल्या विषयी जो अत्यंत भयंकर अपवाद पसरलेला आहे, तो राजसभेमध्ये ऐकून श्रीरामांचे हृदय संतप्त झाले आणि ते मला सर्व गोष्टी सांगून महालात निघून गेले. ॥११ १/२॥
|
न तानि वचनीयानि मया देवि तवाग्रतः ॥ १२ ॥ यानि राज्ञा हृदि न्यस्तानि अमर्षात्पृष्ठतः कृतः ।
|
देवी ! राजा रामाने ज्या अपवाद वचनांचे दुःख सहन न झाल्यामुळे ती वचने आपल्या हृदयातच ठेवली आहेत. ती मी आपल्या समोर सांगू शकत नाही. म्हणून मी त्यांची चर्चा सोडून दिली आहे. ॥१२ १/२॥
|
सा त्वं त्यक्ता नृपतिना निर्दोषा मम सन्निधौ ॥ १३ ॥ पौरापवादभीतेन ग्राह्यं देवि न तेऽन्यथा । आश्रमान्तेषु च मया त्यक्तव्या त्वं भविष्यसि ॥ १४ ॥ राज्ञः शासनमादाय तथैव किल दौर्हृदम् ।
|
आपण माझ्या समोर निर्दोष सिद्ध होऊन चुकला आहात तरीही महाराजांनी लोकापवादांना घाबरून आपला त्याग केला आहे. देवी ! आपण दुसरे काही मनात समजू नये. आता महाराजांची आज्ञा मानून आणि आपलीही अशीच इच्छा समजून मी आपल्याला आश्रमांच्या जवळ घेऊन जाऊन तेथेच सोडून देईन. ॥१३-१४ १/२॥
|
तदेतज्जाह्नवीतीरे ब्रह्मर्षीणां तपोवनम् ॥ १५ ॥ पुण्यं च रमणीयं च मा विषादं कृथाः शुभे ।
|
शुभे ! हे राहिले गंगेच्या तटावरील ब्रह्मर्षिंचे पवित्र आणि रमणीय तपोवन. आपण विषाद करू नये. ॥१५ १/२॥
|
राज्ञो दशरथस्यैव पितुर्मे मुनिपुङ्गवः ॥ १६ ॥ सखा परमको विप्रो वाल्मीकिः सुमहायशाः । पादच्छायामुपागम्य सुखमस्य महात्मनः । उपवासपरैकाग्रा वस त्वं जनकात्मजे ॥ १७ ॥
|
येथे माझे पिता राजा दशरथांचे घनिष्ठ मित्र महायशस्वी ब्रह्मर्षि मुनिवर वाल्मीकी राहातात, आपण त्याच महात्म्यांच्या चरणांच्या छायेचा आश्रय घेऊन येथे सुखपूर्वक रहावे. जनकात्मजे ! आपण येथे उपवासपरायण आणि एकाग्र होऊन निवास करावा. ॥१६-१७॥
|
पतिव्रतात्वमास्थाय रामं कृत्वा सदा हृदि । श्रेयस्ते परमं देवि तथा कृत्वा भविष्यति ॥ १८ ॥
|
देवी ! आपण सदा श्रीरामांना हृदयात ठेवून पातिव्रत्याचे अवलंबन करावे. असे करण्याने आपले परम कल्याण होईल. ॥१८॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे सप्तचत्वारिंशः सर्गः ॥ ४७ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा सत्तेचाळिसावा सर्ग पूरा झाला. ॥४७॥
|