श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ अष्टनवतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सीतायां कृते श्रीरामस्य शोकः, ब्रह्मणा तस्य सान्त्वनं, उत्तरकाण्डशेषांशं प्रेरणं च -
सीतेसाठी श्रीरामांचा खेद, ब्रह्मदेवांनी त्यांना समजाविणे आणि उत्तरकांडाचा शेष अंश ऐकण्यासाठी प्रेरित करणे -
रसातलं प्रविष्टायां वैदेह्यां सर्ववानराः ।
चुक्रुशुः साधु साध्वीति मुनयो रामसन्निधौ ॥ १ ॥
वैदेही सीतेने रसातलात प्रवेश केल्यावर श्रीरामांच्या समीप बसलेल्या संपूर्ण वानर तथा ऋषि-मुनि यांनी साध्वी सीते ! तू धन्य आहेस ! असे म्हणण्यास सुरूवात केली. ॥१॥
दण्डकाष्ठमवष्टभ्य बाष्पव्याकुलितेक्षणः ।
अवाक्छिरा दीनमना रामो ह्यासीत् सुदुःखितः ॥ २ ॥
परंतु स्वयं भगवान्‌ श्रीराम फार दुःखी झाले. त्यांचे मन उदास झाले आणि ते उंबराच्या दण्डाचा आधार घेऊन उभे राहून खाली मान घालून डोळ्यांतून अश्रू ढाळू लागले. ॥२॥
स रुदित्वा चिरं कालं बहुशो बाष्पमुत्सृजन् ।
क्रोधशोकसमाविष्टो रामो वचनमब्रवीत् ॥ ३ ॥
बराच वेळ रडून वारंवार अश्रु ढाळत क्रोध आणि शोकाने युक्त होऊन श्रीराम याप्रमाणे बोलले - ॥३॥
अभूतपूर्वं शोकं मे मनः स्प्रष्टुमिवेच्छति ।
पश्यतो मे यथा नष्टा सीता श्रीरिव रूपिणी ॥ ४ ॥
आज माझे मन अभूतपूर्व शोकात बुडून जात आहे; कारण की या समयी माझ्या डोळ्यांदेखत मूर्तीमती लक्ष्मीसमान सीता अदृश्य झाली आहे. ॥४॥
साऽदर्शनं पुरा सीता लङ्‌कापारे महोदधेः ।
ततश्चापि मयानीता किं पुनर्वसुधातलात् ॥ ५ ॥
पहिल्याने सीता समुद्राच्या पार लंकेत जाऊन माझ्या दृष्टीआड झाली होती. परंतु जर मी तेथूनही तिला परत आणली तर मग पृथ्वीच्या आतून घेऊन येणे काय मोठी गोष्ट आहे ? ॥५॥
वसुधे देवि भवति सीता निर्यात्यतां मम ।
दर्शयिष्यामि वा रोषं यथा मामवगच्छसि ॥ ६ ॥
(असे म्हणून ते पृथ्वीला म्हणाले -) पूजनीय भगवती वसुंधरे ! मला सीता परत दे, अन्यथा मी आपला क्रोध दाखवीन. माझा प्रभाव कसा आहे हे तू जाणत आहेस. ॥६॥
कामं श्वश्रूर्ममैव त्वं त्वत्सकाशात् तु मैथिली ।
कर्षता फालहस्तेन जनकेनोद्धृता पुरा ॥ ७ ॥
देवि ! वास्तविक तूंच माझी सासू आहेस. राजा जनक हातात फाळ घेऊन तुलाच नांगरत होते, ज्यायोगे तुझ्यातूनच सीतेचा प्रादुर्भाव झाला. ॥७॥
तस्मान्निर्यात्यतां सीता विवरं वा प्रयच्छ मे ।
पाताले नाकपृष्ठे वा वसेयं सहितस्तया ॥ ८ ॥
म्हणून एक तर तू सीतेला परत दे अथवा माझासाठीही आपल्या अंकावर जागा दे; कारण पाताळ असो वा स्वर्ग, मी सीतेच्या बरोबरच राहीन. ॥८॥
आनय त्वं हि तां सीतां मत्तोऽहं मैथिलीकृते ।
न मे दास्यसि चेत् सीतां यथारूपां महीतले ॥ ९ ॥

सपर्वतवनां कृत्स्नां विधमिष्यामि ते स्थितिम् ।
नाशयिष्याम्यहं भूमिं सर्वमापो भवत्विह ॥ १० ॥
तू माझ्या सीतेला घेऊन ये. मी मैथिलीसाठी मत्त झालो आहे. जर या पृथ्वीवर तू त्याच रूपात मला सीतेस परत केले नाहीस तर मी पर्वत आणि वनांसहित तुझी स्थितिच नष्ट करून टाकीन. सर्व भूमिचा विनाश करून टाकीन. मग भलेही सर्व काही जलमयच होऊन जावो. ॥९-१०॥
एवं ब्रुवाणे काकुत्स्थे क्रोधशोकसमन्विते ।
ब्रह्मा सुरगणैः सार्धं उवाच रघुनन्दनम् ॥ ११ ॥
काकुत्स्थ राम जेव्हा क्रोध आणि शोकाने युक्त होऊन याप्रकारे गोष्टी बोलू लागले तेव्हा देवतांसहित ब्रह्मदेवांनी त्या रघुनंदन श्रीरामांना म्हटले - ॥११॥
राम राम न सन्तापं कर्तुमर्हसि सुव्रत ।
स्मर त्वं पूर्वकं भावं मन्त्रं चामित्रकर्शन ॥ १२ ॥
सुव्रत रामा ! आपण मनांत संताप करू नये. शत्रुसूदन ! आपल्या पूर्व स्वरूपाचे स्मरण करावे. ॥१२॥
न खलु त्वां महाबाहो स्मारयेयमनुत्तमम् ।
इमं मुहूर्तं दुर्धर्ष स्मर त्वं जन्म वैष्णवम् ॥ १३ ॥
महाबाहो ! मी आपल्याला आपल्या परम उत्तम स्वरूपाचे स्मरण करून देत नाही. दुर्धर्ष वीरा ! केवळ हा अनुरोध करत आहे की या समयी आपण ध्यानाच्या द्वारे आपल्या वैष्णव स्वरूपाचे स्मरण करावे. ॥१३॥
सीता हि विमला साध्वी तव पूर्वपरायणा ।
नागलोकं सुखं प्रायात् त्वदाश्रयतपोबलात् ॥ १४ ॥
साध्वी सीता सर्वथा शुद्ध आहे. ती प्रथमपासूनच आपल्या परायण रहात आहे. आपला आश्रय घेणेच तिचे तपोबल आहे. त्याच्या द्वारे ती सुखपूर्वक नागलोकाच्या बहाण्याने आपल्या परमधामात निघून गेली आहे. ॥१४॥
स्वर्गे ते सङ्‌गमो भूयो भविष्यति न संशयः ।
अस्यास्तु परिषन्मध्ये यद् ब्रवीमि निबोध तत् ॥ १५ ॥
आता पुन्हा साकेत धामात आपली तिच्याशी भेट होईल; यात संशय नाही. आता या सभेमध्ये मी आपल्याला जे काही सांगत आहे, त्याच्या कडे ध्यान द्यावे. ॥१५॥
एतदेव हि काव्यं ते काव्यानां उत्तमं श्रुतम् ।
सर्वं विस्तरतो राम व्याख्यास्यति न संशयः ॥ १६ ॥
आपल्या चरित्राशी संबंध असणारे हे काव्य, जे आपण ऐकले आहे, सर्व काव्यांमध्ये उत्तम आहे. श्रीरामा ! हे आपल्या सार्‍या जीवनवृत्तांताचे विस्ताराने ज्ञान करविल, यात संदेह नाही. ॥१६॥
जन्मप्रभृति ते वीर सुखदुःखोपसेवनम् ।
भविष्यदुत्तरं चेह सर्वं वाल्मीकिना कृतम् ॥ १७ ॥
वीर ! अविर्भाव काळापासूनच जे आपल्या द्वारा सुखदुःखांचे (स्वेच्छेने) सेवन झाले आहे त्याचे तसेच सीता अंतर्धान झाल्यानंतर ज्या भविष्यात होणार्‍या गोष्टी आहेत त्यांचेही महर्षि वाल्मीकिंनी यात पूर्णरूपाने वर्णन केलेले आहे. ॥१७॥
आदिकाव्यं इदं राम त्वयि सर्वं प्रतिष्ठितम् ।
नह्यन्योऽर्हति काव्यानां यशोभाग् राघवादृते ॥ १८ ॥
श्रीरामा ! हे आदिकाव्य आहे. या संपूर्ण काव्याची आधारशिला आपणच आहात - आपल्याच जीवन वृत्तान्तास घेऊन या काव्याची रचना झाली आहे. रघुकुलाची शोभा वाढविणार्‍या आपणाशिवाय दुसरा कोणी असा यशस्वी पुरुष नाही जो काव्यांचा नायक होण्याचा अधिकारी असेल. ॥१८॥
श्रुतं ते पूर्वमेतद्धि मया सर्वं सुरैः सह ।
दिव्यमद्‌भुतरूपं च सत्यवाक्यं अनावृतम् ॥ १९ ॥
देवतांसह मीही पूर्वीच आपल्याशी संबंधित या संपूर्ण काव्याचे श्रवण केले आहे. हे दिव्य आणि अद्‍भुत आहे. यात कुठलीही गोष्ट लपविण्यात आलेली नाही. यात सांगितल्या गेलेल्या सर्व गोष्टी सत्य आहेत. ॥१९॥
स त्वं पुरुषशार्दूल धर्मेण सुसमाहितः ।
शेषं भविष्यं काकुत्स्थ काव्यं रामायणं शृणु ॥ २० ॥
पुरुषसिंह रघुनंदना ! आपण धर्मपूर्वक एकाग्रचित्त होऊन भविष्यातील घटनांनी युक्त शेष रामायण काव्यही ऐकावे. ॥२०॥
उत्तरं नाम काव्यस्य शेषमत्र महायशः ।
तच्छृणुष्व महातेज ऋषिभिः सार्धमुत्तमम् ॥ २१ ॥
महातेजस्वी आणि महायशस्वी श्रीरामा ! या काव्याच्या अंतिम भागाचे नाव उत्तरकांड आहे. तो उत्तम भाग आपण ऋषिंसहित ऐकावा. ॥२१॥
न खल्वन्येन काकुत्स्थ श्रोतव्यं इदमुत्तमम् ।
परममं ऋषिणा वीर त्वयैव रघुनन्दन ॥ २२ ॥
काकुत्स्थ वीर रघुनंदना ! आपण सर्वोत्कृष्ट राजर्षि आहात. म्हणून प्रथम आपणच हे उत्तम काव्य ऐकले पाहिजे, दुसर्‍याने नव्हे. ॥२२॥
एतावदुक्त्वा वचनं ब्रह्मा त्रिभुवनेश्वरः ।
जगाम त्रिदिवं देवो देवैः सह सबान्धवैः ॥ २३ ॥
इतके सांगून तीन्ही लोकांचे स्वामी ब्रह्मदेव देवता आणि त्यांच्या बंधु-बान्धवांसह आपल्या लोकी परत गेले. ॥२३॥
ये च तत्र महात्मान ऋषयो ब्राह्मलौकिकाः ।
ब्रह्मणा समनुज्ञाता न्यवर्तन्त महौजसः ॥ २४ ॥

उत्तरं श्रोतुमनसो भविष्यं यच्च राघवे ।
तेथे जे ब्रह्मलोकात राहाणारे महातेजस्वी महात्मा ऋषि विद्यमान होते, ते ब्रह्मदेवांची आज्ञा मिळवून भावी वृत्तांतानी युक्त उत्तरकाण्ड ऐकण्याच्या इच्छेने परत आले. (त्यांच्या बरोबर ब्रह्मलोकांस गेले नाहीत.) ॥२४ १/२॥
ततो रामः शुभां वाणीं देवदेवस्य भाषिताम् ॥ २५ ॥

श्रुत्वा परमतेजस्वी वाल्मीकिमिदमब्रवीत् ।
त्यानंतर देवाधिदेव ब्रह्मदेवांनी सांगितलेल्या त्या शुभ वाणीचे स्मरण करून परम तेजस्वी श्रीरामांनी महर्षि वाल्मीकिंना याप्रकारे म्हटले - ॥२५ १/२॥
भगवन् श्रोतुमनस ऋषयो ब्राह्मलौकिकाः ॥ २६ ॥

भविष्यदुत्तरं यन्मे श्वोभूते सम्प्रवर्तताम् ।
भगवन्‌ ! हे ब्रह्मलोकाचे निवासी महर्षि माझ्या भावी चरित्राने युक्त उत्तरकांडाचा शेष अंश ऐकू इच्छितात. म्हणून उद्या सकाळपासूनच त्याच्या गायनास आरंभ व्हावयास हवा. ॥२६ १/२॥
एवं विनिश्चयं कृत्वा सम्प्रगृह्य कुशीलवौ ॥ २७ ॥

तं जनौघं विसृज्याथ पर्णशालामुपागमत् ।
तामेव शोचतः सीतां सा व्यतीयाय शर्वरी ॥ २८ ॥
असा निश्चय करून श्रीरघुनाथांनी जनसमुदायाला निरोप दिला आणि कुश तसेच लवाला बरोबर घेऊन ते आपल्या पर्णशालेत आले. तेथे सीतेचेच चिंतन करीत त्यांनी रात्र व्यतीत केली. ॥२७-२८॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डेऽष्टनवतितमः सर्गः ॥ ९८ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा अठ्ठयाण्णवावा सर्ग पूरा झाला. ॥९८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP