॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
बालकाण्ड
॥ अध्याय चोविसावा ॥
श्रीराममंडपागमनं
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
श्रीरामांचे लग्नमंडपात आगमन -
श्रीरामप्रसाद सेवितां । समाधिसुख फिकें आतां ।
ऐसी उल्लासली सीता । श्रीरघुनाथाचेनि शेषें ॥ १ ॥
सद्गुारूपरात्पर उपरी । सर्वातें सावधान करी ।
घटिका प्रतिष्ठिली अंतरीं । जीवनावरी संख्येची ॥ २ ॥
अक्षरें अक्षर पळेंपळ । घडी भरता न लगे वेळ ।
लोकव्यापारें विकळ । काळ गेला नेणती ॥ ३ ॥
घडी झेंगटातें हाणित । काळ जावो न द्यावा व्यर्थ ।
तेणें काळें काळ अंत आणित । मुद्दल तेथें बुडालें ॥ ४ ॥
नवल लोकांची नवाई । काळें गिळिलें न पडे ठायीं ।
दुमाही चौमाही गणिता वही । तेणें पाही नागवले ॥ ५ ॥
सद्गुीरू सांगे भरली घडी । उगेंच पाहताती वर्हााडी ।
ज्यांसी निजकार्याची तातडी । ते घडिया घडी साधिती ॥ ६ ॥
श्रीरामसेवक साववित्त । क्षणक्षण जावों न देती व्यर्थ ।
फळ विसतारी रघुनाथ । तेणेम् सकळार्थ सफळित ॥ ७ ॥
वधूचें वस्त्र परिधान - रुखवत समारंभ :
सीतेसी नेसावया चिदंबर । नानारत्नांणचे अलंकार ।
हृदयपदकीं नीळ मनोहर । विचित्र हार मुक्तलग ॥ ८ ॥
अहंकाराचें बीज भरडी । मोहममतेचा कोंडा दवडी ।
सोलींव डाळीची परवडी । भरलीं दुरडीं भावाची ॥ ९ ॥
घेवोनि विवेकाची चाळणी । कणिक चाळिली सुगरणीं ।
फोलकट त्यागिलें सांडोनी । गूळ गोडपणीं त्यामाजीं ॥ १० ॥
समूळ देंठीहून सुटलीं । निजपरिभाकें उतटलीं ।
रमदास्पर्शें नाही स्पर्शिली । फळें आणिलीं फळार्था ॥ ११ ॥
रंभाफळें परम पवित्रें । वक्राकृति अपवित्रें ।
सोलून सांडिलीं रामचम्द्रें । केलीं अवक्रेम् श्रीरामें ॥ १२ ॥
लोकांचे फळी चूतफळ । तेंही माझारी गांठियाळ ।
रामविस्तारी अच्युतफळ । फळें सफळ विदेही ॥ १३ ॥
सौभाग्यद्रव्य ठेविलें आधीं । धणे आणि जळदी ।
जिरें मेळविलें त्यामधीं । जेवी सद्बुद्धीं विवेक ॥ १४ ॥
श्रीराम मुख्य अहेवतंतु । श्याममणि स्वये ओंवितु ।
त्यामाजी रामनामसंकेतु । कंठीं एकांतु गळसरी ॥ १५ ॥
तोडूनि सांडिल्या गांठ्याळ गांठी । स्मरणमनी सीतेच्या कंठीं ।
बांधावया गळसरी गोमटी । राम जगजेठी स्वयें ओंवी ॥ १६ ॥
विमन त्यजोनि सर्वत्र । शुद्ध सुमनांचे हार ।
गुनेवीण गुंफी रामचम्द्र । सीता मनोहर तेणें शोभे ॥ १७ ॥
नाहीं मध्यमध्य गांथाळ । सबाह्य रसें अति रसाळ ।
इक्षुदंड अति सिज्ज्वळ । आणिले सफळ फळांसी ॥ १८ ॥
कांटे पुढें काळे नेवाळे । चहूं वर्णांही वेगळे ।
ऊंस आणिले प्रेमसमेळें । सफळ फळें सीतेसी ॥ १९ ॥
एकें बीजेंवीण फळें । एकें त्वचेवीण रसालें ।
एकें सबाह्य निर्मळें । स्फळफळें सीतेसी ॥ २० ॥
चहूं मुक्तींच्या सेवया कुसरी । श्रद्धेच्या परड्या दुरड्या भरी ।
देवोनि नवविधींच्या करीं । फळ बाहेरी काढिलें ॥ २१ ॥
ऋष्यशृंगाची कांता अलंकारें । शांता करवली सौभाग्यभरें ।
मिरवताहे अति गजरें । मंगळतुरें गर्जती ॥ २२ ॥
सूर्यवंशींच्या राजवल्लभा । जैसी सूर्याची निजप्रभा ।
तैशा शोभती निजांगशोभा । वेदगर्भा श्रुतिव्यक्ती ॥ २३ ॥
लग्नीं पहावया रघुपती । वर्हाूडिणी आल्या श्रुतिस्मृती ।
कर्मकांडींच्या घेवोनि बुंथी । मिरवताती निजगजरें ॥ २४ ॥
वर्हााडी मंडळींचे जनकाकडून स्वागत :
घेवोनि ऋषिवर्गाचा मेळ । निघाला दशरथ भूपाळ ।
राजे चालिले सुहृद सकळ । तुरें बंबाळ लागलीं ॥ २५ ॥
जनक आला जी सामोरा । नमस्कारिलें ऋषींश्वरां ।
मंडपीं बैसविलें नृपवरा । ऋषीश्वरांसमवेत ॥ २६ ॥
कन्या बैसवाया मूळपीठ । निजप्रकृतीचें धुवट ।
वरी अंथरिलें चोखट । पुरोहित श्रेष्ठ शतानंद ॥ २७ ॥
कन्या आणिल्या बाहेरी । वस्त्रें अर्पून त्यांचे करीं ।
सवेंचि नेल्या जी भीतरीं । त्या चमत्कारीं नेसल्या ॥ २८ ॥
फेडून मायामलिनांबरें । रामनामें चूण मनोहरें ।
चौघी नेसल्या चिदंबरें । जयजयकारें आणिल्या ॥ २९ ॥
सीतेसह चारही जनककन्यांचे मंडपात आगमन :
वरावया निजात्मपती । चारी मुक्ति शृंगारिती ।
तैशा चौघी जणी येती । सीता सती मुख्यत्वें ॥ ३० ॥
सीतेचे पल्लव झळकत । उजेड पडला मंडपात ।
सून देखोनि दशरथ । अति विस्मित पैं जाला ॥ ३१ ॥
तें तंव लेणियाचे लेणें । तिचेनि शोभती भूषणें ।
सीतेचेनि निजगुणें । अवघ्या सगुण भासती ॥ ३२ ॥
सीताअम्गप्रभाकिरनें । लाजलें अंधाराचें जिणें ।
लोपलें उष्ण आणि चांदनें । प्राणी प्रानें तटस्थ ॥। ३३
न कळे दिवस ना राती । सवों विसरलीं नेत्रपातीं ।
समूळ शब्दांची जाली शांती । अवघीं पाहती टकमका ॥ ३४ ॥
चार बंधूंना फळे अर्पण :
वसिष्ठ म्हणे सावधान । दशरथें देखिली सून ।
वेगी करी फल अर्पण । श्रीराम लग्न साधावया ॥ ३५ ॥
लावावया श्रीरामलग्न । नाहीं उरले व्यवधान ।
सीता साधावया निधान । फल अर्पण करी वेगी ॥ ३६ ॥
पहिलेनि अर्पितां फळ । कार्य न साधे तत्काळ ।
निःशेष अर्पिल्या फळ सकळ । खूण भूपाळ पावला ॥ ३७ ॥
वसिष्ठाच्या निजवचना । सन्मुख बैसवोनि चारी सुना ।
निःशेष फळ अर्पिले जाणा । वस्त्रभूषणांसमवेत ॥ ३८ ॥
पुरोहित जनकवंशी । धतानंद धनउ्दासी ।
दशरथें आणोनि त्यासी । घातली कळशीं कोटिद्रव्यें ॥ ३९ ॥
तो म्हणे राया दशरथा । देखिलिया रघुनाथा ।
द्रव्यलोभ नाहीं आता । रायें चरणीं माथा ठेविला ॥ ४० ॥
द्विजा अग्रपूजासमान । दिधलें सुमनचम्दन ।
सकळां ताळ्बूल संपूर्ण । फलार्पण पैं जालें ॥ ४१ ॥
वसिष्ठ साम्गे जनकासी । शीघ्र मूळ यावें वरासी ।
दशरथासहित ऋषी । जानवशासी स्वयें आले ॥ ४२ ॥
बोलती वराडणी बेल्हाळा । कन्या देखतांचि डोळां ।
तहान भूक नाठवे सकळां । अपूर्व कळा सौभाग्यें ॥। ४३ ॥
अत्यंत सुरूपा चौघीजणी । समूळ सौंदर्याची खाणी ।
लावण्यपीठींच्या दिव्य योगिनी । सगुणगुणी गुनांच्या ॥ ४४ ॥
साधावया नवविधान । स्वयें श्रीराम सज्ञान ।
त्र्यंबक भंगोनियां जाण । दिव्य रत्नस पर्णिलें ॥ ४५ ॥
येवोनि आद्या शक्ति जाण । स्वयें श्रीरामासी आपण ।
अदृश्यीं बांधलें दृश्यकांकण । जीवें निंबलोण करोनि गेली ॥ ४६ ॥
सुमेधा राणी तेलवण करते :
जनक अति संभ्रमेंसी । मूळ निघाला वरासी ।
सुमेधा अत्यंत उल्लासीं । तेलवनासी विस्तारी ॥ ४७ ॥
सूक्ष्म सेवेचे पैं लाडू । श्रीरामासी अत्यंत कोडू ।
वैर्ग्य शर्करा अति गोडू । तिळव्या जोडु सुस्वादु ॥ ४८ ॥
शाब्दिकशब्दाची खसखस । धुवून सांडिली कसकस ।
लाडू वळले सुरस । शुद्ध चिदम्श गुळगोडिया ॥ ४९ ॥
चार्वाकचारें फोडफोडूण् । चैतन्यचारोळ्या पडिपाडू ।
चित्साकरा वलले लाडू । सुखसुरवाडू श्रीरामा ॥ ५० ॥
अष्टांगयोगींचे अष्टदळबीज । त्याचेंही सोलूनि काढिलें निज ।
सुमेधा सुगंध वळिले सहज । दाखवी वोज तेलवणा ॥ ५१ ॥
सप्रेम सर्वांगीं कांटे । फणसाअंतरीं गोड गोमटे ।
त्याचेंही बीज काढूनि नेटें । लाडू गोमटे वळियेले ॥ ५२ ॥
अति सज्ञान विदेहभाज । गंगाफळाचें निजबीज ।
सोलून लाडू वळिले सहज । निजवोज तेलवणा ॥ ५३ ॥
कंतकांमाजी दांभिकबोरें । आंत आंबट वरी साजिरें ।
त्याचेंही बीज फोडून निजनिर्धारें । काढी बाहेर निजबीज ॥ ५४ ॥
सद्भावाचा गूळ गोडू । घालोनि वळिले लाडू ।
श्रीराम जाणे चवी निवाडू । पडिपाडू तेलवणा ॥ ५५ ॥
वैराग्य कडकडित कडकणें । सुमेधा आणि तेलवणें ।
श्रीराम उद्देशाचेनि गुणें । फुटणें तुटणें त्या नाहीं ॥ ५६ ॥
निजप्रपंचा उबगले । तेचि वांकडे कानवले ।
मुरडी सद्भावें मुरडले । ते आवडले श्रीरामा ॥ ५७ ॥
संदेहाचें तेलवण । बोलावया बहुतां आंगवण ।
परी तें विदेहाचें तेलवण । अति कठिण अर्थितां ॥ ५८ ॥
वरासी मूळ गज गहिरे । जनक आला अत्यादरें ।
सुमेधा सुवासिनीसंभारें । निजगजरें पैं आली ॥ ५९ ॥
देवोनि दशरथें सन्मान । दोहीं पक्षींचे सुहृज्जन ।
सभे बैसविलें प्रसन्नवदन । समाधान मंडपीं ॥ ६० ॥
वर उपविष्ट सर्वांतरी ।भावें आणावया सभेभीतरीं ।
वसिष्ठ सद्गुंरू हातीं धरी । राम बाहेरी तैं प्रगटे ॥ ६१ ॥
श्रीराम लावण्याची राशी । फेडी वेडी नाहीं त्यासी ।
त्याचेनि सुंदरत्व जगासी । सीमा रूपासी न अक्रवे ॥ ६२ ॥
वसिष्ठगुरुवचनीं ।श्रीराम आला सभास्थानी ।ते
जें कोंदलीं नभमोदनी । वरासनी बैसविला ॥ ६३ ॥
देखतां श्रीरामाचें मुख । तटस्थ जाले सकळ लोक ।
डोळ्या लागली टकमक । अंतरीं सुखकोंदलें ॥ ६४ ॥
श्रीरामाचेनि दर्शनें । होत डोळियां पारणें ।
इंद्रियें सुखावली संपूर्ण । बोलणें चालणें तटस्थ ॥ ६५ ॥
वसिष्ठ म्हणे सावधान । वेगीं समर्पा तेलवण ।
सुमेधा येवोनि आपण । पाहे वदन वराचे ॥ ६६ ॥
देखोनि श्रीरामाचे वक्त्र । परमानंदे धाले नेत्र ।
देत तृप्तीचे ढेकर । तरी अपार भुकेले ॥ ६७ ॥
वारंवार मुख न्याहाळी । हरिखें निंबलोण उतरी ।
राम देखोनि सर्वांतरी । जीवें करी कुरवंडी ॥ ६८ ॥
सर्वांतरी रा परिपूर्ण । कवणा वाहूं तेलवण ।
वसिष्ठ येवोनि आपण । श्रीराम खुणेनें प्रबोधी ॥ ६९ ॥
ज्याचें देखतां दर्शन । सर्वांतरीं दिसे परिपूर्ण ।
तोचि श्रीराम मुख्य जाण । त्यासी तेलवण अर्पावे ॥ ७० ॥
ऐकतां वसिष्ठाचें वचन ।सुमेधा जाली सावधान ।
श्रीरामासी तेलवण । वस्त्रें भूषणें अर्पिली ॥ ७१ ॥
वर्हााडी बोलती नवाई । मुख्य वाहमाय नोळखे जावाई ।
आतां आम्हीं करावें काई । वर लवलाही चालूं द्या ॥ ७२ ॥
जैसें श्रीरामासी तेलवण । तैसेचि भरतशत्रुघ्नलक्ष्मण ।
देवोनि दिव्यांबरें भूषण । समसमान पूजिले ॥ ७३ ॥
चौघे कुमार घोड्यावरून मंडपाकडे येतात :
शुद्ध सत्वाचा श्वेत वारू । त्यावरी चढला रघुवीरू ।
सत्वाथिला अत्यंत धीरू । श्रीरामभारू तो साहे ॥ ७४ ॥
चौघांसीही समसमान । बैसावया श्वेतवाहन ।
चौघेही वर शोभायमान । जनजनयन आल्हादी ॥ ७५ ॥
लक्षूनि पूर्ण परमानंदू । प्रगटे सच्चिदानंदु ।
तैसे रामास्मेत तिघे बंधु । निजात्मबोधु एकात्मता ॥ ७६ ॥
जेवीं का ॐकार मुख्य वेदु । तोचि भासे चरुत्विधु ।
तैसेच हेही चौघे बंधु । निजबोध एकात्मता ॥ ७७ ॥
एकाची साधूच्या शरीरीं । भासती पुरुषार्थ चारी ।
तैसीच या चौभांची परी । एकाकारीं निजबोधु ॥ ७८ ॥
जेवी एक श्लोकीं चरण चारी । तैसीच या चौघांची परी ।
श्रीराम अर्थ श्लोकाक्षरीं । तेवीं चौघांभीतरी एकत्व ॥ ७९ ॥
वर मिरवती एकत्रें । धरिलीं तन्मयाचीं निजछत्रें ।
निजबोधाचीं ढळती चामरें । दशविध तुरें लागली ॥ ८० ॥
घंटाकिंकिणींचे शब्द । मधुर शब्दांचे अनुवाद ।
वीणा वेणु मृदंगनाद । सुद्ध शब्दचि काहळा ॥ ८१ ॥
तुरें काहळा गर्जती भारी । निशाण त्राहाटिलें गजरीं ।
दुमदुमलिया मंगळ मोहरी । नादांतरी मन निवे ॥ ८२ ॥
जैसा अनुहताचा गजर । तैसीं तुरें अपार ।
नादें कोंदलें अंबर । शब्दाकार नभ जालें ॥ ८३ ॥
श्रीरामवर्णनी चतुर । चौघे भाट अति गंभीर ।
उठरा मागध विचित्र । वंशींचे वीर वर्णिती ॥ ८४ ॥
शब्दानुवादें अत्यंत प्रबळ । साही जणां वाद सबळ ।
शब्द करिती सळ । अभिमान प्रबळ ज्ञानाचा ॥ ८५ ॥
आठही भाव अत्यम्तप्रीतीं । सत्वाचा वारू धरोन हातीं ।
श्रीरामसवें नित्य चालतीं । अन्यथा गति त्यां नाहीं ॥ ८६ ॥
सुखछायेची आतपत्रें । चिदंबरींचीं पालवछत्रें ।
झळकताती तेजाकारें । श्रीरामचम्द्रें उल्लास ॥ ८७ ॥
अनुबह्व स्वानम्दे दुर्धर । भाट गर्जती अति गंभीर ।
दोहीं बाहीं कुंजरभार । चालती स्थिर श्रीरामें ॥ ८८ ॥
श्रीरामें त्यजिल्या त्याग देऊनी । अष्टही महासिद्धि नाचणी ।
नाचती चपळपणीं । जनांलागूनी भुलवावया ॥ ८९ ॥
सिद्धि जेथें नाचता देखतीं । योगी साधक तेथें ढेसती ।
शेखी संज्ञासी भुलती । पहाणें रघुपती विसतोनी ॥ ९० ॥
चैतन्य बुका घाली रघुनाथ । ज्यासी लागे तो धन्य जगांत ।
याचकाचे निवे चित्त । तैसे देत संज्ञेंनें ॥ ९१ ॥
शतानंद जगजेठी । घेवोनि विवेकवेताटी ।
दृश्याची मांदी मागें लोटी । श्रीराम दृष्टीं पहावया ॥ ९२ ॥
श्रीरामरूपीं अत्यंत प्रीती । वैष्णव पुढें नाचती ।
अहं सोहं सोडोनि वृत्ती । नित्य करिती स्वानंदें ॥ ९३ ॥
श्रीरामासवें सुवासिनी । ब्रह्मविद्येच्या ब्राह्मणी ।
बोधपुत्राच्या जननी । सुखासनीं मिरवती ॥ ९४ ॥
ऐसिया सुवासिनी समस्ता । निजबोधाच्या अक्षता ।
घालिती रघुनाथाचे माथां । लक्ष सर्वथा न चुकती ॥ ९५ ॥
श्रीरामाचे सोयरे आप्त । योगी अनुभवी ज्ञानी मुक्त ।
त्यांसी वहनें रघुनाथ । जें जें देत तें ऐका ॥ ९६ ॥
एका सलोकता घोडे । एका समीपता रथ चोखडे ।
एका स्वरूपता गज गाढे । भवभंगडे रणर्तंगी ॥ ९७ ॥
सायुज्य चवरडोलावरी । बैसविले निजाधिकारी ।
त्यासी जवळोनिया दुरी । क्षणभ्री जाऊं नेदी ॥ ९८ ॥
भरून रथ तम औषध । अग्नियंत्रें करोनि सिद्ध ।
श्रीरामासीं अति विनोद । एक प्रबुद्ध दाविती ॥ ९९ ॥
चैतन्याग्नि देवोनि देहीं । ममता जाळिली हवाई ।
गगनास उसळोनियां पाहीं । ठायींच्या ठायीं निवाली ॥ १०० ॥
सलोभ लोभाच्या चिचुंदरी । विवेके जाळोनि टाकिल्या दुरी ।
त्या अडति जनांवरी । उरीं शिरीं जाळितां ॥ १ ॥
देवोनि उपशम अनळा । जाळिला क्रोधाचा भुइनळा ।
भडभडां निघोनि ज्वाळा । तोही तत्काळ निवाला ॥ २ ॥
श्रीरामयुक्तीच्या स्वलीळा । जाळित कामाचा हातनळा ।
जाळूं नेणती त्या अबळा । जीवीं जिव्हाळा पोळितु ॥ ३ ॥
पाहतां अत्यंत कठीण । चिन्मात्र अग्नि लावून पूर्ण ।
जाळिला अहंकारबाण । पळे जीवपण दचकोनी ॥ ४ ॥
अहंममता कामक्रोधशांती । करीत येतसे रघुपती ।
वृथा वाढविली युक्ती । ऐसें संतीं न म्हणावें ॥ ५ ॥
जाहल्या अहंममतादिशांती । उजळोनि निजात्मज्योती ।
प्रकटली परमदीप्ती । तेही स्थिती अवधारा ॥ ६ ॥
समूळ अंधार नुरेचि तेथ । उष्ण चांदणें घोटीं समस्त ।
तेज प्रकटलें अत्यद्भुत । सुखें डुल्लत श्रीरामें ॥ ७ ॥
एवं नाना परींचे त्याग । पदोपदीं जी अनेग ।
ओवाळिती जीवभाग । स्वयें श्रीराम पैं आला ॥ ८ ॥
कन्येचिया द्वारापासीं । एकें भागीं सिद्धिवासी ।
शुकनालागीं श्रीरामासीं । पूर्ण कलशेंसी तिष्ठती ॥ ९ ॥
दुस्रे भागीं द्वाराप्रई । श्रद्धा कीर्ति धृति विरक्ती ।
जीवे ओंवाळावया रघुपती । स्वयें तिष्ठती सर्वदा ॥ ११० ॥
एकीं त्याग दिधला निःशेष । एकीं दिधला परम हर्ष ।
एकीं दिधले अनंत सुख । एकीं आवश्यक निजवास ॥ ११ ॥
जीवभावाचिया मुदा । ओंवाळूनि सांडे सुमेधा ।
सोहळा देखोनि निर्वदा । परमानंदा ते पावे ॥ १२ ॥
द्वारीं परवेशला रघुनाथ । चौघां बंधूंसमवेत ।
अवघे जयजयकार करीत । मंडपाआम्त आणिले ॥ १३ ॥
छेदाव्या हृदयबंधु । गुरुवाक्येंसी रिघे बोधु ।
तैसे घेवोनि तिघे बंधु । राम प्रसिद्धु स्वयें आला ॥ १४ ॥
दशेंद्रियें अति समर्थ । दशेंद्रियांसी अति अलिप्त ।
तोचि महाराज दशरथ । सोहळा समस्त त्याचेनि ॥ १५ ॥
एका जनार्दना शरण । मंडपा श्रीराम आगमन ।
पुढें मधुपर्कविधान । श्रेतीं सावधान परिसावें ॥ १६ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायने बालकांडे एकाकारटीकायां श्रीराममंडपागमनं नाम चतुर्विंशतितमोऽध्यायः ॥ २४ ॥ ॥ ओंव्या ११६ ॥
GO TOP
|