श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ पञ्चपञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
राज्ञो निमेर्वसिष्ठस्य च मिथः शापेन देहत्यागः -
राजा निमि आणि वसिष्ठांचा एक-दुसर्‍याच्या शापाने देहत्याग -
एष ते नृगशापस्य विस्तरोऽभिहितो मया ।
यद्यस्ति श्रवणे श्रद्धा शृणुष्वेहापरां कथाम् ॥ १ ॥
श्रीरामांनी म्हटले - लक्ष्मणा ! याप्रकारे मी तुला राजा नृगाच्या शापाचा प्रसंग विस्तारपूर्वक सांगितला आहे. जर ऐकण्याची इच्छा असेल तर दुसरी कथाही ऐक. ॥१॥
एवमुक्तस्तु रामेण सौमित्रिः पुनरब्रवीत् ।
तृप्तिराश्चर्यभूतानां कथानां नास्ति मे नृप ॥ २ ॥
श्रीरामांनी असे म्हटल्यावर सौमित्र परत म्हणाला -हे राजन ! ह्या आश्चर्यजनक कथा ऐकत असता मला कधी तृप्ति वाटत नाही. ॥२॥
लक्ष्मणेनैवमुक्तस्तु राम इक्ष्वाकुनन्दनः ।
कथां परमधर्मिष्ठां व्याहर्तुमुपचक्रमे ॥ ३ ॥
लक्ष्मणाने याप्रकारे म्हटल्यावर इक्ष्वाकुनंदन श्रीरामांनी पुन्हा उत्तम धर्माने युक्त कथा सांगण्यास आरंभ केला - ॥३॥
आसीद्राजा निमिर्नाम इक्ष्वाकूणां महात्मनाम् ।
पुत्रो द्वादशमो वीर्ये धर्मे च परिनिष्ठितः ॥ ४ ॥
सौमित्रा ! महात्मा इक्ष्वाकु-पुत्रांमध्ये निमि नामक एक राजा झाला आहे, जो इक्ष्वाकुचा बारावा पुत्र होता. तो पराक्रम आणि धर्मात पूर्णतः स्थिर राहाणारा होता. ॥४॥
स राजा वीर्यसम्पन्नः पुरं देवपुरोपमम् ।
निवेशयामास तदा अभ्याशे गौतमस्य तु ॥ ५ ॥
त्या पराक्रमसंपन्न नरेशांनी त्या काळात गौतम आश्रमाजवळ देवपुरी समान एक नगर वसविले. ॥५॥
पुरस्य सुकृतं नाम वैजयन्तमिति श्रुतम् ।
निवेशं यत्र राजर्षिः निमिश्चक्रे महायशाः ॥ ६ ॥
महायशस्वी राजर्षि निमिने ज्या नगरात आपले निवासस्थान बनविले त्याचे सुंदर नाव वैजयंत ठेवले गेले. याच नावाने त्या नगराची प्रसिद्धि झाली. (देवराज इंद्रांच्या प्रासादाचे नाम वैजयंत आहे. त्याच्याशी समतेमुळे नगराचेही नाम वैजयंत ठेवले गेले होते.) ॥६॥
तस्य बुद्धिः समुत्पन्ना निवेश्य सुमहापुरम् ।
यजेयं दीर्घसत्रेण पितुः प्रह्लादयन् मनः ॥ ७ ॥
ते महान्‌ नगर वसविल्यावर राजाच्या मनात हा विचार उत्पन्न झाला की मी पित्याच्या हृदयाला आल्हाद प्रदान करण्यासाठी एका अशा यज्ञाचे अनुष्ठान करीन, जो दीर्घकाळपर्यंत चालू राहाणारा असेल. ॥७॥
ततः पितरमामन्त्र्य इक्ष्वाकुं हि मनोः सुतम् ।
वसिष्ठं वरयामास पूर्वं ब्रह्मर्षिसत्तमम् ॥ ८ ॥

अनन्तरं स राजर्षिः निमिरिक्ष्वाकुनन्दनः ।
अत्रिमङ्‌गिरसं चैव भृगुं चैव तपोनिधिम् ॥ ९ ॥
त्यानंतर इक्ष्वाकुनंदन राजर्षि निमिने आपला पिता मनुपुत्र इक्ष्वाकु यांस विचारून आपला यज्ञ करण्यासाठी सर्वात प्रथम ब्रह्मर्षि शिरोमणी वसिष्ठांचे वरण केले. त्यानंतर अत्रि, अंगिरा तसेच तपोनिधी भृगुंनाही आमंत्रित केले. ॥८-९॥
तमुवाच वसिष्ठस्तु निमिं राजर्षिसत्तमम् ।
वृतोऽहं पूर्वमिन्द्रेण अन्तरं प्रतिपालय ॥ १० ॥
त्या समयी ब्रह्मर्षि वसिष्ठांनी राजर्षिंच्या मध्ये श्रेष्ठ निमिंना म्हटले - देवराज इंद्रांनी एका यज्ञासाठी आधीच माझे वरण केले आहे, म्हणून तो यज्ञ जोपर्यंत समाप्त होत नाही तो पर्यंत तू माझ्या आगमनाची प्रतिक्षा कर ! ॥१०॥
अनन्तरं महाविप्रो गौतमः प्रत्यपूरयत् ।
वसिष्ठोऽपि महातेजा इन्द्रयज्ञमथाकरोत् ॥ ११ ॥
वसिष्ठ निघून गेल्यावर महान्‌ ब्राह्मण महर्षि गौतमांनी येऊन त्यांचे काम पूरे केले. तिकडे महातेजस्वी वसिष्ठही इंद्रांचा यज्ञ पूरा करू लागले. ॥११॥
निमिस्तु राजा विप्रांस्तान् समानीय नराधिपः ।
अयजद् हिमवत्पार्श्वे स्वपुरस्य समीपतः ।
पञ्चवर्षसहस्राणि राजा दीक्षामथाकरोत् ॥ १२ ॥
नरेश्वर राजा निमिने त्या ब्राह्मणांना बोलावून हिमालयाजवळ आपल्या नगरानिकटच यज्ञ आरंभ केला, राजा निमिने पाच हजार वर्षांसाठी यज्ञाची दीक्षा घेतली. ॥१२॥
इन्द्रयज्ञावसाने तु वसिष्ठो भगवान् ऋषिः ।
सकाशमागतो राज्ञो हौत्रं कर्तुमनिन्दितः ॥ १३ ॥

तदन्तरमथापश्यद् गौतमेनाभिपूरितम् ।
तिकडे इंद्र-यज्ञाची समाप्ति झाल्यावर अनिंद्य भगवान्‌ वसिष्ठ ऋषि राजा निमिकडे होतृकर्म करण्यासाठी आले. तेथे येऊन त्यांनी पाहिले की जो समय प्रतीक्षेसाठी दिलेला होता, तो गौतमांनी येऊन पूरा केलेला होता. ॥१३ १/२॥
कोपेन महताविष्टो वसिष्ठो ब्रह्मणः सुतः ॥ १४ ॥

स राज्ञो दर्शनाकाङ्‌क्षी मुहूर्तं समुपाविशत् ।
तस्मिन्नहनि राजर्षिः निद्रयाऽपहृतो भृशम् ॥ १५ ॥
हे पाहून ब्रह्मकुमार वसिष्ठ महान्‌ क्रोधाने आविष्ट झाले आणि राजाला भेटण्यासाठी दोन घटकापर्यंत तेथे बसून राहिले. परंतु त्या दिवशी राजर्षि निमि अत्यंत निद्रेला वश होऊन झोपून राहिले होते. ॥१४-१५॥
ततो मन्युर्वसिष्ठस्य प्रादुरासीन्महात्मनः ।
अदर्शनेन राजर्षेः व्याहर्तुमुपचक्रमे ॥ १६ ॥
राजा भेटला नाही, या कारणाने महात्मा वसिष्ठ मुनिंना फारच क्रोध आला. ते राजर्षिना लक्ष्य करून बोलू लागले - ॥१६॥
यस्मात् त्वमन्यं वृतवान् मामवज्ञाय पार्थिव ।
चेतनेन विनाभूतो देहस्ते पार्थिवैष्यति ॥ १७ ॥
भूपाल निमे ! तू माझी अवहेलना करून दुसर्‍या पुरोहिताचे वरण केले आहेस, म्हणून तुझे शरीर अचेतन होऊन पडून जाईल. ॥१७॥
ततः प्रबुद्धो राजा तु श्रुत्वा शापमुदाहृतम् ।
ब्रह्मयोनिमथोवाच स राजा क्रोधमूर्च्छितः ॥ १८ ॥
त्यानंतर राजाची झोप उडाली. ते त्यांना दिल्या गेलेल्या शापाची गोष्ट ऐकून क्रोधाने मूर्छित झाले आणि ब्रह्मर्षि वसिष्ठांना म्हणाले - ॥१८॥
अजानतः शयानस्य क्रोधेन कलुषीकृतः ।
उक्तवान् मम शापाग्निं यमदण्डमिवापरम् ॥ १९ ॥
मला आपल्या अगमनाची गोष्ट माहीत नव्हती, म्हणून मी झोपलो होतो. परंतु आपण क्रोधाने कलुषित होऊन माझ्यावर दुसर्‍या यमदण्डाप्रमाणे शापाग्निचा प्रहार केला आहे. ॥१९॥
तस्मात् तवापि ब्रह्मर्षे चेतनेन विनाकृतः ।
देहः स सुरुचिरप्रख्यो भविष्यति न संशयः ॥ २० ॥
म्हणून ब्रह्मर्षे ! निरंतर शोभेने युक्त जे आपले शरीर आहे, तेही अचेतन होऊन पडून जाईल - यात संशय नाही. ॥२०॥
इति रोषवशादुभौ तदानीं
अन्योन्यं शपितौ नृपद्विजेन्द्रौ ।
सहसैव बभूवतुर्विदेहौ
तत्तुल्याधिगतप्रभाववन्तौ ॥ २१ ॥
याप्रकारे त्या समयी रोषाच्या वशीभूत होऊन ते दोघे नृपेंद्र आणि द्विजेंद्र परस्परास शाप देऊन एकाएकी विदेह झाले. त्या दोघांचा प्रभाव ब्रह्मदेवांप्रमाणे होता. ॥२१॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे पञ्चपञ्चाशः सर्गः ॥ ५५ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा पंच्चावन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP