[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ द्वात्रिंशः सर्गः॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
सीताया वितर्कः -
सीतेचे तर्क - वितर्क -
ततः शाखान्तरे लीनं दृष्ट्‍वा चलितमानसा ।
वेष्टितार्जुनवस्त्रं तं विद्युत्सङ्‌घात पिङ्‌गलम् ॥ १ ॥

सा ददर्श कपिं तत्र प्रश्रितं प्रियवादिनम् ।
फुल्लाशोकोत्कराभासं तप्तचामीकरेक्षणम् ॥ २ ॥
जेव्हा शाखांमध्ये लपून बसलेल्या, विद्युतपुञ्जा प्रमाणे अत्यन्त पिंगट वर्णाच्या श्वेत वस्त्रधारण केलेल्या हनुमन्तावर सीतेची दृष्टी पडली तेव्हा तिच्या चित्तात खळबळ माजली. फुललेल्या अशोक प्रमाणे, अरुण कान्तिने प्रकाशित एक विनीत आणि प्रिय भाषी वानर फाद्यांच्यामध्ये बसलेला सीतेने पाहिला. त्याचे नेत्र तप्त सुवर्णासारखे चमकत होते. ॥१-२॥
साथ दृष्ट्‍वा हरिश्रेष्ठं विनीतवदवस्थितम् ।
मैथिली चिन्तयामास विस्मयं परमं गता ॥ ३ ॥
विनीत भावाने बसलेल्या वानरश्रेष्ठ हनुमन्तास पाहून मिथिलेशकुमारीला फारच आश्चर्य वाटले. ती मनातल्या मनात विचार करू लागली की - ॥३॥
अहो भीममिदं सत्त्वं वानरस्य दुरासदम् ।
दुर्निरीक्ष्यं इदं मत्वा पुनरेव मुमोह सा ॥ ४ ॥
अहो ! हा वानर तर फारच भयंकर आहे. याला पकडणे तर अत्यन्त कठीण आहे. त्याच्याकडे तर डोळे वर करून बघण्याचे ही धाडस होत नाही. असा विचार करून ती भयाने परत मूर्च्छित झाली. ॥४॥
विललाप भृशं सीता करुणं भयमोहिता ।
रामरामेति दुःखार्ता लक्ष्मणेति च भामिनी ॥ ५ ॥
भयाने मोहित झालेली भामिनी सीता अत्यन्त करूणाजनक स्वरात विलाप करू लागली. हे रामा ! हे लक्ष्मणा ! असे म्हणून ती दुःखाने व्याकुळ होऊन अत्यन्त विलाप करू लागली. ॥५॥
रुरोद सहसा सीता मन्दमन्दस्वरा सती ।
साथ दृष्ट्‍वा हरिवरं विनीतवदुपागतम् ।
मैथिली चिन्तयामास स्वप्नोऽयमिति भामिनी ॥ ६ ॥
त्यावेळी सीता मन्दातिमन्द स्वरात एकाएकी रडू लागली. इतक्यात तिने पाहिले की तो श्रेष्ठ वानर मोठ्‍या विनयाने जवळ येऊन बसला आहे. भामिनी मैथिलीने विचार केला की हे एखादे स्वप्न तर नाही ना ? ॥६॥
सा वीक्षमाणा पृथुभुग्नवक्त्रं
शाखामृगेन्द्रस्य यथोक्तकारम् ।
ददर्श पिङ्‌गप्रवरं महार्हं
वातात्मजं बुद्धिमतां वरिष्ठम् ॥ ७ ॥
त्याच्याकडे दृष्टि टाकून तिने वानरराज सुग्रीवाच्या आज्ञाधारक, विशाल, आणि वज्राच्या प्रहाराने ज्याच्या हनुवटीवर व्रण झालेला आहे, अशा परम आदरणीय, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ, वानरप्रवर पवनपुत्र हनुमन्तास पाहिले. ॥७॥
सा तं समीक्ष्यैव भृशं विपन्ना
गतासुकल्पेव बभूव सीता ।
चिरेण सञ्ज्ञां प्रतिलभ्य चैवं
विचिन्तयामास विशालनेत्रा ॥ ८ ॥
त्याला पाहून सीता अत्यन्त व्यथित होऊन तिची अशी अवस्था झाली की जणु तिचे प्राणच जात आहेत. परत थोड्‍या वेळाने सावध झाल्यावर विशाललोचना सीतेने विचार केला की - ॥८॥
स्वप्ने मयायं विकृतोऽद्य दृष्टः
शाखामृगः शास्त्रगणैर्निषिद्धः ।
स्वस्त्यस्तु रामाय सलक्ष्मणाय
तथा पितुर्मे जनकस्य राज्ञः ॥ ९ ॥
आज मी हे अत्यन्त वाईट स्वप्न पाहिले आहे. स्वप्नात वानर दिसणे शास्त्रांनी निषिद्ध सांगितले आहे. माझी भगवन्तास प्रार्थना आहे की श्रीराम, लक्ष्मण आणि माझे पिता जनक यांचे मंगल होवो, त्यांच्यावर या दुःस्वप्नाचा प्रभाव पडू नये. ॥९॥
स्वप्नो हि नायं नहि मेऽस्ति निद्रा
शोकेन दुःखेन च पीडितायाः ।
सुखं हि मे नास्ति यतो विहीना
तेनेन्दुपूर्णप्रतिमाननेन ॥ १० ॥
परन्तु हे स्वप्न तर असूच शकत नाही, कारण शोक आणि दुःखाने पीडित झाल्याने मला कधी झोपच येत नाही. (जो सुखात असेल त्यालाच झोप लागते) मला तर त्या पूर्णचन्द्राप्रमाणे मुख असलेल्या श्रीरघुनाथाचा वियोग झाल्यामुळे आता सुखही सुलभ नाही. ॥१०॥
रामेति रामेति सदैव बुद्ध्या
विचिन्त्य वाचा ब्रुवती तमेव ।
तस्यानुरूपं च कथां तदर्था-
मेवं प्रपश्यामि तथा शृणोमि ॥ ११ ॥
मी बुद्धिने सर्वदा राम ! राम ! असे चिन्तन करीत वाणीद्वाराही रामनामाचेच उच्चारण करीत असते, म्हणून त्या विचारास अनुसरूनच तोच अर्थ असलेली ही कथा मी पहात आणि ऐकत आहे. ॥११॥
अहं हि तस्याद्य मनोभवेन
सम्पीडिता तद्‌गतसर्वभावा ।
विचिन्तयन्ती सततं तमेव
तथैव पश्यामि तथा शृणोमि ॥ १२ ॥
माझे हृदय सदा श्रीरामाच्या ठिकाणीच जडलेले आहे, म्हणून श्रीराम दर्शनाच्या लालसेने अत्यन्त पीडित होऊन सदा त्यांचेच चिन्तन करीत सर्वत्र त्यांनाचा पहात असते आणि त्यांच्याच कथा ऐकत असते. ॥१२॥
मनोरथः स्यादिति चिन्तयामि
तथापि बुद्ध्यापि वितर्कयामि ।
किं कारणं तस्य हि नास्ति रूपं
सुव्यक्तरूपश्च वदत्ययं माम् ॥ १३ ॥
मला असे वाटते आहे की, ही माझ्या मनान्तील एखादी भावना असेल पण बुद्धिने तर्क-वितर्क करते की हे जे काही दिसत आहे त्याचे कारण काय आहे ? मनोरथ अथवा मनातील भावनांना कधी स्थूल रूप नसते. परन्तु या वानराचे रूप तर स्पष्ट दिसत आहे. एवढेच नव्हे तर तो माझ्याशी संभाषणही करीत आहे. ॥१३॥
नमोऽस्तु वाचस्पतये सवज्रिणे
स्वयम्भुवे चैव हुताशनाय ।
अनेन चोक्तं यदिदं ममाग्रतो
वनौकसा तच्च तथास्तु नान्यथा ॥ १४ ॥
मी वाणीने स्वामी बृहस्पतिला, वज्रधारी इन्द्रास, स्वयंभू ब्रह्मदेवास तसेच वाणीची अधिष्ठातृ-देवता अग्निला नमस्कार करते. या वनवासी वानराने माझ्या समक्ष जे काही सांगितले आहे, ते सर्व सत्य ठरो, त्यातील काहीही अन्यथा ठरू नये. ॥१४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे द्वात्रिंशः सर्गः ॥ ३२ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दराकाण्डाचा बत्तीसावा सर्ग पूर्ण झाला ॥३२॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP