|
॥ श्रीरामचरितमानस ॥ (मराठी अनुवाद) ॥ लंकाकाण्ड ॥ ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ अध्याय ६ वा Download mp3 दो० :- कालरूप खलवनदहन गुणाकार घनबोध ॥ जो कालरुप असून खलरुपी वनाला जाळणारा, गुणांचे माहेर घर, ज्ञानधन आहे व शंकर व ब्रह्मदेवही ज्याची सेवा ( भक्ती ) करतात त्याच्याशी वैर कसे करायचे ? ॥ दो० ४८ म ॥ वैर सोडुनि द्या वैदेही भजा कृपानिधि परमस्नेही ॥ छं० :- ढकलीति भूधर शिखर कोटी विविध गोळे चालले । म्हणून वैर सोडून वैदेही देऊन टाका व कृपानिधी परमस्नेही रामास भजा – शरण जा ! ॥ १ ॥ त्याचे बोलणे रावणाला बाणासारखे लागले, तेव्हा रावण म्हणाला की जा व हे अभागे तोंड काळे कर. ॥ २ ॥ म्हातारा आहेस म्हणून तुला मारीत नाही पण पुन्हा मला तोंडही दाखवूं नकोस. ॥ ३ ॥ माल्यवंताने आपल्या मनात अनुमान केले की कृपानिधान राम याला मारुं पहात आहेत. ॥ ४ ॥ तो उठून अपशब्द बोलत निघून गेला मग मेघनाद सकोप होऊन म्हणाला, ॥ ५ ॥ माझे कौतुक ( कर्तृत्व ) सकाळी पहावे, पुष्कळ करुन दाखवीन उगाच बोलून कशाला दाखवूं ? ॥ ६ ॥ पुत्राच्या या वचनाने रावणाला भरोसा आला व त्याने पुत्रास मांडीवर घेतले. ॥ ७ ॥ याप्रमाणे विचार करीत असतांच पहाट झाली व कपींनी लंकेची चारी द्वारे रोधून धरली. ॥ ८ ॥ क्रुद्ध झालेल्या कपींनी त्या अवघड गडाला वेढा घातला तेव्हा लंकेत कोलाहल फारच वाढला. ॥ ९ ॥ विविध आयुधे धारण केलेले निशाचर आले व त्यांनी गडावरुन गिरिशिखरे ढकलून देण्यास सुरुवात केली. ॥ १० ॥ कोट्यावधी गिरीशिखरे ढकलली जाऊं लागली व अगणित तोफांचे गोळे सुटू लागले. त्या पर्वतांचा घडघडाट वज्रपातासारखा व तोफांचा गडगडाट प्रलय काळी गर्जणार्या मेघांसारखा ( विजांसारखा ) होत होता अक्राळ विक्राळ मर्कट योद्धे लढूं लागले. गोळे लागून देह जखमांनी जर्जर झाले तरी ते कचरले नाहीत, उलट तेच पर्वत पकडून गडावर असे फेकूं लागले की निशाचर वीर जागच्या जागी मरुन पडूं लागले. ॥ छंद ॥ कुठें कोसलाधिप दो भ्राते- । धन्वी ख्यात सकल लोकीं ते ॥ दो० :- सर्वां दश दश मारि शर महिं पडले कपि वर ॥ कुठे आहेत ते सर्व लोकांत धनुर्धर म्हणून प्रसिद्ध असलेले दोघे ? कोसलपती आणि त्यांचा भाऊ ? ॥ १ ॥ कुठे आहेत द्विवीद नलनील आणि सुग्रीव ? आणि कुठे आहेत ते बळाची सीमा असलेले अंगद आणि हनुमान ? ॥ २ ॥ कुठे आहे तो बंधूद्रोही बिभीषण ? आज या सर्वांचाच वध करतो. बिभीषणाला तर हट्टाने मारतो. ॥ ३ ॥ अशी घोषणा करुन त्याने धनुष्यावर कठीण बाण लावले व धनुष्य अति क्रोधाने कानापर्यंत ताणले. ॥ ४ ॥ मेघनाद बाणांचे समूह सोडू लागला व ते जणूं पंख असलेले पुष्कळ सर्पच धावत सुटले ॥ ५ ॥ वानर जिकडे तिकडे धडाधड खाली पडताना दिंसूं लागले, तेव्हा कोणीही समोर उभा राहू शकला नाही. ॥ ६ ॥ कपी भल्ल जिकडे तिकडे पळत सुटले ( कारण ) युद्धाची इच्छा त्या सर्वांना सोडून पळाली ! ॥ ७ ॥ तेव्हा रणांगणात असा एकही वीर किंवा वानर राहीला नाही की ज्याला त्याने प्राणशेष करुन टाकला नाही ( सारे मृतप्राय झाले ). ॥ ८ ॥ त्याने सर्व कपींना दहा दहा बाण मारले तेव्हा कपी मूर्च्छित होऊन पडले तेव्हा बलवान व धैर्यवान मेघनाद सिंहनाद करुन गर्जना करुं लागला. ॥ दो० ५० ॥ बघुन पवनसुत कटकाव्याकुळ । धावे काळ जणूं क्रोधाकुळ ॥ दो० :- वश ज्याच्या माये प्रबल शिव विरंचि लघुथोर ॥ आपले सैन्य व्याकुळ झाले आहे असे पाहून पवनसुत क्रोधाने क्षुब्ध होऊन काळासारखा धावला. ॥ १ ॥ एक महाशैल उपटून त्वरेने व अति रोषाने तो मेघनादावर फेकला. ॥ २ ॥ पर्वत रथावर येत आहे असे पाहून मेघनाद आकाशात पळाला सारथी, रथ, व घोडे यांचा चुराडा झाला. ॥ ३ ॥ हनुमंताने पुष्कळ वेळां आव्हान दिले पण तो मर्म जाणत असल्याने जवळ आला नाही ॥ ४ ॥ मग मेघनाद रघुपतींजवळ गेला व नाना प्रकारचे अपशब्द बोलला. ॥ ५ ॥ अस्त्रे व शस्त्रे मिळून सर्व प्रकारच्या आयुधांचा मारा त्याने केला, पण प्रभूंनी ती सर्व आयुधे कौतुकाने छेदून टाकली. ॥ ६ ॥ हा प्रताप पाहून तो मूर्ख अति चिडला व अनेक प्रकारे मायेने ( कपटाने ) पोरखेळ करुं लागला. ॥ ७ ॥ ज्याप्रमाणे सापाचे पिलूं गरुडास दाखवून भेडसावण्याचा त्याच्याशी कोणी पोरखेळ करावा तसे. ॥ ८ ॥ ज्यांच्या प्रबल मायेला शिव, ब्रह्मदेव व लहान थोर सर्व वश असतात त्यांना हा निशाचराचा पोरगा दुष्टबुद्धी आपली माया दाखवीत आहे ! ॥ दो० ५१ ॥ वर्षि चढुनि नभिं बहु अंगारां । प्रगटति भूमींतुनि जलधारा ॥ दो० :- रामाज्ञा मागून कपि वालिसुतादि समेत ॥ आकाशांत उंच जाऊन त्याने निखार्यांची पुष्कळ वृष्टी केली, जमिनीतून पाण्याच्या धारा निघूं लागल्या. ॥ १ ॥ नाना प्रकारचे पिशाच व पिशाचिनी मारा-कापा असे ओरडत अतिशय नाचूं लागल्या. ॥ २ ॥ तो कधी विष्टा, पू, रक्त, केंस, हाडे यांची वृष्टी करतो तर कधी दगडांची वृष्टी करतो. ॥ ३ ॥ धुळीचा वर्षाव करुन तर त्याने इतका अंधार केला की आपलाच पसरलेला हात आपल्यालाही दिसूं नये. ॥ ४ ॥ ती माया पाहून सर्व कपी व्याकुळ झाले व त्यांना वाटले की हे असेच चालू राहीले तर सर्वांना मरण येणार ॥ ५ ॥ ते मायेचे कौतुक पाहून राम हसले व त्यांनी ओळखले की सर्व कपी भयभीत झाले आहेत. ॥ ६ ॥ जसा सूर्य अंधाराच्या समूहाचा नाश करतो तशी एकाच बाणाने प्रभूंनी सर्व माया नष्ट केली. ॥ ७ ॥ कृपाद्रुष्टीने कपी-भल्लांकडे पाहताच ते इतके प्रबळ झाले की युद्धा पासून रोखले तरी रोखून न राहता युद्धास निघाले. ॥ ८ ॥ क्षतज नयन उरबाहु विशाल । हिमगिरि निभ तनु किंचित लाल ॥ दो० :- जमे रक्त खाड्यांमधें वरती धूळ उडून ॥ लक्ष्मणाचे नेत्र रक्तासारखे लालबुंद झाले आहेत, छाती आणि बाहू विशाल आहेत, आणि हिमालयासारखी कान्ती असलेले शरीर किंचित लाल दिसत आहे. ॥ १ ॥ इकडे लक्ष्मण आहेत, त्या बाजूस दशमुखाने मोठे योद्धे पाठवले, ते नाना प्रकारची शस्त्रास्त्रे धारण करुन धावत आले. ॥ २ ॥ पर्वत, नखे व वृक्ष ही आयुधे धारण करणारे कपी राम जय जयकार करीत धावले. ॥ ३ ॥ जोडीस जोड पाहून सर्व भिडले व दोन्ही बाजूंना जयाची इच्छा थोडी थोडकी नाही ! ॥ ४ ॥ मुष्टी लाथा मारुन दातांनी कापून जयशील कपी त्यांना दटावीत आहेत ॥ ५ ॥ मारा, मारा, धरा, धरा, पकडा शिरे हातानी तोडून टाकून, बाहू उखडून – उपटून टाका. ॥ ६ ॥ अशा प्रकारचा ध्वनी नवखंडात व्यापून राहीला – कोंदाटला व प्रचंड धडे धरणीवर धावू लागली. ॥ ७ ॥ देवांचा समुदाय आकाशात जमून हे कौतुक पहात आहेत ते कधी आनंदित तर कधी मनांत खिन्न होत आहेत. ॥ ८ ॥ जमिनीवरील खळग्यातून रक्त जमले व त्यावर धूळ उडून जणूं असे वाटते आहे की निखाराच्या ढीगांना राखेने झाकून ठेवले आहेत. ॥ दो० ५३ ॥ जखमी वीर विराजति तैसे । कुसुमित किंशुक तरुवर जैसे ॥ दो० :- मेघनाद सम कोटि शत सुभट बघति उचलून ॥ फुललेले पळसाचे मोठे वृक्ष जसे शोभावे तसे जखमी झालेले वीर शोभूं लागले. ॥ १ ॥ लक्ष्मण व मेघनाद हे दोघे योद्धे भारी क्रोधाने परस्पर लढत आहेत. ॥ २ ॥ ( परंतु ) एक दुसर्यास जिंकण्यास समर्थ होईना, तेव्हा निशाचर मेघनाद कपटबळ व अन्याय करुं लागला. ॥ ३ ॥ तेव्हा लक्ष्मण मनांत फार क्रुद्ध झाले व एका क्षणांत रथासह सारथीचा त्यांनी विनाश केला. ॥ ४ ॥ लक्ष्मणाने नाना प्रकारे प्रहार केले तेव्हा राक्षस मृतप्राय झाला. ॥ ५ ॥ तेव्हा रावणसुताने मनांत अनुमान केले की संकट घोर आहे ! हा माझे प्राण हरण करील. ॥ ६ ॥ त्याने वीरघातिनी शक्ती सोडली ती तेजोराशी शक्ती लक्ष्मणाच्या छातीत लागली. ॥ ७ ॥ शक्ती लागून लक्ष्मण मुर्च्छित पडताच तो मेघनाद भीती सोडून जवळ आला. ॥ ८ ॥ मेघनाद व त्याच्या सारखे अगणित महावीर लक्ष्मणाला उचलण्याचा प्रयत्न करुं लागले, पण जगाचा आधार शेष त्यांना कसा उचलता येणार ? उचलूं शकले नाहीत व दांत ओठ खात लज्जित होऊन पाय आपटित चिडून परत गेले. ॥ दो० ५४ ॥ श्रुणु गिरिजे क्रोधानल ज्याचा । करी दाह चौदा भुवनांचा ॥ दो० :- ये सुषेण नमि मस्तका राम सरोरुह पायिं ॥ गिरिजे ऐक ! ज्याचा क्रोधाग्नी चौदा भुवनांना केव्हाच जाळून टाकतो त्याला युद्धांत कोण जिंकु शकणार ? ज्याची सेवा सुर नर व स्थावर जंगम सर्व करतात त्याला कोण जिंकणार ? ॥ १-२ ॥ या कौतुकातील रहस्य त्यालाच कळते की राम ज्याच्यावर कृपा करतात. ॥ ३ ॥ संध्याकाळ झाली तेव्हा ( दोन्ही ) सैन्ये परत फिरली आणि सेनाप्रमुख आपापल्या सेनेची गणती करु लागले. ॥ ४ ॥ रामचरणसरसिज उरिं राखुनि । निघे प्रभंजनसुत बल भाषुनि ॥ दो० :- ऐकुनि दशमुख रुष्ट अति, तो मनिं करी विचार ॥ रामचरणकमलें आपल्या हृदयात ठेऊन प्रभंजन-सुत आपले बळ वर्णन करुन निघाला. ॥ १ ॥ तिकडे हेराने हे सर्व मर्म रावणास सांगीतले तेव्हा रावण कालनेमीच्या घरी आला. ॥ २ ॥ दशमुखाने कार्य सांगीतले व कालनेमीला मर्म कळले व त्याने आपले मस्तक पुष्कळदा जोराने आपटले. ॥ ३ ॥ व म्हणाला – तुमच्या देखत ज्याने नगर जाळले, त्याचा मार्ग कोणी कधी काळी तरी रोखूं शकेल कां ? ॥ ४ ॥ रघुपतीला शरण जाऊन आपले हित साधा नाथ ! वृथा बडबडणे बंद करा. ॥ ५ ॥ नीलकमला सारखे सुंदर श्याम शरीर असलेले व जे नयनांना आनंद देणारे आहेत त्यांस हृदयात ठेवा ॥ ६ ॥ मी तू आणि माझे हा मूर्खपणा सोडा, आणि तुम्ही महामोहरुपी रात्रीत झोपलेले आहांत, त्यांतून जागे व्हा. ॥ ७ ॥ काळरुपी व्याळाला किंवा मत्त हत्ती जो भक्षण करतो अशा ( सिंहाला ) जिंकणे तुम्हांला स्वप्नात तरी शक्य आहे काय ? ॥ ८ ॥ ते ऐकून दशानन अति रुष्ट झाला तेव्हा कालनेमीने विचार केला की, हा दुष्ट पापांनी काठोकाठ भरलेला आहे, तेव्हा त्याच्या हातून मरण्यापेक्षा रामदूताच्या हाताने मरावे हेच उत्तम ! ॥ दो० ५६ ॥ जाइ वदुनि पथिं माया रचितो । सर मंदिर वर बाग बनवितो ॥ दो० :- सरिं शिरतां कपि पद धरी मकरी त्वरा करून ॥ तसे त्यास सांगून तो निघाला आणि हनुमंताच्या मार्गात त्याने मायिक रचना केली एक तलाव, शिव मंदिर व उत्तम बगीचा बनविला. ॥ १ ॥ मारुतसुताने शुभ आश्रम पाहिला व वाटले की मुनीच्या परवानगीने पाणी पिऊं म्हणजे श्रम नष्ट होतील. ॥ २ ॥ तो राक्षस तेथे कपटमुनी बनून बसला असता मायापतीच्या दूताला मोहूं पहात आहे. ॥ ३ ॥ पवनसुताने जाऊन नमस्कार केला व तो ( कपटमुनी ) रामगुणकथा सांगू लागला. ॥ ४ ॥ व कथा ओघात म्हणाला रावण व राम यांचे महायुद्ध सुरु आहे, त्यात राम जिंकतील यात संशय नाही. ॥ ५ ॥ इथे बसूनच मी सर्व पहात आहे ( कारण ) मला ज्ञानद्दष्टीचे पुष्कळ बळ आहे. ॥ ६ ॥ इतक्यात कपीने पिण्यासाठी पाणी मागीतले तेव्हा मुनीने आपला कमंडलू पुढे केला पण कपी म्हणाला हे एवढेसे पाणी मला कसे पुरेल ? ॥ ७ ॥ ( त्यावर मुनी म्हणाला ) तलावांत स्नानही करुन या म्हणजे मग मी तुम्हांला दिक्षा देईन त्यायोगे तुम्हांला सर्व ज्ञानही प्राप्त होईल. ॥ ८ ॥ कपी सरात = तलावात शिरताच मगरीने त्वरा करुन कपीचा पाय गिळला, तेव्हा ती त्वरेने मारली गेली, व दिव्य देह धारण करुन विमानात बसून निघाली ! ॥ दो० ५७ ॥ कपि ! तव दर्शन हरि मम पापा । तात ! दूर करि मुनिवर शापा ॥ दो० :- बघती भरत विशाल अति; निशिचर मनि मानून ॥ हे कपी, तुझ्या दर्शनाने माझे पाप नष्ट झाले व मी शापमुक्त झाले ॥ १ ॥ हा मुनी नाही, हा भयंकर निशाचर आहे, हे माझे म्हणणे कपी तुम्ही सत्य माना, बरं ! ॥ २ ॥ असं सांगून जेव्हा ती अप्सरा निघून गेली तेव्हा कपी निशाचराजवळ गेला. ॥ ३ ॥ आणि कपी म्हणाला, अहो मुनी ! तुम्ही आधी गुरुदक्षिणा घ्या व मग मला तुम्ही मंत्र दिक्षा द्या. ॥ ४ ॥ मस्तकाला शेपूट गुंडाळून त्याला गरगरा फिरवून जमिनीवर आपटून कपीने ठार मारला. मरताना त्याने आपला मूळ राक्षस देह प्रगट केला. ॥ ५ ॥ “ राम राम ” उच्चारुन त्याने प्राण सोडला ते पाहून व ऐकून हनुमान आनंदाने निघाला. ॥ ६ ॥ जाऊन पर्वत पाहीला पण औषधी ओळखतां नाही आली तेव्हा एकाएकी कपीने पर्वतच उपटून घेतला. ॥ ७ ॥ पर्वत घेऊन तो आकाशमार्गाने उडत अयोध्येवरुन चालला ॥ ८ ॥ भरताने पाहीले की कोणीतरी अति विशाल प्राणी अयोध्येवरुन जात आहे तेव्हा कोणी निशाचर असावा असे मनात समजून भरताने एक बोथट बाण आकर्ण ताणून मारला. ॥ दो० ५८ ॥ पडला मूर्छित लागत सायक । म्हणतचि राम राम रघुनायक ॥ सो० :- कपिस हृदयिं धरतात पुलकित तनु लोचन सजल ॥ भरत – हनुमान भेट – तो बोथट बाण लागताच “ राम राम रघुनायक ” म्हणतच कपी जमिनीवर मूर्च्छित होऊन पडला. ॥ १ ॥ प्रिय वचन ऐकून भरत धावतच त्वरेने कपीजवळ आले. ॥ २ ॥ कपीला मूर्च्छित पाहून भरताने त्याला हृदयाशी धरुन त्याला जागृत करण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काही शुद्धीवर येईना. ॥ ३ ॥ तेव्हा भरताचे मुख उदास झाले व मनांत भरत अति दु:खी झाले व त्यामुळे बोलूं लागताच त्यांच्या डोळ्यात पाणी आले ॥ ४ ॥ ज्या दैवाने मला रामविमुख केला तोच मला हे दारुण दु:ख देत आहे. ॥ ५ ॥ जर मनाने वाणीने आणि शरीराने माझी रामपदकमलीं निष्कपट प्रीती असेल आणि जर रघुपती मला अनुकूल असतील तर हा कपी मूर्च्छा व पीडा रहित होवो. ॥ ६-७ ॥ हे वचन ऐकताच कपि उठून बसला व “ जय् कोसलाधीश जय ” म्हणाला, ॥ ८ ॥ भरताने कपीला हृदयाशी धरला तेव्हा शरीर रोमांचांनी व डोळे पाण्याने भरलेच व रघुकुल तिलक रामाचे स्मरण केल्याने प्रीती हृदयात मावेना. ॥ दो० ५९ ॥ तात कुशल वद सुखनिधान कीं । सहित अनुज माता हि जानकी ॥ दो० :- मनिं प्रताप तव धरुनि प्रभु जाइन नाथ पळांत ॥ तात ! अनुज आणि माता जानकी यांच्या सहित सुखनिधान ( रघुनाथ ) कुशल आहेत नां ? सांग बरं ! ॥ १ ॥ कपीने सर्व चरित्र संक्षेपाने सांगीतले ते ऐकून भरत मनांत दु:खी होऊन पश्चाताप करुं लागले. ॥ २ ॥ हाय रे दैवा ! मी जन्मलो तरी कशाला ? कारण मी प्रभूच्या एकाही कार्यात उपयोगी पडत नाही ॥ २ ॥ ( पण ) कुसमय आहे हे जाणून भरताने मनात धीर धरला व बलवान वीर भरत कपीला म्हणाले की, ॥ ४ ॥ हे तात ! तुला जाऊन पोचण्यास उशीर होईल व सूर्योदय झाला की कार्यहानी होईल. ॥ ५ ॥ म्हणून माझ्या बाणावर तूं पर्वतसह चढ, मी तुला एका क्षणांत कृपानिकेत रघुनाथांजवळ पोचवितो. ॥ ६ ॥ हे ऐकतांच कपीच्या मनांत क्षणभर अभिमान उत्पन्न झाला की माझा पर्वतासह भार या बाणाला कसा पेलवेल ? ॥ ७ ॥ पण प्रभूचा प्रताप मनांत आणताच भरत चरणांस वंदन करुन कपी म्हणाला, ॥ ८ ॥ हे नाथ ! हे प्रभो ! मी तुमचा प्रताप हृदयांत ठेवून एका पळांत जाईन ( असे म्हणून ) भरताची आज्ञा घेऊन व चरणांस वंदन करुन हनुमान निघाला. ॥ दो० ६० रा ॥ ( जाता जाता मनात ) भरताचे बाहूबल, शील, गुण व प्रभूपदींची अपार प्रीती याची वारंवार प्रशंसा करीत पवनकुमार गेला. ॥ दो० ६० म ॥ तिथें राम लक्ष्मणा निरखुनी । वदले वचन नरा अनुसरुनी ॥ सो० :- प्रभूप्रलाप महान परिसुनि वानरगण विकल ॥ श्रीराम – विलाप प्रताप – हर्षि राम हनुमाना भेटति । प्रभू परम सुजाण कृतज्ञ अति ॥ दो० :- ऐकुनि दशकंधर वचन कुंभकर्ण सुम्लान ॥ राम प्रभु परम सुजाण व अति कृतज्ञ असल्याने हर्षित होऊन हनुमंतास भेटले. ॥ १ ॥ वैद्याने त्वरेने उपाय केले व लक्ष्मण हर्षित होऊन उठून बसले. ॥ २ ॥ प्रभु बंधुला हृदयाशी धरुन भेटले तेव्हा सर्व वानर भल्ल समूह हर्षित झाले. ॥ ३ ॥ वैद्याला प्रथम जसा आणला होता तसाच हनुमंताने त्यास परत पोचविला. ॥ ४ ॥ कृत न बरें त्वां निशिचर राया । अतां जागवा कां मज वाया ॥ दो० :- रामस्वरूप गुण आठवित प्रेम मग्न पळ एक ॥ हे निशाचर राजा ! तू हे बरे केले नाहीस, मला व्यर्थ का जागा केलास ? ॥ १ ॥ हे तात ! अजून तरी अभिमान सोडून रामाला शरण जा म्हणजे तुझे कल्याण होईल. ॥ २ ॥ हे दशशीर्षा ! रघुनायक काय मनुष्य आहेत ? ज्याचे दूत हनुमंतासारखे आहेत, त्यांना तू मनुष्य म्हणतोस ? ॥ ३ ॥ हाय ! हाय ! बंधु तूं अगदी वाईट केलेस आधीच मला का नाही कळविलेस ? ॥ ४ ॥ हे प्रभु ! शंकर, ब्रह्मदेव व इतर सर्व देव ज्यांची सेवा करतात त्या देवाशी तुम्ही वैर केलेत ! ॥ ५ ॥ नारद मुनींनी मला जे ज्ञान सांगीतले ते मी तुला सांगीतले असते पण आता वेळ निघून गेली आहे. ॥ ६ ॥ आता तू मला एकदा कडकडून भेट पाहू मी जाऊन माझे नेत्र सुफल करतो. ॥ ७ ॥ श्याम शरीर, कमलासारखे नेत्र असलेल्या, व तापत्रया पासून मुक्त करणार्या रघुनायकास मी जाऊन पाहतो. ॥ ८ ॥ रामचंद्राचे रुप, गुण आठवत आठवत कुंभकर्ण एक क्षणभर रामप्रेमात मग्न झाल तोच रावणाने अगणित मद्याचे घट व अनेक रेडे वगैरे पशु कुंभकर्णासाठी मागविले. ॥ दो० ६३ ॥ खाउनि महिष करुनि मद पान । गर्जे वज्राघात समान ॥ दो० :- तन मन वचनें त्यजुनि छल भज हं ! राम रणधीर ॥ महिष खाऊन व मद्यपान करुन कुंभकर्णाने वज्राघातासारखी गर्जना केली. ॥ १ ॥ रणमदाने उन्मत्त झालेला कुंभकर्ण लंका गड सोडून बाहेर पडला – सैन्य न घेता एकटाच. ॥ २ ॥ ( कुंभकर्णाला येताना पाहून ) बिभीषण समोर आला व त्याने पायावर डोके ठेऊन आपले नांव सांगीतले. ॥ ३ ॥ त्याने धाकट्या भावाला उठवून हृदयाशी धरला व रघुपतीभक्त झाला आहे हे जाणून तो कुंभकर्णाला प्रिय वाटला. ॥ ४ ॥ ( बिभीषण म्हणाला ) तात ! मी प्रेम हितकारी मंत्र सांगत असता रावणाने मला लाथ मारली. ॥ ५ ॥ त्या दु:खाने मी रघुपतीच्या पायाशी शरण आलो आणि दीन आहे हे पाहून मी प्रभूच्या मनाला आवडलो. ॥ ६ ॥ ऐक सुता ! रावण कालवश झालेला आहे, आता कुठले तो परमहितकारक उपदेश मानणार ? ॥ ७ ॥ धन्य, धन्य आहेस तू बिभीषणा ! कारण तूं निशाचर कुलभूषण झालास ! ॥ ८ ॥ बंधो, तू शोभासागर व सुखसागर रामाला शरण जाऊन आपला वंश प्रकाशमय केलास. ॥ ९ ॥ शरीर – मन – वाणीने छल – कपट सोडून रणधीर रामाची सेवा कर हं ! जा, आतां वीरा, मी सुद्धा कालवश झालो असून मला आपला की परका हे कळत नाहीसे झाले आहे. ॥ दो० ६४ ॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु |