|
॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्री जानकीवल्लभो विजयते ॥ श्रीरामचरितमानस ॥ (मराठी अनुवाद) ॥ चतुर्थः सोपानः ॥ ॥किष्किंधाकाण्ड ॥ ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ अध्याय १ ला Download mp3 स्रग्धरा :- वैदेहीं मार्गमाणः प्रतितरुकुरगं जानकीं मन्यमानो । मूळ मंगलाचरण शा. वि. :- कुन्देन्दीवर-सुंदरावतिबलौ विज्ञान धामावुभौ । अनुवादकृत मंगलाचरण श्लोक वैदेहीचा शोध करित असता प्रत्येक झाडाला व हरिणाला जानकी मानतात व गाढ आलिंगन देऊन मुक्तीरूपी दुर्लभ सद्गती जे देतात; आत्महिताच्या मार्गाने जाणार्यास आपल्या शोकाच्या प्रलापांनी कामरूपाच्या (स्त्रीच्या) विषयी वैराग्य देतात; ते कामांधाचे जन्म मृत्यूभयदायक चरित्र लीला करून दाखविणारे राम आमचे रक्षण करोत. ॥ १ ॥ महाभयाचे निवारण करणारे, कलियुगातील पापाच्या ओघांना साफ जाळून टाकणारे, विविध ताप रूपी कुमुदांना सूर्याच्या तापासारखे, हरिचरणकमलांचे उत्तम दर्शन करविणारे, भ्रमादिक अंधार नाहिसा करणारे, आत्मसुखरूप प्रकाश देण्यात भास्करासारखे आणि कामदेवाच्या शत्रूस (शंकरास) सुख देणारे हे रामनाम, हे मनुजा ! स्मरण कर. ॥ २ ॥ गोस्वामी तुलसीदासकृत मूळ मंगलाचरण कुंदाची फुले व नीलकमल याप्रमाणे अति सुंदर, अति बलवान, विज्ञानाचे धाम, शोध संपन्न श्रेष्ठ धनुर्धर, वेदांनी स्तुती केलेले, गाई व ब्राह्मण समुदाय ज्यांना प्रिय आहेत असे, मायेने मनुष्यरूप धारण केलेले, रघुकुलात श्रेष्ठ, सद्धर्माचे संरक्षक, सर्वांचे हितकर्ते, सीतेचा शोध घेण्यात तत्पर असलेले, मार्गात (चालत) असलेले, ते दोघे रघुवर (राम व लक्ष्मण) आम्हाला भक्ती प्रदान करणारे आहेत, हे निश्चित. ॥ ३ ॥ रामायणरूपी सागराची ज्याच्यापासून उत्पत्ती झाली, (वेदरूपी सागरातून ज्याची निर्मिती झाली), ते कलीमलाचा विध्वंस करणारे, अविनाशी श्री शंभूच्या अतिसुंदर व श्रेष्ठ मुखात सर्वदा शोभायमान असणारे श्री राम नाम रूपी अमृत जे सतत पान करतात (पितात) ते कृती ‘बुद्धीमान’ धन्य होत. ॥ ४ ॥ रघुराया मग पुढें चालले । ऋष्यमूक गिरि निकट पातले ॥ दो० :- जग कारण तारण भव भंजन धरणीभार ॥ मारुती मिलन - कोसलेश दशरथ-सुत जन्मुनि । वनि आलों पितृवचना मानुनि ॥ दो० :- एक मीं मंद मोहवश कुटिल-हृदय अज्ञान ॥ आम्ही कौसलाधीश दशरथ महाराजांचे पुत्र म्हणून जन्मास आलो आहोत. आणि पित्याचे वचन मानून वनात आलो आहोत. ॥१॥ आम्ही दोघे भाऊ असून माझे नाव राम व हा लक्ष्मण आणि आमचे बरोबर सुकुमार व फार सुंदर स्त्री होती. ॥२॥ (पण) इथे निशाचराने वैदहीला चोरून नेली, म्हणून हे विप्रा ! आम्ही तिच्या शोधार्थ हिंडत आहोत.॥३॥ आम्ही आपले चरित्र सांगितले (आता) अहो विप्रा आपण आपला परिचय द्यावा. ॥४॥ हे प्रभू आहेत हे हनुमंताने ओळखले. त्याने रामाचे पाय धरले. उमे ! ते सुख कोणाला वर्णन करता येईल ? ॥५॥ शरीर रोमांचीत झाले. मुखावाटे शब्द बाहेर पडत नाही व प्रभूच्या वेषाच्या सुंदर रचनेकडे पहात आहे ॥६॥ मग पक्का धीर धरून स्तुती करू लागला व (आपलेच) नाथ आहेत हे ओळखून हृदयात हर्ष मावेनासा झाला आहे.॥७॥ स्वामी ! माझ्या परिने न्यायाने मी आपणास नाना प्रश्न विचारले, पण आपणसुद्धा (अज्ञानी) माणसासारखे मला कसे विचारता ? ॥८॥ आपल्या मायेला वश झाल्याने मी भुलून जाऊन फिरत भटकत आहे. त्यामुळे मी प्रभू आपल्याला आळखू शकलो नाही ॥९॥ एक तर मी मंद, त्यात आपल्या मायेच्या मोहाला बळी पडलेला, त्यातही कुटील हृदयाचा व अज्ञानी असे असून प्रभू आपण मला दीन बंधू भगवान असूनही भुलविता ? ॥ दो.२ ॥ नाथ दोष मम जरि बहु असती । प्रभु न सेवका चुकुन भुलवती ॥ दो० :- तो अनन्य ज्याची अशी मति न ढळे हनुमंत ॥ चित्रा नक्षत्र स्तुती नाथ माझ्यात जरी पुष्कळ दोष आहेत, तरी प्रभू कधी चुकून सुद्धा (मजसारख्या चित्रानक्षत्र स्तुती, अवगुणी) सेवकास भुलवीत नाहीत ! ॥१॥ नाथ ! जीव तुमच्याच मायेने मोहीत असल्याने मी केवळ तुमच्याच कृपेने यातून सुटू शकतो ॥ २॥ त्यांत हे रघुवीरा ! आपली शपथ घेऊन सांगतो की भजनादि (भक्तीचे) काही साधन जाणत नाही ॥३॥ सेवक स्वामीच्या व बालक मातेच्या भरवश्यावर निश्चिंत राहतात. तेव्हा अशांचे पालन करणे प्रभूला भागच आहे. ॥४॥ असे म्हणून व्याकुळ होऊन पायांवर पडला आणि आपले स्वत:चे मूळ (कपिरूप) शरीर प्रगट केले व प्रेमाने परिपूर्ण झाला ॥५॥ त्याबरोबर रघुपतींनी त्याला उठवून हृदयाशी धरला व आपल्या प्रेमाश्रुंनी त्याला आभिषेक करून शांतविला ॥६॥ ( व म्हणाले की) हे कपि ! ऐक तू मनात काहीही वाईट वाटून घेऊ नकोस, तू मला लक्ष्मणाच्याही दुप्पट प्रिय आहेस ॥७॥ मी समदर्शी आहे असे सर्वच म्हणतात पण मला अनन्य गति सेवकच प्रिय असतो. ॥८॥ चराचर विश्वरूपाने माझे स्वामी (प्रभू) भगवान आहेत आणि मी त्यांचा सेवक आहे. असा ज्यांचा निश्चय कधी ढळत नाही तोच हनुमंता अनन्य सेवक म्हणावा. ॥ दो. ३॥ बघुनि पवनसुत पति अनुकूल । हर्षित हृदिं हरले सब शूल ॥ दो० :- दोहि कडिल हनुमंत तैं सकल कथा सांगून ॥ स्वामी प्रसन्न आहेत असे पाहून हनुमान हृदयात हर्षित झाला व त्याचे सर्व शूल नष्ट झाले. ॥१॥ प्रीति जडलि अंतर अणु नुरलें । लक्ष्मण रामचरित सब वदले ॥ दो० :- श्रवुनि सखावच हर्षे कृपासिंधु बलशीव ॥ दोघांची एकमेकांवर प्रीती जडली व अंतर(आडपडदा) जरा सुद्धा राहीले नाही. लक्ष्मणाने सर्व रामचरित्र सांगीतले ॥१॥ (ते ऐकून) डोळे पाण्याने भरले आहेत असा सुग्रीव म्हणाला की नाथ ! मिथिलेश्वरांची कन्या मिळेल (काही काळजी करू नका) ॥२॥ मी आपल्या मंत्र्यांसह येथे एके दिवशी विचार करीत बसलो होतो ॥३॥ तेव्हा आकाश मार्गाने जात असलेली एक स्त्री मला दिसली; ती परवश झालेली असल्याने अतिशय विलाप करित होती ॥४॥ राम ! राम ! हा राम ! असे ओरडत असलेल्या तिने आम्हाला पाहून आपले वस्त्र टाकून दिले ॥५॥ ते रामानी मागीतले व त्यांनी त्वरेने आणून दिले, व ते हृदयाशी कवटाळून राम अतिशय शोक करू लागले ॥६॥ सुग्रीव म्हणाला की रघुवीर ! मी सांगतो ते जरा ऐका, मनात चांगला धीर धरा व हा शोक सोडा पाहू ॥७॥ मी सर्व तर्हेने अशी व्यवस्था करेन की जेणे करून जानकी येऊन भेटेल ॥८॥ दोहा० मित्राचे भाषण ऐकून कृपासिंधु व बलसीमा रघुवीर हर्षित झाले व (म्हणाले की) सुग्रीव ! तुम्ही वनात राहण्याचे कारण काय ते मला सांगा, बरं ! ॥ दो. ५ ॥ नाथ वालि मी दोघे भाई । प्रीति होति न वदली जाई ॥ दो० :- श्रुणु सुगीवा वालिला एकचि शरें वधीन ॥ नाथ ! वाली व मी दोघे भाऊ आणि आमच्यात अशी प्रीती होती की ती सांगता येणे शक्य नाही ॥१॥ मायावी नावाचा मय दानवाचा मुलगा, प्रभू ! तो आमच्या गावी आला ॥२॥ मध्यरात्री पुरवेशीजवळ येऊन त्याने गर्जना केली (युद्धाला आव्हान दिले) व वाली शत्रूचे बळ सहन करू शकला नाही ॥३॥ तेव्हा वाली त्याच्यावर धावला, त्याला पाहून तो मायावी पळत सुटला, मग मी सुद्धा भावाच्या मागोमाग गेलो ॥४॥ तो मायावी एका पर्वताच्या मोठ्या गुहेत शिरला, तेव्हा वाली मला असे म्हणाला की ॥५॥ एक पंधरवडा माझी वाट पहा, व मी नाही आलो तर मी मेलो हे नक्की समजा ॥६॥ खरारी ! मी तेथे एक महिनाभर राहीलो, तेव्हा त्या गुहेतून एक रक्ताचा लोट वाहू लागला ॥७॥ वाली मारला गेला व आता तो मलाही येऊन मारेल (असे वाटून) मी एक शिळा लावून पळ काढला ॥८॥ (पुष्कळ दिवस) नगरी राजा विहीन आहे असे पाहून मंत्र्यांनी मला जबरीने राज्य दिले ॥९॥ त्याला मारून वाली घरी परत आला, आणि मला पाहून त्याने मनात वैर धरले ॥१०॥ शत्रुप्रमाणे त्याने मला भरपूर मार दिला व सर्वस्व आणि स्त्री सुद्धा हिरावून घेतली ॥११॥ हे कृपाळ रघुवीरा ! त्याच्या भयाने मला व्याकुळ करून सगळ्या भुवनात भ्रमविला ॥१२॥ येथे तो शापामुळे येऊ शकत नाही, पण माझे मन अजून त्याची भीती विसरत नाही ॥१३॥ मित्र दुःख ज्यां न दुःखकारि । तयां विलोकत पातक भारी ॥ दो० :- प्रिये भीरु ! तो म्हणे श्रुणु समदर्शी रघुनाथ । मित्रधर्म ज्यांना मित्राचे दु:ख दु:खकारक होत नाही त्यांना पाहताच भारी पातक लागते ॥१॥ स्वत:चे दु:खाचे डोंगर रजासारखे (धूळीकण) जाणतात व मित्राचे रजासारखे दु:ख सुमेरू पर्वतासारखे वाटते ॥२॥ अशी बुद्धी ज्यांच्यात स्वाभाविकपणे असत नाही ते शठ मैत्री करतात तरी कशाला ? ॥३॥ कुमार्गापासून निवारण करून सन्मार्गाने चालवितो आणि अवगुण दोष लपवून गुण प्रगाट करतो ॥४॥ देताना किंवा घेताना भय किंवा संशय बाळगीत नाहीत व आपल्या शक्तीच्या प्रमाणात सदा हित करतात ॥५॥ विपत्तीत शतपट स्नेह करतात; हे मित्रगुण आहेत असे संत व श्रुती सांगतात ॥६॥ तोंडावर गोड गोड बोलून ममता दाखवितात पण पाठीमागे अहित, करतात (अशी) मनात कुटिलता असते ॥७॥ (असे) सर्पाच्या गतीसारखे ज्याचे चित्त असते अशा कुमित्रास त्यागणेच हिताचे असते ॥८॥ शठ सेवक, कृपण राजा, कुनारी व कपटी मित्र या चारी व्यक्ती शूलाप्रमाणे पीडादायक आहेत ॥९॥ मित्रा ! माझ्या बळावर सर्व शोकचिंता सोडून दे मी तुझी सर्व कार्ये लवकरच साधीन ॥१०॥ सुग्रीव म्हणाला, रघुवीर ! ऐका वाली महाबलवान व अति रणधीर आहे ॥११॥ (असे म्हणून) त्याने दुंदुभीच्या हाडांचा सापळा व सात ताल वृक्ष दाखविले (तत्क्षणी) रघुनाथाने ते काही प्रयास न करता (सहज) उडवून दिले ॥१२॥ अमित (अपरंपार) बल पाहून प्रीती वाढली व हे वालीचा वध करतील अशी प्रीती उत्पन्न झाली ॥१३॥ वारंवार पायांवर मस्तक नमविले व हे प्रभू आहेत असे जाणून कपीशाला हर्ष झाला ॥१४॥ आणि आत्मज्ञान उपजले, तेव्हा म्हणाला की नाथ ! आपल्या कृपेने माझे मनच आता स्थिर झाले आहे ॥१५॥ महती, विषयसुख, संपत्ती वगैरे सर्व सोडून मी (आता) प्रभूच्या पायांची सेवा करीन ॥१६॥ ही राम भक्तीला बाधक आहेत असे तुमची आराधना करणारे संत म्हणतात ॥१७॥ शत्रुमित्र, सुखदु:खे इ. जगातील सर्व मायाजनित आहेत. त्यांना परमार्थिक आस्तित्व नाही ॥१८॥ राम ! विषादास शमन करणार्या ! तुमची भेट ज्याच्या प्रसादाने झाली तो वाली परम हितकर्ता होय ॥१९॥ ज्या एखाद्या बरोबर स्वप्नात युद्ध झाले तर जागे झाल्यावर तो विचार मनात आला की लाज वाटते, तेव्हा जशी कृपा करावी की सर्व सोडून रात्रंदिवस भजनात घालवू शकेन ॥२१॥ कपीची वैराग्ययुक्त वाणी ऐकून राम धनुष्य हातात घेऊन मोठ्याने हसून म्हणाले की ॥२२॥ हे मित्रा ! तुम्ही जे म्हणालात ते सर्व सत्य आहे पण माझे वचन खोटे होऊ शकत नाही ॥२३॥ गरूडा ! नट जसा माकडाला नाचवितो तसे राम सर्व जगाला नाचवितात असे वेद वर्णन करतात ॥२४॥ रघुनाथ सुग्रीवाला घेउन हातात धनुष्य व बाण घेऊन निघाले(वाली वधासाठी)॥२५॥ (मग) राघुपतींनी सुग्रीवाला पाठविले. त्याने रामाचे पाठबळ मिळाल्यामुळे जवळ जाऊन गर्जना केली. ॥२६॥ ती ऐकताच वाली क्रोधाने धावत निघाला. पण त्याच्या स्त्रीने तारेने त्याचा हात धरला व पाय धरून त्याची समजूत घालू लागली. ॥२७॥ तारा म्हणाली हे पते, ऐकाव जरा, सुग्रीवाला जे भेटले आहेत ते दोघे बंधू तेज व बल यांची परमावधि आहेत. ॥२८॥ ते कोशलराज दशराथांचे पुत्र राम व लक्ष्मण आहेत व ते काळाला सुद्धा तेव्हाच युद्धात जिंकू शकतील. ॥२९॥ दोहा : तो वाली म्हणाला की प्रिये ! भित्रे ! ऐक. रघुनाथ समदर्शी आहेत आणि जरी कदाचित त्यांनी मला मारला तरी मी सनाथ होईन ॥दो.७॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु |