हनुमता सीतां श्रावयतुं श्रीरामकथाया वर्णनम् -
|
सीतेला एकविण्यासाठी हनुमन्ताने श्रीराम कथा वर्णन करणे -
|
एवं बहुविधां चिन्तां चिन्तयित्वा महामतिः ।
संश्रवे मधुरं वाक्यं वैदेह्या व्याजहार ह ॥ १ ॥
|
याप्रमाणे अनेक प्रकारांनी विचार केल्यावर तो महाबुद्धिमान हनुमान, सीतेलाच ऐकू जाईल, अशा जवळच्या जागेवर जाऊन मधुर वाणीने भाषण करू लागला- ॥१॥
|
राजा दशरथो नाम रथकुञ्जरवाजिमान् ।
पुण्यशीलो महाकीर्तिरिक्ष्वाकूणां महायशाः ॥ २ ॥
|
तो म्हणाला - इ़क्ष्वाकु वंशात राजा दशरथ नावाचा एक पुण्यवान राजा होऊन गेला. तो अत्यन्त कीर्तीमान आणि महान यशस्वी होता आणि त्याच्याजवळ रथ, हत्ती आणि घोडेही विपुल प्रमाणात होते. ॥२॥
|
राजर्षीणां गुणश्रेष्ठः तपसा चर्षिभिः समः ।
चक्रवर्तिकुले जातः पुरन्दरसमो बले ॥ ३ ॥
|
त्या श्रेष्ठ नरेशाच्या ठिकाणी राजर्षी सारखे गुण होते. तपस्येमध्येही तो ऋषींची बरोबरी करीत होता. त्याचा जन्म चक्रवर्ती नरेशांचे कुळात झालेला होता आणि तो देवराज इन्द्राप्रमाणे बलवान होता. ॥३॥
|
अहिंसारतिरक्षुद्रौ घृणी सत्यपराक्रमः ।
मुख्यस्येक्ष्वाकुवंशस्य लक्ष्मीवाँल्लक्ष्मिवर्धनः ॥ ४ ॥
पार्थिवव्यञ्जनैर्युक्तः पृथुश्रीः पार्थिवर्षभः ।
पृथिव्यां चतुरन्तायां विश्रुतः सुखदः सुखी ॥ ५ ॥
|
त्याच्या मनात अहिंसा, धर्मासंबन्धी अत्यन्त प्रेम होते आणि क्षुद्रतेचा लवलेशही त्याच्या ठिकाणी नव्हता. तो दयाळू, सत्यपराक्रमी आणि श्रेष्ठ इ़क्ष्वाकु कुळाची शोभा वाढविणारा होता. तो लक्ष्मीवान नरेश राजोचित लक्षणांनी युक्त, परिपुष्ट शोभेने संपन्न आणि भूपालात श्रेष्ठ असा होता. चारी समुद्रांनी वेढलेल्या संपूर्ण भूमंडलावर सर्वत्र त्याची मोठी ख्याती होती. तो स्वतः तर सुखी होताच, शिवाय दुसर्यांनाही सुख देणारा होता. ॥४-५॥
|
तस्य पुत्रः प्रियो ज्येष्ठस्ताराधिपनिभाननः ।
रामो नाम विशेषज्ञः श्रेष्ठः सर्वधनुष्मताम् ॥ ६ ॥
|
त्यांचा ज्येष्ठ पुत्र राम नामाने प्रसिद्ध असून तो पित्याचा अत्यन्त लाडका, चन्द्राप्रमाणे मनोहर मुख असलेला, संपूर्ण धनुर्धरामध्ये श्रेष्ठ आणि शस्त्रविद्येचा विशेष जाणकार आहे. ॥६॥
|
रक्षिता स्वस्य वृत्तस्य स्वजनस्यापि रक्षिता ।
रक्षिता जीवलोकस्य धर्मस्य च परन्तपः ॥ ७ ॥
|
शत्रुंना सन्ताप देणारा श्रीराम आपल्या सदाचाराने स्वजनांचे, जीवलोक (जीव-जगताचे) आणि धर्माचे संरक्षण करणाराही आहे. ॥७॥
|
तस्य सत्याभिसन्धस्य वृद्धस्य वचनात् पितुः ।
सभार्यः सह च भ्रात्रा वीरः प्रव्रजितो वनम् ॥ ८ ॥
|
त्याचा वृद्ध पिता महाराज दशरथ अत्यन्त सत्यप्रतिज्ञ होता. त्यांच्या आज्ञेवरून वीर रघुनाथ आपली पत्नी आणि बन्धु लक्ष्मण यांच्यासह वनात निघून गेले. ॥८॥
|
तेन तत्र महारण्ये मृगयां परिधावता ।
राक्षसा निहताः शूरा बहवः कामरूपिणः ॥ ९ ॥
|
तेथे महान अरण्यात शिकार खेळत असता श्रीरामाने इच्छेप्रमाणे रूप धारण करणार्या अनेक शूरवीर राक्षसांचा वध केला. ॥९॥
|
जनस्थानवधं श्रुत्वा हतौ च खरदूषणौ ।
ततस्त्वमर्षापहृता जानकी रावणेन तु ॥ १० ॥
|
त्यांच्या द्वारा जनस्थानान्तील राक्षसांचा तसेच खर-दूषण यांचा वध झाल्याचे वृत्त ऐकून रावणाने क्रोधास वश होऊन जनकनन्दिनी सीतेचे अपहरण केले. ॥१०॥
|
वंचयित्वा वने रामं मृगरूपेण मायया ।
स मार्गमाणस्तां देवीं रामः सीतामनिन्दिताम् ॥ ११ ॥
आससाद वने मित्रं सुग्रीवं नाम वानरम् ।
|
प्रथम तर त्या राक्षसाने मायेने मृग झालेल्या मारीच राक्षसाद्वारा वनात श्रीरामास धोका दिला आणि नन्तर स्वतः त्याने जानकीचे अपहरण केले. भगवान श्रीराम परम साध्वी सीतादेवीचा शोध घेत घेत मतंग वनात येऊन सुग्रीव नामक वानरास भेटले आणि त्याच्या बरोबर त्यांनी (अग्निस साक्ष ठेवून) मैत्री स्थापन केली. ॥११ १/२॥
|
ततः स वालिनं हत्वा रामः परपुरञ्जयः ॥ १२ ॥
आयच्छत् कपिराज्यं तत् सुग्रीवाय महात्मने ।
|
तदनन्तर शत्रूंच्या नगरीवर विजय मिळविणार्या श्रीरामाने वालीचा वध करून महात्मा सुग्रीवास वानरांचे राज्य दिले. ॥१२ १/२॥
|
सुग्रीवेणाभिसन्दिष्टा हरयः कामरूपिणः ॥ १३ ॥
दिक्षु सर्वासु तां देवीं विचिन्वन्तः सहस्रशः ।
|
त्यानन्तर वानरराज सुग्रीवाच्या आज्ञेवरून इच्छानुसार रूप धारण करणारे हजारो वानर सीतादेवीचा शोध घेण्यास सर्व दिशांमध्ये रवाना झाले. ॥१३ १/२॥
|
अहं सम्पातिवचनाच्छतयोजनमायतम् ॥ १४ ॥
अस्या हेतोर्विशालाक्ष्याः सागरं वेगवान् प्लुतः ।
|
त्यान्तीलच मी एक वानर आहे. मी संपातिच्या सांगण्यावरून विशाललोचना विदेहनन्दिनीच्या शोधासाठी शंभर योजने विस्तृत समुद्रास वेगपूर्वक उल्लंघून येथे आलो आहे. ॥१४ १/२॥
|
यथारूपां यथावर्णां यथालक्ष्मवतीं च ताम् ॥ १५ ॥
अश्रौषं राघवस्याहं सेयमासादिता मया ।
विररामैवमुक्त्वा स वाचं वानरपुङ्गवः ॥ १६ ॥
|
मी श्रीरघुनाथाच्या मुखाने जानकीचे जसे रूप जसा रंग, तसेच जशी लक्षणे ऐकली होती, त्यास अनुरूपच तिला प्राप्त केले आहे. एवढेच बोलून वानर शिरोमणी हनुमान गप्प झाले. ॥१५-१६॥
|
जानकी चापि तच्छ्रुत्वा विस्मयं परमं गता ।
ततः सा वक्रकेशान्ता सुकेशी केशसंवृतम् ।
उन्नम्य वदनं भीरुः शिंशपावृक्षमैक्षत ॥ १७ ॥
|
त्यांच्या गोष्टी ऐकून जनकनन्दिनी सीतेला अत्यन्त विस्मय वाटला. सीतेचे केस कुरळे आणि अत्यन्त सुन्दर होते. भीरू सीतेने आपल्या मुखावर आलेले केस हाताने बाजूस सारून तोंड वर करून ती त्या शिंशपा वृक्षाकडे पाहू लागली. ॥१७॥
|
निशम्य सीता वचनं कपेश्च
दिशश्च सर्वाः प्रदिशश्च वीक्ष्य ।
स्वयं प्रहर्षं परमं जगाम
सर्वात्मना राममनुस्मरन्ती ॥ १८ ॥
|
कपींचे वचन ऐकून सीता अत्यन्त प्रसन्न झाली. ती समस्त वृत्ती एकाग्र करून भगवान श्रीरामाचे स्मरण करीत सर्व दिशांना न्याहाळू लागली. ॥१८॥
|
सा तिर्यगूर्ध्वं च तथा ह्यधस्ता-
न्निरीक्षमाणा तमचिन्त्यबुद्धिम् ।
ददर्श पिङ्गाधिपतेरमात्यं
वातात्मजं सूर्यमिवोदयस्थम् ॥ १९ ॥
|
तिने खालीवर, इकडे-तिकडे दृष्टि़क्षेप करीत त्या अचिन्त्य बुद्धिमान पवनपुत्र हनुमन्तास, जे वानरराज सुग्रीवाचे मन्त्री होते, उदयचलावर विराजमान झालेल्या सूर्याप्रमाणे पाहिले. ॥१९॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे एकत्रिंशः सर्गः ॥ ३१ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा एकतीसावा सर्ग पूर्ण झाला. ॥३१॥
|