[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। त्रयोविंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
लक्ष्मणस्योजस्विवचनं तेन दैवस्य खण्डनं पुरुषार्थस्य मण्डनं च, तस्य श्रीरामाभिषेकविरोधिभिः सह योद्धुं उद्यमश्च - लक्ष्मणाचे ओजस्वी भाषण, त्यांच्या द्वारा दैवाचे खण्डण आणि पुरुषार्थाचे प्रतिपादन तथा त्यांनी श्रीरामाचा अभिषेकाच्या निमित्त विरोधकांशी सामना करण्यास उद्यत होणे -
इति ब्रुवति रामे तु लक्ष्मणोऽवाक्शिरा इव ।
श्रुत्वा मध्यं जगामाशु सहसा दैन्यहर्षयोः ॥ १ ॥
श्रीरामचंद्र ज्यावेळी याप्रकारे सांगत होते त्या समयी लक्ष्मण मस्तक नमवून काही विचार करीत राहिले, नंतर सहसा ते शीघ्रतापूर्वक दुःख आणि हर्ष यांच्या मधल्या स्थितिमध्ये आले. (श्रीरामांच्या राज्याभिषेकात विघ्न आल्या कारणाने त्यांना दुःख झाले आणि त्यांची धर्मामध्ये दृढता पाहून प्रसन्नता वाटली.) ॥१॥
तदा तु बद्ध्वा भ्रुकुटीं भ्रुवोर्मध्ये नरर्षभः ।
निशश्वास महासर्पो बिलस्थ इव रोषितः ॥ २ ॥
नरश्रेष्ठ लक्ष्मणानी त्यासमयी कपाळावर भुवया चढवून दीर्घ श्वास घेण्यास आरंभ केला, जणु बिळात बसलेला महान सर्प रोषाने व्याप्त होऊन फुत्कारत आहे. ॥२॥
तस्य दुष्प्रतिवीक्षं तद् भ्रुकुटीसहितं तदा ।
बभौ क्रुद्धस्य सिंहस्य मुखस्य सदृशं मुखम् ॥ ३ ॥
ताणलेल्या भुवयासह त्याचे मुख कुपित झालेल्या सिंहाच्या मुखासमान वाटत होते, त्याकडे बघणे कठीण वाटत होते. ॥३॥
अग्रहस्तं विधुन्वंस्तु हस्ति हस्तमिवात्मनः ।
तिर्यगूर्ध्वं शरीरे च पातयित्वा शिरोधराम् ॥ ४ ॥

अग्राक्ष्णा वीक्षमाणस्तु तिर्यग्भ्रातरमब्रवीत् ।
ज्याप्रमाणे हत्ती आपली सोंड हलवीत राहातो, त्याप्रकारे ते आपला उजवा हात हालवीत आणि मान शरीरात वर खाली, आणि आजूबाजूला सर्व बाजूला घुमवीत नेत्रांच्या अग्रभागाने तिरक्या नजरेने आपल्या भावाकडे रामाकडे पाहून त्यांना म्हणाले - ॥४ १/२॥
अस्थाने सम्भ्रमो यस्य जातो वै सुमहानयम् ॥ ५ ॥

धर्मदोषप्रसङ्‌‍गेन लोकस्यानतिशङ्‌‍कया ।
कथं ह्येतदसम्भ्रान्तस्त्वद्विधो वक्तुमर्हति ॥ ६ ॥

यथा ह्येवमशौण्डीरं शौण्डीरः क्षत्रियर्षभः ।
किं नाम कृपणं दैवमशक्तमभिशंससि ॥ ७ ॥
'दादा ! आपण समजता की जर मी पित्याच्या या आज्ञेचे पालन करण्यासाठी वनात गेलो नाही तर धर्माच्या विरोधाचा प्रसंग उपस्थित होत आहे, या शिवाय लोंकाच्या मनातही फार मोठी शंका उत्पन्न होईल की जो पित्याच्या आज्ञेचे उल्लंघन करीत आहे, तो जर राजा झाला तर तो आमचे धर्मपूर्वक पालन कसे करील ? या बरोबरच आपण असाही विचार करीत आहात की जर मी पित्याच्या या आज्ञेचे पालन केले नाही तर दुसरे लोकही करणार नाहीत. यप्रकारे धर्माची अवहेलना होण्यामुळे जगताच्या विनाशाचे भय उपस्थित होईल. या सर्व दोषांचे आणि शंकांचे निराकरण करण्यासाठी आपल्या मनात वनगमनाच्या प्रति हा जो फार मोठा संभ्रम (उतावळेपणा) आला आहे, हा सर्वथा अनुचित आणि भ्रममूलकही आहे. कारण आपण असमर्थ 'दैव' नामक तुच्छ वस्तुला प्रबल म्हणत आहात. दैवाचे निराकरण करण्यास समर्थ असणारा आपल्या सारखा क्षत्रिय शिरोमणी वीर जर भ्रमात पडला नसता तर अशी गोष्ट कशी बोलू शकला असता ? म्हणून असमर्थ पुरुषांकडूनच जवळ करण्यास योग्य आणि पौरुषाच्या निकट काहीही 'दैवा' ची आपण साधारण मनुष्याप्रमाणे इतकी स्तुति अथवा प्रशंसा का बरे करत आहांत ? ॥५ -७॥
पापयोस्ते कथं नाम तयोः शङ्‌‍का न विद्यते ।
सन्ति धर्मोपधासक्ता धर्मात्मन् किं न बुध्यसे ॥ ८ ॥
धर्मात्मन ! आपल्या त्या दोन्ही पाप्यांच्या विषयी संदेह कसा होत नाही ? संसारात कित्येक असेच पापासक्त लोक आहेत की जे दुसर्‍यांना ठकविण्यासाठी धर्माचे ढोंग करीत असतात; काय आपण त्यांना जाणत नाही ? ॥८॥
तयोः सुचरितं स्वार्थं शाठ्यात् परिजिहीर्षतोः ।
यदि नैवं व्यवसितं स्याद्धि प्रागेव राघव ।
तयोः प्रागेव दत्तश्च स्याद् वरःप्रकृतश्च सः ॥ ९ ॥
'राघवा ! ती दोघेही आपला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी शठतावश धर्माचा बहाणा करून आपल्या सारख्या सच्चरित्र पुरुषाचा परित्याग करून इच्छितात जर त्यांचा असा विचार नसता तर जे कार्य आज झाले आहे, ते पूर्वीच होऊन गेले असते. जर वरदानाची गोष्ट खरी असती तर आपल्या अभिषेकाचे कार्य प्रारंभ होण्याच्या पूर्वीच या प्रकारचा वर दिला गेला असता. ॥९॥
लोकविद्विष्टमारब्धं त्वदन्यस्याभिषेचनम् ।
नोत्सहे सहितुं वीर तत्र मे क्षन्तुमर्हसि ॥ १० ॥
(गुणवान ज्येष्ठ पुत्र विद्यमान असतांना लहानाला अभिषेक करणे, हे लोक विरूद्ध कार्य आहे, ज्याचा आज प्रारंभ केला जात आहे, आपल्या शिवाय दुसर्‍या कुणाचा राज्याभिषेक व्हावा हे माझ्याने सहन होणार नाही. यासाठी आपण मला क्षमा करावी. ॥१०॥
येनैवमागता द्वैधं तव बुद्धिर्महामते ।
स हि धर्मो मम द्वेष्यो यत्प्रसङ्‌‍गाद् विमुह्यसि ॥ ११ ॥
'महामते ! पित्याचे वचन मानून आपण मोहात पडला आहात आणि ज्याच्यामुळे आपल्या बुद्धित द्विविधा उत्पन्न झाली आहे, तिला धर्म मानण्यास मी पक्षपाती नाही; अशा धर्माचा तर मी घोर विरोध करतो. ॥११॥
कथं त्वं कर्मणा शक्तः कैकेयीवशवर्तिनः ।
करिष्यसि पितुर्वाक्यमधर्मिष्ठं विगर्हितम् ॥ १२ ॥
'आपण आपल्या पराक्रमाने सर्व काही करण्यास समर्थ असूनही कैकेयीला वश होऊन राहाणार्‍या पित्याच्या अधर्मपूर्ण एवं निन्दित वचनाचे पालन कसे काय कराल ? ॥१२॥
यदयं किल्बिषाद् भेदः कृतोऽप्येवं न गृह्यते ।
जायते तत्र मे दुःखं धर्मसङ्‌‍गश्च गर्हितः ॥ १३ ॥
'वरदानाची खोटी कल्पना करण्याचे पाप करून आपल्या अभिषेकात विघ्न आणले गेले आहे, तरीही आपण या रूपात (ही गोष्ट) ग्रहण करीत नाही. यासाठी माझ्या मनास फार दुःख होत आहे. अशा कपटपूर्ण धर्माच्या प्रति असणारी आसक्ती निन्दित आहे. ॥१३॥
तवायं धर्मसंयोगो लोकस्यास्य विगर्हितः । मनसापि कथं कामं कुर्यात् त्वां कामवृत्तयोः ।
तयोस्त्वहितयोर्नित्यं शत्र्वोः पित्रभिधानयोः ॥ १४ ॥
'अशा पाखण्डपूर्ण धर्माच्या पालनात जी आपली प्रवृत्ति होत आहे, ती येथील जनसमुदायाच्या दृष्टीमध्ये निन्दित आहे. आपल्या शिवाय दुसरा कोणही पुरुष सदा पुत्राचे अहित करणार्‍या, पिता-माता नामधारी त्या कामाचारी शत्रूंचे मनोरथ मनानेही कसे पूर्ण करू शकेल ? (त्याच्या पूर्तिच्य विचारही मनात कसा आणू शकेल ? ) ॥१४॥
यद्यपि प्रतिपत्तिस्ते दैवी चापि तयोर्मतम् ।
तथाप्युपेक्षणीयं ते न मे तदपि रोचते ॥ १५ ॥
'माता-पित्यांच्या या विचाराला की - 'आपला राज्याभिषेक होऊ नये' जे आपण दैवाच्या प्रेरणेचे फळ मानत आहात तेही मला चांगले वाटत नाही जरूर ते आपले मत आहे तथापि आपल्याला त्याची उपेक्षा केली पाहिजे. ॥१५॥
विक्लवो वीर्यहीनो यः स दैवमनुवर्तते ।
वीराः सम्भावितात्मानो न दैवं पर्युपासते ॥ १६ ॥
जो भित्रा (कायर) आहे, ज्याच्या ठिकाणी पराक्रमाचे नाव नाही आहे, तोच दैवाचा भरवसा करतो. सर्व संसार ज्यांना आदराच्या दृष्टीने पहातो, ते शक्तिशाली वीर पुरुष दैवाची उपासना करीत नाहीत. ॥१६॥
दैवं पुरुषकारेण यः समर्थः प्रबाधितुम् ।
न दैवेन विपन्नार्थः पुरुषः सोऽवसीदति ॥ १७ ॥
जे आपल्या पुरुषार्थाने दैवाला दडपून टाकण्यास समर्थ आहेत, ते पुरुष दैवाच्या द्वारे आपल्या कार्यात बाधा उत्पन्न झाल्यावर खेद करीत नाहीत- शिथिल होऊन बसून राहात नाहीत. ॥१७॥
द्रक्ष्यन्ति त्वद्य दैवस्य पौरुषं पुरुषस्य च ।
दैवमानुषयोरद्य व्यक्ता व्यक्तिर्भविष्यति ॥ १८ ॥
'आज संसारांतील लोक बघतील की दैवाची शक्ति मोठी आहे की पुरुषाचा पुरुषार्थ श्रेष्ठ आहे. आज दैव आणि मनुष्य यात कोण बलवान आहे आणि कोण दुर्बल आहे - याचा स्पष्ट निर्णय होऊन जाईल. ॥१८॥
अद्य मे पौरुषहतं दैवं द्रक्ष्यन्ति वै जनाः ।
यैर्देवादाहतं तेऽद्य दृष्टं राज्याभिषेचनम् ॥ १९ ॥
ज्या लोकांनी दैवाच्या बळाने आज आपल्या राज्याभिषेकाला नष्ट झालेला पाहिला आहे तेच आज माझ्या पुरुषार्थाने अवश्यच दैवाचाही विनाश पाहून घेतील. ॥१९॥
अत्यङ्‌‍कुशमिवोद्‌दामं गजं मदजलोद्धतम् ।
प्रधावितमहं दैवं पौरुषेण निवर्तये ॥ २० ॥
'जो अंकुशाची पर्वा करीत नाही आणि रस्सी अथवा साखळदंडासही तोडून टाकतो, त्या मदाची धारा वहाणार्‍या मत्त गजराजाप्रमाणे वेगपूर्वक धावणार्‍या दैवालाही मी आज आपल्या पुरुषार्थाने मागे परतवीन. ॥२०॥
लोकपालाः समस्तास्ते नाद्य रामाभिषेचनम् ।
न च कृत्स्नास्त्रयो लोका विहन्युः किं पुनः पिता ॥ २१ ॥
'समस्त लोकपाल आणि तिन्ही लोकातील सर्व प्राणी आज श्रीरामांच्या राज्याभिषेकाला रोखू शकत नाहीत, मग केवळ पित्याची तर गोष्टच कशाला ? ॥२१॥
यैर्विवासस्तवारण्ये मिथो राजन् समर्थितः ।
अरण्ये ते विवत्स्यन्ति चतुर्दश समास्तथा ॥ २२ ॥
'राजन ! ज्या लोकांनी आपसात आपल्या वनवासाचे समर्थन केले आहे, ते स्वतःच चौदा वर्षेपर्यत वनात जाऊन लपून राहतील. ॥२२॥
अहं तदाशां धक्ष्यामि पितुस्तस्याश्च या तव ।
अभिषेकविघातेन पुत्रराज्याय वर्तते ॥ २३ ॥
मी पित्याची आणि जी आपल्या अभिषेकात विघ्न आणून आपल्या पुत्राला राज्य देण्याच्या प्रयत्‍नास लागलेली आहे त्या कैकेयीच्याही त्या आशेला जाळून भस्म करून टाकीन. ॥२३॥
मद्‍बलेन विरुद्धाय न स्याद् दैवबलं तथा ।
प्रभविष्यति दुःखाय यथोग्रं पौरुषं मम ॥ २४ ॥
जो माझ्या बळाच्या विरोधात उभा राहील त्याला माझा भयंकर पुरुषार्थ जसा दुःख देण्यास समर्थ होईल, तैसे दैवबल त्याला सुख पोहोचवू शकणार नाही. ॥२४॥
ऊर्ध्वं वर्षसहस्रान्ते प्रजापाल्यमनन्तरम् ।
आर्यपुत्राः करिष्यन्ति वनवासं गते त्वयि ॥ २५ ॥
'हजारो वर्षे निघून गेल्यावर ज्यावेळी आपण अवस्थाक्रमाने वनांत निवास करण्यासाठी जाल, त्या समयी आपल्यानंतर आपला पुत्र प्रजापालनरूप कार्य करील. (अर्थात त्या समयीही दुसर्‍यास या राज्यात दखल देण्याचा अवसर प्राप्त होणार नाही.) ॥२५॥
पूर्वराजर्षिवृत्त्या हि वनवासोऽविधीयते ।
प्रजा निक्षिप्य पुत्रेषु पुत्रवत् परिपालने ॥ २६ ॥
'पुरातन राजर्षिंच्या आचार परंपरेस अनुसरून प्रजेचे पुत्रवत पालन करण्याच्या निमित्ताने प्रजावर्गाला पुत्रांच्या हाती सोपवून वृद्ध राजाचे वनात निवास करणे उचित सांगितले गेले आहे. ॥२६॥
स चेद् राजन्यनेकाग्रे राज्यविभ्रमशङ्‌‍कया ।
नैवमिच्छसि धर्मात्मन् राज्यं राम त्वमात्मनि ॥ २७ ॥
'धर्मात्मा राम ! आपले महाराज वानप्रस्थ धर्माच्या पालनात चित्ताला एकाग्र करीत नाहीत, म्हणून जर आपण असे समजत असाल की त्यांच्या आज्ञेच्या विरूद्ध राज्य ग्रहण केल्याने समस्त जनता विद्रोही होऊन जाईल, म्हणून राज्य आपल्या हातात राहू शकणार नाही आणि या शंंकेने जर आपण आपल्यावर राज्याचा भार घेऊ इच्छित नसाल अथवा वनांत निघून जाण्याची इच्छा करत असाल तर ही शंका सोडून द्यावी. ॥२७॥
प्रतिजाने च ते वीर मा भूवं वीरलोकभाक् ।
राज्यं च तव रक्षेयमहं वेलेव सागरम् ॥ २८ ॥
'वीर ! मी प्रतिज्ञा करीत आहे की ज्याप्रमाणे तटभूमी समुद्रास अडवून ठेवते त्या प्रकारे मी आपले आणि आपल्या राज्याचे रक्षण करीन. जर असे न करीन तर मी वीर लोकाचा भागी होणार नाही. ॥२८॥
मङ्‌‍गलैरभिषिञ्चस्व तत्र त्वं व्यापृतो भव ।
अहमेको महीपालानलं वारयितुं बलात् ॥ २९ ॥
म्हणून आपण मंगलमय अभिषेक -सामग्रीने आपला अभिषेक होऊ द्यावा, या अभिषेकाच्या कार्यात आपण तत्पर व्हावे. मी एकटाही बलपूर्वक समस्त विरोधी भूपालांना रोखण्यास समर्थ आहे. ॥२९॥
न शोभार्थाविमौ बाहू न धनुर्भूषणाय मे ।
नासिराबन्धनार्थाय न शराः स्तम्भहेतवः ॥ ३० ॥
'ह्या माझ्या दोन्ही भुजा केवळ शोभेसाठी नाही आहेत. माझे हे धनुष्य आभूषण बनणार नाही. ही तलवार केवळ कमरेला बांधून ठेवण्यासाठी नाही आहे तसेच या बाणांचे खांब बनणार नाहीत. ॥३०॥
अमित्रमथनार्थाय सर्वमेतच्चतुष्टयम् ।
न चाहं कामयेऽत्यर्थं यः स्याच्छत्रुर्मतो मम ॥ ३१ ॥
'या सर्व चारी वस्तू शत्रूंचे दमन करण्यासाठीच आहेत, ज्याला मी आपला शत्रु समजतो त्याला कदापि जीवित राहू देण्याची इच्छा करत नाही. ॥३१॥
असिना तीक्ष्णधारेण विद्युच्चलितवर्चसा ।
प्रगृहीतेन वै शत्रुं वज्रिणं वा न कल्पये ॥ ३२ ॥
'ज्यावेळी मीही तीक्ष्ण धार असलेली तलवार हातात घेतो, ती वीजे प्रमाणे चञ्चल प्रभेने तळपू लागते. तिच्या द्वारे आपल्या कुठल्याही शत्रुला, मग तो वज्रधारी इन्द्र का असेना, मी काहीही किंमत द्त नाही (म्हणजे त्याला तुच्छ- कस्पटा समान समजतो.) ॥३२॥
खड्गनिष्पेषनिष्पिष्टैर्गहना दुश्चरा च मे ।
हस्त्यश्वरथिहस्तोरुशिरोभिर्भविता मही ॥ ३३ ॥
'आज माझ्या खड्‌गाच्या प्रहाराने ठार केले गेलेल्या हत्ती, घोडे आणि रथींच्या हात, जांघा आणि मस्तकांच्या द्वारा सपाट केली गेलेली ही पृथ्वी अशी गहन होऊन जाईल की हिच्यावर चालणे-फिरणे कठीण होऊन जाईल. ॥३३॥
खड्गधाराहता मेऽद्य दीप्यमाना इवाग्नयः ।
पतिष्यन्ति द्विषो भूमौ मेघा इव सविद्युतः ॥ ३४ ॥
'माझ्या तलवारीच्या धारेने कापले गेलेले रक्तबंबाळ झालेले शत्रू जळत असलेल्या आगीप्रमाणे भासतील आणि वीजेसहित मेघांप्रमाणे आज पृथ्वीवर कोसळतील. ॥३४॥
बद्धगोधाङ्‌‍गुलित्राणे प्रगृहीतशरासने ।
कथं पुरुषमानी स्यात् पुरुषाणां मयि स्थिते ॥ ३५ ॥
'आपल्या हातात घोरपडीच्या चर्माचे बनविलेले हातमोजे बांधून जेव्हा हातात धनुष्य घेऊन मी युद्धासाठी उभा राहीन, त्या समयी पुरुषांच्या पैकी कोणीही माझ्या समोर कसा आपल्या पौरुषासंबंधी अभिमान करू शकेल ? ॥३५॥
बहुभिश्चैकमत्यस्यन्नेकेन च बहूञ्जनान् ।
विनियोक्ष्याम्यहं बाणान्नृवाजिगजमर्मसु ॥ ३६ ॥
मी बर्‍याचशा बाणांनी एकाला आणि एकाच बाणानी अनेक योद्ध्यांना धराशायी करीत मनुष्य, घोडे आणि हत्तींच्या मर्मस्थांनावर बाण मारीन. ॥३६॥
अद्य मेऽस्त्रप्रभावस्य प्रभावः प्रभविष्यति ।
राज्ञश्चाप्रभुतां कर्तुं प्रभुत्वं च तव प्रभो ॥ ३७ ॥
'प्रभो ! आज राजा दशरथांच्या प्रभुत्वाला नष्ट करण्यासाठी आणि आपल्या प्रभुतेची स्थापना करण्यासाठी अस्त्रबलाने सम्पन्न अशा माझा - लक्ष्मणाचा प्रभाव प्रकट होईल. ॥३७॥
अद्य चन्दनसारस्य केयूरामोक्षणस्य च ।
वसूनां च विमोक्षस्य सुहृदां पालनस्य च ॥ ३८ ॥

अनुरूपाविमौ बाहू राम कर्म करिष्यतः ।
अभिषेचनविघ्नस्य कर्तॄणां ते निवारणे ॥ ३९ ॥
'श्रीरामा ! आज माझ्या या दोन्ही भुजा, ज्या चंदनाचा लेप लावण्यास, बाजूबंद धारण करण्यास, धनाचे दान करण्यास आणि सुहृदांचे पालन करण्यात संलग्न रहाण्या योग्य आहेत, आपल्या राज्याभिषेकात विघ्न आणणारांना रोखण्यासाठी आपल्या अनुरूप पराक्रम प्रकट करतील. ॥३८ -३९॥
ब्रवीहि कोऽद्यैव मया वियुज्यतां
     तवासुहृत् प्राणयशःसुहृज्जनैः ।
यथा तवेयं वसुधा वशा भवेत्
     तथैव मां शाधि तवास्मि किं‍करः ॥ ४० ॥
'प्रभो ! सांगावे की मी आपल्या कुठल्या शत्रूला आत्ता प्राण यश आणि सुहृज्जनां पासून सदा साठी विलग करून टाकू ? ज्या उपायाने ही पृथ्वी आपल्या अधिकारात येईल, त्यासाठी मला आज्ञा द्यावी. मी आपला दास आहे. ॥४०॥
विमृज्य बाष्पं परिसांत्व्य चासकृत्
     स लक्ष्मणं राघववंशवर्धनः ।
उवाच पित्रोर्वचने व्यवस्थितं
     निबोध मामेव हि सौम्य सत्पथः ॥ ४१ ॥
रघुवंशाची वृद्धि करणार्‍या राघवाने लक्ष्मणाचे हे भाषण ऐकून त्यांचे अश्रू पुसले आणि त्यांना वारंवार सांत्वना देत त्यांना म्हटले- 'सौम्य ! मला तर तू माता पित्याच्या आज्ञापालनातच दृढतापूर्वक स्थित समज. हाच सत्पुरुषांचा मार्ग आहे.' ॥४१॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे त्रयोविंशः सर्गः ॥ २३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा तेवीसावा सर्ग पूरा झाला. ॥२३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP