[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। सप्तदशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
राजमार्गसुषमामवलोकयतः सुहृदां वचांसि शृण्वतश्च श्रीरामस्य पितुर्भवने प्रवेशः - श्रीरामांचा राजपथाची शोभा पहात आणि सुहृदांच्या गोष्टी ऐकत ऐकत पित्याच्या भवनात प्रवेश -
स रामो रथमास्थाय सम्प्रहृष्टसुहृज्जनः ।
पताकाध्वजसम्पन्नं महार्हागुरुधूपितम् ॥ १ ॥

अपश्यन्नगरं श्रीमान् नानाजनसमन्वितम् ।
स गृहैरभ्रसङ्‌‍काशैः पाण्डुरैरुपशोभितम् ॥ २ ॥

राजमार्गं ययौ रामो मध्येनागुरुधूपितम् ।
याप्रकारे श्रीमान् रामचंद्र आपल्या सुहृदांना आनंद प्रदान करीत रथात बसून राजमार्गाच्या मधून चाललेले होते, त्यांनी पाहिले - सर्व नगर ध्वजा आणि पताकांनी सुशोभित होत आहे. चहू बाजूस असंख्य मनुष्यांची गर्दी दिसून येत आहे. तो राजमार्ग श्वेत मेघांसारख्या उज्ज्वल भव्य भवनांनी सुशोभित तथा अगुरुच्या सुगंधांनी व्याप्त होत होता. ॥१-२ १/२॥
चन्दनानां च मुख्यानामगुरूणां च सञ्चयैः ॥ ३ ॥

उत्तमानां च गन्धानां क्षौमकौशाम्बरस्य च ।
अविद्धाभिश्च मुक्ताभिरुत्तमैः स्फाटिकैरपि ॥ ४ ॥

शोभमानमसम्बाधं तं राजपथमुत्तमम् ।
संवृतं विविधैः पुष्पैर्भक्ष्यैरुच्चावचैरपि ॥ ५ ॥

ददर्श तं राजपथं दिवि देवपतिर्यथा ।
दध्यक्षतहविर्लाजैर्धूपैरगुरुचन्दनैः ॥ ६ ॥
उत्तम श्रेणीचे चंदन, अगुरू नामक धूप, उत्तम गंध द्रव्ये, अळशी ( अथवा जवस) आणि ताग (अथवा अंबाडी)च्या धाग्यांनी बनविलेले कपडे तसेच रेशमी वस्त्रांचे ढीग, वेज न पाडलेले मोती आणि उत्तमोत्तम स्फाटिक रत्‍ने, त्या विस्तृत आणि उत्तम राजमार्गाची शोभा वाढवीत होते. तो नाना प्रकारच्या पुष्पांनी आणि विविध भक्ष्य पदार्थांनी भरलेला होता. त्याच्या चौकांची सदा दही, अक्षत, हविष्य, लाह्या, धूप, अगर, चंदन, नाना प्रकारचे पुष्पहार आणि गंधद्रव्यांच्या द्वारा पूजा केली जात होती. स्वर्ग लोकांत बसलेल्या देवराज इंद्राप्रमाणे रथारूढ श्रीरामांनी त्या राजमार्गास पाहिले. ॥३-६॥
नानामाल्योपगन्धैश्च सदाभ्यर्चितचत्वरम् ।
आशीर्वादान् बहूञ्शृण्वन् सुहृद्‌भिः समुदीरितान् ॥ ७ ॥
यथार्हं चापि सम्पूज्य सर्वानेव नरान् ययौ ।
ते आपल्या सुहृदांच्या मुखांनी उच्चारलेल्या बर्‍याचशा आशीर्वादांना ऐकत आणि त्या सर्व लोकांचा यथायोग्य सन्मान करीत चाललेले होते. ॥७ १/२॥
पितामहैराचरितं तथैव प्रपितामहैः ॥ ८ ॥

अद्योपादाय तं मार्गमभिषिक्तोऽनुपालय ।
( त्यांचे हितैषी सुहृद म्हणत होते-) 'रघुनंदन ! तुमचे पितामह आणि प्रपितामह (आजोबा आणि पणजोबा) ज्या मार्गावर आलेले आहेत- आज त्याच मार्गाचे ग्रहण करून युवराज- पदावर अभिषिक्त होऊन आपण आम्हा सर्व लोकांचे निरंतर पालन करा.' ॥८ १/२॥
यथा स्म पोषिताः पित्रा यथा सर्वैः पितामहैः ।
ततः सुखतरं सर्वे रामे वत्स्याम राजनि ॥ ९ ॥
( नंतर ते आपसात म्हणू लागले-) 'बंधुनो ! रामाचे पिता तथा समस्त पितामहांच्या द्वारा ज्यप्रकारे आपले पालन- पोषण झालेले आहे, राम राजा झाल्यावर आम्ही त्याहूनही अधिक सुखी राहूं. ॥९॥
अलमद्य हि भुक्तेन परमार्थैरलं च नः ।
यथा पश्याम निर्यान्तं रामं राज्ये प्रतिष्ठितम् ॥ १० ॥
'जर आम्ही राज्यावर प्रतिष्ठीत झाल्यावर श्रीरामास पित्याच्या घरांतून निघतांना पाहू - जर राजा रामाचे दर्शन करू तर आता आम्हांला इहलोकातील भोग आणि परमार्थस्वरूप मोक्ष घेऊन काय करायचे आहे ? ॥१०॥
ततो हि नः प्रियतरं नान्यत् किञ्चिद् भविष्यति ।
यथाभिषेको रामस्य राज्येनामिततेजसः ॥ ११ ॥
'अमित तेजस्वी श्रीरामाचा जर राज्यावर अभिषेक होईल तर ते आमच्यासाठी जसे प्रियकर कार्य होईल, त्याहून अधिक परम प्रिय कार्य दुसरे कुठलेही असणार नाही.' ॥११॥
एताश्चान्याश्च सुहृदामुदासीनः शुभाः कथाः ।
आत्मसम्पूजनीः शृण्वन् ययौ रामो महापथम् ॥ १२ ॥
सुहृदांच्या मुखांतून निघालेले हे तथा आणखी काही प्रकारचे आपल्या प्रशंसेशी संबंध ठेवणारे सुंदर उद्‌गार ऐकत श्रीराम राजपथावर पुढे चालले होते. ॥१२॥
न हि तस्मान्मनः कश्चिच्चक्षुषी वा नरोत्तमात् ।
नरः शक्नोत्यपाक्रष्टुमतिक्रन्तेऽपि राघवे ॥ १३ ॥
(जे श्रीरामांकडे एक वेळ पहात असत ते त्यांना पहातच राहात असत.) राघव दूर निघून गेल्यावरही कोणी त्या पुरुषोत्तमावरून आपले मन अथवा दृष्टी हटवू शकत नव्हते. ॥१३॥
यश्च रामं न पश्येत्तु यं च रामो न पश्यति ।
निंदितः स सर्वलोकेषु स्वात्माप्येनं विगर्हते ॥ १४ ॥
त्या समयी ज्यांनी रामांना पाहिले नाही आणि ज्याला श्रीरामांनी पाहिले नाही, तो समस्त लोकात निंदित समजला जात होता तथा स्वयं त्याचा अंतरात्माही त्याचा धिक्कार करीत होता. ॥१४॥
सर्वेषु स हि धर्मात्मा वर्णानां कुरुते दयाम् ।
चतुर्णां हि वयःस्थानां तेन ते तमनुव्रताः ॥ १५ ॥
धर्मात्मा श्रीराम चारी वर्णांच्या सर्व मनुष्यांवर त्यांच्या अवस्थेस अनुरूप दया करीत होते म्हणून ते सर्व त्यांचे भक्त होते. ॥१५॥
चतुष्पथान् देवपथांश्चैत्यांश्चायतनानि च ।
प्रदक्षिणं परिहरञ्जगाम नृपतेः सुतः ॥ १६ ॥
राजकुमार श्रीराम चौकांना, देवमार्गांना, चैत्यवृक्षांना तथा देवमंदिरांना आपल्या उजव्या बाजूस ठेवून पुढे जात होते. ॥१६॥
स राजकुलमासाद्य मेघसङ्‌‍घोपमैः शुभैः ।
प्रासादशृङ्‌‍गैर्विविधैः कैलासशिखरोपमैः ॥ १७ ॥

आवारयद्‌भिर्गगनं विमानैरिव पाण्डुरैः ।
वर्द्धमानगृहैश्चापि रत्‍नजालपरिष्कृतैः ॥ १८ ॥

तत् पृथिव्यां गृहवरं महेन्द्रसदनोपमम् ।
राजपुत्रः पितुर्वेश्म प्रविवेश श्रिया ज्वलन् ॥ १९ ॥
राजा दशरथांचे भवन, मेघसमूहाप्रमाणे शोभा प्राप्त करणार्‍या, सुंदर अनेक रूप-रंगाच्या कैलासशिखराप्रमाणे उज्ज्वल प्रासादशिखरांनी (अट्टालिकांनी) सुशोभित होते. त्यात रत्‍नांच्या जाळीने विभूषित तथा विमानकार क्रीडागृहेही बनविलेली होती, जी आपल्या श्वेत प्रभेने प्रकाशित होत होती. ती आपल्या उंचीमुळे आकाशसही ओलांडत आहेत की काय अशी प्रतीत होत होती. अशा गृहांनी युक्त ते श्रेष्ठ भवन या भूतलावर इंद्रसदना प्रमाणे शोभत होते. त्या राजभवनाच्या जवळ पोहोचून आपल्या शोभेने प्रकाशित होणार्‍या राजकुमार श्रीरामांनी पित्याच्या महालात प्रवेश केला. ॥१७-१९॥
स कक्ष्या धन्विभिर्गुप्तास्तिस्रोऽतिक्रम्य वाजिभिः ।
पदातिरपरे कक्ष्ये द्वे जगाम नरोत्तमः ॥ २० ॥
त्यांनी धनुर्धर वीरांच्या द्वारा सुरक्षित महालाच्या तीन देवड्यांना तर घोडे जोडलेल्या रथाने पार केले, नंतर दोन देवड्यातून पुरुषोत्तम राम पायीच गेले. ॥२०॥
स सर्वाः समतिक्रम्य कक्ष्या दशरथात्मजः ।
संनिवर्त्त्य जनं सर्वं शुद्धान्तःपुनरत्यगात् ॥ २१ ॥
या प्रकारे सर्व देवड्या पार करून दशरथ नंदन श्रीराम आपल्या बरोबर आलेल्या सर्व लोकांना परत पाठवून स्वयमंतःपुरात गेले. ॥२१॥
तस्मिन् प्रविष्टे पितुरन्तिकं तदा
     जनः स सर्वो मुदितो नृपात्मजे ।
प्रतीक्षते तस्य पुनः स्म निर्गमं
     यथोदयं चन्द्रमसः सरित्पतिः ॥ २२ ॥
ज्यावेळी राजकुमार श्रीराम पित्याच्या जवळ जाण्यासाठी अंतःपुरात प्रविष्ट झाले तेव्हा आनंदमग्न झालेले सर्व लोक बाहेर उभे राहून त्यांच्या पुन्हां बाहेर येण्याची प्रतीक्षा करू लागले. जसा सरितांचा स्वामी समुद्र चंद्रोदयाची प्रतीक्षा करीत राहातो, बरोबर त्याच प्रमाणे. ॥२२॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे सप्तदशः सर्गः ॥ १७ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा सतराव सर्ग पूरा झाला. ॥१७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP